अबकी बार खरंच ३०० के पार?

Submitted by कोहंसोहं१० on 19 May, 2019 - 12:08

सर्व राज्यातील निवडणुका संपल्या आहेत आणि विविध एक्सिट पोल बाहेर आले आहेत. सर्वच एक्सिट पोल मोदी सरकार पुन्हा येईल हेच दर्शवत आहेत. परंतु एक उत्कंठावर्धक बातमी अशी आहे जवळपास सर्वच पोल हे NDA ला ३०० च्या आसपास सीट्स मिळतील असे दर्शवत आहेत. लोकसत्ता वरून घेतलेले खालील आकडे:

Exit Poll 2019 प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज
> टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४

> इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७

> रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे.

रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७

> एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५

> आयएएनएस- सी व्होटर: भाजपा- २३६, काँग्रेस – ८०
एनडीए- २८७

> नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६

> न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२

> एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजपा – २१८, काँग्रेस ८१)

आज तक वर येणारे आकडे: एनडीए – ३३९-३६५, यूपीए – ७७-१०८, अन्य: ६९-९५

मायबोली वर याआधी मोदी विरुद्ध राहुल किंवा बीजेपी विरुद्ध काँग्रेस अश्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेत काँग्रेस समर्थक जास्त दिसत होते (निदान प्रतिसादावरून). परंतु देशातील जनमाणसात अजूनही मोदी लाट कायम आहे हे दिसत आहे. काँग्रेस च्या सीट्स वाढलेल्या दिसत असल्या तरी प्रमुख विदरोधी समर्थक म्हणून अजूनही पुरेसे समर्थ नेतृत्व आणि तश्या जागा त्यांना मिळालेल्या दिसत नाहीत.
शेवटी हे सर्व अंदाज आहेत. २३ ला खरे चित्र येईलच. परंतु त्याआधी आपल्याला काय वाटते? खरंच बीजेपी+ ३०० चा आकडा गाठेल?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आणि हे ममता,मायावती,शरद पवार ,मुलायम,चंद्रा बाबू काय देश सांभाळणार आहेत . >>> ठासून भरलेला द्वेष, मळमळ आणि गरळ बाहेर आली एकदाची. याकडे डोळेझाक करत बाकीच्यांची मात्र द्वेषाची टेप चालू आहे,

यांची काय व्याख्या आहे द्वेषाची ?
एका भाजप खासदाराने एका भाजप आमदाराला मिटींगदरम्यान पायातला जोडा काढून जोरदार प्रेमपूर्वक जोड्याने गालास स्पर्श केला. या घटनेचा व्हिडीओ ज्याने व्हायरल केला त्याच्या मनात द्वेष वसत असणार. जोडाप्रेमी आणि स्पर्शेच्छुक यांच्यातले प्रेम त्यास दिसले नाही.

ईव्हीएम बाबत तक्रारी बिनबुडाच्या आहेत तर ही मंडळी का गेली होती सर्वोच्च न्यायालयात ? ८ ऑक्टोबर २०१३ चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असतानाही व्हीव्हीपॅट लावायला चार वर्षे का घेतली ?
व्हीव्हीपॅटची शंभर टक्के मतमोजणी का नाही ?
मतमोजणीसाठी जाचक अटी का आहेत ?
निवडणूक आयोगातले एक आयुक्त आयोग निष्पक्ष नाही असे सांगतोय त्याचे काय ?

ते राजस्थान मध्यप्रदेशच्या विधानसभा निकालानंतर हे EVM EVM गळा काढणारे कुठे गेले होते?
का पराभव समोर दिसायला लागल्यानंतर पळवाटा शोधायला लागला का?

खरंय खरंय.... ईव्हीएम फक्त राजस्थान, मध्यप्रदेशातच नीट चालायच्या २००९ च्या अलिकडे पलिकडे . जिथे भाजप हरायची तिथे घोटाळा होत असे. सहमत आहे.

आणि हे ममता,मायावती,शरद पवार ,मुलायम,चंद्रा बाबू काय देश सांभाळणार आहेत .
~ हो का? जसा काही भारत देश परशुरामाने मोदींच्या हातात दिलाय चालवायला बारा हजार वर्षांपासून. काही मनाची लाज हय का?

<आणि हे ममता,मायावती,शरद पवार ,मुलायम,चंद्रा बाबू काय देश सांभाळणार आहेत .>
मोदींनी सांभाळला, त्यापेक्षा बराच बरा सांभाळतील.

