Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44        
      
    आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults
शेअर करा
 
 
अच्छा.. मग मला का माहीत नाही
अच्छा.. मग मला का माहीत नाही ते आधीच कळल्यासारखे वाटत होते. म्हणजे बॉडी ईतकी जाळलीय आणि मिळणार नाही असे तो खात्रीपुर्वक बोलूनही सहज मिळतेय तर ती बदललेली दुसरी आहे असेच डोक्यात होते. मला तेव्हा अमिताभचा मजबूर चित्रपटही आठवत होता. कारण तो खुनाचे पुरावे स्वताच बनवतोय हे सुद्धा कळत होते.. फक्त खुनी म्हणून स्वतालाच प्रोजेक्ट करणार हे कळले नव्हते. कुठेतरी क्ष नावाच्या अज्ञात व्यक्तीवर ढकलून तिला केसबाहेर काढेल ईतकेच वाटत होते.
Body nahi re , baakiche
Body nahi re , baakiche puraave .
जाने जा च नाव आधी सस्पेक्ट
जाने जा च नाव आधी सस्पेक्ट एक्स अस होत का? हे नाव बघितल्यासरख वातल नेट्फ्लिक्स वर
जाने जा च नाव आधी सस्पेक्ट
जाने जा च नाव आधी सस्पेक्ट एक्स अस होत का? >>>>>>> हो मी पण नेफ्लि वर रिमाईंडर लावला होता तेव्हा हेच नाव दिसत होतं. नंतर एकदम लोकं जानेजा बद्दल बोलायला लागली तेव्हा कळलं हा सेमच मुव्ही.
अगदीच नावही कॉपी केल्यासारखं वाटेल म्हणून बदललं असेल.
करीना बार मधे गाणं म्हणत् अस
करीना बार मधे गाणं म्हणत् अस ते तेव्हा विजय वर्मा वेटरला विचारतो ही ला पाहिलेस का, तेव्हा तो नाही म्हणतो ना?? मला तेव्हा पासुन वाटत होतं की आता ह्याला कळालं पण कोणाला आठवतं का की तो वेटर नाही म्हणाला की हो?
'नाही' म्हणाला तो अदिती, उगाच
'नाही' म्हणाला तो अदिती, उगाच प्रेक्षकांची दिशाभूल केली आहे. सारखं 'हॉट' सस्पेक्ट म्हणत होते ते, किती अनप्रोफेशेनल. सस्पेक्टला बोलतं करायला ऑलमोस्ट डेटिंगच केले. भूत झलोकिया घातलेले मोमोज काय, कॅरेओके काय.
'सस्पेक्ट' नाव डोक्यात फिट होतं, नेटफ्लिक्सवर काऊंटडाऊन दाखवत होते त्यामुळे. मग अमितचं शशक वाचताना कोणत्यातरी जुन्या पिसेबल 'जानेजां' बद्दल सगळे बोलत असावेत असं वाटलं. तरीही शंका आली की सगळ्यांनी एकदाच जुना 'जानेजां' कसा बघितला. मी बघूनही मला लक्षात आलं नाही. अंजलीला +१
 मी बघूनही मला लक्षात आलं नाही. अंजलीला +१ 
नाही म्हणाला तो अदिती, >>
नाही म्हणाला तो अदिती, >> विजय वर्माने काय विचारला प्रश्न हे आपण इमॅजीन केलय आधीच्या सरधोपट / अती बाळबोध हाताळणीमुळे खरतर
तो प्रश्न - नक्की ? आठव ..बघ ...दुसरी कोणी नव्हती ना? असाही प्रश्न असू शकतोय तो आणि त्यावर त्याचे "नाही नाही दुसरी कोणी नाही" हे उत्तर असू शकतय
बाकी सिनेमाबाबत जाऊद्या आता बघितलाय तर बघितलाय. होणार होते खर्ची तास माझे त्यातल्या त्यात अगदीच काही वाईटातले वाईट नाही बघितले इतकेच समाधान वेळ घालवल्याचे
 त्यातल्या त्यात अगदीच काही वाईटातले वाईट नाही बघितले इतकेच समाधान वेळ घालवल्याचे
जानेजा- बऱ्याच काळानंतर एकही
जानेजा- बऱ्याच काळानंतर एकही शिवी नसलेली वेब सिरीज पहिली...बर वाटलं...नाहीतर आजकालच्या वेबसिरीज म्हणजे संवाद कमी शिव्या जास्त.. कालकूट बघायला सुरवात केली होती विजय वर्मा साठी.पण तो शिव्यांचा भडिमार ऐकून बंद केलं पाहणं...
