सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं

Submitted by अस्मिता. on 25 August, 2023 - 16:41

बंदिवान मी ह्या संसारी
आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.
दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी
१९८८

आशा काळे(कमल) लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं. गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.

मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी' ;)..!

या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भर्त्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!
बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स.

निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही Wink '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.

पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून. मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही. पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.

#दोनतासकुठंहोताकाकू
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.

©अस्मिता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते पाहता काकूंनी कमलला 'या घरात तुला 'माझ्याव्यतिरिक्त' अजून कुणी दिसत नाही ना?' असे विचारायला हवे. >>> Lol म्हणजे काकूंच काड्या करून घर बळकावण्याकरता या दोघांना बाहेर काढतात असे का? Happy

पण 'तुझीच नजर वाईट, गप मेले' अशा अपराधी भावनेत कित्ती कित्ती वर्षे काढली मी....सत्याला मरण नसते ते असं . >>> Lol

अस्मिता - वरच्याचा वरचा म्हणजे अल्गॉरिदम वगैरेचा उल्लेख आहे तो का? Happy

माझेमन,
पण 'तुझीच नजर वाईट, गप मेले' अशा अपराधी भावनेत कित्ती कित्ती वर्षे काढली मी....सत्याला मरण नसते ते असं . >>> Lol
मग तर माझी नजर इतकी वाईट आहे की मी बहुतेक पाटलापेक्षाही नीच आहे. Lol

आता ललिता पवार ही सासू, रंजना ही नणंद आणि कुलदिप पवार हा नवरा असले भन्नाट काँम्बो असेल तर प्रत्यक्ष अंबाबाईनेच आशा काळेला सांगायला हवे होते की बाई तू असल्या घरात लग्न करून जाऊ नको. पण बहुतेक अंबाबाईला पण तिचा सोशिकपणा आणि प्रेक्षकांचा अंत पहायचा होता त्यामुळे अडीच तास झेलावे लागतात. >>>>>>>>>>> Lol Lol मेले.

चेकॉव्हची बंदूक प्रिंसिपल वाले असणार ते.
आपण आपले रेड हेअरिंग स्कूल ऑफ थॉट वाले. ढळढळीत समोर दिसलं तरी ते आपल्याला उल्लू बनवायला ठेवलंय हेच आधी मनात येणारे. Happy

अस्मिता - वरच्याचा वरचा म्हणजे अल्गॉरिदम वगैरेचा उल्लेख आहे तो का?>>>>
हो फा, हा टायपेपर्यंत नवा आला म्हणून शिडी लावली.

>>> नववारी पातळ किती revealing असू शकते
म्हणूनच त्याला 'पातळ' म्हणत असावेत. बाकी बायका नेसतात त्या साड्या/लुगडी. Proud

भारी रीव्ह्यू आणि कमेन्ट्स. माझा 'का पाहिलास पण?!' हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. Proud

Lol हो तर , तमन्ना भाटिया आणि आशा काळे सारख्याच वाटताहेत आता.

माझा 'का पाहिलास पण?!' हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
>>> हे बघा स्वाती आणि अमित , जगातील सर्वात महत्वाच्या व गंभीर प्रश्नांवर कुणीतरी व्यक्त व्हावं लागतं. असं सगळेच 'का- का' म्हणू लागले तर काकू कशा येणार... ! Proud

श्रद्धा Lol बदाम पोस्ट.
फा , @ययाती-देवयानी संदर्भ -
धमाल पोस्ट. Lol
'राजवाडे ॲन्ड सन्स' मधे फक्त हंडे मोडीत काढायला नेलेले आठवत आहे. @पुणे ५२ तर 'रहस्य नको पण बिल्ड अप आवर' होता.
मला खांडेकर हा शब्द ऐकूही आला नव्हता. अविनाश खर्शीकर मला दिसलाही नाही व ऐकूही आला नाही. तो तरंगत आला व वांग्याची भाजी खाऊन तरंगत गेला. ययाती -देवयानीचा संदर्भ योगायोग समजावा. हे कादंबरी आणि विहिरीचं कनेक्शन भन्नाट जमलं आहे. सिनेमाच्या लेखकाला कळवायला हवं कुणीतरी. Happy

हा कल्ट मुव्ही आहे बहुतेक...

