सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं

Submitted by अस्मिता. on 25 August, 2023 - 16:41

बंदिवान मी ह्या संसारी
आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.
दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी
१९८८

आशा काळे(कमल) लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं. गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.

मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी' ;)..!

या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भर्त्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!
बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स.

निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही Wink '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.

पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून. मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही. पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.

#दोनतासकुठंहोताकाकू
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.

©अस्मिता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याकाळचे नट नट्या इतक्या सोज्वळ होत्या की अजूबाजूला चिटपाखरूही नसताना जयश्री गडकर मायग्रेन चा उपाय अरूण सरनाईक च्या कानात सांगतात.
पण तितका सोज्वळपणा नायकांना नव्हता. जयश्री सरनाईकांना कानात चोळी देते सांगितल्यावर तितक्याच मोठ्या आवाजात सरनाईक,"काय चोळी का, दे की मग" असे सहज रोज चोळीचीच टोपी लावून हिंडत असल्यासारखे सांगतात.

बाकी ह्या चित्रपटातील दोन तीन प्रसंगात जयश्री गडकर "शिवा" इतक्या भारी ओरडल्यात की ते पाहूनच आलिया भट ब्रम्हास्त्र मध्ये "शिवा" असे ओरडत होती हे कोणाच्याच कसे बरे लक्षात आले नाही? पण जयश्री गडकरच्या ओरडण्यासमोर आलियाचे "शिवा" असे ओरडणे म्हणजे ढाण्या वाघाच्या डरकाळी समोर पामेरिअन कुत्र्याने वॅक वॅक करण्यासारखे आहे.

मला खात्री आहे की भाऊसाहेबांचा हातखंडा रोल न देता भिक्षुकाचा दिला म्हणून तो सतत वैतागलेला दिसतो या पिक्चर मधे.
कोटिवानना डोळ्यांच्या खाचा होवूनही नीचपणे छेडता येत नाही. खर्शीकरला नीट फ्लर्ट करता येत नाही
मुळात म्हणजे आशा काळेशी फ्लर्ट करावे लागत असल्याने सर्वचजण वैतगलेले असावेत!

>>> Lol Lol Lol

पण तितका सोज्वळपणा नायकांना नव्हता. जयश्री सरनाईकांना कानात चोळी देते सांगितल्यावर तितक्याच मोठ्या आवाजात सरनाईक,"काय चोळी का, दे की मग" असे सहज रोज चोळीचीच टोपी लावून हिंडत असल्यासारखे सांगतात. >>>>>>> LOL

पण जयश्री गडकरच्या ओरडण्यासमोर आलियाचे "शिवा" असे ओरडणे म्हणजे ढाण्या वाघाच्या डरकाळी समोर पामेरिअन कुत्र्याने वॅक वॅक करण्यासारखे आहे. ......... SO ACCURATE

पण तितका सोज्वळपणा नायकांना नव्हता. जयश्री सरनाईकांना कानात चोळी देते सांगितल्यावर तितक्याच मोठ्या आवाजात सरनाईक,"काय चोळी का, दे की मग" असे सहज रोज चोळीचीच टोपी लावून हिंडत असल्यासारखे सांगतात. >>>>>>> LOL

पण जयश्री गडकरच्या ओरडण्यासमोर आलियाचे "शिवा" असे ओरडणे म्हणजे ढाण्या वाघाच्या डरकाळी समोर पामेरिअन कुत्र्याने वॅक वॅक करण्यासारखे आहे. ......... SO ACCURATE

त्या लिंकवरचा सीन पाहिला...
अरुण सरनाईक डोक्याला बांधलेल्या चोळीसकट जमिनीत गाडलेला ... ते पाहून मला 'टॉम अ‍ॅण्ड जेरी'मधला सर्व उपाय थकल्यावर स्वत:च जमिनीत खड्डा करून त्यात जाऊन आडवा पडणारा टॉम आठवला.

चोळीसकट नाही गं Happy
गाडला तेव्हा बिनचोळी होता.मग तो भूत रुपात त्याकाळचा बैलगाडी उबर सर्व्हिस काम करून आला तेव्हा चोळी आली

कमरेचं सोडून डोक्याला बांधणे हा वाक्प्रचार जिवा शिवाच्या जोडीमुळेच प्रचलित झाला.

(भूत असलं तरी लाजत नव्हते. अभिमानाने मुंडावळ्या सारखे मिरवत होते).

चोळीसकट नाही गं >>>

अगं हो, पुढे बघ...
ती जिऊ घरी पोचते, आईला सांगते शिवा न्यायला आला होता.
वडील ते ऐकून चरकतात, बायकोला हळूच सांगतात, "शिवा जिता न्हाई". आई पण घाबरते.
वडील म्हणतात, त्याला अमुकतमुक ठिकाणी पुरलं होतं, उकरून बघतो. तिथे जाऊन ते उकरतात.
स्क्रीनवर मातीत गाडलेल्या अ.स.चा फक्त चेहरा दिसतो आणि डोक्याला चोळी. Lol
जिऊ धावत येते आणि वर (आलिया भट सहित) उल्लेख झालेली "शिवा......." अशी आरोळी ठोकून तिथल्या तिथे गतप्राण होते.

ती जिऊ घरी पोचते, आईला सांगते शिवा न्यायला आला होता.<<<<<
तेव्हा आधी आई तिला विचारते 'चोळी कुठाय तुझी?'
त्याकाळी म्हणजे शुद्ध हवेतच व्हिटॅमिन्स ए बी सी डी सगळं.. सगळ्यांच्या नजरा त्यामुळे अशा बिनचष्म्याच्याच तीक्ष्ण...

