
अवकाश....
अणुरेणु पासून तारे दीर्घिका पर्यंत खूप मोठा विश्वव्यापी पसारा.
आपले अवकाश (सूर्यमाला):
सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, चंद्र, कृत्रिम उपग्रह, मंगळ, लघुग्रह पट्टा, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो(?), हेलिस्फिअर, क्यूपर बेल्ट, टर्मिनल शॉक, धूमकेतू, उर्ट क्लाऊड
छोटे छोटे अवकाश:
अणु, रेणू, बोसॉन, फोटॉन, ग्लुओन, फर्मीओन, इलेक्ट्रोन्स, क्वार्क्स, क्वांटम्स, स्ट्रिंग्ज
मोठे मोठे अवकाश:
तारे, न्युट्रॉन स्टार्स, पल्सार्स, क्वासार्स, सुपरनोव्हा, नेब्युलाज, दीर्घिका, क्लस्टर्स
गूढ गम्य अवकाश:
डार्क म्याटर, डार्क एनर्जी, वर्म होल्स, कृष्णविवरे, श्वेत विवरे
संशोधकांचे अवकाश:
CERN, LHC, LIGO, NASA, Quantum, Relativity, Gravity, Time Dilation, Length Contraction, Light years, Ripple effect, Hubble, James Webb, Double slit experiment, Photo electric effect, Planck's constant, Spring theory, Schrodinger's Cat, Uncertainty Principle, Pauli exclusion principle, Wavefunction, Multiverse theory, Quantum entanglement, Quantum teleportation, Quantum computers,
या आणि अशा संदर्भातील शोध लागतात. त्याच्या बातम्या आपण वाचतो. तेंव्हा आपल्याला अनेक प्रश्न पडतात. या व अशा गोष्टीवर प्रश्न/शंका विचारून चर्चा करण्यासाठी हा धागा. या जास्तीकरून गप्पाच असतील. हमरीतुमरी हरकत नाही पण दिवे घेऊन चर्चा. गणिती व क्लिष्ट समीकरणे, सिद्धता इत्यादी शक्यतो टाळून


(Conference on Physics which was held from 24 to 29 October 1927)
Why do people act like as if
Why do people act like as if NASA knows everything that partains about the universe .
When in real sense they have only discovered 0.00000 not even close .to 1%?
असे आहे तर तुम्ही टाईम
असे आहे तर तुम्ही टाईम डायलेशन मान्य करत आहात >> हो.
चर्चा वाचेन, रोचक दिसतेय.
चर्चा वाचेन, रोचक दिसतेय.
धन्यवाद निलिमा.
केशवकूल,
केशवकूल,
कारण तशा प्रकारच्या कथा पूर्वीही वाचल्या आहेत, पण नारळीकर सरांनी लिहिली आहे माहित नव्हते. त्यांचे 'प्रेषित' वगैरे कथा वाचल्या आहेत. पण हि कथा वाचल्याचे आठवत नाही. अर्थात नारळीकर सरांनी त्यामागे हा सर्व विचार करूनच लिहिली असेल. त्यामुळे त्यांची क्षमा मागूनच Paradox कुठे जाणवतो ते सांगतो:
अर्रर सॉरी मला ती कथा खरेच तुम्ही विनोदाने लिहिली आहे असे वाटले
इथे 'पृथ्वीवासियांच्या' दृष्टीने कथा सांगितली जाते कि "तो अवकाशात वेगाने जाऊन पृथ्वीवर परत आला" व निष्कर्ष असतो:
"त्याचे वय तेवढेच राहिलेले असते व पृथ्वीवासी वृद्ध झालेले असतात "
पण वेग हा सापेक्ष आहे. त्यामुळे जो अवकाशात जाऊन येतो त्याच्या दृष्टीने हीच कथा "पृथ्वी अवकाशात वेगाने जाऊन त्याच्याकडे परत आली" अशी होईल (का नाही होणार?). व त्याचा निष्कर्ष असेल:
"पृथ्वीचे (पृथ्वीवासियांचे) वय तेवढेच राहिलेले असते व हा वृद्ध झालेला असतो"
घटना तर एकच घडली आहे पण दोघांचे निष्कर्ष असे परस्परविरोधी आलेत. हे कसे काय? हाच तो Paradox. नक्की कोण तरुण राहील व कोण वृद्ध होईल? कथा सांगणाऱ्यावर ते अवलंबून असायला नको. त्यामुळे हरपा यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. किंबहुना मलासुद्धा अशा कथांमध्ये Paradox जाणवायचा पूर्वी पण त्याचे उत्तर मिळत नव्हते. व ज्यांनी ते मांडले आहे ते मला कळत नव्हते. परवा ChatGPT सोबत गप्पा मारताना तो उलगडा झाला. मला जसे समजले तसे मी पुढच्या प्रतिसादात स्टेप्स मांडत आहे. बघा तुम्हाला पटतात का...