शाधनाताई पळवलेले मशीन्स ही काय भानगड आहे? समजावून सांगाल का?>>>>>>

माझा काय संबंध? मशीन पळवली असे जे म्हणतात त्यांना माहिती असणार.

"अबकी बार खरंच ३०० के पार?" हा प्रश्न पडलेले कोहंसोहं१० दिसले नाही परत , वाचत असतील तर शतकपूर्तीच्या शुभेच्छा Wink

फक्त महाराष्ट्र चा विचार केला तरी काही गोष्टी ध्यानात येतील .
देवेंद्र फडणवीस सरकार वर भ्रष्टाचार चा एक सुधा आरोप विरोधक करू शकले नाहीत .
BJP chya हिंदुत्व च्या राजकारण ला शह देण्यासाठी जातीय राजकारण सुरू केले .
त्या नुसार मग मराठा मोर्चा,कुणबी मोर्चा,धनगर मोर्चा obc मोर्चा असले प्रकार विरोधक करू लागले पण महाराष्ट्रात जात आणि धर्म आणि भाषा ह्या वरून मतदान होत नाही एवढी अक्कल सुधा विरोधकांना नव्हती .
हिंदुत्व चे कट्टर बाळासाहेब सारखे नेते असताना सुधा ह्या राज्याची सत्ता मिळवण्यासाठी किती तरी वर्ष गेली पण पूर्ण बहुमत हिंदू मोठ्या संख्येने असून सुधा त्यांना मिळालं नाही .
भाषेचं नाव घेवून मत मागणाऱ्या लोकांना सुधा इथल्या जनतेने नाकारलं .
Up आणि बिहार च गलिच्छ जातीच गणित महाराष्ट्रात कधीच यशस्वी होणार नाही हे समजायला पाहिजे होते .
देवेंद्र फडणीस सरकारनी कोणताच मोर्चा न अडवता कोणाच्या च मागण्या न फेटाळ ता विरोधक ची हवा च काढून घेतली .
जल्युक्त शिवार ही योजना राबवताना त्या वर अंकुश ठेवून विरोधी पक्षांनी आपले अस्तित्व दाखवून द्यायला पाहिजे होते ते पण त्यांनी केले नाही

हे काय बडबडताहेत?
ं<देवेंद्र फडणवीस सरकार वर भ्रष्टाचार चा एक सुधा आरोप विरोधक करू शकले नाहीत .>
फडणवीसांकडे क्लीन चिट द्यायचं एक मशीन आहे. ते सध्या निवडणूक आयोग वापरतंय.

मायवती वगैरे देश सम्भाळु शकत नाहीत !!

१९४२ साली फितुरी केलेल्या आनि १९८० साली राजीव गान्धीना संग्णकाला विरोध करायला बैल्गाडी आणलेल्या संघ रत्न पुर्स्कारीत माण्साने ते पद भुशवुन दाखव्ले होते की.

चमच्यांनी आताच EVM ची रडारडी सुरु केली आहे , २ दिवस दम धरा आणि मग काय रडारडी करायची ती करा अजून किती वेळा सर्वोच्च न्यायालयाकडून शिव्या खाणार आहेत देव जाणे ...

काँग्रेस चे इतके वाईट दिवस आहेत कि पोगो स्टार ला पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित पण करू शकत नाहीत .. वाट बघू, निकाल नंतर ठरवू अरेरे ...आता पार माया , ममता आणि चंद्राबाबू ची नाव अरे हि लोक स्वतःच्या जीवावर २०-३० सीट पण नाही आनु शकत आणि देश चालवायचा स्वप्न बघतात , थोडी पण लाज लज्जा नाही ह्यांच्यात ..लोक एवढी येडी नाहीत, आणि पप्पू तर नाहीच नाही..

