अबकी बार खरंच ३०० के पार?

Submitted by कोहंसोहं१० on 19 May, 2019 - 12:08

सर्व राज्यातील निवडणुका संपल्या आहेत आणि विविध एक्सिट पोल बाहेर आले आहेत. सर्वच एक्सिट पोल मोदी सरकार पुन्हा येईल हेच दर्शवत आहेत. परंतु एक उत्कंठावर्धक बातमी अशी आहे जवळपास सर्वच पोल हे NDA ला ३०० च्या आसपास सीट्स मिळतील असे दर्शवत आहेत. लोकसत्ता वरून घेतलेले खालील आकडे:

Exit Poll 2019 प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज
> टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४

> इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७

> रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे.

रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७

> एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५

> आयएएनएस- सी व्होटर: भाजपा- २३६, काँग्रेस – ८०
एनडीए- २८७

> नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६

> न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२

> एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजपा – २१८, काँग्रेस ८१)

आज तक वर येणारे आकडे: एनडीए – ३३९-३६५, यूपीए – ७७-१०८, अन्य: ६९-९५

मायबोली वर याआधी मोदी विरुद्ध राहुल किंवा बीजेपी विरुद्ध काँग्रेस अश्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेत काँग्रेस समर्थक जास्त दिसत होते (निदान प्रतिसादावरून). परंतु देशातील जनमाणसात अजूनही मोदी लाट कायम आहे हे दिसत आहे. काँग्रेस च्या सीट्स वाढलेल्या दिसत असल्या तरी प्रमुख विदरोधी समर्थक म्हणून अजूनही पुरेसे समर्थ नेतृत्व आणि तश्या जागा त्यांना मिळालेल्या दिसत नाहीत.
शेवटी हे सर्व अंदाज आहेत. २३ ला खरे चित्र येईलच. परंतु त्याआधी आपल्याला काय वाटते? खरंच बीजेपी+ ३०० चा आकडा गाठेल?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आतातरी कर्नाटकात भाजपची अवस्था बिकट दिसते ,महाराष्ट्रात ही भरघोस यश मिळेल हेही दिवास्वप्न ठरेल सरकार जरी भाजपच आल तरी जागा मात्र कमीच होणार

भाजप साठी कर्नाटकचा गड खडतरच दिसतोय.
बर ते South वाले म्हणजे अती अस्मिता सांभाळणारे , नंदिनी दूध आणि अमुल वरून सुद्धा त्यांची अस्मिता डोकी फिरू शकतात .

इतक्या जागांवर लढण्यासाठी इतके उमेदवार अजुन शिल्लक आहेत त्यांच्याकडे??? >>>>>>>>
सध्या त्यांचे ५० खासदार आहेत , त्या खासदारांचे नातेवाईक आणि गांधी घराण्यातील वीस पंचवीस गांधी पकडुन होतील की ३७० .
Happy

Bjp कडे जे उमेदवार आहेत निवडणुका मध्ये उभे राहणारे ते सर्व आयात केलेले काँग्रेसी च आहेत.
Bjp कडे आमदार,खासदार होण्याच्या लायकीची लोक च नाहीत.
हे सत्य का नाकारत आहात

तुम्ही लै धडाधड गोळया मारता राव
आमदार खासदार होण्याच्या लायकीचे लोकं निवडताना काय parameter असतो बुवा ?
भाजपचे आमदार खासदार फक्त पक्षाच्या नावावर आणि मोदीच्या करिष्मावर निवडून येतात , काँग्रेसकडे या बाबत मोठ्ठा वणवा आहे .
राहुल च्या सभा नकोत अशी मुवमेंट काँग्रेसमध्ये २०१९ ला निघाली होती , लक्षात आहे ना ?

तुम्ही लै धडाधड गोळया मारता राव
आमदार खासदार होण्याच्या लायकीचे लोकं निवडताना काय parameter असतो बुवा ?
भाजपचे आमदार खासदार फक्त पक्षाच्या नावावर आणि मोदीच्या करिष्मावर निवडून येतात , काँग्रेसकडे या बाबत मोठ्ठा वणवा

मतदार संघात त्या व्यक्ती ल कोणी तरी ओळखले तरी पाहिजे
ह्या व्यक्ती ल का मत द्यावे इतके काम तरी त्याचे असावे त्या मतदार संघात
ज्याला आमदार तिकीट देता येईल
अशी लोक bjp कडे कुठे आहेत.
मोदी Karishma mule BJP ला लोकांनी अगोदर मत दिली नाहीत
बाबरी मशिदी मध्ये हिंदू च जीव अडकला होता म्हणून दिली होती.
आता लोक भानावर आली आहेत

}भाजपचे आमदार खासदार फक्त पक्षाच्या नावावर आणि मोदीच्या करिष्मावर निवडून येतात ,}
मग मूळ भाजपवाल्यांना सतरंज्या उचलायला ठेवून इतर पक्षातून तिकीट द्यायला लोक का आणतात? किमान स्वतः:ला खरं वाटेल, असं तरी लिहावं माणसाने.