१. अल्बर्ट आईनस्टाईन यांनी
१. अल्बर्ट आईनस्टाईन यांनी प्रकाशाचा वेग सापेक्ष नसून स्थिर असतो असे मानले
२. याचा अर्थ एखादी वस्तू अवकाशात स्थिर असली काय किंवा वेगात असली काय, त्या वस्तूच्या दृष्टीने प्रकाशाचा वेग मात्र तेवढाच (स्थिर) राहील.
३. याचाच पुढचा अर्थ, त्या वस्तूसाठी कालमापन मंदगतीने (काळविस्फारण) होईल. पाहणाऱ्याच्या दृष्टीने त्या वस्तूच्या वेगाच्या प्रमाणात तिचा काळ संथ झालेला दिसून येईल.
समजा राम व शाम एकाच वयाचे आहे. राम पृथ्वीवर आहे व शाम अवकाशात आहे.
रामच्या दृष्टीने पाहता...
५. रामच्या दृष्टीने विचार करता, पहिला मुद्दा: त्याचा स्वत:चाच वेग त्याच्यादृष्टीने शून्य असेल.
६. रामच्या दृष्टीने शामचा अवकाशातला वेग हा प्रकाशाच्या वेगाच्या अर्धा आहे असे समजू
७. आता इथे रामला शामच्या सगळ्या हालचाली संथपणे होताना व शामचे वयसुद्धा संथगतीने वाढताना दिसेल. कारण रामच्या दृष्टीने शामचा काळ विस्फारलेला आहे.
८. जेंव्हा शाम थांबेल (म्हणजेच रामच्याच गतीने प्रवास करेल) तेंव्हा शामचे काळविस्फारण थांबेल. आता मात्र शामचे वय रामच्या वयाप्रमाणेच वाढेल.
शामच्या दृष्टीने पाहता...
९. शामच्या दृष्टीने विचार करता, पहिला मुद्दा: त्याचा स्वत:चाच वेग त्याच्यादृष्टीने शून्य असेल.
१०. वेग सापेक्ष असल्याने वरील #६ चा परिणाम: शामच्या दृष्टीने रामचा अवकाशातला वेग प्रकाशाच्या वेगाच्या अर्धा असेल
११. काळविस्फारण सुद्धा सापेक्ष आहे. म्हणून वरील #७ चा परिणाम: शामला रामच्या सगळ्या हालचाली संथपणे होताना व रामचे वय संथगतीने वाढताना दिसेल. कारण शामच्या दृष्टीने रामचा काळ विस्फारलेला आहे.
१२. वरील #८ चा परिणाम: शामच्या दृष्टीने पाहता राम थांबलेला दिसेल. त्यामुळे रामचे काळविस्फारण थांबून आता रामचे वय शामच्या वयाप्रमाणेच वाढेल.
सारांश:
अ. सापेक्षतेमुळे गती, काळविस्फारण (वय संथ वय वाढणे) या गोष्टी दोघानाही एकमेकांच्या बाबत दिसतील. "त्याला हा लहान दिसेल आणि याला तो लहान दिसेल". एरव्ही अशक्य वाटणारी हि गोष्ट ते दोघे एकमेकांच्या दृष्टीने जोवर खूप वेगात आहेत तोवर घडत राहील.
ब. जितका वेग जास्त तितका एकाला दुसरा लहान दिसेल. म्हणजेच, एकमेकांसापेक्ष वेगाच्या प्रमाणात वयातला फरक असेल.
