पावसाळी कविता (एक धागा हौशी कवींसाठी)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 August, 2014 - 14:35

पाऊस येतो आपल्या मर्जीने !
पाऊस जातो आपल्या मर्जीने !!
लोकं मात्र भिजतात आपल्याच हलगर्जीने ..

मी कवी नाहीये. पण तो बरसायला सुरुवात झाली की आपसूक शब्दांचेही ढग मनी दाटून येतात. अन त्याच्यासंगे रिते होतात.

लोकं पण ना, कमाल करतात,
चार थेंब नाही पडले, तर छत्री खोलतात ..

जेव्हा आभाळ कोरडे पडते, तेव्हा "धावा" करतात ..
जेव्हा बरसू लागते, यांच्या "विकेट" पडतात !

- कवी ऋन्मेऽऽष

असू द्या असू द्या ...
तर माझ्यासारखे पावसाळी कवी मायबोलीवर कैक असतील. आपल्या सर्वांसाठी म्हणून हा धागा. कविता वाचायला आवडणार्‍यांसाठी नाही, तर कविता (न लाजता) रचायला आवडणार्‍यांसाठी. कोणीच नाही लिहिले तर माझी मी भर घालत राहीलच. तरीही कोणी नावाजलेल्या कवींच्या फसलेल्या पावसाळी कविता त्यांना शेपरेट धागा काढून प्रकाशित कराव्याश्या वाटत नसतील तर त्या कृपया इथे येऊ द्या. जर असा एखादा धागा मायबोलीवर आधीच असेल तर कृपया त्याच्या लिंका शोधायचा त्रास घेण्यापेक्षा काही ताज्या ताज्या पावसाळी चारोळ्या रचून ईथे भर घाला. पावसाळा उलटून दोन महिने झाल्यावर हा धागा काढला म्हणून,
दिलगीर आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेषची कविता पुढे कंटिन्यू करते Proud
-----

भिजवून टाकायला चार थेंब पुरतात
एक तनावर
एक मनावर
दोन तरीही उरतात ...
एक शिशिरावर
एक ग्रीष्मावर
पुढच्या पावसापर्यंतची बेगमी करतात

डिविनिता .. धन्यवाद .. आवडेल त्यालाच चांगले बोलल्याबद्दल Proud

आश्विनी .. वाह वा पर्रफेक्ट ! अर्थ आणलात, नाहीतर ते दोन थेंब वाहूनच जायचे होते.
(आणि माझ्या ओळी कंटिन्यू कराव्याश्या वाटल्या म्हणून जरा माझीही पाठ थोपटतो Wink )

पहिलं पहिलं प्रेम
सांवर रे मना
पहिल्या पावसाचंही सेम
तू कोसळ रे घना..

....
...

आज मुंबईत पैल्यावैल्या पावसाने हजेरी लावल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ जुना धागा उचकवटून वर आणत आहे.

श्रावण...

आला रे आला
पुन्हा श्रावण आला
घेऊन आठवणींचा झुला

हिंदकळती आठवणी
पाणथळल्या वळचणी
इंद्रधनूचा घेऊन झुला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला

बहरली माती
हिरवीगार शेती
मृदगंध आसमंती दाटला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला

ऊनपावसात लागे
कोल्हाकोल्हिचे लगीन
ढगांचा बॅड वाजला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला

केतकीच्या बनात
मयूर पिसारा फुलला
सर्वत्र केकारव घुमला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला

राजेंद्र देवी

हाहा धन्यवाद लोक्स, ते तर धागा वर काढायला काहीतरी खरडले, पण धागा चालू न होता तो वार फुकट गेला म्हणून आणखी एक बनवले.. आवडले तर बरंय पण, व्हॉटसपवर फिरवतो Wink

मी कविता लिहीतो आहे
तरीही थापा मारतो आहे
ऋ चा खोटेपणा बघण्या
धागा वर काढतो आहे
Lol

व्वा राजेंद्रजी सुंदर रचना! Happy

पावसाच्या धारा
बरसुनी गेल्या
शेकडोंचा संसार
उघड्यावर मांडुन गेल्या

पुर आला होता
आता ओसरला आहे
आसवांचा पुर
नेत्रांत अजुनही आहे

वाहुन गेली गुरेढोरे
नाहीशी झाली घरे
अन्
जागी झाली
माणसांतली माणुसकी सळसळले हात शेकडो एकजात फक्त
माणुस होऊनी

(Dipti Bhagat)

वादळांचा गडगडाट होता विज चमकते।
पडणारच म्हणता कुठेतरी माशी शिंकते।।
धोधो पडणारा अंगणात शिंपडाव करतो।
मन ओले चिंब होता तन राहते भिजायचे।।

चारोळी खास तुझ्यासाठी

श्रावण आला गं सखे
----------------------------

श्रावण आला गं सखे
माहेराची सय आली
हाती जरी किती कामं
त्या साऱ्याला लय आली

परसात एक आड
अंगणात किती झाडं
त्या झोक्यांची याद आली

प्रेमळ गं भाऊराया
वहिनी करिते माया
भेटायची इच्छा झाली

देवासमान गं पिता
देवासमान गं माता
पानं गळायला आली

आताच जायला हवं
त्यांना पहायला हवं
चिंता इथे भय घाली
------------------------
बिपीन

Pages