चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

धनुडी एका स्कुल फ्रेंडने बघितला, तो नेदरलँडमध्ये राहतो, त्याला आवडला. मी थेटरात पिक्चर बघायला काही जात नाही, किंवा क्वचित अगदी जाते, किल्ला आणि भाई (पु.ल. देशपांडे) पार्ट वन बघितलेला, त्यामुळे ओटीटी वर आला आणि आमच्याकडे दिसला तर बघेन, असं आत्तातरी ठरवलं आहे.

माझं ज्ञान एवढं अगाध की मी त्याला विचारलं की कुठल्या ओटीटी वर बघितला, मी समजतेय ओटीटी वर आहे. तो म्हणाला ओटीटी वर वेळ लागेल, थिएटरमध्ये बघितला.

खुफिया: अत्यंत ढिसाळ, लांब, कायच्या काय कथा, कायच्या काय पटकथा, कायच्या काय संवाद... काळाच्या उड्या मला आवडतात, पण इथे ते ही जमलं नाहीये. हव्या तितक्या उड्या मारा पण एकतर ६ महिने आधी, दोन दिवस नंतर असं लिहू नका आणि लिहिलंय तर काही रेफ्रन्स ठेवा....
तब्बू, अली फजल असून विशाल भारद्वाज ने माती खाल्ली आहे.

अच्छा, धन्स अन्जू. ट्रेलर कसा वाटला या धाग्यावर याची लिंक दिसली मला , काल शोधलं. Vaccine war. बघीन मी पण.

खुफिया - कालच्या पेपरात 'खास वि. भा. टच' म्हणून याचं कौतुक वाचलं.
>>>>>
ते पेड रिव्ह्यू असतात.
थिएटरला पिक्चर बघताना पब्लिक जे उत्स्फूर्त शिट्टी आणि टाळ्या वाजवते तेच खरे असते Happy

बरेच दिवस prime वरचा Arrival मूव्ही खुणावत होता .
ट्रेलर मध्ये उडत्या तबकडी चे दर्शन झालेले म्हणलं चला आज अंतराळची सफर करू या म्हणून आज रविवारी दुपारी जेवणानंतर बघायला घेतला आणि कॉलेज लाईफ मधील जाड पुस्तक डोक्याखाली घेवून झोपायचे दिवस आठवले .

त्या एक दीड तासात बराच वेळ मी डूकल्या मारत होतो .
काय ती संथ कथा , काय ते भारतीय आर्ट फिल्म सारखे डायलॉग !
ती उडती तबकडी काही केल्या हलेना , त्यांच्यात आणि आपल्या संशोधक मध्ये सतत सांकेतिक भाषेत संवाद चाललेला .
सिनेमा संपला पण डोळ्या वरून झोप काही केल्या जाईना .
इतर खुपिया बिपिया , बंबई मेरी जान आणि तो अहलावत आणि करीना चा मूव्ही बघून झालेले .
म्हणून arrival बघितला हो !
अजिबात नादी लागू नका मंडळी ......

ओह माय गॉड2 पाहिला.मोठ्या विषयाला हात घातला आहे.15-आणि पुढच्या मुलामुलींना अलावूड हवा होता.(18+ आहे.15 प्लस विथ पॅरेन्ट्स असे रेटिंग हवे होते.)

सुभेदार - खूप दिवस टाळत होतो. आज क्लिक केलंच. सुरूवातीचंच ग्रामीण मराठी जाम खटकलं. बालपण हा शब्द आलाय त्यात. शिवाजी महाराज म्हणून कुणीही असोत तो नट जाम अवघडलेला असतो आणि उगीचच चार पावलं चालताना सुद्धा तडफ दाखवतो. वर पाहताना पण एखादी डान्स स्टेप असल्याप्रमाणे मान उचलायची म्हणजे साईड अँगलने जिरेटोपाचा गोंडा हलताना दिसतो.

महाराजांची एण्ट्री झाल्या झाल्या तिसर्‍या मिनिटाला महाराज गरीब जनतेला पाहून भावुक होतात. कधी डोळ्यात पाणी येतं. कधी हात अचानक पुढे येतो. सतत डोळे ओलावलेले, गहीवर. राजे असेच असतील का ? लोकांच्यात फिरताना रिलॅक्स मधे फिरले नसतील का ?

त्यातच काठपदर असलेली ओढणी सारखी पट्टी डाव्या ख्यांद्यावरून मागे जाऊन उजव्या खांद्यावरून पुढे दंडाला नागिणीसारखा वळसा घालून मनगटाला गुंडाळत पुढे तर्जनीला अडकवलेली. असे चालताना अवघड होणारच. त्या पट्टीचा उपयोग म्हणजे खेडूत जेव्हां धान्याचं दान देतात तेव्हां पदरासारखं पसरून त्यात ते धान्य घेतलं जातं.