क. ते दोघे जेंव्हा एकाच गतीमध्ये येतील (कोणत्याही ठिकाणी, हा पृथ्वीवर आला काय, किंवा तो तिकडे गेला काय, किंवा दोघे मध्ये भेटले काय) तेंव्हासुद्धा "त्याला हा लहान दिसणे आणि याला तो लहान दिसणे" हे सुरु राहीलच, पण फक्त यावेळी सापेक्ष गती व काळविस्फारण संपुष्टात आल्याने "वयातला फरक शून्य" होऊन वरील #ब नुसार दोघे एकमेकांना शून्यच्या फरकाने लहान दिसतील. म्हणजेच, ते पुन्हा एकमेकास एकाच वयाचे दिसतील.
निष्कर्ष:
गती व काळविस्फारण सर्वकाही दोघांनी एकमेकांसापेक्ष समसमान अनुभवल्यामुळे एकाचेच वय वाढले व दुसऱ्याचे तेवढेच राहिले असे होणार नाही. जोवर सापेक्ष गती आहे तोवर त्यांना एकमेकांच्या वयातला फरक जाणवेल. पण भेटल्यानंतर दोघांनीही वये पुन्हा सारखीच होतील (व्हायला हवीत)
इतरही सारे इंटरेस्टिंग
इतरही सारे इंटरेस्टिंग प्रतिसाद दिसत आहेत. पण जरा नंतर/उद्या वाचतो
सुंदर विश्लेषण
सुंदर विश्लेषण. इथे एकाला दुसऱ्याच्या हालचाली संथ भासणे हे ध्वनी लहरींच्या बाबतीत डॉप्लर इफेक्ट सारखे वाटते आहे. फक्त तिथे प्रकाशाऐवजी ध्वनीकंपने संथ किंवा जलद भासतात, त्यामुळे कंपनसंख्या बदलते आणि आपण त्याला डॉप्लर इफेक्ट म्हणतो.
ध्वनी लहरींचा वेग constant नसतो हा एक फरक आहे, पण तो वेगळा मुद्दा आहे.
<<<<घटना तर एकच घडली आहे पण
<<<<घटना तर एकच घडली आहे पण दोघांचे निष्कर्ष असे परस्परविरोधी आलेत. हे कसे काय? हाच तो Paradox. नक्की कोण तरुण राहील व कोण वृद्ध होईल?>>>>
<<<<गती व काळविस्फारण सर्वकाही दोघांनी एकमेकांसापेक्ष समसमान अनुभवल्यामुळे एकाचेच वय वाढले व दुसऱ्याचे तेवढेच राहिले असे होणार नाही. जोवर सापेक्ष गती आहे तोवर त्यांना एकमेकांच्या वयातला फरक जाणवेल. पण भेटल्यानंतर दोघांनीही वये पुन्हा सारखीच होतील (व्हायला हवीत)>>>
मला वाटते ह्यात तुम्ही एक गोष्ट विचारात घेतली नाहीये, दोघांनाही स्वतःचा वेग दुसर्याच्या तुलनेत स्थिर वाटला तरी दोघांनाही गती आहे आणि त्या गतीचा त्यांच्या शरीरावर (शरीरातल्या पेशींवर किंवा त्याही पलिकडे जाऊन पेशींच कार्य ज्या जनुकांच्या कार्यान्वित होण्या न होण्यावर अवलंबून असते त्या प्रक्रियेवर) परिणाम होतो आहे. ह्या पैकी जी गती पेशींच्या चयापचयावर (biological ageing) नकारात्मक परिणाम घडवुन आणेल तो दुसर्याच्या तुलनेत जास्त वृध्द होइल.
रोचक मुद्दा, पर्णीका
रोचक मुद्दा, पर्णीका
मी काय किंवा कोण काय म्हणतय
मी काय किंवा कोण काय म्हणतय हे सोडून देऊया. पण दस्तुरखुद्द आईनस्टाईन महोदय काय म्हणतात ते त्यांच्याच शब्दात -----
Einstein: If we placed a living organism in a box ... one could arrange that the organism, after any arbitrary lengthy flight, could be returned to its original spot in a scarcely altered condition, while corresponding organisms which had remained in their original positions had already long since given way to new generations. For the moving organism, the lengthy time of the journey was a mere instant, provided the motion took place with approximately the speed of light
हे जर मान्य नसेल तर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. जर मान्य असेल तर पॅॅराडॉक्सचे निराकरण कसे करायचे ते बघता येईल.
