Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चंद्रा बारोट हे मूळचे
चंद्रा बारोट हे मूळचे कॅमेरामन.>>> Nariman Irani (producer of Don) He was cinematographer.
बरोबर. चंद्रा बारोट
बरोबर. चंद्रा बारोट दिग्दर्शक होते. ते मनोजकुमारचे सहाय्यक होते.
बरंच मटेरिअल आहे. >>. टोटली.
बरंच मटेरिअल आहे. >>. टोटली. मला डॉनबद्दल वाचायला अजिबात कंटाळा येत नाही
थोडेफार वाचले आहे त्या बॅकग्राउण्डबद्दल. ही मूळ व्यक्तीच्या जागी त्याच्यासारखाच दिसणारा तोतया पाठवणे - अशी कल्पनाही बहुतेक शत्रुघ्नच्या "कालिचरण' मधे आधी वापरली होती. फार पूर्वी तो पिक्चर पाहिला आहे पण आता अजिबात आठवत नाही.
ती शेवटची फायटिंग मात्र सलीम-जावेद ने कहानी की माँग म्हणून नाराजीने मान्य केली असावी. त्यांच्या पटकथांची एक लेव्हल असे तेव्हा. ही फायटिंग अगदी पाचकळ आहे. इव्हन प्राणचे रोल्स एरव्ही भारी असतात. यातला रोल ओव्हरऑल चांगला आहे पण ते मुलांना दोरीवरून नेणे वगैरे जरा जास्तच आहे. मात्र क्लायमॅक्सच्या आधीचे त्याचे नारंग व त्याच्या गँगबरोबरचे संवाद पुन्हा चांगले जमले आहेत.
टायटल्सच्या आधीचा ओपनिंग सीन आहे तो म्हणे सध्याच्या नवी मुंबई मधल्या कोणत्यातरी भागात चित्रित झालेला आहे. तेथे तेव्हा माळरान होते
हो. युट्यूबवर अमूक फिल्मचं
हो. युट्यूबवर अमूक फिल्मचं शूटींग इथे झालं होतं अशी एक कॅटेगरी आहे, त्यात पाहिलाय.
Angry Young Man ही इमेज कॅरी
Angry Young Man ही इमेज कॅरी करणारे दोघेच भावतात. अमिताभ आणि सनी देओल.
अमिताभ चा थंडपणा आणि सनीचा लाऊड अभिनय खटकत नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्वाला ते शोभून दिसले.
सलीम जावेदचं प्रकाश मेहरांसोबत वाजलं त्यामुळे त्यांनीच जंजीर नंतर पुन्हा सलीम जावेद सोबत काम केले नाही. मुकद्दर का सिकंदर, लावारीस, शराबी यातला अमिताभ टोटली वेगळा होता. शतरंज त्यांनी नाकारला. सुभाष घईंनी तो स्विकारला. पण अमिताभच्या डेट्स मिळेनात म्हणून मग अनिल कपूरला घेऊन मेरी जंग या नावाने बनवला. नाहीतर त्यात अमिताभला Angry Young Man बघायला आवडले असते.
सनीला Angry Hammer Man म्हणणे ठीक होईल.
मी डिपार्टेड बघितला तेव्हा
मी डिपार्टेड बघितला तेव्हा मला डॉनची आठवण झाली होती
(ज्याला रहस्य माहिती आहे तोच माणूस मरणे आणि मग आपण कोण आहोत हे सिद्ध करणे अशक्यप्राय होणे यामुळे)
रणवीर सिंग कपिलदेवच वाटतो याला +१ त्याचा डॉन बघायला आवडेल.
सनीला Angry Hammer Man म्हणणे
सनीला Angry Hammer Man म्हणणे ठीक होईल. >>
> मलाही तो एका सिटींग मधे
> मलाही तो एका सिटींग मधे बघता आला नाही. वर्षभरात बघून झाला.
मला त्याहूनही जास्त वेळ लागेल. त्यापेक्षा त्याचे हवा येउ द्या मधले स्किट छान !
“रणवीर सिंग कपिलदेवच वाटतो” -
“रणवीर सिंग कपिलदेवच वाटतो” - नुसतं दिसणंच नाही, तर बोलणं, बॉलिंगची स्टाईल, बॉडी लँग्वेज सगळ्यातून त्याने कपिल उभा केलाय.
डॉनविषयी फा शी सहमत (तसंही अमिताभ आणि फ्रेंड्स ह्या दोन विषयात त्याच्याशी असहमत होताच येत नाही
)
धूम २ काळातला ह्र्थिक चालला
धूम २ काळातला ह्र्थिक चालला असता पण तो आता इतका म्हातारा दिसतोय, त्यापेक्षा शारुख सुद्धा फ्रेश दिसतो मग अजुन >>>
हृतिक ग्रे शेड च्या किंवा आऊट अँड आऊट नेगेटिव्ह रोल मध्ये भारी वाटेल. पर्सनली मला त्याचा विक्रम वेदा रिमेक मधला वेदा आवडला होता.