जानेजा बरी वाटली.. स्लो आहे पण अभिनय सगळ्यांचा छान...तिच्या एक्स ची बॉडी कुठे गेली हे मलाही नाही कळलं.
नरेन केमिस्ट्री प्रोफेसर असता
नरेन केमिस्ट्री प्रोफेसर असता तर म्हटली असती विरघळवली.
नरेन केमिस्ट्री प्रोफेसर असता
नरेन केमिस्ट्री प्रोफेसर असता तर म्हटली असती विरघळवली >>>> पण तो maths professor असल्याने , त्याने problem solve केलाचं
्चेहरा लपवत पळणारी बाहुली.
सगळे चांगले अॅक्टर्स असूनही
सगळे चांगले अॅक्टर्स असूनही पकड घेत नाही कथा>>> बहुतेक काहींचे असे मत असावे. पण उलट मला अगदी इंटरेस्टींग वाटली कथा आणि हाताळणी. खूप आवडला मला. भला मोठ्ठा एक फ्लॉ असून ही. इतके क्राईम पॅट्रोल बघत बसल्याने चुटकी सरशी फ्लॉ दिसतात चाणाक्ष का काय ते प्रेक्षका ला. पण पुर्ण मुव्ही बनवणार्या ला कळत नाही.
कहानी सोडला तर लूप होल अजिबात नसलेला दुसरा चांगला मुव्ही आठवत नाही.
मलाही त्या दोघांच्या
मलाही त्या दोघांच्या अभिनयामुळे आवडला. शेवट विशेष नव्हता व करिनाच्या ऐवजी दुसरी आवडली असती पण ठीक आहे.
भला मोठ्ठा एक फ्लॉ >> नाही समजला. काय होता?
जाने जा स्पॉइलर अलर्ट
जाने जा स्पॉइलर अलर्ट
.
.
.
.
अजित पोलिसात होता (तसे नसते तरीही त्याच्य पोलिस मेडीकल रीपोर्टात त्याचा ब्लड ग्रूप असणारच) जी भिकार्याची बॉडी मिळाली तीचे डीएने रक्त काहीही न तपासता सरळ बॉडी पोलिसाचे ओळखपत्र मिळाल्याने अजित ची घोषित करतात का पोस्ट मॉर्टेम वाले? ते काय च्या काय वाटले..
DNA चेक करतात ना केस मिळतात
DNA चेक करतात ना केस मिळतात त्यावरून
योगिशा एक्स नो केनशिन
योगिशा एक्स नो केनशिन (डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स) कादंबरी/चित्रपट स्पॉइलर
जाने जा अजून पाहिला नाही पण मूळ जपानी कादंबरी वाचली आणि चित्रपट बघितला आहे. त्यामध्ये काही काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्याने शेवटची ट्रॅजेडी ठसते.
१) बर्याच वर्षांनंतर जेव्हा युकावा (विजय वर्माचे कॅरेक्टर) आणि इशिगामी (जयदीप अहलावतचे कॅरेक्टर) भेटतात तेव्हा इशिगामीची पहिली प्रतिक्रिया असते की तू अजूनही तरुण कसा काय दिसतोस? युकावाला तिथेच समजते की इशिगामीच्या आयुष्यात गणित सोडून इतर इंटरेस्ट निर्माण झाले आहेत कारण पूर्वीच्या इशिगामीने अशी प्रतिक्रिया कधीच दिली नसती.
२) जेव्हा इशिगामीची चौकशी सुरु होते तेव्हा इशिगामीच्या तोंडी वाक्य आहे "किका नो मोनदाई मिएते जित्सु वा कान्सु नो मोनदाई" (जो प्रश्न भूमितीचा दिसतो तो प्रत्यक्षात (बीजगणितातील) फंक्शनचा प्रश्न आहे). इथे इशिगामीचा गर्भितार्थ "दिसतं तसं नसतं" हा आहे. त्याक्षणी युकावा प्रथम ही शक्यता विचारात घेतो की बॉडी ज्याची दिसते/वाटते, त्याची नाही.
३) ओरिजिनलमध्ये नवर्याची डेडबॉडी समुद्रात फेकून दिलेली असते. पण तिचा नवरा बेसिकली एक भुरटा चोर असल्याने त्याचे फारसे काही रेकॉर्ड नसते त्यामुळे बाय चान्स ती बॉडी सापडली तरी काही उपयोग होणार नाही. इशिगामीने ही शक्यता आधीच लक्षात घेतलेली असते. एका होमलेस माणसाची निवड करण्यामागे नवर्याप्रमाणेच रेकॉर्ड नसणे हे एक आणखी कारण!
