अबकी बार खरंच ३०० के पार?

Submitted by कोहंसोहं१० on 19 May, 2019 - 12:08

सर्व राज्यातील निवडणुका संपल्या आहेत आणि विविध एक्सिट पोल बाहेर आले आहेत. सर्वच एक्सिट पोल मोदी सरकार पुन्हा येईल हेच दर्शवत आहेत. परंतु एक उत्कंठावर्धक बातमी अशी आहे जवळपास सर्वच पोल हे NDA ला ३०० च्या आसपास सीट्स मिळतील असे दर्शवत आहेत. लोकसत्ता वरून घेतलेले खालील आकडे:

Exit Poll 2019 प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज
> टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४

> इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७

> रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे.

रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७

> एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५

> आयएएनएस- सी व्होटर: भाजपा- २३६, काँग्रेस – ८०
एनडीए- २८७

> नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६

> न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२

> एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजपा – २१८, काँग्रेस ८१)

आज तक वर येणारे आकडे: एनडीए – ३३९-३६५, यूपीए – ७७-१०८, अन्य: ६९-९५

मायबोली वर याआधी मोदी विरुद्ध राहुल किंवा बीजेपी विरुद्ध काँग्रेस अश्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेत काँग्रेस समर्थक जास्त दिसत होते (निदान प्रतिसादावरून). परंतु देशातील जनमाणसात अजूनही मोदी लाट कायम आहे हे दिसत आहे. काँग्रेस च्या सीट्स वाढलेल्या दिसत असल्या तरी प्रमुख विदरोधी समर्थक म्हणून अजूनही पुरेसे समर्थ नेतृत्व आणि तश्या जागा त्यांना मिळालेल्या दिसत नाहीत.
शेवटी हे सर्व अंदाज आहेत. २३ ला खरे चित्र येईलच. परंतु त्याआधी आपल्याला काय वाटते? खरंच बीजेपी+ ३०० चा आकडा गाठेल?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

यु पी त जागा कमी होनार आहेत, महाराश्त्रात कमी होनार आहेत, ब्म्गाल ममताचेच . मग ३०० क्रोस कसे होनारेत म्हणे ?

Wait for 3 more days. एवढी काय घाई आहे. बाकी माबो वर कॉंग्रेस समर्थक जास्त आहेत हे खरे. पण त्यामुळे मोदींना काही फरक पडत नाही Happy

यु पी त जागा कमी होनार आहेत, महाराश्त्रात कमी होनार आहेत, ब्म्गाल ममताचेच . मग ३०० क्रोस कसे होनारेत म्हणे ?
नॉर्थ ईस्ट ची राज्य आसाम, ओरिसा ,बंगाल ही राज्य आहत
Up la केंद्रीय सरकार मध्ये बहिष्कार टाकला पाहिजे
Sp आणि मायावती हे दोन mahamurkh केंद्रात बिलकुल नकोत
Up

यु पी त जागा कमी होनार आहेत, महाराश्त्रात कमी होनार आहेत, ब्म्गाल ममताचेच . मग ३०० क्रोस कसे होनारेत म्हणे ?
नॉर्थ ईस्ट ची राज्य आसाम, ओरिसा ,बंगाल ही राज्य आहत
Up la केंद्रीय सरकार मध्ये बहिष्कार टाकला पाहिजे
Sp आणि मायावती हे दोन mahamurkh केंद्रात बिलकुल नकोत
Up

मी यंदा मतदान केले नाही. त्यामुळे काहीही उलथापालथ होऊ शकते. आजवर मी ज्याला मत दिले तो उमेदवार जिंकला आणि त्यांचाच पक्ष सत्तेत आला हा ईतिहास आहे.

