अबकी बार खरंच ३०० के पार?

Submitted by कोहंसोहं१० on 19 May, 2019 - 12:08

सर्व राज्यातील निवडणुका संपल्या आहेत आणि विविध एक्सिट पोल बाहेर आले आहेत. सर्वच एक्सिट पोल मोदी सरकार पुन्हा येईल हेच दर्शवत आहेत. परंतु एक उत्कंठावर्धक बातमी अशी आहे जवळपास सर्वच पोल हे NDA ला ३०० च्या आसपास सीट्स मिळतील असे दर्शवत आहेत. लोकसत्ता वरून घेतलेले खालील आकडे:

Exit Poll 2019 प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज
> टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४

> इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७

> रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे.

रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७

> एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५

> आयएएनएस- सी व्होटर: भाजपा- २३६, काँग्रेस – ८०
एनडीए- २८७

> नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६

> न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२

> एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजपा – २१८, काँग्रेस ८१)

आज तक वर येणारे आकडे: एनडीए – ३३९-३६५, यूपीए – ७७-१०८, अन्य: ६९-९५

मायबोली वर याआधी मोदी विरुद्ध राहुल किंवा बीजेपी विरुद्ध काँग्रेस अश्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेत काँग्रेस समर्थक जास्त दिसत होते (निदान प्रतिसादावरून). परंतु देशातील जनमाणसात अजूनही मोदी लाट कायम आहे हे दिसत आहे. काँग्रेस च्या सीट्स वाढलेल्या दिसत असल्या तरी प्रमुख विदरोधी समर्थक म्हणून अजूनही पुरेसे समर्थ नेतृत्व आणि तश्या जागा त्यांना मिळालेल्या दिसत नाहीत.
शेवटी हे सर्व अंदाज आहेत. २३ ला खरे चित्र येईलच. परंतु त्याआधी आपल्याला काय वाटते? खरंच बीजेपी+ ३०० चा आकडा गाठेल?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Evm सदोष असेल तर नक्कीच त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे .
पण फक्त आरोप करून ,संशयाचे वातावरण निर्माण करून हा प्रश्न सुटणार नाही .
त्यासाठी सर्व रीतसर पर्यायी मार्गाचा अवलंब करून लोकांच्या मनातील शंका सर्वांच्या sahkaryani दूर केली पाहिजे.
पण मध्य प्रदेश मध्ये काँग्रेस जिंकली तेव्हा evm बरोबर काम करत नाही अशी तक्रार कोण्ही केली नाही

अश्विनी के,

तुम्ही म्हटल्याप्रमाणे मतं डिलीट करण्याची सोय नाही हे अगदी बरोबर आहे. मराठी वर्तमानपत्रात अगदी मटा, लोकसत्ता या सर्व वर्तमानपत्रात ही बातमी आहे. आणि संबंधित वीस अधिका-यांवर कारवाई करण्याचे आयोगाने संकेत दिल्याचेही सांगितलेले आहे. या बातम्यांमधे अधिकच्या मतांचा हिशेब जुळावा म्हणून प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. म्हणजे काय ते समजले नाही. पण त्याच कारणांसाठी कारवाई होत आहे.

आजच्याच मटाला बातम्या असल्याने तुम्ही शोधून पाहू शकता. काही शंका असल्यास त्यांना विचारू शकता. प्रसार माध्यमांनी दिलेल्या बातम्या खोडून काढायच्या तर मग नक्की तथ्य हाताशी असलेले बरे असते. म्हणजे खरे काय ते जनतेच्या ध्यानात आणून देता येते.

डिलीट केली ही बातमी ज्याने कुणी दिली त्याने तशी का दिली हे समजत नाही. मात्र कारवाई का झाली याचाही विचार व्हायला हवा. मॉकपोलची मतं तशीच राहणे हा निष्काळजीपणाच आहे. आणि हा घोटाळा निवडणूक निरीक्षकाच्या ध्यानात आलेला आहे, विरोधी पक्षांच्या नव्हे...