४) इशिगामी शेवटपर्यंत यासुकोला (करीना कपूरचे कॅरेक्टर) सत्य/त्याने नक्की काय केले ते सांगत नाही. त्याची पक्की समजूत असते की यासुकोला तो आवडणार नाही आणि तो स्वत:चे मन तिच्याकडे मोकळे करत नाही. युकावाला काय घडले असेल ते लक्षात येते पण तो ते सिद्ध करू शकत नाही. जेव्हा यासुकोला युकावाकडून सत्य समजते, तेव्हा ती स्वत:हून आपल्या गुन्ह्याची कबुली देते. ती इशिगामीला सांगते की त्याला गमावून ती सुखी राहू शकत नाही तरी जी काही शिक्षा असेल तिला आपण जोडीने सामोरे जाऊ. हे समजल्यानंतर इशिगामी एकीकडे सुखावतो - अखेर त्याला प्रेम गवसले - पण यासुकोला तो शिक्षेपासून वाचवू शकला नाही हे लक्षात येऊन तो दु:खी होतो. जर त्या दोघांनी आधीच एकमेकांकडे मन मोकळे केले असते (हे कादंबरीत अधिक ठसते) तर इशिगामीने नवर्याचा बंदोबस्त करण्याचा दुसरा एखादा अहिंसक मार्ग शोधला असता. त्यामुळे एक टाळता येण्याजोगा गुन्हा लपवण्याच्या नादात तो त्याहून भयंकर गुन्हा करून बसतो आणि एवढे करूनही सत्य बाहेर येतेच ही त्याच्या आयुष्याची ट्रॅजेडी!
यातला डिटेक्टिव्ह मानाबु युकावा एक फिजिक्स प्रोफेसर आहे आणि त्याच्या केसेसची "गॅलिलिओ सिरीज" म्हणून बरीच मोठी मालिका आहे. सस्पेक्ट एक्स त्यामध्ये अपवादात्मक केस आहे कारण जनरली त्याच्या केसेस साय-फाय मध्ये मोडतात.
कादंबरी आणि मूळ पिक्चर भारी
कादंबरी आणि मूळ पिक्चर भारी दिसतोय..
पायस
पायस
छान पोस्ट आहे.
मला सिनेमा आवडला पण टीचर चे पात्र फार स्टिफ आणि अन नॅचरल वाटत होते.. तशीच गरज असेल कदाचित असही वाटलं. पण आता पायस यांची पोस्ट वाचून लक्षात आलं. जपानी charactor असेच असायला हवे होते. काहीच न सांगणारा, एकदम stif body language. साधे काळे सूट, आणि रोज एकच रूटीन असणारा. मध्येच असलेला dojo चा उल्लेख किंवा रोज तिथे जाणे हे सगळे आता एकदम बरोबर वाटतेय.
विजय वर्मा फ्लर्ट करताना दाखवला नसता तर कदाचित जास्त चांगलं वाटलं असतं...
Maths and chess च्या उल्लेखामुळे
एका क्षणी जेव्हा १० वर्ष एक प्रॉब्लेम सोडवत होतो तो सुटला असं टीचर म्हणतो तेव्हा मला वेगळा प्लॉट वाटला .. म्हणजे टीचर १०वर्ष करिनावर पाळत ठेवून आहे, अनेक प्लॅनिंग करून तो तिचा शेजारी झाला , मग नवऱ्याला त्यानेच इथे बोलावून तो मरेल असा प्लॅन केला आणि त्यातून सोडवायला करिनाच्या गुड बुक्स मध्ये आला वगैरे..
शेवटी खरंतर काहीच वेगळं घडत नाही, पण तो n=np वाला टीचरचा फंडा छान अप्लाय करताना दाखवला आहे..
पायस ईंटरेस्टींग पोस्ट.
पायस ईंटरेस्टींग पोस्ट.
विजय वर्मा फ्लर्ट करताना दाखवला नसता तर कदाचित जास्त चांगलं वाटलं असतं>>> हिंदी चित्रपटांची लिबर्टी..
विजय वर्मा फ्लर्ट करताना
विजय वर्मा फ्लर्ट करताना दाखवला नसता तर कदाचित जास्त चांगलं वाटलं असतं...>> १० वर्ष सोडवत असलेल गणित दुसरा कोणी ४८ तासापुर्वीच सोडवून मोकळा झालाय ना ते हेच गणित असाव करिनाच हृदय. वर्मा फ्लर्ट करुन दोन दिवसात जवळीक साधतो हा १० वर्ष प्रयत्न करत होता. असं काही असणार दाखवायचं
 वर्मा फ्लर्ट करुन दोन दिवसात जवळीक साधतो हा १० वर्ष प्रयत्न करत होता. असं काही असणार दाखवायचं
कविन तथ्य आहे.