टा. प्रतिनिधी, नाशिक
'नरेंद्र मोदी यांची पत्रिका कन्या राशीची असून, ते वृश्चिक राशीचे आहेत. त्यांच्या पत्रिकेद्वारे राशीत गुरुचे भ्रमण सुरु आहे. याचा त्यांना निश्चितच फायदा होईल. भाजपच्या अनेक उमेदवारांच्या पत्रिकेत केंद्रस्थानी गुरुचे भ्रमण सुरू आहे. मात्र त्यांना बहुमत मिळणार नाही. असे असले तरी महायुतीतील घटक पक्ष व इतर छोट्या पक्षांच्या आधारे ते सत्तास्थापन करतील. त्यानंतर पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील,' असे भाकीत राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशनात महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दे‌श्वर मारटकर यांनी वर्तविले आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक उमेदवाराला, राजकीय पक्षांना आणि सामान्यांचे लक्ष सत्तास्थापनेकडे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर ज्योतिषी सिध्देश्वर मारटकर यांनी राजकीय नेत्यांच्या पत्रिकांचा अभ्यास करुन निकालाचा अंदाज वर्तविला आहे. ज्योतिषशास्त्राच्या आधारे यंदा पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील पण, सेना-भाजपला बहुमत नसेल, असे भाकीत त्यांनी वर्तविले आहे. रविवारी सकाळी कालिका देवी मंदिरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मारटकर म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पत्रिकेत गुरु तूळ राशीत असून, रवी व मंगळ मिथून राशीत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत त्यांचे बोलणे त्यांचे प्रभावी झाल्याचे दिसते आहे. त्यांच्या पत्रिकेनुसार ते पंतप्रधान होणार नाहीत. पण, सेना-भाजपला काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा फटका बसेल. चांगल्या संख्येने महाआघाडीचे उमेदवार निवडणून येतील. तसेच प्रियंका गांधी यंदा लोकसभेच्या रिंगणात नाहीत. त्यामुळे त्यांच्या विजयी होण्याचा प्रश्न येत नाही. प्रियंका यांची मूळ पत्रिका धनू रवी अशी आहे. त्यांच्या पत्रिकेतील शनी हा वृषभ राशीत आहे. त्यामुळे जुलै २०२० नंतर प्रियंका यांचा राजकारणातील प्रभाव अधिक जाणवू लागेल, असे भाकीत त्यांनी वर्तविले. त्यामुळे २३ मे रोजी मताधिक्य कोणाच्या पारड्यात पडते आणि ज्योतिषी मरटकरांनी वर्तविलेले भाकीत अचूक ठरेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
समीर यांची पत्रिका चांगली
नाशिक लोकसभेच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची पत्रिका पाहता महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांची कन्या राशीची पत्रिका आहे. त्यांची रास कुंभ असून, त्यांच्या केंद्र स्थानातून शनी आणि गुरुचे भ्रमण सुरू आहे. त्यामुळे त्यांची सध्याची ताकद वाढली आहे. याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. या उलट महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांची कर्क रवीची पत्रिका असून, त्यांच्या ६ व्या स्थानात शनीचे भ्रमण सुरू आहे. त्यामुळे त्यांचे मताधिक्य कमी होण्याची शक्यता आहे. या रिंगणात अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांचाही प्रभाव असणार आहे. तो हेमंत गोडसे यांना अधिक त्रासदायक ठरेल. त्यामुळे नाशिकमधून विजयी होणाऱ्या उमेदवाराला अगदी अटतटीचा विजय प्राप्त होणार आहे, असेही मरटकर म्हणाले.
राज्यात 'महायुती'ला फटका!
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रिका कर्क रवीची आहे. त्यांचा मूळ शनी कर्क राशीत आहे. १२ व्या स्थानात मंगळ आणि राहू आहे. त्यामुळे सेना-भाजपच्या जागेत केंद्रासह महाराष्ट्रातही घट होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रिकेत रवी वृश्चिक राशीत असून, या राशीत गुरुचे भ्रमण सुरू आहे. हे त्यांच्यासाठी अनुकूल असेल. यंदा महाआघाडीच्या जागेत वाढ होईल, असेही भाकीत मरटकरांनी वर्तविले.
'राज' यांना विधानसभा!
'मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रिकेत रवी मंगळ हा मिथून राशीत आहे. धनू राशीतील गुरू त्यांचा प्रभाव वाढविणारा आहे. लोकसभेच्या निवडणुकांमध्येही त्यांच्या नेतृत्वाचा आणि भाषणाचा प्रभाव होता. त्यांच्या पत्रिकेतील गुरूचा सर्वाधिक प्रभाव विधानसभेत जाणवले. मनसेचे काही उमेदवार विधानसभेत विजयी होतील, असेही मरकटकर म्हणाले.
सुजय-पार्थ विजयी होणार?
सुजय विखे-पाटील व पार्थ पवार यांची पत्रिका चांगली आहे. सुजय यांच्या पत्रिकेत रवी समोर गुरू चालून आला. त्यांचा एकतर्फी विजय होऊ शकतो. पार्थ यांच्या पत्रिकेत रवी मीन राशीत असून, मंगळ, राहू व शनी मकर राशीत आहेत. त्यामुळे त्यांची राजकारणातील सुरुवात त्यांची दमदार झाली आहे. त्यांना मात्र फार कमी फरकाने विजय-पराजयचा सामना करावा लागेल, असा अंदाज मारटकरांनी व्यक्त केला