बाहुबली २ मधला एक प्रसंग कॉपी केला आहे. फक्त मां जिजाऊ एका शिद्दीचं शीर धडावेगळं करतात. फरशीवर सांडलेलं रक्त हे कुंकवाच्या डागांसारखं दिसतं. मृणाल कुलकर्णी आता घरी सुद्धा " भोजनाची व्यवस्था झाली आहे कि आम्ही पंतांना सांगून मागवू खानावळीतून ?" असंच बोलत असतील.

फारच घोडेछाप दिग्दर्शन. पण अजय देवगण च्या तान्हाजी पेक्षा बरा आहे. वीस मिनिटांनी बंद केला.

अराय व्हल मस्त आहे. टेकिन्ग जरा इन्सेप्शन टाइप आहे म्हण जे इट गो ज बॅक एंड फोर्थ. हिरवीण आहे ती एलिअन्स शी संपर्क साधू शकते. व तिथेच तिला हिरो भेटतो पहिल्या पाच मिनिटातच मुलगी मरते हे दाखवल्याने मी पण उठूनच जाणार होते. पण बसले. मी हा थिएटर मध्ये बघितला आहे. हिरवीण भाषा शास्त्रज्ञ आहे. बारकी मुलगी नेहमी सारखी क्युट आहे. हे मुलगी मरायचं ग्रॅविटी सिनेमात पण घेतले आहे. ( शुद्ध वैताग) सिनेमातली मुलं डोक्यावर मिरे वाटत नाहीत वाट्ट आयांच्या.

हिरो गोड आहे पण जेनेरिक व्हाइट मॅन टाइप. नेहमी प्रमाणे वैश्विक संकट वगैरे मसाला आहे. बॅक ग्राउंड संगीत भारी आहे. पुर्षी आडवे डोके
प णा खूपच आहे. तुम्ही हसू शकता.

प्राइम वर बाँ ड पट रेंट वर होते असे मी इथे मागे लिहिले होते पण काल पाहिले तर फुकट होते. कसिनो रॉयल अर्धा पाहिला.

मग कदाचित माझ्यावर दुपारच्या जेवणाचा परिणाम झाला असावा Happy

संजीवकुमारचा 'कत्ल' बघितला काल यूट्यूबवर. मी लहानपणी बघितला होता आणि आवडलेला. काल बघतानाही आवडला.
संजीवकुमार, सारिका, रंजिता, शत्रुघ्न सिन्हा.
संजीवकुमार आंधळा असतानाही नीट plan करून एक खून करतो. तो ते कसं जमवतो आणि पुढे काय होतं हे चांगलं घेतलं आहे. शत्रुघ्न सिन्हाच्या पात्राला विनोदी झालर का लावली आहे ते समजलं नाही. अभिनय सगळ्यांचा चांगला आहे. संजीवकुमारचा अर्थातच प्रश्नच नाही. त्याचा हा शेवटचा चित्रपट. त्याचं डबिंग थोडं शिल्लक असतानाच संजीवकुमार गेला. उरलेलं डबिंग सुदेश भोसलेने केलं असं वाचलं.

ओह माय गॉड2 पाहिला.मोठ्या विषयाला हात घातला आहे.15-आणि पुढच्या मुलामुलींना अलावूड हवा होता.
>>>>>

अरे मस्त.. हा आला का... थिएटर मध्येच बघायचा होता. पण मुलगी ९ वर्षांची असल्याने जाता आले नाही. मग जवानला गेलो.
आता घरी सुद्धा कधी बघायचा हे बघावे लागेल..

ओह माय गॉड2 ज्यांनी पाहिलाय किंवा पाहणार आहेत त्यांनी review किंवा सविस्तर परीक्षण लिहा म्हणजे लोकांना बघायचं की नाही ते ठरवता येईल.चित्रपटाचा विषय बोल्ड आहे पण महत्वाचा आहे असं ऐकलेलं.

धन्यवाद वावे - संडे नाईट चित्रपट सुचवल्याबद्धल... संजिव कुमार प्लस मिस्ट्री म्हणजे मस्तच असणार.. बघेन...

विषय बोल्ड आहे.पण व्यवस्थित हाताळला आहे. अगदी लहान मुलांसमोर बघता येणार नाही.पण 16 वर्षाच्या किंवा वरच्या मुलांसह नक्की बघावा(किंवा त्यांना एकटं किंवा घरी मित्रांबरोबर बघायचा असल्यास).
वयात येणाऱ्या मुलींना खूप आधार आजूबाजूला मिळतो.पण मुलं (मुलगे) मात्र एकटी पडतात. त्यातून मग शास्त्रीय ज्ञान न मिळाल्याने चुकीच्या साईट्स वरून ज्ञान, चुकीचे युट्युब व्हिडिओ किंवा ती स्पॉन्सरड चिप आर्टिकल असतात (त्याने 'हे' घेतलं आणि प्रेयसी पुढचे 2 तास बघतच राहिली वगैरे या सुरातले) ती वाचून काहितरी समज करून घेणे यातून समाजाचं खूप नुकसान होतं आहे.स्पेशली लहान गावात संदेश पोहोचणं गरजेचं आहे.