बाबरी मशिदी मध्ये हिंदू च जीव अडकला होता म्हणून दिली होती.
आता लोक भानावर आली आहेत >>>>>
मी तर म्हणेन बाबरी मशिदीत मुस्लिमांनी आणि काँग्रेसने हिंदूचा जीव हेतूपुरस्सर अडकवला होता .
काय गरज होती मशिदीची केस इतक्या दिवस भिजत ठेवण्याची ?
धडधडीत पुरावे मिळाले असताना , पूर्वीच्या मोगल राजांनी धर्मप्रसार करण्यासाठी असंख्य देवळे फोडली हे माहीत असताना देखील बाबरी मशिदीला पकडुन बसले होते .
तेच बांधकाम स्वतःहून पाडले असते , हिंदूंच्या ताब्यात त्या जागा दिल्या असत्या तर दोन्ही धर्मातील दुफळी माजली असती का ?
उलट जगापेक्षा वेगळा भारतातील सहिष्णू मुस्लिम धर्म दिसून आला असता .
तिथे प्रोफेट किंवा इतर मोठ्ठ्या मुस्लिम संताचे जन्मस्थान नव्हते पण सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदू लोकांसाठी ती रामजन्म भूमी होती .
अयोध्येत त्यांना जे जमले नाही ते त्यांनी ग्यानवापी बाबत करून दाखवाव , बघा देशात कशी शांतता नांदेल .
ग्यान वापी मध्ये स्पष्ट दिसतेय हजारो वर्षांपूर्वीच्या मंदिराच्या खांबाचा उपयोग करून बांधण्यात आलेली मस्जिद !
मोगलांनी त्याची नासधूस केली मग आत्ताच्या मोगलांनी ते जस्टिफाय का करावे ?
त्यात मुस्लिमांना भडकवण्याचा कार्यक्रम लीब्री गँग जोमात करत असते .

देशातल्या महान ज्योतिष्यांनी पावसापाण्याच अचूक भविष्य सांगितल त बर व्हयील अवकाळीन शेकऱ्याले पार भिकेला लावल नी सरकारन भाव न देऊन आमच कंबरडच मोडल सरकार काय कुनाचभी आल तरी त्ये भांडवलदाराचच आसत भारतातला प्रत्येक आमदार खासदार करोडपतिच आसतो त्यो कशालेगरीबाच हित बघल परतेक पक्षाले सत्ता पायझेल नी सत्तेसाठी निवडणुकीत पैसा लागतोय तवा कोनताभी पक्ष आसो त्यो जो जादा फंड दिल त्यायचच भल करल नी त्यायले अशे सर्वेवालेभी ईकत घ्याव लागतातच की जमिनीवर उतरून पाव्हा तवा तिनशेपार का वजाबाकी व्हनार ह्ये कळल पर एक बात खरीच हाय की भाजपले बहुमत भेटल तरी काठावरचच आसल तस या त्या पक्षातून निवडुन येनार आमदार खासदार ईडी ,शिबिआय ,मुख्यमंत्री पदाची लालूच दावून पक्ष कशे फोडायचा नी सत्ता कशी मिळवायची याबाबत भाजपचा हात धरनारा दुसरा कुठलाच पक्ष अस्तित्वात नाय म्हना तवा काय सांगता यांनी त नाय ।

काल काँग्रेस घराण्याच्या राजपुत्राचा वाढदिवस होता .
त्यांना भाजप समर्थकांनी पप्पू म्हणून सतत हिणवले पण राजपुत्राने कधीच सभ्यतेची पातळी ओलांडली नाही .
कोट्यवधी भारतीयांच्या लोकांच्या अपेक्षा या महान राजपुत्राकडून आहेत ,त्यांना उशिरा का होईना
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

एक पत्रकार परिषद पण घेण्याची बैद्धिक कुवत. नसणारे च त्यांना पप्पू म्हणतात.
लोकांस चांगले माहीत आहे पप्पू कोण आहे ते

बुद्धिवान , कर्तबगार , अहो रात्र देशाची आणि कुटुंबाची सेवा करणाऱ्या रागाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या की नाही ?

Pages