वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेड इन हेवन सीझन १ आवडला होता.
पण सीझन २ बघावासा वाटत नाही.

फारएण्ड, नेटाने २-४ भाग बघ, पात्रं पुढे पुढे एन्गेज करतात आपल्याला. झोया अख्तर अ‍ॅन्ड टीम म्हटल्यावर जी एक बेसिक पातळी असायला हवी, ती आहे, आणि ती चांगली आहे.

मेड ईन हेवन मला सिंगापोरत दिसत नाहिये आता Sad सी१ मी इथंच पाहिला होता पुर्वी!
प्राईम ओरीजिनल असेल तर ते स्वतःचेच कंटेंट पण काढतात का? :बुचकळ्यात पडलेली बाहुली:

४ मोर शॉट्स ३ रा सीझन प्राईम मेंबरशीप असून ही मला दाखवत नव्हते... माजलेत साले - असे मनात म्हटले Sad

Kalkoot (जिओ सिनेमा) पाहून घ्या छान आहे. विजय वर्मा ने मस्त भूमिका निभावली आहे. सर्वच पात्रांचा अभिनय सुंदर. घाई गडबड नाही की cliffhanger म्हणतात ते नाही. सुटसुटीत मालिका आहे. आठ भागात संपते.

स्पोईलर नाहीयेत.खाली लिहिलेल्या मध्ये जितकं कळतं तितकं ट्रेलर मध्येही कळेल.इतरांनीही स्पॉयलर्स देऊ नका ही विनंती.

पाहिले मेड इन हेवन 2 काल रात्री.
चांगले आहे.पण पहिल्यात जास्त ठसठशीत केसेस आहेत.
शिबानी दांडेकर चा वेडिंग ड्रेस आवडला.शोभीता चे सर्व कपडे क्लासि आणि वेगवेगळे आहेत.एकच फॅशन रिपीट वाटत नाही.जॅझ पण चांगली रुळलीय.कनिष्ट मध्यमवर्गीय लहान घरातली मुलगी ड्रेसिंग होतं पहिल्या सिझन ला नोकरीत नवी असताना ते बरंच क्लासि झालंय.अर्जुन माथूर चं पात्र खूप सेल्फ डिस्ट्रक्टक्षन ला गेलंय.
सर्व ब्राईडांचे(मुद्दाम केलंय असं अनेकवचन) वॉर्डरोब जरा टू मच पेस्टल वाटले.तेच बेज आणि ओनीयन पिंक रंग इत्यादी.सुरुवातीच्या 2-3 ब्राईड लुक्स मध्ये सारख्या वाटल्या त्या पेस्टल मुळे.
राधिका आपटे चा रोल आणि तिने दिलेला संदेश दोन्ही आवडले.दिसलीय पण छान.
मोना सिंग ने चांगला अभिनय केलाय.जोहरी ची बायको इतकी छान असेल असं वाटलं नव्हतं Happy

काल Netflix वर क्वार्टरबॅक संपवली. खूपच आवडली. गेल्या वर्षी च्या सुपरबोल मध्ये mahomes, cousins आणि mariota अशा तीन क्वार्टर बॅक ना पूर्ण सीजन फॉलो केलय. जरी तुम्ही अमेरीकन फुटबॉल पाहत नसाल तरी हे व्यावसायिक खेळाडू किती मेहनत घेतात, मॉडर्न डे खेळाच्या मानसिक, शारीरिक डिमांड आणि ते कसे ते हाताळतात हे बघायला engaging आहे. तीन क्वार्टर बॅक चांगले निवडले आहेत. एक सुपरस्टार, एक साधा सरळ कौटुंबिक नवरा (बॉय नेक्स्ट डोर) आणि एक कमनशिबी. वेगवेगळे एपिसोड, मेंटल, under pressure situations वगैरे.
अशा स्पोर्ट्स सिरीज मला खूप आवडतात. या आधी ऑस्ट्रेलिया टीम आणि मुंबई इंडियन्स यांची बघितली होती. पण या. मालिकेत वेगळे वाटले कारण त्यांनी इंडिव्हिज्युअल खेळाडूंना पूर्ण सीजन ला फॉलो केलाय. हा दृष्टिकोन नवीन आणि चांगला वाटला. Peyton manning producer आहे. तो शेवटी दर्शन देण्या पुरता आला असता तर मस्त वाटले असते Happy

वीरप्पन मस्त बनवली आहे. एक प्रकारचा शिरशिरी आणणारा थंडपणा जाणवत रहातो (कदाचित याबद्दल माहिती असल्यामुळेही असेल).

मिकी म्हणजे लिंकन लॉयर, बरोबर.

कोहराचे प्रतिसाद न वाचता बाकी प्रतिसाद वाचणे फार्फार अवघड होते Happy
ती परिक्षा पास होऊन मालिका पाहिली. मस्त तर बनवली आहेच. तो प्र. कु कसा मेला ते मात्र कळले नाही.

