Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चला द्रविड आणि रोहित यांनी
चला द्रविड आणि रोहित यांनी मिळून भारताच्या पराभवाची चांगली तयारी केली आहे. आता बघुया 3 दिवसात हरणार की 4 दिवसात.
ओके- ऑस्ट्रेलिया ची बॅटींग.
ओके- ऑस्ट्रेलिया ची बॅटींग. सुर्या, भारतचे डेब्यू. कुलदीपच्या ऐवजी अक्षर.
पीच ची परिस्थिती बघता मॅच
पीच ची परिस्थिती बघता मॅच तिसऱ्या दिवसा पुढे गेली तर मला धक्का बसेल.
पहिली ओव्हर नंतर अस दिसतंय
पहिली ओव्हर नंतर अस दिसतंय भरतला मांडी घालून keeping करावी लागेल
>>अक्षर, जडेजा आणि अश्विन हे
>>अक्षर, जडेजा आणि अश्विन हे तीन फिरकी बॉलर खेळवले आहेत
भारत ऐवजी राहुलला कीपर म्हणून खेळवण्यापेक्षा बॅटींग स्ट्रॉंग करायचा हा ऑप्शन चांगला आहे
हां आता कुलदीपवर जरा अन्याय होतोय पण त्याला एव्हाना सवय झाली असेल याची!!
पहील्या तीन ओव्हरमध्ये २ विकेट्स
सहमत आहे.
सहमत आहे.
पंत नाही. अय्यर नाही. फलंदाजीची चिंता आहे. त्यामुळे अक्षर आणि जडेजा यांना सिमिलर गोलंदाज असूनही एकत्र खेळवले आहेत. नकारात्मक सोच आहे. पण ठिक आहे..कुलदीपवर अन्याय करणे. राहुलचे लाड करणे. हे हल्ली आपल्या डावपेचांचेच भाग झालेत.
फॉर्म मधल्या गिल ला बसवून
फॉर्म मधल्या गिल ला बसवून राहुलला घेणं बहुतेक बीसीसीआय कडून वेडिंग गिफ्ट असावं
स्मिथ अन् लाबू चिकटलेत.. लंच ला 76/2
फुटली जोडी.
फुटली जोडी.
आता घाला राडा.. गुंडाला १५०-१७५ ला..
स्मिथ पण गेला
स्मिथ पण गेला
कांगारू सर्वबाद १७७.
कांगारू सर्वबाद १७७.
आपले काय दिवे लागत आहेत पाहता येईल.
नविन लग्न झालेल्या राहुलला
नविन लग्न झालेल्या राहुलला आली आठवण. शेवटचे षटक शिल्ल्क असताना सोप्पा झेल नवोदित गोलंदाजाचा पहिला बळी.
१ बाद ७६.
शेवटचे षटक शिल्ल्क असताना
शेवटचे षटक शिल्ल्क असताना सोप्पा झेल नवोदित गोलंदाजाचा पहिला बळी. >> टॉड मर्फी चांगली बॉलिंग टाकत होता. गिफ्ट म्हणण्यासारखी नव्हती बॉलिंग त्याची. आथियाची आठवण आली असेल हे शक्य आहे मात्र
बाकी ऑसी नी दोन ऑफ्स्निपर खेळवले ह्याचे एकमेव कारण गरज पडली तर स्मिथ नि लाबू लेग स्पिन करतील हे असेल का ? अगार ला दुसरा स्पिनर म्हणून आणतील असे वाटलेले. विशेषतः डॉक्टर्ड पिच बद्दल ऑसी मिडीया मधे लागलेली बोंब बघून. रेनसॉला आणयाचे कारण पण पिच असू शकेल का ? एक कमी लेफ्टी.
स्मिथ, लाबू, रोहित, कॅरी ह्यांची बॅटींग बघून पिच पेक्षा बॅटसमन्च्या डोक्यात प्रॉब्लेम्स आहेत असे वाटतेय .