"Many times, I find myself daydreaming about bringing this movie to Hollywood, envisioning Regina Phelangi in the role of Asha Kale, while I take on the character of Nile Phule.
Dreams have a way of sparking our imagination, don't they? — Ken Adams (2000)

म्हणजे काकूंच काड्या करून घर बळकावण्याकरता या दोघांना बाहेर काढतात असे का?<<<<
अर्थात!!! निफुच्या चार पिढ्या त्या घरात (आणि त्या गावात) राहिल्या, आता कमल पोटुशी असल्याने पाचवी पिढी येण्याच्या वाटेवर! काकूंनी घर बळकवायला वाट पहावी तरी किती? काकूच खरा व्हिलन आहेत कथेतल्या. त्यांनी लहानपणापासून गुरूला वाढवायच्या मिषाने योग्य वयात त्याचे लग्न होऊ दिले नाही, पण तो गुपचूप लग्न करून आला. म्हणून नव्या नवरीच्या स्वागताला त्याच दिवशी न येता त्या खूप दिवसांनी दोडकी घेऊन आल्या. ज्यात 'कमल, तू लाडकी नव्हे, तर दोडकी आहेस' हा गूढ अर्थ होता.

#दोनतासकुठंहोतातकाकू या हॅशटॅगला 'योग्य वेळी हथोडा मारण्यासाठी लोहा गरम होण्याची वाट पाहत होते' हे उत्तर आहे. निफुला मॅक्स पश्चात्ताप केव्हा होईल, त्यावेळीच काकूंनी 'कमळी रे कमळी व्हेरी गुड व्हेरी गुड, भाऊसाहेब व्हेरी बॅड व्हेरी बॅड' अस्त्र बाहेर काढले.

एका सीन मधे कमल त्या माधवला विचारते की तुझ्या हातात कोणते पुस्तक आहे. तो सांगतो "खांडेकरांचे"<<<< पुस्तक 'दोन ध्रुव' असते पण.

फारएंडचे विश्लेषण लेखकाने वाचले असते, तर 'ययाती'च दिले असते हातात.

खूप दिवसांनी दोडकी घेऊन आल्या. ज्यात 'कमल, तू लाडकी नव्हे, तर दोडकी आहेस' हा गूढ अर्थ होता. >>> Lol

मला खांडेकर हा शब्द ऐकूही आला नव्हता. अविनाश खर्शीकर मला दिसलाही नाही व ऐकूही आला नाही. तो तरंगत आला व वांग्याची भाजी खाऊन तरंगत गेला. >>> Lol पाटील सुद्धा त्याचे वर्णन "ते हडकुळं" असा करतो Happy

आपण आपले रेड हेअरिंग स्कूल ऑफ थॉट वाले. ढळढळीत समोर दिसलं तरी ते आपल्याला उल्लू बनवायला ठेवलंय हेच आधी मनात येणारे. >>> हे त्या पाटलाला सांगायला हवे होते कोणीतरी Wink

सगळे महान आहात Happy
चित्रपट पाहिला नाही, पण त्या काळात सेन्सर बोर्ड इतकं कडक होतं की लोकांना एकमेकांऐवजी कॉमन पिसाची चुंबनं घ्यावी लागायची.त्या काळातले कोव्हीड कॉन्टॅक्टलेस प्रोटोकॉल्स.तिथे आशा काळे ची पातळ पातळं कट झाली नाहीत का?

'या घरात तुला 'माझ्याव्यतिरिक्त' अजून कुणी दिसत नाही ना?'
लाडकी-दोडकी
Rofl

'कमल, तू लाडकी नव्हे, तर दोडकी आहेस' हा गूढ अर्थ होता.
कमळी रे कमळी व्हेरी गुड व्हेरी गुड,
>>>> श्रद्धा Biggrin Biggrin

तिथे आशा काळे ची पातळ पातळं कट झाली नाहीत का?>>>
हिपोक्रसीचा उत्कृष्ट नमुना.
चार पोरं झाली पण आम्ही कधी वडिलधार्यांसमोर बोललो नाही एकमेकांशी हे कौतुकाने सांगणार्यांच्या देशात सेन्सॉर बोर्ड अपवाद कसे ठरेल?