कोहरा पाहिली.
आधी पंजाबीतच सुरू झालेली. Happy
चांगली वाटली. आवडली.
काही काही ठिकाणी अचाट वाटली.
जास्त लिहीत गेलो तर spolier असतील.
त्यामुळे इथून पुढे प्रतिसाद spoiler समजून वाचूच नका.

*spolier*

1) garundi पात्र फारच भारी. थोडा इनोसंट आणि प्रामाणिक असलेला. त्याचं त्याच्या वहिनीसोबत अफेअर का होतं ते लक्षात आलं नाही त्यामुळे विअर्ड वाटलं. त्याच्या भावाला माहीत असतं का असेही वाटले.
2) बलबीर आवडला. Acting चांगली.
3) किती जण भडक डोक्याचेच दाखवलेत नुसते. UK मध्ये की कॅनडा मध्ये देखील तो स्टीव्ह पोराला रानटिपणाने हाणतोय, बलबीर त्याच्या घरी आलेल्या निमरतच्या बॉयफ्रेंडला तुडवतोय..
4) पोलिस जरा जास्तच दादागिरी करताना दाखवलेत.
5) हॅपी सारख्या माणसाला तो भैय्या सहजच ब्लॅकमेल करतोय आणि पैसे घेउन त्याच्या हातातील पिस्तुल पाडून मारहाण करून पिस्तुल घेउन पळून जातो हे जरा जास्त वाटलं. अर्थात हॅपी चा बाप आणि त्याच्या मधले तणाव वै चांगले दाखवलेत त्यामुळे तो बेनेफिट ऑ doubt
6) फारएन्ड ने लिहिलेले क्लारा विषयी सहमत, आधी जरी ऐकला नसेल तरी नंतर तरी ऐकला असेलच की voice मेसेज, तो गायब झालाय त्याबद्दल काही महत्वाची माहिती त्यात असेल म्हणून. तरी ती नंतर।पोलिसांना पीळ मारत राहते.
7) गिल चा डायलॉग प्यार बडी ××××× चीज होती है मध्ये बर्याच जणांना बर्याच गोष्टी realise होतात हे मला आवडले. म्हणजे ते तिथवर येउन पोहचलेत पण अडले आहेत तिथे त्या डायलॉग ने त्यांना पुश दिला गोष्टी समजून घ्यायला.
8) साकार, तो नशेडी kulli ह्यांनी पण रंगत आणलीच
Kulli सारखा नशेडी किती धोकादायक !!!!!
9) शिंदा , सरळमार्गी टोटी , शिंदाची बायको हे उपकथानक तितके लांबले नसते तरी चालले असते का असे वाटले
10) बॉलिवूड चित्रपटातील नुसता चमचम करणारा पंजाब आणि इथे दाखवलेला पंजाब ह्यात बराच फरक आहे. इथे चांगला section घेतलाय असे म्हणता येईल
11) लग्नाच्या 2 रात्री आधी वीरा होणाऱ्या नवऱ्याला भेटायला जाते , पास्ट सांगते ,त्यांच्यात इंटिमेंट गोष्टी घडतात हे जरा ओढून ताणून वाटलं.
12) "ती" 2 पात्रे एकमेकांवर प्रेम करत असणार हे आपल्याला लक्षात येतं पण स्टीव्ह आणि त्याच्या बायकोला कसे काय शंका येत नसेल?

बऱ्यावाईट गोष्टीसहित आवडली हे सेरीज.

Kulli सारखा नशेडी किती धोकादायक >>> +१ टाळू वर चा लोणी खाणारा असा वाक्प्रचार ह्यातूनच आला असावा.

Painkiller-Netflix या आधीही तुम्ही फार्मसी कंपनी आणि त्यांच्या गैव्यवहारप्रकरणी मालिका पहिल्या असतील. तशीच ही , Purdue नावाच्या फार्मसी कंपनी बाबत आहे, ज्यांच्या औषधामुळे लोकं अक्षरशः नशेडी होऊन जातात. अतिशय परिणामकारक सिरीज आहे नक्की पाहा

Sony liv वरील Jengaburu Curse चे सात भाग आज बघितले. विषय खूपच विस्कळीतपणे हाताळला आहे. फक्त शेवटचा भाग बघितला तरी काहीही फरक पडणार नाही, उलट वेळ वाचेल.

garundi पात्र फारच भारी. थोडा इनोसंट आणि प्रामाणिक असलेला. त्याचं त्याच्या वहिनीसोबत अफेअर का होतं ते लक्षात आलं नाही त्यामुळे विअर्ड वाटलं. त्याच्या भावाला माहीत असतं का असेही वाटले.>>>>>>>>>> तीच जरा जास्त ऑब्सेस्ड असते त्याच्यासाठी असं वाटलं. तिला वाटत नसतं त्याचं लग्न व्हावं. भावाला माहित असतं. पण बहुतेक प्रॉपर्टीचे हिस्से होतील, तो त्याचा वाटा मागेल लग्न झाल्यावर असं काही वाटल्याने भाऊ काही बोलत नसावा.