पिच पेक्षा बॅटसमन्च्या
पिच पेक्षा बॅटसमन्च्या डोक्यात प्रॉब्लेम्स आहेत असे वाटतेय .>>>>
+१
रोहीत शर्मा पुन्हा एकदा आपला
रोहीत शर्मा पुन्हा एकदा आपला क्लास दाखवत आहे
IND v AUS, 1st Test
IND 171-5
AUS 177
Ravindra Jadeja*: 2 (3)
Rohit Sharma: 95 (166)
Todd Murphy 19-3-43-4
Day 2: 2nd Session - India trail by 6 runs
अपेक्षेप्रमाणे सूर्या आणि भरत
अपेक्षेप्रमाणे सूर्या आणि भरत लवकर गेले. भारताला जर ६०-७० बॉल्स मध्ये १५-२० काढणार ओपनर हवा असेल तर आश्विन, जडेजा किंवा अक्षर हे पण उपलब्ध आहेत. निदान एक जागा तरी खाली होईल . KL चे एवढे जावईलाड तर सुनील शेट्टी पण करत नसेल.
ही कसोटी भारत केवळ ८ खेळाडू घेऊन खेळत आहे. KL, सूर्या आणि भरत केवळ ठोकले म्हणून उभे आहेत.
मस्त कलंदर
मस्त कलंदर
एलिफन्ट इन द रूम आपला नंबर 4 चा फलंदाज आहे.
माझ्या मते (गेली 2-3 वर्षे) तो कसोटी क्रिकेट मध्ये राहुल पेक्षाही वाईट फॉर्मात आहे
सूर्या फारच बेजबाबदार शॉट
सूर्या फारच बेजबाबदार शॉट खेळला. परत खेळायला नाहि मिळाले तर ह्या एका शॉट मुळॅ तो बाहेर जाउ शकतो. बाकी पिच चा सगळा खेळ ऑसीज्च्या डॉक्यात अधिक होता हे आज अजून उघड झाले.
सलामीला फलंदाजी करत सेना
सलामीला फलंदाजी करत सेना देशांविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
23 शतके- रोहित शर्मा*
23 शतके- डेसमंड हेन्स
22 शतके- ख्रिस गेल
20 शतके- सचिन तेंडुलकर
रणजी सेमीफायनल पण चांगल्या
रणजी सेमीफायनल पण चांगल्या चालू आहेत.
कर्नाटक करता मयांक ने एकहाती तंबू सांभाळला. एका वेळी बिकट परिस्थिती असताना 249 धावा करून टीम ला 400 पार पोचवले (407 ऑल आऊट).
प्रत्युत्तरात सौराष्ट्र ने हि भारी फाईट दिली आहे. जॅकसन आणि वासावडा च्या शतकांच्या जोरावर पहिल्या इंनिंग चा लीड मिळायला पाहिजे (दिवसाअखेरचा स्कोर 364/4).
बंगाल मध्य प्रदेश समोर ने कमांडिंग पोझिशन घेतली आहे.
मध्य प्रदेश ने इंदोर ला बऱ्यापैकी ग्रीन टॉप बनवला आहे पण त्यांचे फास्ट बॉलर पहिल्या दिवशी वहावत जाऊन खूप शॉर्ट पीच करून फसले (बंगाल 438 ऑल आऊट).
या उलट बंगाल च्या पेस बॉलर (मुकेश, आकाश दीप आणि पोरेल) नि बरोबर लेंग्थ पकडून मध्य प्रदेश ला 170 ला खोलले.
“रणजी सेमीफायनल पण चांगल्या
“रणजी सेमीफायनल पण चांगल्या चालू आहेत.” - मस्त चालल्या आहेत दोन्ही मॅचेस. सौराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे जोरदार मुसंडी मारलीय. बंगाल वि. सौराष्ट्र फायनल होण्याची चिन्ह दिसताहेत.
असामी, सूर्या आणि
असामी, सूर्या आणि पिचविषयीच्या पोस्टला अनुमोदन. सूर्या सोडला तर इतर कुणाचं आऊट होणं तितकसं खटकलं नाही. चांगल्या बॉलवर फसल्यामुळे किंवा वाईट बॉलवर स्कोअरिंगची संधी साधताना शॉट फसल्यामुळे विकेट गेल्यामुळे चुटपुट लागली तरी वाईट वाटत नाही. पण ठीक आहे. सूर्याची पहिलीच टेस्ट आहे.
