सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं

Submitted by अस्मिता. on 25 August, 2023 - 16:41

बंदिवान मी ह्या संसारी
आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.
दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी
१९८८

आशा काळे(कमल) लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं. गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.

मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी' ;)..!

या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भर्त्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!
बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स.

निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही Wink '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.

पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून. मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही. पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.

#दोनतासकुठंहोताकाकू
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.

©अस्मिता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाटील न होता) इमॅजिन करतोय. >>> Lol

आणि तरीही लोक विचारत आहेत का पाहिला म्हणून >>> Lol

तिचे नाव निराशा ठेवले होते .>>>> Lol

बहती हवा सा था वो" >>>> Rofl
खर्शीकर सारखा दिसणारा नेहरू शर्ट होता तो...!

लंपन Lol
लंपन दिसले रे दिसले की ते 'सतीचं वाण' घ्या म्हणून मागं लागायचं आता...!

चोळी देणारं भूत<<<< देणारं नव्हे गं, घेणारं...
आता यावरून -
देणाऱ्याने देत जावे... हीदेखील कविता येईल की काय चर्चेत? बाकी, अख्खी नऊवारी साडी नेसलेली असताना पदराचा तुकडा फाडून नाही देत बया डोक्याला बांधायला!

बहती हवा सा था वो - Lol (कहां गया उसे ढुंढो... बरोबर आहे, शेवटी कुठेतरी दूर निघून जातो ना तो!)

Btw कुठल्यातरी एका गाण्यात आशा काळे शर्ट पॅन्ट घालून डान्स करत्या झाल्यात, तो कुठला सिनेमा?

अख्खी नऊवारी साडी नेसलेली असताना पदराचा तुकडा फाडून नाही देत बया डोक्याला बांधायला!
>>> मराठीत आधीच रोमॅन्सची वाणवा आहे, त्यात तुम्ही अजून 'भरजरी गं पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण ' करून राखी पौर्णिमा करा. Wink

मराठीत आधीच रोमॅन्सची वाणवा आहे, <<<<<
म्हणून चोळी देऊन त्याचा असा वणवा करायचा?
(बाकी मलाही तेच गाणं आठवलं होतं. भुताने ऐकलं असतं तर जबर धक्क्याने पुन्हा मेलं असतं.)

परत एकदा मायग्रेन भूत रॉक्स.तसं ते भूतच होतं.त्यामुळे त्याला स्वतःची बंडी फाडून मायग्रेन ची व्यवस्था करायला हरकत नव्हती.पण ते फारच अँटी रोमान्स झालं असतं.

स्वतःची बंदी बाजूला बसलेली असताना स्वतःची बंडी फाडून डोक्याला बांधायला ते काय सलमान खान होतं? पण मला अजून बेसिक प्रश्न आहे, भुताला मायग्रेन होत असेल तर काय उपयोग भूत होऊन? (खरंतर काही होत नसणार, उगा चोळी मागायला निमित्त!)

आशा काळेंना ललिता पवार, रंजनानी छळलं नसेल तेवढं या धाग्यावर छळलं जात आहे अध्यक्ष महोदय!

भुताला मायग्रेन होत असेल तर काय उपयोग भूत होऊन? >>> Lol

(खरंतर काही होत नसणार, उगा चोळी मागायला निमित्त!) >>> लोल. भुताचाही पाटील झाला.

Biggrin कहर आहात सगळे.
श्रद्धा, फारएंड...!!
भुताला मायग्रेन होत असेल तर काय उपयोग भूत होऊन?....
म्हणून चोळी देऊन त्याचा असा वणवा करायचा?...

खूप हसले. ..
You made my day!

अरे बाप्रे !
इथे तर धमाल चालू आहे सगळी. Lol
भूत पाटील होते Lol
कमाल आहेत सगळे Lol
भुतकर पाटील आडनाव आहे एक Happy

म्हणून चोळी देऊन त्याचा असा वणवा करायचा?
भुताला मायग्रेन होत असेल तर काय उपयोग भूत होऊन >>> Biggrin Biggrin

मुळात भुताला रोमान्स करता येतो का?
आणि रुमाल/स्कार्फ गळ्यात बांधणे/खिशात ठेवणे/कानातले/पैंजण जपून ठेवणे इतपर्यंत ठीक आहे. चोळी डोक्याला बांधणे हा कसला रोमान्स? घामट वासाने डोके उठणार नाही का अजून?

चोळी बांधणे हा मूळ मोटिव्ह नव्हता.मूळ मोटिव्ह भूत झाल्यावर बाकी मर्यादा बाजूला पडून गर्लफ्रेंड ला भेटून निवांत गप्पा मारता याव्या हा होता.बाकी गोष्टी(चोळी, मायग्रेन, मुंडावळ्या, स्वयंवर आज तुझे माझे गाणं) या प्रसंगाच्या ओघात झाल्या.भूत संस्कारी होतं म्हणून अजून पुढच्या गोष्टी झाल्या नाहीत.
भूतांना घामाचा वास येत नाही.

भूत संस्कारी होतं म्हणून अजून पुढच्या गोष्टी झाल्या नाहीत.<<<<<
टोटली!!! भूत डोक्याला चोळी बांधून घेतल्यावर म्हणतं 'जिऊ, आता माझं एक ऐकणार?' जिऊपण म्हणते 'एक का, तू सांगशील तेवढं ऐकीन.' एवढी ब्लॅंकेट* परमिशन असूनही भूत फक्त तिच्या गळ्यात साज घालतं स्वतःच्या हाताने.

*काकडणाऱ्या भुताला ब्लॅंकेट (परमिशन)चा आधार!

डाकू असलेल्या रवींद्र महाजनीला अटक करायला पोलीस येतात आणि बाजूला उभ्या आशा काळेला पाहून 'अजून काय शिक्षा करायची लेका तुला?' म्हणत बेड्या न ठोकता निघून जातात, हा सीन पाहणीय आहे. 'आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला' हे वचन तिथेच उगम पावले. >>> हे भारी आहे एकदम Lol

स्ट्रेसबस्टर धागा झालाय Lol

मै कमली कमली' गाण्यात आशा काळे????? कल्पूनच घाम फुटला. >>>> अरे , काय चाल्लय काय इकडे Rofl

आयसीयूच्या बाहेर इथले प्रतिसाद वाचणे शक्य नाही Lol

>>>>>>>डाकू असलेल्या रवींद्र महाजनीला अटक करायला पोलीस येतात आणि बाजूला उभ्या आशा काळेला पाहून 'अजून काय शिक्षा करायची लेका तुला?' म्हणत बेड्या न ठोकता निघून जातात
मलाही हा जोक त्यातलं 'लेका' वगैरे संबोधन हहपुवा झाले. Lol Lol Lol

*काकडणाऱ्या भुताला ब्लॅंकेट (परमिशन)चा आधार! >>>
भूत संस्कारी होतं म्हणून अजून पुढच्या गोष्टी झाल्या नाहीत. >>> Lol

Biggrin
खरेच. खूपच स्ट्रेस बस्टर धागा!

Pages