काल ताली बिंज वॉच करून पाहिली. कधीची वाट पाहत होते या सीरिज ची. किती सुंदर अभिनय सगळ्यांचा. सुश्मिता तर सुश्मिता वाटतच नाही, गौरीच वाटते. Suvrat was a big surprise. Must watch series.

मेड इन हेवन दुसरा सीझन बघतेय. पहिला अजिबात लक्षात नव्हता. मला पंजाबी कल्चर आणि त्यांचा सगळा शो ऑफ, वेडींग्ज बघून उलटीसारखं काहीतरी व्हायला लागतं. आदिलचं घर आणि ती कोण लंडनहून आलेली फॅमिली त्यांचं घर आवडलं. शोभिता त्या लग्नात पट्टेरी साडीवर फुलांचा ब्लाऊज अशी महान फॅशन करुन मोलकरणीसारखी दिसत असते. बाकी सेक्स वगैरे आहेच तोंडी लावायला.

हो पण तरी नुसता शो ऑफ, नुसते सेक्स सीन्स फॉर द सेक ऑफ इट असे नाहीये. वेडिंग्ज चे सेट, आयडिआज सुंदर आणि क्लासी वाटले मला बरेचसे. सोभिता, करण , जॅझ. मेहर सगळ्यांच्या पर्सनल स्ट्रगल्स चांगल्या घेतल्या आहेत.

मेड इन हेवन बघितला नाहीये पण आत्ताच्या सिझनमधल्या राधिका आपटेच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. ती स्टोरी चांगली आहे का, लग्न सीन प्रोमो चांगला वाटला.

राधिका आपटे चा एपीसोड खरंच छान आहे.त्यातली दुसरी अर्धी लग्न साउथ इंडियन कथा उगीच आहे.
राधिका आपटे च्या कथेत मेसेज आणि लुक्स दोन्ही चांगले आहेत.शेवटी आंबेडकरांचा फोटो स्पष्ट दाखवला आहे.सुंदर चित्रीकरण. मुळात असं बुद्धिस्ट+ आंबेडकर लग्न पडद्यावर पहिल्यांदा दिसलंय.(किंवा इव्हन काही ठराविक लग्न सोडून बाकी एरियात काय काय रीती आहेत आपल्याला माहीत नसतं.पंजाबी बंगाली ख्रिश्चन लग्न खूप ठिकाणी दाखवल्याने आपल्याला माहीत असतं.)

अवांतर: जॅझ आणि कबीर बसराय उर्फ उपेंद्र लिमये चे तरुण आणि चप्पट गाल व्हर्जन यांची कथा रॉस आणि रेचेल पेक्षा पण जास्त गोंधळलेली आहे.

मी मेड इनचे २च एपिसोड्स पाहिले आहेत काल. लोकेशन्स, आयडियाज चांगल्या आहेत पण इन जनरलच बॉलिवूडच्या जोहर, चोप्रा, कपूर वगैरे दिग्गज लोकांमुळे प्ण्जाबी लोकांना जे एक ग्लॅमर प्राप्त झालं आहे त्याची मला शिसारी येते.

राधिका आपटेच्या लग्नात मला न पटलेली गोष्ट म्हणजे ती स्वतःचा उल्लेख "दलित" असा करते?आय डोन्ट थिन्क कोणी स्वतःचाच तसा उल्लेख करत असतील. तिला स्वतःच्या आयडेन्टिटी ला एम्ब्रेस करायचे आहे, ती त्या स्पेसिफिक जातीचे नाव घेईल फार तर. "माझ्या / अमक्या जातीत असते तसे " " बाबासाहेबांच्या पद्धतीचे", किंवा बुद्धिस्ट वेडिंग हे ठीक वाटले असते. मला "दलित वेडिंग " हवे हे ऐकायला चुकीचे वाटले.

ती फॉरिन ची आहे
तिथल्या लोकांना पटकन संदर्भ लागावा म्हणून दलित म्हणायची सवय लावली असेल(शिवाय विशिष्ट जातीचं नाव घेऊन सिरीयल मेकर्स अडचणीत येऊ शकतील)

तिथल्या लोकांना पटकन संदर्भ लागावा म्हणून दलित म्हणायची सवय लावली असेल >>> तसेच असावे. ताज हॉटेल म्हंटले तर भारताबाहेर कळणार नाही म्हणून त्या २६/११ वरच्या पिक्चरचे नाव "हॉटेल मुंबई" केले तसे.

Pages