ओएमजी २ आवडला , थोडा फिल्मी मेलोड्रामा आहे पण चलता है !
कंप्लिट पंकज त्रिपाठी मुव्ही आहे , अक्शय कुमार कमी दिसतो ही मेन जमेची बाजू , त्रिपाठी साहेब अ‍ॅक्टिंग करतोय असं वाटतच नाही, तसाच वाटतो !
पवन मल्होत्र्॒चं कामही खूप आवडल !
सनातन धर्मं वाले का भडकले होते काय माहित, रिअ‍ॅलिटी चेक झेपला नाही का ?
सुरवातीलाच ते अर्धनग्नं साधू दाखवलेत, तिथपासूनच समाजाचे डबल स्टँडर्ड्स छान दाखवलेत !

मेड इन हेवन सारख्या सिरीज ने एक चुकीची इमेज तयार केली आहे त्यामुळे omg नक्की बघा>>> म्हणजे??
लैंगिक शिक्षण विषय आहे का? अनू च्या पोस्ट वरून तसं वाटतय.

त्रिपाठी ने पूर्ण पिक्चर खाल्लाय. यामी गौतम ला पाहिलं की तिचे दात पाडावेसे वाटतात(ही तिच्या अभिनयाला पोचपावती आहे.)
त्या लहान मुलाने आणि जज पावन मल्होत्रा ने पण मस्त काम केलंय.
फार ऑफेंड व्हावं असं काही वाटलं नाही.तसंतर सनातन ने पार्ट 1 वर जास्त आक्षेप घ्यायला हवा होता.(आठवत नाही, घेतला असेल पण.) अक्षय कुमार जितका आहे त्यात त्याने कमीत कमी अनोयिंग असण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.5० प्लस ला फिजिक आणि तो त्या गाण्यात मारतो त्या उड्या वगैरे साष्टांग दंडवतयोग्य आहे.
हो आशु, तोच विषय आहे.मेड इन हेवन चा क्लास आणि सोसायटी शहरातील खूप हाय आणि वगैरे दाखवल्याने त्यांचे लैंगिक शिक्षण झालेले आहेच.

Netflix वर American made movie पाहिला. टॉम क्रुज चा हा एक सिनेमा पाहिला नव्हता अजून तो बघितला. सत्य घटनेवर आधारित. सत्य कल्पने पेक्षा कितीतरी अधिक विचित्र असते त्याची प्रचिती आली. 80 च्या दशकात कोल्ड war, drug आणि शस्त्रास्त्रे बेकायदा smuggling याच्यात एक पायलट (टॉम) कसा अडकतो किंव्वा स्वतःला अडकून घेतो आणि पुढील एकात एक घटना अशी डार्क कॉमेडी आहे. आणि टॉम ne अतिशय उत्तम अभिनय केला आहे.

Spoiler : मला सारखी Ozark chi आठवण येत होती. घटना क्रम Ozark सारखाच वाटते होता. हा चित्रपट अर्थातच आधी आलेला. आधी बघितला असता तर Ozark चे नावीन्य वाटले नसते.

मी अनु +११
omg2 आवडला पण टीनएजर्स ला कसा कळेल ह्या बद्दल जरा शंकाच आहे. बर्याच गोष्टी त्यांच्या डोक्यावरुन जातील...

यामी गौतमला पाहिलं की तिचे दात पाडावेसे वाटतात
>>>> घाबरले ना मी पुढचे वाक्य वाचेपर्यंत. पण आता बघेन असे वाटते. ओह माय गॉड चा पहिला भाग आवडला होता.

omg2 आवडला पण टीनएजर्स ला कसा कळेल ह्या बद्दल जरा शंकाच आहे. बर्याच गोष्टी त्यांच्या डोक्यावरुन जातील...>>> आजकालच्या टिनएजर्स साठी हा सिनेमा बाळबोध आहे Happy

हो खरंच. याच विषयावर कोटा फॅक्टरी, एआयबी चे मॅन्स बेस्ट फ्रेंड,सलील जमादार चे काही व्हिडीओज यात विनोदी हलक्या प्रकारे चर्चा झालीय.

आपली ऑस्कर एन्ट्री असलेला २०१८ हा मल्याळी सिनेमा बघितला. केरळ मध्ये आलेल्या पूरावर आधारित आहे.
चांगला सिनेमा आहे. पण ऑस्कर मिळण्याच्या तोडीचा नाही वाटला.

Netflix वर Fair Play म्हणून ड्रामा इरॉटिक थ्रिलर आला आहे. फारच आवडला. उत्तम अभिनय सर्वांचाच.

कत्ल बघितला.. शेवट काहीही म्हणजे काहीही आहे... रणजित चे अपार्टमेंट मस्त ... सारिका हॉट दिसलीय....
गाणी नको होती- एक स्पीड थ्रिलर झाला असता.. शत्रू ला उगाच कॉमेडी दाखवलाय...

Pages