वरचे सगळेच प्रतिसाद भन्नाट आहेत. आता मी 'कमली हो गई तेरे बिना' किंवा 'नि मैं कमली कमली' वगैरे गाणी या चित्रपटात आशा काळेवर चित्रित असती तर काय संस्कारी बदल करावे लागले असते हे (पाटील न होता) इमॅजिन करतोय.

(पाटील न होता)<<<<< कंस फार म्हत्त्वाचा आहे हा!

'नि मै कमली कमली' गाण्यात आशा काळे????? कल्पूनच घाम फुटला. आमिर खानने तर नृत्याची परीक्षा न घेताच तिला पास केले असते.

आशा काळेचा 'देवता' आठवला चर्चेवरून. डाकू असलेल्या रवींद्र महाजनीला अटक करायला पोलीस येतात आणि बाजूला उभ्या आशा काळेला पाहून 'अजून काय शिक्षा करायची लेका तुला?' म्हणत बेड्या न ठोकता निघून जातात, हा सीन पाहणीय आहे. 'आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला' हे वचन तिथेच उगम पावले.

सुलोचना ताईंच्या अंत्ययात्रेवेळी कुणी आशा काळेंचे रडणं बघितलं का? मला तर खूप नाटकी वाटत होत.

डाकू असलेल्या रवींद्र महाजनीला अटक करायला पोलीस येतात आणि बाजूला उभ्या आशा काळेला पाहून 'अजून काय शिक्षा करायची लेका तुला?' म्हणत बेड्या न ठोकता निघून जातात >>>> खरंच?

'आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला' हे वचन तिथेच उगम पावले. >> Lol कहर!

खरंच?<<<< Lol नाही नाही. तो सरेंडर करतो आणि नंतर प्रतिथयश बिल्डर बनतो, असे काहीतरी आहे.

कहर लिहीलय एकेकाने. मी आशा काळेचे असलेच रडके पिक्चर बघून तिचे नाव निराशा ठेवले होते .

हो मी तोच पिक्चर सुचवणार होते. तिने डाकुला नवरा म्हटल्यावर बाकी डाकू वर्गापासून रक्षण होतं.स्टॉकहोम सिंड्रोम ची आद्य केस.

तुम्हाला सुंदर जयश्री गडकरी आणि मायग्रेन असलेलं भूत बघायचं असेल तर काय हो चमत्कार नक्की बघा.यात मायग्रेन चं औषध पण एकदम विचार करण्यायोग्य आहे.

Lol श्रद्धा

अनु, लक्षात आले. चोळी देणारं भूत. Happy

बापरे... Lol
असले सिनेमे माहिती तरी कसे होतात तुम्हाला?

बाजूला उभ्या आशा काळेला पाहून 'अजून काय शिक्षा करायची लेका तुला?' म्हणत बेड्या न ठोकता निघून जातात >>>
'आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला' >>> Lol

(पाटील न होता) इमॅजिन करतोय. >>> Lol

या पिक्चरने आत्तापर्यंत दोन कादंबर्‍या, ४-५ गाणी व एक सुभाषित इतके संदर्भ चर्चेत आणले आहेत. ३-४ इतर मराठी पिक्चर्स सुद्धा - "काय हो चमत्कार" ते "पुणे-५२" रेंज मधले. आणि तरीही लोक विचारत आहेत का पाहिला म्हणून Wink

माधव हवेतून तरंगत आला या वाक्यावरून मला आशा काळे "बहती हवा सा था वो" गात आहे असेही डोळ्यासमोर आले. निफू नाहीतरी तिला तो तुझा "यार" आहे असे म्हणतोच. त्यामुळे "यार हमारा था वो" वगैरे सुद्धा लागू होईल.

Pages