८३ बद्दल सहमत. शिवाय दिल
८३ बद्दल सहमत. शिवाय दिल धडकने दो मध्येही तो आवडला होता. त्यातला रणवीर हाच ८३ मधला कपिल आहे हे खरंच वाटत नाही. हे जमणे सोपे नाही.
गोलियो की रासलीला कुणी बघितला आहे का? कसा आहे? मला गाणी आवडतात, पण पिक्चर कुठे बघायला मिळाला नाही.
गाण्यांसाठी बघा पिक्चर.
गाण्यांसाठी बघा पिक्चर. व्हिज्युअल्स मस्त आहेत.गाणी ऐकायला सुंदर वाटतात.बघायला पण.बाकी रोमिओ ज्युलिएट चं राजस्थानी व्हर्जन विथ भरपूर बंदुका आणि गोळ्या.
गोविंदा नाम मेरा बघितला
गोविंदा नाम मेरा बघितला (हॉटस्टार)
ओके वाटला.
कॉमेडी ड्रामा, खंडीभर पात्रं, एकाचा दुसर्यावर संशय, दुसरा तिसर्याला सामील, तिसर्याची चौथ्याशी गद्दारी, चौथा पहिल्या-दुसर्यावर पाळत ठेवतोय... संशयाची सुई इतकी गरागरा फिरवलीय की शेवटी प्रेक्षक उत्तर दिशा पकडून बसून राहतात.
छोटे-छोटे कॉमेडी ड्रामा प्रसंग, संवाद छान लिहिलेत. पण सर्वांचा मिळून सिनेमा लाऊड, बटबटीत झालाय. आणि शेवटी मिस्ट्री समजावून सांगणे. (सी.आय.डी.टाइप)
विकी कौशलचं कॉमेडी टायमिंग, कॉमेडी सेन्स छान आहे. आणि अमेय वाघचं सुद्धा. पुन्हा एकदा मला वाटलं- अमेय वाघ इज मेड फॉर फिल्म्स. त्याने सिनेमेच करावेत.
आज घरापुढे रांगोळी घातली. सडा
आज घरापुढे रांगोळी घातली. सडा शिंपला. दिवे लावलेत.
सकाळपासून सनई वाजतेय युएसबी स्पीकरवर. त्यामुळे वातावरण कसं मंगलमय आहे.
काल नवीन कपडे खरेदी पार पडली. बायकोला नवीन शालू घेतला ( खरे म्हणजे तिनेच घेतला, मी फक्त बिल पे केले). बर्याच दिवसांनी मी ही माझ्या पसंतीचा पिवळ्या रंगाचा ( त्याला हल्दी कलर म्हणायचे हे समजले) झब्बा घेतला. त्याच्यावर शुभ्र पांढरा पायजमा घेतला त्याला सलवार म्हणतात हे ही समजले. बायकोने गडद निळा ( कि काळपट निळा) झब्बा माझ्यासाठी निवडला होता. पण आजचे पवित्र कार्य लक्षात घेऊन तिने उदार मनाने मला माझ्या आवडीचा रंग निवडू दिला. मुलांनी त्यांची खरेदी स्वतःच केली.
बाल्कनीतून दिव्यांच्या माळा सोडल्या. संध्याकाळी बँडपथक बोलावले आहे. त्यानंतर मिरवणुकीने आम्ही सजवलेल्या गाडीतून निघणार आहोत.
एव्हढे सगळे केल्यावर रात्री दीड वाजता उत्साहाने मायबोलीवर आलो तर गदर २ चित्रपट आवडला हेवेसांनल.
नाहीच आलो तर..... समजून जा मग !
गोलियो की रासलीला कुणी बघितला
गोलियो की रासलीला कुणी बघितला आहे का? कसा आहे? मला गाणी आवडतात, पण पिक्चर कुठे बघायला मिळाला नाही.
>>>>
फुकट मिळाला तरी बघू नका. गाणी बघा युट्यूबवर. मी आयमॅक्स ला बघितला होता. नवरा तर पहिल्या तासात निघूया म्हणत होता. पण मी आता तरी काही तरी चांगले होईल या फोल अपेक्षेत बसून होते, आयमॅक्सचे तिकीट वाया घालवायचेही जीवावर आले होते.
ओव्हर द टॉपचा जर काय अतिरेक असेल तर हा पिक्चर. अज्जुन नवरा सुनावतो हो त्यावरून
गोलियो की रासलीला >>>
गोलियो की रासलीला >>> नावावरून डार्क ह्युमर चित्रपट असावा असे वाटले.