लोकसभा निवडणुकीचा निकाल अद्याप येणे बाकी असताना उत्तर प्रदेशातील काही दलितांनी पैशांसाठी मत विकण्यास नकार देत सर्वांसमोर एक उदाहरण दिलं आहे. एकीकडे दारु, पैसे, साड्यांच अमिष दाखवल्यावर लोक सहजपणे आपलं मत विकत असल्याची अनेक प्रकरणं समोर येत असताना चंदौली लोकसभा मतदारसंघातील सहा दलित समोर आले आहेत ज्यांना मतदान करु नये यासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती. तसंच धमकीही देण्यात आली होती. मात्र या सर्वांनी पैसे घेण्यास नकार दिला.
तुमचे पैसे परत घेऊन जा, आम्ही आमचं मत विकणार नाही असं पनारु राम यांनी गावातील माजी प्रमुख आणि भाजपा समर्थक छोटेलाल तिवारी याला सांगितलं. पनारु राम यांनी सांगितल्यानुसार, छोटेलाल तिवारी याने त्याच्या सहकाऱ्यासोबत जबरदस्तीने बोटावर शाई लावली आणि ५०० रुपयांची ऑफर दिली. तुम्ही उद्या लोकसभेसाठी मतदान करु नका अशी धमकीच देण्यात आली होती. मात्र पनारु राम यांनी आपण पैशांसाठी मत विकणार नाही असं स्पष्ट सांगितलं.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/dalits-of-up-refused-to-take-b...

पोलिसांचे अभिनंदन, त्यांनी हलकट गुंडांना तत्काळ अटक केली

नापास झाल्यावर मात्र
मी सर्व पेपर नीट सोडवला होता
मी नापास होवूच शकत नाही अशी बोंब मारली जाते

निवडणूक यंत्रे आयोगाच्या हाती सुरक्षित आहेत - आयोग
सोबतच्या चित्रात आयोगाचे जबाबदार कर्मचारी मतदान यंत्रे कडेकोट बंदोबस्तात पूर्ण जबाबदारीने आणि सुरक्षिततेने वाहून नेतांना..

60983888_2369717386421365_1073194138360348672_n.jpg

Kiran hi कोणत्या राज्यातील घटना आहे
नक्कीच up किंवा बिहारची असेल.
सडलेल प्रशासन फक्त ह्या दोन राज्यात च आहे .
ह्या दोन्ही राज्यातील निवडणूक रद्द करून पूर्ण दुसऱ्या राज्यातील कर्मचारी वर्ग वापरून नवीन निवडणूक घेतलीच पाहिजे

अजून एक व्हिडीओ सापडत नाही. ज्यात उत्तर प्रदेशातील एका मतदार संघात मुस्लीम आणि दलित वस्तीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाऊन मतदान करू नका म्हणून पैसे दिल्याचे उघड झाले आहे. हातात पैसे कोंबून नखाला शाई लावून हे लोक निघून गेले. व्हिडीओ सापडला की बोलू या विषयावर. तोवर नाकारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.

संबंधित बातमी
https://gorakhpurtimes.com/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE...

नवीन Submitted by किरणुद्दीन on 22 May, 2019 - 13:41 >>>

इव्हीएम विरुद्धच्या दाव्यान्मधील आणखी एक फोलपणा !

संबंधित बातमीतील घटना ६ व्या फेजचे "मतदान होण्याआधीची" आहे. ती घटना घडली तेव्हा हे लोक झोपले होते काय? आणि तशी घटना मतदानाआधी घडली असेल तर त्याचा आणि निकालाचा संबंध नक्की काय? आता हे सर्व पुढे आणुन काय सिद्ध करायच आहे?