२००४ साली सर्व exit poll चुकले होते तेही ७० च्या मार्जिनने. यावेळीही भाजप २८० वरून २१० वर येऊ शकतं.
Exit poll ची विश्वासार्हता शून्य आहे. तिकडे कांगारू लँडमध्येही सर्व ओपिनियन पोल , exit poll जो निकाल दाखवत होते त्यापेक्षा वेगळा निकाल लागला तोही १ टक्का मत-फरकाने. अमेरिकेत तमाम मीडिया, टाईम सकट - हिलरीच येणार असं म्हणत होते.
दुसरीकडे २०१४ मध्ये भाजपला अंदाजापेक्षाही ३०-४० जागा जास्तच भेटल्या होत्या सो इट कॅन गो आयदर वे, द इलेक्शन इज स्टिल वाईड ओपन.
रागा पेक्षा पवार फॉर पीएम इज माय प्रेफरन्स!

रागा पेक्षा पवार फॉर पीएम इज माय प्रेफरन्स!
नवीन Submitted by सनव on 20 May, 2019 - 09:07
__
दोन एक खासदार घेऊन हे शक्य झाले तर आमचा देखील पाठिंबा घड्याळ काकांना असेल. Lol

गेल्या ८ वर्षांत फक्त टुडेज चाणक्य ने दिलेल्या एक्सिट पोल्स नि सर्वात जास्त वेळा बाजी मारलीय. यावेळी ते NDA ला ३५० सीट्स मिळतील असे सांगत आहेत. त्यान्चे २०१४ चे एक्जिट पोल्स सर्वात अचुक होते.

@TodaysChanakya
All India Lok Sabha Tally 2019
BJP 300 ± 14 Seats
NDA 350 ± 14 Seats
Cong 55 ± 9 Seats
UPA 95 ± 9 Seats
Others 97 ± 11 Seats

नरेंद्र मोदी यांची पत्रिका कन्या राशीची असून, ते वृश्चिक राशीचे आहेत. त्यांच्या पत्रिकेद्वारे राशीत गुरुचे भ्रमण सुरु आहे. याचा त्यांना निश्चितच फा

>>>>>
म्हणजे मागे कोणीतरी bjp ला पिंडीवरचा विंचू म्हणालेले ते अगदीच चुकीचे नव्हते तर

नरेंद्र मोदी यांची पत्रिका कन्या राशीची असून, ते वृश्चिक राशीचे आहेत >>>>दोन दोन राशिवाला माणूस पहिल्यांदाच पाहतोय . मोदी है तो मुमकिन है
ज्योतिषी सिध्देश्वर मारटकर हे पावसापाण्याचं भविष्य सांगतील का ?