मगाशी वेगळ्या धाग्यावर लिहिलेला मजकूर डकवत आहे.
रालोआला बहुमत मिळाले नाही तर मग पंप्र कोण होणार हा खल वाचला. राहुल गांधी, शरद पवार, मायावती, ममता, चंद्राबाबू ही अशी बरीच नावं चर्चेत होती/असल्याचं अनेक ठिकाणी वाचलं आहे. नवीन पटनाईक हाही एक त्यातल्या त्यात उजवा पर्याय ठरू शकतो, जर ते राजी झाले तर. ते ओडिशामधे ३-४ वेळा निवडून आले आहेत, मोदींसारखेच. त्यामुळे अनुभवी आहेत, लोकप्रिय आहेत आणि नुकत्याच आलेल्या चक्रीवादळात त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे भाजपानेही कौतुक केले आहे.
अर्थात हे सगळं जर-तर आहे, त्यांनी अजून रालोआ विरोधकांना सामील होणार की नाही ही बाब गुलदस्त्यात ठेवली आहे Happy

किती भंपक हे भाजपावाले.
एकेकाळी ममता ह्याम्च्याच वाजपेयी कळपात रेल्वे मंत्री होत्या,
ममता , मायावती आणि जयललिताने वाजपेयींच्या गुढग्याचा अगदी दशरथ राजा करून ठेवला होता, गुरुची ही अवस्था आणि शिश्याचे चेले त्याण्ची टर उडवताहेत.

<<१९४२ साली फितुरी केलेल्या आनि १९८० साली राजीव गान्धीना संग्णकाला विरोध करायला बैल्गाडी आणलेल्या संघ रत्न पुर्स्कारीत माण्साने ते पद भुशवुन दाखव्ले होते की.>>
India bought its first computer in 1956 for a princely sum of Rs 10 lakh. It was called HEC-2M and was installed at Calcutta's Indian Statistical Institute.
काळे मांजर भारतात पहिला संगणक १९५६ लाच आलेला होता उगाच राजीव गांधींच्या गप्पा झोडु नका, आणि ४२ ची चलेजाव ची मोहीम ला काय नुसता संघाचं विरोध होता का काँग्रेस च्याच काही लोकांचा त्याला विरोध होता
Many leaders from Congress itself, such as C. Rajagopalachari, Maulana Abul Kalam Azad. Rajaji were opposed to Quit India Movement, Communists opposed Quit India Movement after their British counterparts advised them of the Anglo-Soviet alliance and the need for Indian Communists to support war effort.Even Ambedkar was not favourably disposed to the entire movement.
आधी आपल्याच पारड्यात बघत जावा कि काय ठेवले होते आणि मग दुसर्यांना उपदेश करत जावा..

ममता , मायावती आणि जयललिताने वाजपेयींच्या गुढग्याचा अगदी दशरथ राजा करून ठेवला होता, गुरुची ही अवस्था आणि शिश्याचे चेले त्याण्ची टर उडवताहेत.- काळे मांजर, अहो मंत्री बनवला होत , पंतप्रधान नाही.. आणि आता वाजपेयींचा जमाना नाही राहिला ..२० वर्ष झाले आता त्याला ..तुम्ही निदान पप्पू ला एखाद मंत्रालय तरी द्यायचं होता लायकी सिद्ध करायला..पण तेंव्हा भरवसा नव्हता वाटत भारतात राहील कि बँकॉक मध्ये ..

भांडखोर पणा,उगाचच गोंधळ घालण्याची वृत्ती हे सर्व ममता,मायावती मध्ये ठासून भरली आहे ,
जयललिता त्या दोघी न पेक्षा खूप वेगळ्या होत्या उगाच जयललिता चा अपमान करू नका

किती भंपक हे भाजपावाले.
एकेकाळी ममता ह्याम्च्याच वाजपेयी कळपात रेल्वे मंत्री होत्या, >>>

Lol , तोच भंपकपणा रागा पुढे चालवत आहेत. एक ठिकाणी रागानी ममता भ्रष्टाचारी म्हणून कांगावा करायचा आणि नंतर महागठबंधांच्या नावाखाली सोगानि त्यांचा हात धरायला जायचं !

काळे मांजर भारतात पहिला संगणक १९५६ लाच आलेला होता.

पहिला बाजारात आला असेल, सार्वजनिक जीवनात व सरकारी कामात या अर्थाने राजीव गान्धीना श्रेय जाते.

माझे संदर्भ चुकले. बैल्गाडी आंदोलन हे पेट्रोल दरवाधी विरुध होते. राजीव गान्धी संग्णक वगैरे दुसरे प्रकरण.

https://www.quora.com/Why-did-the-BJP-oppose-the-Computer-Revolution-in-....

