पावसाळी कविता (एक धागा हौशी कवींसाठी)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 August, 2014 - 14:35

पाऊस येतो आपल्या मर्जीने !
पाऊस जातो आपल्या मर्जीने !!
लोकं मात्र भिजतात आपल्याच हलगर्जीने ..

मी कवी नाहीये. पण तो बरसायला सुरुवात झाली की आपसूक शब्दांचेही ढग मनी दाटून येतात. अन त्याच्यासंगे रिते होतात.

लोकं पण ना, कमाल करतात,
चार थेंब नाही पडले, तर छत्री खोलतात ..

जेव्हा आभाळ कोरडे पडते, तेव्हा "धावा" करतात ..
जेव्हा बरसू लागते, यांच्या "विकेट" पडतात !

- कवी ऋन्मेऽऽष

असू द्या असू द्या ...
तर माझ्यासारखे पावसाळी कवी मायबोलीवर कैक असतील. आपल्या सर्वांसाठी म्हणून हा धागा. कविता वाचायला आवडणार्‍यांसाठी नाही, तर कविता (न लाजता) रचायला आवडणार्‍यांसाठी. कोणीच नाही लिहिले तर माझी मी भर घालत राहीलच. तरीही कोणी नावाजलेल्या कवींच्या फसलेल्या पावसाळी कविता त्यांना शेपरेट धागा काढून प्रकाशित कराव्याश्या वाटत नसतील तर त्या कृपया इथे येऊ द्या. जर असा एखादा धागा मायबोलीवर आधीच असेल तर कृपया त्याच्या लिंका शोधायचा त्रास घेण्यापेक्षा काही ताज्या ताज्या पावसाळी चारोळ्या रचून ईथे भर घाला. पावसाळा उलटून दोन महिने झाल्यावर हा धागा काढला म्हणून,
दिलगीर आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर, शर्मिला. हीच कविता अजून एक्स्पांड करूयात का?

पावसानं घरकुल कोसळल्याचं
लोकं बोललेत..
पण ते आधीच ढासळतांना पाहिलंय मी....

झाडाचं पान अलगदच
पिकून खाली पडलंय...
पण वादळात निडरपणे सळसळताना पाहिलंय मी.

झाडाचं पान अलगदच
पिकून खाली पडलं...
पण वादळात निडरपणे सळसळताना पाहिलंय मी.>>>>
खूप सुंदर, हरचंद पालव.

पावसामुळे चाकरमान्यांचे हाल
अशा बातम्या पेपरात
पण चाकरमान्यांना कायम बिड्या फुंकतानाच पाहिलंय मी.
पण चाकरमान्यांना तर कायमच दु:खात पिचताना पाहिलंय मी (घ्या... चाकरमान्यांसाठी दोन टाळ्या... आपलं अश्रू तर ढाळलेच पायजेल)
अशा रिसायकल्ड बातम्यांमुळेही पेपरचा खप हुकमी वाढताना पाहिलंय मी

हवी ती घ्या! Wink Proud

पावसात कांदा भज्यांचे फोटो
सगळेच टाकतात
ओले कांदे न विकता आल्याने डोळ्यात पाणी... पाहिलंय मी!

काय संबंध! पण घ्या! आज सेंटी रतीब! आणखी जरा सेल्फ लोदिंग करायचं असेल तर
ओले कांदे न विकता आल्याने डोळ्यात पाणी... पुसलंय मी!
:माफ करा मला:

अमित Lol Lol

त्या एका थेंबाने ...

तप्त धरणी शांत झाली
चातकाची चोच मिटवली
मयूरपंखांना मिळाली नवी झळाळी
शेतकऱ्याची आशा जागवली
माळ्यावरची छत्री खाली आली

त्या एका थेंबाने,
चराचरावर किमया केली

#थेंब #चारोळीलेखन

पाऊस आला की ३ गोष्टी हमखास उगवतात जिकडेतिकडे
एक म्हणजे भूछत्रे, दुसरे बेडूक आणि तिसरे हौशी कवडे
पैकी भूछत्रे आणि बेडूक असती बिचारे निरुपद्रवी
परंतु हवसे गवसे नवकवि - दॅटस अ होल डिफरन्ट स्टोरी Wink

बर्‍याच कल्पना आहेत पण शब्द बसत नाहीयेत चालीत Sad
पाऊस - एक प्रियकर
पाऊस - एक एन्ट्री भावखाऊ नट
पाऊस - सेडिस्ट
पाऊस - मनकवडा(क्वचित)

पैकी भूछत्रे आणि बेडूक असती बिचारे निरुपद्रवी
परंतु हवसे गवसे नवकवि - दॅटस अ होल डिफरन्ट स्टोरी Wink

नवीन Submitted by सामो on 14 September, 2023 - 13:56>>>>
Lol Lol Lol
सामो चांगले शालजोडीतले हाणलेत .

पहीले शहाळे एकत्र पिताना, विद्याविहार वेस्ट स्थानकाजवळ .....
पावसाने पकडलेले आपल्याला,
आणि डोळे मिचकावत म्हणालेला
'लग्न तर होउ द्या, मग बोला'
.
आता लग्न होउन २५ वर्षे झाली .....,
आपण अजुन जाब विचारतोय
एवढं माहीती होतं तर तेव्हाच का नाही स्पष्ट वॉर्न केलस?
बेअक्कल, सेडिस्ट पाऊस कुठला !
.
पण नाही कोड्यात बोलायची याची सवय
केवढी महाग आपल्याला पडलेली
आपणच अक्कल गहाण ठेवलेली
विद्याविहार वेस्ट स्थानकाजवळ , पहीले शहाळे एकत्र पिताना Wink

आता कविताच्या दर्जाचा बार खूप खाली आणलाय तेव्हा लाजू नये. बिन्धास्त होउन जाउ द्या ......

टुकार कविता करणार मन
चकार शब्द मानायला तयार नसतं...
त्यामुळे सगळी काम करतो,
पण कविता आवर
हाच नवकविच्या घरी
गजर असतो.
Lol Lol Lol Lol

पहीले शहाळे एकत्र पिताना, विद्याविहार वेस्ट स्थानकाजवळ .....
>>>

एवढे स्थानकासह डीटेलिंग ते सुद्धा बोल्ड करून म्हणजे नक्कीच भूतकाळात हात घालून काहीतरी काढलेय..
सूनवायचे असावे दुसऱ्या कोणालाच, उगाच पावसाला यात ओढलेय Proud

Pages