२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार

Submitted by निंबुडा on 6 August, 2010 - 00:49

२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार

बाळ ५-६ महिन्यांचे झाले कि हळू हळू आपण त्याला दूधाव्यतिरिक्तचे अन्न पदार्थ द्यायला सुरुवात करतो. घरात वडीलधारी माणसे असतील तर नक्की कशापासून आणि किती प्रमाणात सुरुवात करायची या बाबतीत मार्गदर्शन मिळते. पण बर्‍याच आयांना (विशेषतः सेपरेट कुटुंबातील) ते कसे करावेत याची माहीती असेलच असे नाही. अन्यथा मैत्रिणी / पुस्तके / आंतर्जाल इ. वर हवाला ठेवावा लागतो.

मूल साधारण १ वर्षाचे झाले की त्याला आपण जेवतो ते सर्व अन्न पदार्थ (भाजी + वरणभात + पोळी etc) देता येतात. अर्थातच कमी तिखटाचे. ५ महिने ते २ वर्ष काय काय पदार्थ देता येतील, ते करण्याची कृती काय, कोणत्या वेळेला काय काय देता येईल, काय काय पचू शकेल,अजून दात न आलेल्या, किंवा २-३ दात आलेल्या १ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीचे स्पेशल खाऊचे प्रकार, मूल २ वर्षांचे होईपर्यंत हळू हळू आहारात बदल करून मोठ्यांसारखे सर्व अन्नपदार्थ खायला लागणे इ. बद्दलची माहीती व प्रश्नोत्तरांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बीबी! उपयुक्त टीप्स, खाऊ ज्यातून भरवायचा ती utensils etc या विषयीची माहीती ही शेअर करु या.

सर्व would be mothers ना आणि ज्यांची बाळे ५ महिने ते २ वर्ष या वयोगटात मोडतात त्या पालकांना हे फायद्याचे ठरेल असे वाटतेय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी लेक १.५ वर्षाची आहे. खायचा खूप कन्टाळा करते. भाताची पेज, नाचणी सत्त्व, खिचडी, दलिया, चपाती, ई. सर्व प्रयत्न करुन झाले. पण तेच. पेजेची वाटी बघूनच रडायला सुरुवात करते. डोसा, शिरा, वै. देखिल फारसे आवडत नाहित. बळजबरी ने भरवायला गेलं तर खूप हमसुन रडते. काय करावे?

सानीसा,

लक्ष दुसरीकडे वळवून (उदा समोर कुणीतरी हातात खेळणे धरून उभे राहून किवा गाणे म्हणत किंवा मोबाईल वर लहान मुलांची व्हीडीओ साँग्स प्ले करून अस काहीसं) भरवायचा प्रयत्न करून पाहिला आहात का?

माझी मुलगी 10 महीन्याची आहे...पन चिकट शि करते...तिला मी सफरचंद उकडुन देते आणि खिचडी भाताची पेज एवढच देते...चिकट शि का करते plz सांगा

नमस्कार,मी मायबोलीवर नवीन आहे.
Maze bal 11 mahinyache aahe. 15 diwsapurvi paryant to batline(formula milk) dudh pit hota (3wela) shiway 4 wela solids pan khaycha. Diwasbharat sadharan 400 ml pyaycha.
Gele 8 diwas to ajibat dudh pit nahi. Batli tondala lawli ki dhaklun deto, agdich ghetli tar jemtem 30 te 60 ml gheto. Diwasbharche 100 ml peksha jast batline pitach nahi. Sippy cup ne pan nit pit nahi.
Sadhya dat yet ahet. konala asa anubhaw ala ahe ka?

हो,चालेल की
थोडं तूप,कधी किंचित मिरपूड पण चालेल

७ महिन्याच्या बाळाला गायीचं दूध द्यायला सुरूवात करावी का? कसं द्यावं? पाणी घालावं का? वावडिंग घालतात असंही ऐकलंय.

७ महिन्याच्या बाळाला गायीचं दूध द्यायला सुरूवात करावी का? कसं द्यावं? पाणी घालावं का?>>> प्रथम बाहेरचे दूध देताना पाणी घालून द्यावे.१५ दिवसांनी पाण्याचे प्रमाण कमी करावे.तसेही गाईचे दूध पातळ असते.तरी काळजी घेतलेली बरी.बाळाला सेमीसॉलीड फूड चालू केले नाही का?

वरण भात, व्हेजिटेबल स्टोकमध्ये किंचित हळद हिंग घालावा का ?>>>> हो तूप्,लिंबू अवश्य घालावे.

वावडिंग म्हणजे काय?>>>> गुटीमधे छोटे छोटे दाणे असतात.
बाळाला सेमीसॉलीड फूड चालू केले नाही का?>>>>> भरडी, उकडलेला भोपळा, गाजर, नाचणीचे सत्व चालू केलेय कधीच. पण फॉर्म्युला मिल्क सोडून गायीचं दूध चालू करावं असं सुचवलंय.

वावडींग टाकून दूध, पाणी उकळले की ते पचायला हलके होते.
मी लेकीला म्हशीचे दूध देते ते ही पाच मिनिटं वावडींग टाकून उकळते.

आमचा मुलगा आठ महिन्यांचा होईल. सध्या आम्ही त्याला दिवसभरात दर दोन तासाने नाचणी सत्व, मखाणे-ओट्सची खीर, वेगवेगळ्या फळांच्या प्युरीज, खिचडी असे खायला देत असतो. तो सगळे आवडीने खातो. शिवाय रात्री सिमिलॅकचे फॉर्म्युला दुध देतो दर दोन तासांनी. इथे अमेरिकेत मिळते ते ऑर्गॅनिक दुध सध्या देता येऊ शकते का? कोणते दुध बाळासाठी चांगले ठरेल?
तो दुधासाठी फार कासाविस होतो, रात्री किमान ५-६ वेळा दुधासाठी रडत उठतो. असे वाटते की त्याला ते दुध पुरवणी येत नाहीये.

इथे अमेरिकेत मिळते ते ऑर्गॅनिक दुध सध्या देता येऊ शकते का?>>>
नऊ ते बारा महिन्याच्या बाळाला हळुहळु दूध सुरु करता येते पण तेही फॉर्म्युला देऊन टाळावे. गाईच्या दुधात DHA- ARA पुरेसं नसतं. पचायलाही जड असतं . Enfamil, nestle , similac अनेक दूध पावडर मिळतात. बाळाच्या pediatricianलाही विचारून बघा. रात्री झोपताना सॉलिड फूड देऊन झोपवलं तर ? जास्त वेळ झोपेल कदाचित.

>>>>>>शिवाय रात्री सिमिलॅकचे फॉर्म्युला दुध देतो दर दोन तासांनी.
आईचं दूध दर २ तासाला लागतं कारण बाळाची पाण्याचीही गरज भागते. पहील्यांदा दाट येतं व शेवटी पातळ की अदर वे राऊंड - असं काहीसं वाचलेलं. पण फॉर्म्युला जड असावा. ते दर २ तासाला लागतं का माहीत नाही.
बाळाचं पोट दुखत असेल. जरुर बालरोगतज्ज्ञांना (pediatrician) कन्सल्ट करा.

पालकत्वाबाबत मला माझं मत समोरच्यावर फोर्स करणं पटत नाही म्हणून >>> एकदम सहमत म्हणूनच इतर काही सल्ला देण्याऐवजी बाळाच्या पेडिला विचारा असं लिहिलं.

Pages