त्यामुळे अनुभवी आहेत, लोकप्रिय आहेत आणि नुकत्याच आलेल्या चक्रीवादळात त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे भाजपानेही कौतुक केले आहे. >>> चीकू, बीजेडी आणि बीजेपीचा काही अपवाद वगळता बर्‍याच अंशी uneventful असलेला ईतिहास, पटनाईकांची एवढ्या वर्षात खूप प्रकर्षाने दिसून न आलेली नॅशनल लेवलवरची महत्वाकांक्षा, वादळातल्या कामाबद्दल पटनाईकांचे झालेले कौतूक आणि मोदींनी पटनाईकांविरोधात ओडिशात प्रचार करतांना, महागठबंधन आणि ममता वर केलेल्या घणघणाती प्रहारांच्या तुलनेत केलेले फार म्हणजे फारच सौम्य प्रहार - ह्या दोन-चार बाबींवरून मला असे वाटते की बीजेडी भाजपाच्या बाजूने किंगमेकर बनणे जास्त पसंत करेन.
पुन्हा नॅशनल प्रेझेंसचा बॅकबोन नसलेल्या रिजनल पार्टी चा कुठलाही नेता पंप्तप्रधानपदी पूर्ण १ वर्षभरही राहू शकलेला नाही हा ईतिहास आहे. नुसते शपथविधी सोहळे बघणे कोणाला आवडेल.

>>पुन्हा नॅशनल प्रेझेंसचा बॅकबोन नसलेल्या रिजनल पार्टी चा कुठलाही नेता पंप्तप्रधानपदी पूर्ण १ वर्षभरही राहू शकलेला नाही हा ईतिहास आहे. नुसते शपथविधी सोहळे बघणे कोणाला आवडेल
+१००.
२५०+ पार केलेल्या पक्षाला पाठींबा द्यायला रांगा लागतात. सत्तेच्या सुळावर आपली पोळी भाजून पक्ष व राजकीय हित साधणे हे साधे गणित असते.
मात्र, निव्वळ १००+ पार केलेल्यांच्या मागे जाऊन स्वताच्या पक्षाचं आणि हिताचं माथेरं करण्यात कुणी शक्यतो पुढे येत नसतं.
आता मोदी नकोच म्हणून अडून बसलेल्यांना हे कसं समजवायच..? Wink
असो.

जयललिता यांना भ्रष्टाचाराची मूर्ती असे भाजप नेत्यांनी म्हटले होते. यांच्या गोटात आल्या आणि त्या पवित्र झाल्या. कुणीही चोर, दरवडेखोर, खूनी, तडीपार, दंगलखोर, घोटाळेबाज, दहशतवादी यांना पवित्र व्हायचे असेल की त्यांना एकच छावणी आहे आणि ती म्हणजे....

शीर्षक वाचून आयपीएल आठवलं. आयपील सुरू व्हायच्या अगोदर विराट कोहली जाहिरातीत बोलायचा आम्ही 200 करू नी 300 करू पण पहिल्याच सामन्यात 70 बनवताना नाकीनऊ आले होते.

मोदीण्चा गुजरात सोडुन देशव्यापी करियरचा प्रारंभ सुखरामला भाजपा गटबंधनात ओढुन झाला होता. तेही पैसे खाताना सापदल्यान्ण्तर.

हेच मोदी नोटाब्ण्दीत बोल्ले होते, १९४७ से आज तक सबको पाई पाई का हिसाब देना पडेगा आणि लॉकहार्टचा शाप लागल्यागत स्मृतीभंश झालेले लोक टाळ्या वाजवत होते.

जयललिता यांना भ्रष्टाचाराची मूर्ती असे भाजप नेत्यांनी म्हटले होते. यांच्या गोटात आल्या आणि त्या पवित्र झाल्या. कुणीही चोर, दरवडेखोर, खूनी, तडीपार, दंगलखोर, घोटाळेबाज, दहशतवादी यांना पवित्र व्हायचे असेल की त्यांना एकच छावणी आहे आणि ती म्हणजे....

नवीन Submitted by किरणुद्दीन on 21 May, 2019 - 21:19 >>>

मला वाटत की ही एक सामान्य बाब झालेली आहे. म्हणजे ममतांचा हात पकडायचा प्रयत्न करणाऱ्या सोगा, रागाच्या मागे मैत्रीसाठी धावणारे हतबल केजरीवाल, हे सर्व पाहिले की तुम्ही लिहिलंय ते सर्व नेहेमीचंच वाटतं.

Pages