म्हणजे मागे कोणीतरी bjp ला पिंडीवरचा विंचू म्हणालेले ते अगदीच चुकीचे नव्हते तर>>>> मग राहुल गांधी पण वृश्चिकेचे आहेत, त्यांना तसेच म्हणाल का? Proud

सिंबा, यातला उपहास सोडा. पण मेष ( शरद पवार ) वृश्चिक ( वाजपेयी, मोदी , नारायण राणे व राहुल ) कर्क ( नेहेरु, म. गांधी ) मकर ( इंदिरा गांधी ), सिंह ( राजीव गांधी ), मिथुन ( राज ठाकरे ,प्रमोद महाजन ) , कन्या ( बाळासाहेब ठाकरे ) असेच लोक नेतृत्व करतात.

रवी ( सत्ता, अधिकार ), शनी ( न्याय , सत्ता ), मंगळ ( धाडस, पराक्रम ) चंद्र ( जनसंपर्क ) हे ग्रह राजकारणात महत्वाचे असतात. बुध हा ग्रह माणसाला कुशल वक्ता बनवतो. उदा. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, राज ठाकरे.

बाकी नंतर लिहीते.

डॉक्टर, सिद्धेश्वर मारटकरांनी प्रमोद महाजन व राज ठाकरेंचे अचूक भविष्य दिले होते.

दोन दोन राशिवाला माणूस पहिल्यांदाच पाहतोय . मोदी है तो मुमकिन है>>>. अहो तसे नाहीये ते. मोदींची जन्मरास व लग्न रास एकच म्हनजे वृश्चिक आहे.

अहो तसे नाहीये ते. मोदींची जन्मरास व लग्न रास एकच म्हनजे वृश्चिक आहे>>>>मला माहितेय पण कोण चान्स सोडणार Lol
मी कोणत्याही पक्षाचा समर्थक-विरोधक नसल्याने सत्तेत कोणताही पक्ष येओ पण मोदी-शहा यांचा मी कट्टर वगैरे विरोधक आहे. हे दोघे देशाला घातक आहेत

हे जोतिषी लोक हजारो लोकांचं भविष्य पाहतात त्यामुळे काहींचं तर बरोबर निघणारच . चुकलेले अंदाज कबुल करणारा मी आजवर एकही जोतिषी पाहिला नाही. खरा जोतिषी तो असतो जो राज्याचं- देशाचं भविष्य सांगू शकतो आणि ते काही याना जमत नाही कारण त्याला मेदनीय जोतिष आणि काही जोतिष चक्रे असतात यांवर प्रभुत्व लागतं जे यांना कधीही शक्य नाही. किरकोळ भविष्य तर आपणही चांगला काही वर्ष अभ्यास करून सांगू शकतो पण ते पुरेसं नसत.हे गल्लाभरू लोक वातावरणाचा अंदाज घेऊन तळ्यात ना मळ्यात असं काहीतरी भविष्य सांगतात. कोणाच्या किती जागा येणार हे याना कधीही सांगता येणार नाही. यांची खरी लायकी दिल्लीच्या निवडणुकीत दिसली होतीही. एकही तज्ञाला केजरीवाल निवडून येणार हे सांगायला जमलं नव्हतं. मी आजही त्यांची ती कॉमेडी भाकीत युट्युबवर बघून मनोरंजन करून घेतो
असो विषयांतर होईल. २३ नंतर कळेलच काय होणार ते Happy

>>बाकी माबो वर कॉंग्रेस समर्थक जास्त आहेत हे खरे.
हे खोटे आहे. माबो वर 'मोदी विरोधक' थोडेफार आहेत पण ते अनेक बाफ व अनेक पोस्टी टाकून संख्या जास्त असल्याचा भास निर्माण करायचा प्रयत्न करतात. Proud
रच्याकने: स्वतः खुद्द कॉ. स्वताचे समर्थन करेना ना तिथे यांचे कसले आले समर्थन!

>>पण ते अनेक बाफ व अनेक पोस्टी टाकून संख्या जास्त असल्याचा भास निर्माण करायचा प्रयत्न करतात<<

अनेक आयड्यांनी Proud

काही काही आयडी तर समोरच्या गोटात घुसवून मोक्याच्या वेळी सेल्फगोल करायला ठेवलेत

#लाखा_फ्रॉम_लगान

Pages