शरीरातील क्रिया थांबणार का?
शरीरातील क्रिया थांबणार का?
म्हणजे त्याचे हार्ट थांबणार का?
अन्न तो घेईल की नाही.
सर्व जैविक क्रिया थांबल्या तर तो जीवंत कसा राहील.
हा प्रश्न आहेच ना.
आईनस्टाईन भौतिक शास्त्रज्ञ होता जीवशास्त्र ज्ञ नाही.
केशवकूल,
केशवकूल,
फक्त आईनस्टाईन यांनी त्यास पॅॅराडॉक्स न म्हणता "peculiar" म्हटलेय. पण हा पॅॅराडॉक्स आहे हे समकालीन अनेक वैज्ञानिकांनी सुद्धा नमूद केलेले आहे. यावर तेंव्हापासूनच विविध अंगाने चर्चा केली जात आहे:
आईनस्टाईन यांचे जे विधान तुम्ही दिलेले आहे, तोच उगम आहे पॅॅराडॉक्स चा
https://en.wikipedia.org/wiki/Twin_paradox
या आर्टिकल मध्ये आईनस्टाईन यांचे वरील विधान आहे आणि लगोलग Resnick यांचे विधान आहे ज्यात ते म्हणतात कि
If the stationary organism is a man and the traveling one is his twin, then the traveler returns home to find his twin brother much aged compared to himself. The paradox centers on the contention that, in relativity, either twin could regard the other as the traveler, in which case each should find the other younger—a logical contradiction. This contention assumes that the twins' situations are symmetrical and interchangeable, an assumption that is not correct.
जो पृथ्वीवर आहे त्याचा अनुभव, आणि जो अवकाशात आहे त्याचा अनुभव सापेक्षतेमुळे एकच समजला गेल्याने हा paradox वाटतो, पण तो अनुभव दोघांसाठी बहुतांशी सारखा असला तरी अगदी जशास तसे सारखा नसेल थोडा वेगळा असेल, त्यामुळे हा paradox उद्भवणार नाही असे स्पष्टीकरण त्यांच्यासहित अनेकांनी दिले आहे.
त्वरणाचा आधार घेऊन दिलेले स्पष्टीकरण:
हा वेगळा अनुभव म्हणजे जेंव्हा अवकाशात जाणारा (शाम) जेंव्हा त्याच्या अवकाशयानाचा वेग कमी वा जास्त करेल (acceleration) तेंव्हाच असेल. बाकी, एकदा ठराविक वेग आल्यावर त्या एकाच वेगाने तो किती काळ अवकाशात प्रवास करत राहणार याला महत्व नाही. कारण सापेक्षतेनुसार त्याच वेगाने पृथ्वीवरचा राम सुद्धा प्रवास करत असेल. पण ते acceleration मात्र फक्त शामच अनुभवेल राम नाही. कारण वेग सापेक्ष असतो, त्वरण (acceleration) नाही. पण केवळ वेग वाढवण्याच्या/कमी करण्याच्या कालावधीत वयात असा एकतर्फी कितीसा फरक पडेल?
पर्णीका / Hemant 333
पर्णीका / Hemant 333
तुमच्या शंका रास्त आहेत व अनेकांच्या मनात त्या येतात. परंतु जेव्हा प्रचंड गतीमुळे Time Dilation होते त्याचा अर्थ सर्वकाही मंद होते. अणुरेणू इतकेच काय त्याच्या आत जरी काही असेल ते सुद्धा स्लो होईल कारण काळाची मितीच ताणली जाते. त्यामुळे माणसाचे वयच काय तुम्ही इतर कोणतीही म्हणजे अगदी कोणतीही घटना विचारात घ्या ती स्लो झालेली असेल. व्हिडिओ प्लेबॅक स्लो केला तर जसे दिसते अगदी तोच इफेक्ट!