कविन तथ्य आहे.
कविन, तसं नसेल कारण टीचर ते
कविन, तसं नसेल कारण टीचर ते गणित आपल्या पूर्वी दुसऱ्याने सोडवलं म्हणून एक निर्णय घेणार असतो ते दृश्य विजय वर्मा येण्याच्या आधी आहे.त्यामुळे खरंच गणित असेल बहुतेक.
हो, ते दहा वर्षांचे गणित खरे
हो, ते दहा वर्षांचे गणित खरे होते.
त्यानंतर पंधरा वर्षांचे सोडवायला आत गेला.
माझे जे गणितावर थोडेफार प्रेम होते ते उडाले हे बघून.
कविन
कविन
मला ठीक वाटला जाने जान. शेवट
मला ठीक वाटला जाने जान. शेवट लेट डाऊन करणारा. भिकार्याला मारलं एक सोडलं तर शेवटचा दिवस रिक्रिएट करणार हे समजलंच होतं. मला आणखी काही क्रिपी असेल वाटलेलं. इक्वॅलिटी दाखवायला गणिताचा शिक्षक कशाला लागतो!
एकदा पाहायला सुरुवात केली की
एकदा पाहायला सुरुवात केली की तुम्ही जाने जा मूव्ही थांबवू शकत नाही , हे मात्र नक्की !
हल्ली ओटीटी वर चांगल्या कथानकाचे मूव्ही येत आहेत .
आलिया चा डार्लिंग असू द्या किँवा राजकुमार चा ओ माय डार्लिंग .
फक्त ओटीटी साठी बनवलेल्या मूव्ही मध्ये ग्लॅमरस नसते पण कथा सशक्त असतात.......
मुळात खून लपवायला इतका खटाटोप
मुळात खून लपवायला इतका खटाटोप का केला? पोलिसांना बोलावून स्वसंरक्षणाचं कारण देता आलं नसतं का? नवर्याच्या बॉडीचं काय झालं?
मूळ गोष्टीत नवरा भुरटा चोर होता तर सिनेमात त्याला पोलिस का केला?
पोलीस वरीष्ठांना हिंदी सिनेमांमध्ये फोनवरून 'जल्दी पता लगाओ' म्हणून ओरडण्यापलीकडे काही काम का नसतं? तपास कसा चालतो/चालायला हवा हे त्यांना माहीत नसतं का?
अजाईल मॉडेल फॉलो करत असतील
अजाईल मॉडेल फॉलो करत असतील हल्ली पोलिस. मॉर्निंग स्टॅंड अपला काही बोलण्यासारखं नसलं की असं ओरडण्याशिवाय वरिष्ठ काय करतात?

माझा मॅनेजर पण पुढच्या चार स्प्रिंटची एस्टिमेट आजच मागून जीव मेटाकुटीला आणतो. त्याला का माहित नाही की जोवर गटारात हात घालत नाही तोवर कॅन ऑफ वर्म्स बाहेर येत नाहीत. पण नाही!!!!
स्वाती +1
स्वाती +1
शिवाय मूळ बॉडी पारच गायब केलीय तर मग दुसऱ्या खूनाची, त्याची सगळी तयारी(तिकिटं अँड ऑल), त्याचं बालंट स्वत: वर घ्यायची वगैरे गरजच नव्हती.
हा एक असू शकतं, 15 वर्ष सरकारच्या पैशात राहून निवांत गणिताचा प्रॉब्लेम सोडवता येईल
पायस - इंटरेस्टिंग माहिती.
पायस - इंटरेस्टिंग माहिती.
मी पहिली सुमारे २० मिनीटे पाहिला आहे. पुढे अजून पाहिला नाही. तो तोच्या नवर्याचे काम केलेला अॅक्टर अचानक दिसू लागला आहे. बम्बई मेरी जान वेब सिरीज मधे त्याने हाजी मस्तानचा रोल केला आहे.
>>> 15 वर्ष सरकारच्या पैशात
>>> 15 वर्ष सरकारच्या पैशात राहून निवांत गणिताचा प्रॉब्लेम सोडवता येईल
हो, आणि एवीतेवी जीव द्यायला निघालेलाच असतो - म्हणजे अगदी फाशी झाली तरी ते जीव जाणं (करीनाला मदत करून) सत्कारणी लागेल असा काहीतरी विचार असावा.
अमित
Pages