रोहित, अश्विन, जडेजा आणि अक्षर मस्त खेळले. १४४ चा लीड आहे. १५०+ चा डेफिसीट घेऊन दुसर्या इनिंगला बॅटींग करताना ऑस्ट्रेलियाचा कस लागणार आहे.
@अक चार नंबराचा हत्ती
@अक चार नंबराचा हत्ती डोंगराएवढा धावांचा मालक आहे. सध्याचा फॉर्म बघता team मध्ये असला तर हरकत नाही.
हो धावांचे भरपूर क्रेडिट
हो धावांचे भरपूर क्रेडिट त्याच्या बँकेत आहे.
पण हि मालिका हि जर फेल झाला तर अजून किती काळ सेलेक्टर पेन्शस दाखवतील असे तुम्हाला वाटते ?
“ पण हि मालिका हि जर फेल झाला
“ पण हि मालिका हि जर फेल झाला तर अजून किती काळ सेलेक्टर पेन्शस दाखवतील असे तुम्हाला वाटते ?” - वनडे आणि टी-२० मधे कोहलीने परत मिळवलेला फॉर्म बघता, टेस्टमधला टर्न-अराऊंड फारसा दूर वाटत नाहीये. तसं होणं इंडियासाठी, क्रिकेटसाठी चांगलं ठरेल. पण दुर्दैवानं तसं झालं नाही (ह्या सिरीजमधे) तरी कोहलीसारख्या (क्लास) प्लेयरला सिलेक्शन कमिटी बाहेर काढेल - किंबहूना काढावं - असं मला वाटत नाही. He still has a lot to offer to Indian cricket.
करियरच्या सुरूवातीला भारतात
करियरच्या सुरूवातीला भारतात येऊन, भारताविरूद्ध चांगलं परफॉर्म करणार्या स्पिनर्सचा ट्रॅक रेकॉर्ड फारसा चांगला नाहीये (जेसन क्रेज्झा, एजाज पटेल) हे कुणीतरी त्या टॉड मर्फीला सांगायला हवं होतं.

@अक - सध्याचा फॉर्म पाहता
@अक - सध्याचा फॉर्म पाहता कोहली बाहेर जाणं कठीण आहे. माझ्यामते अजून एक सीजन तरी कोहली बाहेर जात नाही, आणि परफॉर्म केलं (करावं ही इच्छा) तर प्रश्नच नाही.
KL ने शमी , अक्षर, आश्विन , जडेजा कडून थोडे बॅटिंग चे धडे घ्यावे.
२२३ धावांची आघाडी निर्णायक
२२३ धावांची आघाडी निर्णायक ठरेल असे दिसतेय.
काही वेळा चेंडू भोवऱ्या सारखा फिरलाय खेळपट्टीवर.
>>पीच ची परिस्थिती बघता मॅच
>>पीच ची परिस्थिती बघता मॅच तिसऱ्या दिवसा पुढे गेली तर मला धक्का बसेल.
अगदीच अचूक अंदाज
पीच आखाडा नव्हतं (टर्न आणि लो
पीच आखाडा नव्हतं (टर्न आणि लो बाउन्स असला तरी) पण ऑस्ट्रेलिया च्या डोक्यात ते तसं आहे हे मॅच सुरु होण्याआधीच घुसलं होतं.
अर्थात यात सिंहाचा वाटा ऑस्ट्रेलियन मीडिया चा आहे (भरत सुंदरेशन आणि इतर).
अक्षर ने या माईंड सेट वर पोस्ट-डे इंटरव्यू मध्ये त्यांच्या मीडिया ला खुलेआम कॉल आऊट केलेले फार आवडले.
रणजी सेमीफायनल >>>
रणजी सेमीफायनल >>>
बंगाल ने मॅच खिशात टाकलेली आहे. मध्य प्रदेश ला शेवटच्या दिवशी साडे पाचशे चेस करणं अशक्यप्राय आहे.
दुसऱ्या सेमीत सौराष्ट्र हि फायनल मध्ये पोचायच्या मार्गावर आहेत.
माझं फायनल चे प्रेडिक्शन पूर्णपणे चुकले आहे.
Pages