इथे त्या आईच्या तोंडी 'या गायब झालेल्या चोली के पीछे क्या है' वाक्याला भूगर्भातून 'चोलीमे सर है मेरा' आवाज आला असता तर मग कुणीतरी बंदीवान या भूसंसारी झाला असल्याची शंका तिलाही आली असती.

हुश्श! आता हा विषय तितका अवांतर राहिला नाही.

सहज रोज चोळीचीच टोपी लावून हिंडत असल्यासारखे सांगतात.>>>> Lol
ढाण्या वाघाच्या डरकाळी समोर पामेरिअन कुत्र्याने वॅक वॅक करण्यासारखे आहे.>>>> Lol
टॉम अ‍ॅण्ड जेरी'मधला सर्व उपाय थकल्यावर स्वत:च जमिनीत खड्डा करून त्यात जाऊन आडवा पडणारा टॉम आठवला.>>>> Lol
आता मला टिंगल केल्याबद्दल वाईट वाटत आहे.>>> Lol
बोकलत म्हणत होते खूप इमोशनल आहे, मीही बघितला नाही अजून.
सगळ्यांच्या नजरा त्यामुळे अशा बिनचष्म्याच्याच तीक्ष्ण...>> Lol
चोलीमे सर है मेरा' >>>> Lol

शिवा......." अशी आरोळी ठोकून तिथल्या तिथे गतप्राण होते.>>>
म्हणजे जिऊ सुद्धा मरते शेवटी, हे तर 'चोळीचे रोमियो ज्युलिएट' झाले.

धम्माल चालली आहे अगदी....हाहाह्हा
ती भुताबरोबर होती ती जयश्री गडकर ना? कॉमेंट्स मधे मधुन मधुन आशा काळे लिहिताहेत लोक्स.. ती पण आहे का ह्या चित्रपटात? आशा काळे मला बाळा साठी परत येतेभुत होउन एका चित्रपटात म्हणुन भुत म्हणुनच आठवते नेहमी Happy

अरे हां प्रीती, आठवलं.टॉम अँड जेरी मध्ये टॉम ला त्या पांढऱ्या मांजर सुंदरीने नाकारल्यावर टॉम हातातलं फूल घेऊन तसाच कॉफीन मध्ये पडतो. तसा जिवा चिऊ ला ड्रॉप करून तसाच्या तसा डोक्याच्या चोळीसह गाडलेल्या जागी आडवा.
यात वडील अति प्रामाणिक पणे 'मी त्याला काल गाडला होता' सांगतात.दुसऱ्या एखाद्या वडिलांनी आधी 'हा माणूस वेगळा आहे, भूत असू शकेल' वगैरे बिल्डप केला असता स्वतः गाडलं हे न सांगता.

अदिती...
Happy
आशा काळे ही या धाग्याची माजी नायिका होती.....!!
आत्ता ची जयश्री गडकर आहे!

बायदवे, अरुण सरनाईकला पुरतात का? जाळत नाही? जाळलं तरी भूत झालं असतंच ना? पण मग अर्थात चोळी कुठे बांधलेली दाखवायची हा प्रश्न उपस्थित झाला असता. बरं पण मग आता जयश्री गडकरला पुरणार की जाळणार? आणि त्या आधी तिची चोळी तिला परत करणार की नाही? खूपच फिलॉसॉफिकल प्रश्न पडलेत.

त्याकाळी म्हणजे शुद्ध हवेतच व्हिटॅमिन्स ए बी सी डी सगळं.. सगळ्यांच्या नजरा त्यामुळे अशा बिनचष्म्याच्याच तीक्ष्ण...
चोळीचं रोमियो-ज्युलिएट
Rofl

अरे काय हे.. 'किती ती बंदिवान ' व्यक्तीच्या दुःखाची मीमांसा.. Rofl Rofl

अरे हो की.
लेखातला चित्रपट वेगळा आहे आणी आजच्या व्हीडीओ वेगळा... लक्षात आलं नाही

बायदवे, अरुण सरनाईकला पुरतात का?
<<<<<
जिऊच्या वडिलांना वेळ नसेल मिळाला, म्हणून पटकन जमले ते केले.
चोळी व साजाचे आदानप्रदान करून ते दोघे kind of नवराबायको झालेले! त्यामुळे ती चोळी अ स च्या डोक्यालाच राहू दिली असेल.
शिवाय, असे प्रश्न पडू शकणाऱ्या चाणाक्ष प्रेक्षकांसाठीच चित्रपटाच्या शेवटी त्यांनी दाखवले आहे की, दोघांच्या दोन वेगवेगळ्या चिता जळतात. (त्यांचे 'स्वयंवर आज तुझे माझे' बाकीच्यांना मान्य नाही, हे सूचकपणे दाखवले आहे.)

चोळी व साजाचे आदानप्रदान करून ते दोघे kind of नवराबायको झालेले!.. आं...?
लग्नात चोळीचे आदानप्रदान कधी करतात?

आणि एकदा पुरल्या वर पुन्हा चितेवर जाळतात पण?......
इनक्लूसिव्हनेस..म्हणतात तो हाच

गांधर्वविवाह असेल. (त्याचेसुद्धा काय नियम असतील ते मला नाही माहीत, मी आपलं भुताच्या जिवाला बरं वाटावं म्हणून kind of नवरा बायको लिहिलं!) तो साज मंगळसूत्रासारखा तिच्या गळ्यात घालतो, असा सीन आहे.

श्रद्धा.. Biggrin ओके....
गांधर्व विवाह केलेले कुणीही ओळखीचे नाही..नाहीतर नियम विचारले असते....

Pages