इतक्या बातम्या येऊनही काही लोक केवळ पक्षासाठी सत्याचा स्विकार न करता पापाचे धनी होण्यासाठी आतुर झालेले दिसताहेत. कोर्टात जा वगैरे सल्ले देताना दिसताहेत. खरं तर यांचा लोकशाही वर विश्वास असेल तर हे स्वतःही जाऊच शकतात. इथे मी तरी निवडणुकीला उभा नाही किंवा पक्ष कार्यकर्ता नाही, त्यामुळे या बातम्यांवर चिंता व्यक्त करणे एव्हढे माझ्या हाती आहे ते मी करत आहे.

एव्हढे ही स्वातंत्र्य नसेल तर मग अजून पाच वर्षे काय कारभार चालणार हे उघडच आहे. कदाचित उद्या मित्राशी काय बोलायचे याचा ड्राफ्ट अमित शहाकडून मंजूर करून आणावा लागेल.

>>ज्यात उत्तर प्रदेशातील एका मतदार संघात मुस्लीम आणि दलित वस्तीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाऊन मतदान करू नका म्हणून पैसे दिल्याचे उघड झाले आहे.<<

तुम्हा लोकांच्या म्हणण्याप्रमाणे EVM हॅक करायची कला प्राप्त असणारे लोक हे असल्या गोष्टी का करत असावेत बरे?
हे असे पैसे वाटण्यापेक्षा हॅकर्सना वाढवून द्यावे ना पैसे!
Proud

आपली आवडती टीम जिंकली नाही की काही काही लोकांना कसे लगेच मॅच फिक्सिंग आठवते तसेच आहे हे!

सोडा पुड्या आणि वाढवा संभ्रम!

उद्या मतमोजणी चालू झाल्या नंतर जाहीर रित्या विरोधी पक्षांचा evm ला शिव्या शाप देण्याचा कार्यक्रम चालू होईल .निवडणूक आयोग कसा बिनकामाचा आणि bjp चा हस्तक आहे ह्या वर स्वयम् घोषित विचार वंत जनतेचे मनोरंजन करतील
दुपार नंतर bjp la mat देणारी जनता कशी मूर्ख आहे ह्या वर सामूहिक गायनाचा कार्य क्रम होईल .
आणि रात्री घसा बसल्या मुळे सामुहिक श्रम परीहार करण्याचा कार्यक्रम स्वतःच्या खरचानी करावा लागेल याची नोंद घ्यावी

ईव्हीएम हॅक केली हे वाक्य माझ्या प्रतिसादात कुठे आहे ते स्क्रीनशॉट सहीत दाखवावे.
याउलट भाजपचे हजारो व्हिडीओ मायबोलीवर आहेत. २०१३ च्या आधीचे. आणि न्यायालयात त्यांच्या पक्षाचे अधिकृत विधान आहे रेकॉर्डवर. एकच तुणतुणे लावू नका. जरा डोकं लावून मगच बोलत चला.

आयोग कसा बिनकामाचा आणि bjp चा हस्तक आहे ह्या वर स्वयम् घोषित विचार वंत >> पश्चिम बंगाल मधे अमित शहांनी अशी टीका आयोगावर केली आहे. त्याला उद्देशून हे वाक्य आहे का ? कारण मी तरी शहांना विचारवंत समजत नाही.

Submitted by Rajesh188 on 22 May, 2019 - 14:18>>>खरा सांगा व्हाट्सअप वरून उचलून इथं टाकलात ना?

कुठलाही संबंध नसलेले प्रतिसाद देऊन भरकटू नका आणि भरकटवूही नका. तथ्यं बाहेर येत चालल्याने एका पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याचे दिसतेय. अधून मधून समर्थकही येतातच तसेच काही तटस्थभासीही येतात.

आपण २०१३ पूर्वी ज्या बोंबा देशभर मारल्या त्या आपला अधिकार असतो आणि दुस-याने तशी तक्रार केली की तो देशद्रोह असतो किंवा अन्य शेलक्या शिव्या त्याला लावता येतात.

तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी लोकशाही धोक्यात अशा अर्थाचे एक पुस्तक लिहीले आहे आणि त्याला तुमच्याच पक्षाच्या तत्कालीन अध्यक्षांनी प्रस्तावना लिहीलेली आहे. ते एकदा नीट वाचून काढा मग इथे प्रतिसाद देत चला. उगीचच गांजा मारल्यासारखे करू नये (मोफत सल्ला).

बोकलत
शब्द रचना माझी आहे गाभा मात्र WhatsApp मधील आहे.
मान्य

अधिकच्या मतांचा हिशेब जुळावा म्हणून प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. म्हणजे काय ते समजले नाही. पण त्याच कारणांसाठी कारवाई होत आहे. >>>

म्हणजे मतदार रजिस्टरमध्ये मॅनिप्युलेशन केले असेल EVM मधल्या मतसंख्येशी जुळण्यासाठी. अजून ५० नावं फोटो यादीतून पाहून स्वतःच्याच मनाने रजिस्टरमध्ये लिहिली असणार व फोटो असलेल्या यादीत त्याप्रमाणे खुणा केल्या असणार. काही बूथवर observers असतात तेव्हा लक्षात आलं असेल. पहाटे मॉक पोलच्या वेळी झालेली Negligence ची चूक लपवायला / दुरुस्त (?) करायला अजून एक चूक आणि अख्ख्या टीमच्या नशिबी कोर्ट केस.

ईव्हीएम हॅक केली हे वाक्य माझ्या प्रतिसादात कुठे आहे ते स्क्रीनशॉट सहीत दाखवावे.

नवीन Submitted by किरणुद्दीन on 22 May, 2019 - 14:21 >>

मी तुमच्या मताशी सहमत आहे.. EVM हॅक झालेली नाहीत.

विरोधकांची कुठल्याही स्तरावर जाण्याची प्रवृत्ती पाहिल्यामुळे त्या बातम्यांवर माझा विश्वास नाही. अशा वेळी सर्व पुराव्यांनिशी तक्रारकर्त्या पक्षांनी न्यायालयात जावे, पुरावे मांडावेत व मग न्यायालय देईल तो निर्णय मान्य करावा एव्हढच माझं म्हणणं आहे.

उगाच अफवा पसरवून काय साध्य होणार?

अश्विनी के

तुम्ही मतदान अधिकारी म्हणून काम केले आहे का ?
मतदान अधिका-याची नेमणूक झाल्यानंतर एक ते दोन दिवस आधी ते बूथ मधे पोहोचतात. गेल्याबरोबर त्यांना बूथ लावणे व मॉक पोल घेऊन यंत्र व्यवस्थित आहे कि नाही हे पाहणे गरजेचे असते. निवडणूक निरीक्षक दोन प्रकारचे असतात. एकाला झोनल ऑफीसर म्हणतात. तर दुसरे थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आलेले असतात.

अनेक ठिकाणी मतदान अधिकारी आणि टीमच्या चुका होतात. पण जर निर्देश पाळले तर त्या टाळता येण्यासारख्या असतात. मतदान अधिका-याला एक सहाय्यक अधिकारीही क्रॉस चेकींग साठी दिलेला असतो. आदल्या दिवशीच जर मॉक पोल घेतले तर मशीन खराब आहे हे लक्षात येऊन मशीन्स बदलली जाते. मात्र प्रत्येक निवडणुकीत मतदान यंत्रे बदलावी लागली आहेत. सोलापूरला दीडशे मतदान यंत्रे बदलली गेली. एका यंत्रात आठशे ते बाराशे मतं असतात (दोन हजार क्षमता असते). या हिशेबाने एकूण दीड लाख मतं होतात. यंत्र बदलेपर्यंत मतदान खोळंबून राहते.

हा सुद्धा गलथानपणाच आहे. मात्र झोनल ऑफॉसर आणि निवडणूक अधिकारी यांचा कल शक्यतो सांभाळून घेण्याकडे असतो. टीमने मुद्दामून केले नाही एव्हढेच ते पाहतात. गंभीर चुका करूनही कर्मचारी आक्रस्ताळेपणा करत असेल तर त्याला नोटीस काढली जाते. मात्र शक्यतो कारवाई होत नाही कारण हे यांचे नियमित काम नाही याची त्यांना कल्पना असते.