गोलियो की रासलीला कुणी बघितला
गोलियो की रासलीला कुणी बघितला आहे का?>> गाणी सुरेख आहेत. रत्ना पाठकचे काम छान आहे. प्रियांका चोप्राचे एक सेक्सी गाणे आहे. दीपिका भन्ना ट नाचली आहेत. बिचार्यांचे प्रेम सक्सेसफुल व्हायला हवे पन अनंत अडचणी. रणवीरेची एनर्जी भारी आहे. असतील असे लोक्स जगाच्या पाठीवर कुठेतरी. राजस्थानी ड्रेसेस ज्वेलरी एकदम भारी.
गोलियो की रासलीला कुणी बघितला
गोलियो की रासलीला कुणी बघितला आहे का?>>मी पण पाहिलाय थेटरात.. संजय लीला भन्साळी आणि भव्य सेटिंग्ज, गाणी हे पाहायला गेलेलो.. सिनेमा चांगला आहे.
संध्याकाळी बँडपथक बोलावले आहे
संध्याकाळी बँडपथक बोलावले आहे. त्यानंतर मिरवणुकीने आम्ही सजवलेल्या गाडीतून निघणार आहोत.
>>
नवीन व्हर्जन वाजवा...
मैं निकला हो गड्डी लेके..
मला भावलेले बेस्ट ग्रे
मला भावलेले बेस्ट ग्रे/नीगेटिव्ह कॅरॅक्टर असा धागा काढावा का?
अग्नीसाक्षी का काहीसा नाव असलेल्या चित्रपटात नाना ने अक्षरश: थरार मांडला. अवघड जागेचं दुखणं. तो स्क्रीन वर आला तरी चिडचिड/टेन्शन होत होती. मग त्या पेक्षा साठीला आलेला थकेल जॅकी नवरा बरा (श्रीमंत ही दाखवलाय त्यात
) 
संगम मधे रा.क. व्हिलन असतो का? ढोबळ मानाने?
रत्ना नाय सुप्रिया
रत्ना नाय सुप्रिया
हा रिव्ह्यू वाचून हिंमत
हा रिव्ह्यू वाचून हिंमत असल्यास गोलियो की रासलीला बघा(याला म्हणतात सेल्फ प्रमोशन
)
https://www.maayboli.com/node/65175
मला भावलेले बेस्ट ग्रे
मला भावलेले बेस्ट ग्रे/नीगेटिव्ह कॅरॅक्टर असा धागा काढावा का?>>>>
काढा काढा
सर्व प्रतिसादकांचे आभार. अनु,
सर्व प्रतिसादकांचे आभार. अनु, विशेष आभार. नक्की वाचतो. तुमची लेखनशैली आवडते.
Yess Supriya . Of Khichadi
Yess Supriya . Of Khichadi fame. So much kaajal they use.
मी_अनु, त्याचे शीर्षक वाचूनच
मी_अनु, त्याचे शीर्षक वाचूनच फुटायला सुरवात झाली. वाचतो सावकाश.
मी अनु, नंतर वाचेन.
मी अनु, नंतर वाचेन.
सध्या गदर महोत्सव.
कृपया जेलर कुणी बघितला असेल
कृपया जेलर कुणी बघितला असेल तर रिव्ह टाका ...
सिर्फ एक बंदा काफी है झी ५ वर
सिर्फ एक बंदा काफी है झी ५ वर बघितला. आवडला. मनोज वाजपेयीने चीज केलं आहे भूमिकेचं. सगळ्यांचीच कामं चांगली झाली आहेत. मनोज वाजपेयीचं शेवटचं भाषण विशेष आवडलं आणि पटलं.
आजच्या तारखेला वेगवे गळ्या
आजच्या तारखेला वेगवे गळ्या वर्शी ताल सिलसिला व मॅड मॅक्स फुरी रोड रिलीज झालेले आहेत. तिन्ही माझे फेवरिट. सिलसिला बघितला अर्धा. मग अॅप ग्लिच झाले. मॅड मॅक्स बघायचा तर तो रेंट करावा लागला. पण स द्य परिस्थितीत हाच एकदम फिट वाटतो पिक्चर. मग वेळ राहिला तर ताल बघणार नायतर उद्या. प्राइम अॅप आपण हूनच अपडेट झाले पण तरी ग्लिचेस आहेतच. लोरीन सांचीज ची इतकी काय बरे मोहिनी असावी साहेबांना!!! गरीब पूछता है. जुन्या सर्व फेवरिट पिक्चर ला रेंट ऑप्शन लावली आहे. हावरट भांडवल दार निषेध.
Pages