न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यायला जमल नाही तर वर आणखी दंड भरावा लागेल. Happy
०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई (पा आ)
०५)झक्की - रंपा
०६)मृण्मयी
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा - चिकन
०९)अमृता - (द. वडा?)
१०)सायो
११)चमन
१२)रूनी पॉटर (गरमरंपा)
१३) विकु

भाई, उगिच काहितरी लिहिण्यापेक्षा काय आण्णार आहेत ते लिहा बर.. Wink

पा आ म्हणजे काय्?पाव भाजी सारखे किंवा रस असलेले काही आणायला सांगू नका त्यांना.

मागच्या वेळची आठवण आहे ना?

घट्ट सीलबंद डब्यातून, न सांडणारे असे काही असेल तर चालेल. डबा उघडायला थोडा वेळ लागला तरी चालेल, पण आधीच उशीरा यायचे नि .....

आणि त्या उकडीच्या मोदकांचे काय झाले? (:डोमा:)

Happy Light 1

मागच्या वेळची आठवण आहे ना? <<< म्हणजे काय? बिर्याणी खायला घातली की.. घरी पण नेली नंतर... Angry

आणि त्याआधी घरी पण पा.आ. खाऊ घातली होती... Happy

चालूं द्या.. केड्या नसतो का हल्ली एन्.जे. च्या जीटीजी ना.. जुने माबोकर गेले कुठे?
बरं, लालू ते वैशाखातलं जीटीजी नेमकं कधी आहे की चैत्रातलं हळदीकुंकू(?) ठेवलयस संयुक्तावाल्यांसाठी? Uhoh

उपास,
मागच्यावर्षी तू ज्या कारणासाठी डीसी ट्रीप केली तेच कारण यावेळाही आहे डीसी जीटीजीचे - चेरी ब्लॉसम

माझ्यामते यावेळी मिक्स न मॅच मेन्यू ठेवूयात. २,३ स्नॅक आयटम नी एक-दोन भाज्या, पराठे वगैरे.
त्याही आधी: मै ने हॉलचं बुकिंग ठेवलंय की कॅन्सल केलंय?

पाठवलंय की कालच बुकिंग चे लेटर Happy परत नाही आणलं (आणते म्हटलं होतं, आणलं असं कुठे म्हटलं Happy )
बर तेव्हा आता नो कॅन्सलेशन्स अ‍ॅक्सेप्टेड!
खाण्याचे मेनू ठरवा आता.जेवणाचा मेनू करायचाय का?बोली लावा मग :
अ‍ॅपेटायझर १
अ‍ॅपेटायझर २
सॅलड /रायता
व्हेज करी / भाजी
नॉन व्हेज करी
राइसचा प्रकार
रोट्या/पोळ्या - पोळ्या ४०-५० किंवा नान असतील तर २०-२५
स्वीट १
स्वीट २
पेये - पाणी, रंपा, सोडा, ज्यूस
अजून काही?? Happy

सायो: व्हेज करी आणि भाताचा प्रकार (बहुतेक करुन मसालेभात)
मला जेवण +१,२ स्नॅक्स चालतील. नुसतं जेवणही चालेल पण नुसते स्नॅक्स नको वाटतायत.

मी काहीतरी गोड करून आणेन. (मै. वाला आंब्याचा शिरा करावा का, तो माझ्या इथे फारच पॉप्युलर झालाय :))

०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई (पा आ)
०५)झक्की - रंपा
०६)मृण्मयी
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन)
०९)अमृता - (द. वडा?)
१०)सायो
११)चमन
१२)रूनी पॉटर (गरमरंपा)
१३) विकु

०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई (पापलेट आमटी)
०५)झक्की - रंपा
०६)मृण्मयी
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन)
०९)अमृता - (द. वडा?)
१०)सायो
११)चमन
१२)रूनी पॉटर - २ मोठे (ग्लु वाईन)
१३) विकु

बुवा ग्लु वाईन माझ्या नावावर टाकलीत, सगळे जण पिणार असतील तर नक्की करेन. शोनू येणार नाही का?

झक्की रंपा आणतायत ना. अजून परत ग्लु वाइन पण? पिणार कोण इतकं, तेही भर दुपारचं ? त्यापेक्षा अपेटायझर्स जास्त झाले तर चालतील, ते कितीही खपतात! हे माझं सात्विक मत! Happy

रंपा म्हणजे दारू हे संदर्भावरुन कळलं पण त्या शब्दाचं स्पष्टीकरण कुणी देईल का प्लीज ?
रुनी, तुम्ही सिनियर लोकं मदतपुस्तिकेत भर घालत नाही हं वेळेवर ... असं नाही चालणार Wink

अगो
रंपा- रंगीत पाणी, दारु नाही काही :डोमा:, इथल्या लहान लोकांच्या बा.म.वि.प होवु नये म्हणून हे नाव. बाकी माबोवर सिनीअर म्हणजे फक्त झक्की बरका बाकी सब ज्युनिअर. Happy

बा.म.वि.प. ... थोडा वेळ लागला पण कळलं. अच्छा, तरीच मागे कुणीतरी रंगीत पाणी आय डी घेतला तेव्हा सगळे हसत होते. तरी बरं मी सगळे संदर्भ पक्के ध्यानात ठेवते ...नंतर उशीराने कधीतरी कळलं तरी हसता येतं Happy

Pages