पण मॉक पोल सकाळी घेऊन जर विसरले आणि परस्पर नोंदवही किंवा अन्य ठिकाणी बदल केले आणि ते जर झोनल अधिका-याच्या लक्षात आले तर मग काय होईल हे सांगता येत नाही. त्यांना विश्वासात घेतले तर तो चूक सुधारू शकतो. तसा रिपोर्ट लिहायला सांगू शकतो. त्यामुळे समसमान मतं वजा करता येऊ शकतात.

मात्र केंद्रीय अधिका-यांनी असा गलथानपणा पकडला तर मग तिथे काहीही करता येत नाही. थेट निलंबनच हाती असते.

मी - माझा
आधी आपण अफवा पसवरणे बंद करावे. मी कुठेच हॅकींग बाबत प्रतिसाद दिलेला नाही. आणि न्यायालयात जायचे कि नाही याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला असावे असे मला वाटते. जे बाधीत आहेत ते पाहतीलच. याषिवाय मी तुम्हाला अनेकदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्मरण करून दिलेले आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जी गोष्ट मान्य केली आहे ती देशद्रोहीपणाचे किंवा तुमच्या शेलक्या शिव्या खाण्याचे लक्षण आहे का ?

नॉर्मल माणसाला एकदा सांगितले तर समजते. आणखी एका माणसाला दोनदा सांगावे लागते. पण वेगळ्या लोकांबा वारंवार सांगूनही ते समजत नाहॉ. त्यांची संख्या एक ने वाढावी असा माझा कोणताही हेतू नाही... समझने वालो के लिए काफी है ..

आधी आपण अफवा पसवरणे बंद करावे. . आणि न्यायालयात जायचे कि नाही याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला असावे असे मला वाटते >>>

मी तुमच्याबद्धल लिहिलेलच् नाही. क्रुपया गैरसमज करुन घेउ नये. अफवा बातमीदार पसरवत आहेत. न्यायालयात नेत्यानी जावे (कारण त्यानाच त्रास होत आहे व न्यायालयात जाण्याची कुवतही त्यान्च्यातच आहे ) असे माझे म्हणणे आहे.

मी कुठेच हॅकींग बाबत प्रतिसाद दिलेला नाही >> तुम्ही काही बातम्या पोस्ट केल्या. त्या पोस्ट करुन तुम्हाला नक्की काय सुचवायच आहे ते कुठेही लिहिल नाही. त्यामुळे तुमचा प्रतिसाद वाचणार्यन्नी स्वत:चे मत बनवले, यात चुक काय? इतरन्नाही त्यान्च स्वतःच मत बनविण्याच स्वतन्त्र्य आहे. हा त्रास नको असेल तर त्या बातम्या टाकुन तुम्हाला नक्की काय सुचवायच आहे ते स्पष्ट करा. तसे करायचे नसेल तर इतराना त्यान्नी बनविलेल्या मताबद्धल दोष देउ नका.

>>ईव्हीएम हॅक केली हे वाक्य माझ्या प्रतिसादात कुठे आहे ते स्क्रीनशॉट सहीत दाखवावे.<<
>>मी कुठेच हॅकींग बाबत प्रतिसाद दिलेला नाही. <<

हे चांगले आहे..... नरो वा कुंजरो वा स्टाईल Proud
EVM पळवल्याच्या बातम्या चिकटवायच्या; त्यांच्या सुरक्षिततेबद्द्ल हळहळायचे; हॅकरला संधी दिली नाही म्हणायचे; EVM च्या धांदली वगैरे गोलमोल शब्द वापरायचे.... जे म्हणायचे ते आडून आडून म्हणायचे आणि वर मी कुठे असे म्हणालो.... स्क्रीनशॉट दाखवा असा आव आणायचा!

Pages