पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स प्रीति,मिनोती!
मी गरम न टाकता साधेच पाणी टाकते नेहमी. १५-२० मिनीटांनी लोणी व पाणी वेगळे होते. लोणी पाण्यावर तरंगते पण गोळा नाही होत.

तुम्ही सांगितले म्हणुन काल गार पाणी टाकले तर होईच ना.... किती वेळ घुसळले तर क्रिमसारखे झाले. लोणी तर नावाला पण नाही झाले. मग तसेच ठेवले नॉर्मल टेंपरेचरला आल्यावर पुन्हा घुसळल्यावर नेहमीसारखेच लोणी झाले... गोळा नाही.

पाणी किती टाकायचे असते साधारण आणी थंड पाणी टाकायचे तर मग माझे कसे चुकले?

माझी आई ताक घुसळून झाल्यावर (फ्रीजमधल्या) बर्फाचे ४-५ तुकडे टाकायची घुसळलेल्या ताकात, १०-१५ मिनीटांनी सगळे लोणी तरंगुन वर यायचे असे अंधुकस आठवतय मला.

कधी कधी दूधातच सिग्ध पदार्थ कमीच असतात, अश्या दूधाच्या ताकाला लोणी येत नाही. घुसळता घुसळता रविने लोणी एका बाजूला करत रहायचेपारविने घुसळताना थंडच पाणी घाल्याचे

मला पाकिस्तानी पद्ध्तीने मट्ण करीची रेसीपी हवी आहे. कोणी सांगु शकेल का?
( पाकिस्तानी का? तर सेम पद्ध्तीची दोन वेगवेगळ्या पाकिस्तानी रेस्टराँट मध्ये खाल्ली म्हणुन. ती पाकिस्तानी की मुस्लीम पद्ध्त आहे ते माहीत नाही.)

स्वाती, मी पाकिस्तानी नाही करत पण एका मुस्लीम मैत्रीणीची रेसेपी व आपली कोंकणी अशी मिक्स करून एक झकास बनते असे फ्रेंड्स्चे म्हणणे आहे, ती देवू का?

मनःस्विनी , प्लीज तुमची रेसिपी सांगाल का? नेहमीच्याच २-३ पद्धतीने मटन करुन ,खाऊन कंटाळा येतो.

तुमच्या २-३ रेसिपी मी ट्राय केल्यात, झकास झाल्या होत्या. (विशेषतः दिवळी फराळातली 'झटपट रवा लाडू' मस्तच) Happy

तुम्ही आहारशास्त्र व पाकृ चे सदस्य असाल तर दिसायला पाहिजे. आता ट्राय करा. मी ग्रूप सार्वजनिक केला ह्या लिंकचा.

रूनी पॉटर ,दिनेशदा धन्यवाद !
१५-२० मिनीटानी शुभ्र लोणी पाण्यापासुन पुर्णपणे वेगळे होऊन तरंगुन वर येतेच. पण गोळा होत नाही तिथेच गाडी अडतेय.
पुढ्च्यावेळी करताना तुम्ही सांगताय तसे करुन बघते.

गोळा होणया साठी गार पाणी घालून ठेवल्यावर मग रवी एका दिशेने फिरवली तर ते लोणी जमते. न घुसळता. घुसळले तर परत गरम होइल व द्रवात मिसळेल.

<<हे पान पहायची परवानगी नाही.>> म्हणजे नक्की काय ? पुष्कळवेळा असच झाल आहे , म्हणजे आम्हाला वाचायच असेल तर काय करावे...

मला खरिकची खिर कशी बनवतात ते सांगाल का ?
लहान मुलांसाठी मुगाच्या डाळीचा शिरा / खिर बनवता येईल का? कसा ..

माझ्याकडे छोल्यामैवजी या वेळी वालपापडी अस लिहिलेल धान्य आलय. मोठ्या मोठ्या चपट्या आकाराच आहे, आज मी ते सकाळी भीजत घातल. पण त्याच काय करतात माहीत आहे का कोणाला?

हि हि अग धन्यवाद कसले..हो वांग बटाटा करतो तशिच ..स्पेसिफिक रेसिपी नाहिये...आणि वालपापडी शिजायला वेळ लागतो..त्यामुळे ती आणि हवे तर वांग फोडणि करुन मग वाफ आण्..शिजल्यावर मिठ, थोडा गुळ, गोडा मसाला आणि आई जिरे खोबरे लावते , हव तर दाण्याचे कुट...मस्त खमंग लागते..करुन बघ्..आणि सांग Happy

नक्किच . उद्याच करणारे त्याला उद्या सकाळपर्यन्त मोड येतील ना? [मोड आणायचे ना?]. आणि मग लगेच सांगते तुला.

juyee
तुम्ही आहारशास्त्र आणि पाककृती या ग्रूपचे सदस्यत्व घ्या, काही काही पाककृती फक्त ग्रूप मध्ये सामील झाल्यानंतर दिसतात. तुम्हाला पाककृती बघतांना "हे पान बघायची परवानगी नाही" असे येते ते त्याच कारणासाठी. तुम्ही सभासद झालात की तो मेसेज येणार नाही.

Pages