..अतुल तुम्ही म्हणता ती
..अतुल तुम्ही म्हणता ती स्थिती लक्षात आली .
पण जीवंत सजीव त्या स्थिती मध्ये जीवंत राहील का हा खरा प्रश्न आहे.
..दुसरं आपण वाचतो अवकाशात जेव्हा यात्री जातात तेव्हा ..त्या याना तील वातावरण नियंत्रित करावे लागते..
अगदी गुरुत्व पण ..कारण एक च ते जिवंत राहवेत.
वेग वाढेल तसे विपरीत परिणाम शरीरावर होवून रक्त वाहिन्या पण फुटू शकतात
मानवी देहाचा विस्फोट पण होवू शकतो.
प्रकाशाचा वेग म्हणजे infinite maas आणि तो वेग येण्यासाठी लागणारी infinite energy.
ह्याचा विचार तर करावाच लागेल
संशोधक नी शक्यता व्यक्ती केली आहे पण हे सर्व घटक जुळले तर च ते शक्य आहे
हे पण त्यांनी सांगितले आहे
आपण ती बाजू विचारात च घेत नाही
६० डिग्री सेलसिअस तापमान झाले
६० डिग्री सेलसिअस तापमान झाले तरी माणूस तडफडून मरेल.
मानवाला जीवंत राहण्यासाठी.
तापमान,हवेचा दाब,गुरुत्व,ऑक्सिजन,अन्न आणि असे अनेक घटक ह्यांची गरज असते.
हेमंत, आपली पृथ्वी हेच
हेमंत, आपली पृथ्वी हेच अवकाशयान आहे असे आपण समजू शकतो. वेग हा नेहमीच सापेक्ष असतो. त्यामुळे जेंव्हा जेंव्हा "वेगाने" असा शब्द असतो तेंव्हा तिथे नेहमीच "कुणाच्या दृष्टीने?" हा प्रश्न असतोच. या प्रश्नाशिवाय "वेग" शब्दाला अर्थ राहत नाही.
याचा विचार करता आपले पृथ्वी अवकाशयान आता या घटकेला...
१. ७९२००० किलोमीटर ताशी या वेगाने जात आहे (आकाशगंगेच्या केंद्राच्या दृष्टीने)
२. ३६८३ किलोमीटर ताशी या वेगाने जात आहे (चंद्राच्या दृष्टीने)
३. निवांत एकाच जागी थांबले आहे (आपल्याच दृष्टीने)
त्यामुळे विश्वात कुणाच्या दृष्टीने आपला वेग कितीही असला काय, किंवा आपल्या दृष्टीने कुणाचा वेग कितीही असला काय... आपल्या किंवा त्यांच्या आरोग्यावर त्याचा काडीमात्र परिणाम होत नाही. आणि हेच तत्व कोणत्याही अवकाशयानास लागू पडते. आणि प्रकाशाचे म्हणाल तर तो नेहमीच -- तुमचा वेग कुणाच्या दृष्टीने कितीही असो -- प्रकाशाचा वेग तुमच्यासाठी व त्यांच्यासाठी तेवढाच राहतो.
वेग हा फक्त अंक आहे आणि कुणाच्या दृष्टीने कुणाचा वेळ किती स्लो/फास्ट आहे इतकेच त्यावरून कळते असे आईनस्टाईनसाहेब सांगून गेलेत.
आता पृथ्वीसारखे कायम जगता येईल असे अवकाशयान कसे बनवायचे हा विषय वेगळा आहे.
हपा
हपा
जर एका स्थानापासून दूर जाताना वेळ कमी होत असेल तर त्या स्थानाच्या दिशेने येताना तो तितक्याच प्रमाणात वाढेल ना? >>> नाही. हा एकमार्गी प्रवास आहे. वन वे ट्राफिक. परतीच्या प्रवासामुळे पृथ्वी वरच्या जुळ्या च्या वयात अजून भर पडेल,
अतुल सर ,
अतुल सर ,
पण केवळ वेग वाढवण्याच्या/कमी करण्याच्या कालावधीत वयात असा एकतर्फी कितीसा फरक पडेल?>>> हो. पण अस होतंय खर.
त्वरणा चा केल्या शिवाय ही ह्या पॅॅराडॉॉक्स चे निराकारण करता येते. उदा. gravity field. जाणकार असेही म्हणतात की केवळ सापेक्षतावादाची समीकरणे मांडून गणिती पद्धतीनेही हा वाद सोडवता येतो.
Ok.
Ok.
पृथ्वी वेगाने फिरत आहे पण त्याची बिलकुल जाणीव आपल्याला होत नाही.
पण चंद्रावरून बघितले तर पृथ्वी स्थिर नाही हे दिसेल.
माझ्या माहितीत हल्ली हल्लीच
माझ्या माहितीत हल्ली हल्लीच नवीन भर पडली आहे. ती इथे शेअर करतो.
सूर्याच्या पृष्ठ भागावरून पृथ्वीवर यायला फक्त ५०० सेकंद लागतात.
सूर्याच्या गाभ्यामध्ये (कोअर) हायड्रोजनचे फ्युजन होता असते. परिणाम स्वरूप गॅॅमा किरणांचे उत्सर्जन होते. ह्या किरणाच्या कणांंना गॅॅमा रे फोटॉन म्हणूया. मग ह्या फोटॉनचा सूर्याच्या गाभ्या कडून पृष्ठभागाकडे प्रवास चालू होतो. जो प्रवास काही सेकंदात व्हायचा त्या प्रवासाला १०००,००० वर्षे लागतात. ह्याचे कारण ह्या प्रवासात फोटॉननां अनेक टक्के टोणपे खावे लागतात. ह्या प्रक्रियेत गॅॅमा किरणांचे दृश्य प्रकाशात रुपांतर होते. ह्याचे डिटेलवार वर्णन आपण इथे वाचू शकाल.
https://futurism.com/photons-million-year-journey-center-sun
फोटोन हा कण ताऱ्यांच्या
फोटोन हा कण ताऱ्यांच्या पृष्ठभाग सोडल्या वर च प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतो.
अगोदर नाही.
हे मि पण वाचले वाहे
प्राचीन कथा मध्ये ऋषी मुनी
प्राचीन कथा मध्ये ऋषी मुनी सुष्म शरीर घेवून दुसऱ्या दुनियेत जात असत म्हणजे स्वर्गात वैगेरे फेरी मारून येत असतं.
अगदी क्षणात.
म्हणजे ही टाईम ट्रॅव्हल ची कल्पना खूप जुनी आहे.
Warm hole असाच एक शॉर्टकट आहे दुसऱ्या दुनियेत जाण्याचा.
ही पण कल्पना च आहे म्हणा.
>> फोटॉनचा सूर्याच्या गाभ्या
>> फोटॉनचा सूर्याच्या गाभ्या कडून पृष्ठभागाकडे प्रवास
होय हे खूप भन्नाट आर्टिकल आहे. याविषयी आधीही वाचले होते. "हायड्रोजन जळून हेलियम बनतो आणि त्या धगीतून सूर्यप्रकाश तयार होतो" हि आपली किती over simplified बालिश कल्पना आहे
हे ते आर्टिकल वाचल्यावर कळते. किती क्लिष्ट आणि violent आण्विक अभिक्रिया सुर्यगर्भात घडत असतात! तिथून डोळ्याच्या पटलापर्यंतचा फोटोनचा लाखो वर्षांच्या प्रवासाचे वर्णन. भन्नाट आर्टिकल आहे!
जबरदस्त चर्चा सुरू आहे. काही
जबरदस्त चर्चा सुरू आहे. काही वर्षात वर फोटोत जे शास्त्रज्ञ आहेत त्या जागी तुम्ही सगळे दिसाल.
त्या सगळ्यांचे या चर्चेवर
त्या सगळ्यांचे या चर्चेवर बारकाईने लक्ष आहे
>> गतीचा त्यांच्या शरीरावर
>> गतीचा त्यांच्या शरीरावर (शरीरातल्या पेशींवर किंवा त्याही पलिकडे जाऊन पेशींच कार्य ज्या जनुकांच्या कार्यान्वित होण्या न होण्यावर अवलंबून असते त्या प्रक्रियेवर) परिणाम होतो आहे
>> वेग वाढेल तसे विपरीत परिणाम शरीरावर होवून रक्त वाहिन्या पण फुटू शकतात मानवी देहाचा विस्फोट पण होवू शकतो.
माफ करा हे दोन मुद्दे रास्त आहेत पण गतीच्या नव्हे तर त्वरणाच्या बाबतीत. जसे मी मागच्या प्रतिसादात लिहिले गती सापेक्ष आहे ती कितीही असू शकते. मानवी शरीरावर गतीचा काही परिणाम होणार नाही. पण त्वरण (म्हणजे ज्या वेगाने वाढ होते गतीमध्ये) सापेक्ष नाही. आणि एका मर्यादेपलीकडील त्वरणाचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हा मुद्दा इथे नोंद करायला हवा.
जसे कि विमानात किंवा तत्सम कोणत्याही वाहनात आपण अनुभवतो कि एकदम भर्रकन वेग वाढवला तर कानाला दडे बसतात. त्यापुढेही जास्त गतीने वाढवला तर अजून विपरीत परिणाम होतील. हा विचार करून अवकाशयानाला सुरक्षित त्वरण दिले जाते (साधारण ०.५ ते १ G). या त्वरणाने प्रकाशाच्या वेगाइतके पोहोचायला साधारण अडीच ते तीन वर्षे लागतील. अर्थात हे काल्पनिक अवकाशयानाचे गणित. प्रत्यक्षात आजची अवकाशयाने इतका वेग घेऊ शकत नाहीत. प्रकाशाच्या फक्त 0.0063% वेग आजच्या घडीच्या यानांनी साध्य केला आहे.
हे सगळे केवळ मानवी आरोग्याचा विषय निघाला म्हणून.
कारण मुळचा विषय आणि चर्चा हि "सापेक्षता वादाचे तत्व वापरून वेगाने अवकाश प्रवास करून तरुणच राहण्याची जी थियरी मांडली जाते ती खरेच योग्य आहे कि सापेक्षतेच्या सिद्धांताच्या चुकीच्या अवलोकनावर आधारित आहे (paradoxical)" हा आहे.
मी आज मेलो असे समजा माझी बॉडी
मी आज मेलो असे समजा माझी बॉडी पण जाळली.
अस्तित्व संपले.
पण time मशीन च वापर करून .
४०, वर्ष माग गेले तर मी शाळेत जात असताना त्या व्यक्ती ला कसा भेटेन.
ते पण पृथ्वी वर?
त्या साठी
समांतर universe ही कल्पना मान्य करावी लागेल.
आणि
मग ती स्थिती एकच ग्रहावर असेल तर च ते शक्य आहे
दोन तीन ग्रह बनवायला घेतले
दोन तीन ग्रह बनवायला घेतले आहेत. हिने कढईतून तळून काढले कि अवकाशात सोडणार आहे. तिथे ते मोठे होतील आणि तेलाने पेट घेतला कि आपल्याला उजेड मिळेल.
ही घटना पुरी ऑफ तलायनवाद नावाने ओळखली जाईल.
Hemant 333 हि कल्पना वापरून
Hemant 333 हि कल्पना वापरून पास्टात नाही फक्त फ्युचरात जाता येतं.
समांतर universe (multiverse) हि सुद्धा थियरी आहे पण वैज्ञानिकानी ती अजून मान्य केलेली नाही. पण ती खूपच भन्नाट आहे. बोलू कधीतरी त्यावर.
आचार्य तुम्ही वेगळ्याच विश्वात असता ब्वा
म्हणून मला समांतर विश्व कल्पना मस्त वाटते. कुठल्यातरी विश्वात मी तळलेले ग्रह खात असेन तेंव्हा इतरांचा माझ्याविषयी काय ग्रह होईल हे तेव्हाचे माझे ग्रह कसे असतील त्यावर अवलंबून 
तुम्ही वेगळ्याच विश्वात असता
तुम्ही वेगळ्याच विश्वात असता >> हे त्या विशिष्ट शहरातील कौतुक तर नाही ना?
Pages