Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
“ रोहितच्या अपील न करण्याच्या
“ रोहितच्या अपील न करण्याच्या निर्णयाबाबत काय म्हणाल?” - नाही पटलं. पूर्वीही आणि आता तर नक्कीच - नियमाप्रमाणे तो रन-आऊट आहे. स्टंपिंग करताना जशी द्विधा मनःस्थिती नसते तशीच नॉन-स्ट्रायकर एंडला रन-आऊट करताना सुद्धा नसावी.
शॉ, रहाणे आणि ऋतुराज ने रणजी
शॉ, रहाणे आणि ऋतुराज ने रणजी मधे रन्सचा पाऊस पाडलाय.
फेफ, केदार जाधव पण
फेफ,
केदार जाधव पण
“ केदार जाधव पण” - मला वाटलं
“ केदार जाधव पण” - मला वाटलं मागच्या आठवड्यात लिहिलं त्याच्याविषयी. राहून गेलेलं दिसतंय. येस! केदार चं सुद्धा कौतुक. त्याला जरी इंडियन टीममधे यायचा चान्स नसला (मोस्टली) तरी त्याने महाराष्ट्राकडून अजून काही काळ खेळून तरूण खेळाडूंना त्याच्या अनुभवातून मार्गदर्शन करावं.
माझ्या मते अपिल मागे घेऊन
माझ्या मते अपिल मागे घेऊन शनाकाला संधि दिली हे खिलाडूवृत्तीचे लक्षण आहे.
हे काही युद्ध नव्हे.
युद्धात भारत कच खातो, तीनदा पाकीस्तानला जबरद्स्त हाणले, पण त्यांच्याकडून काश्मीरचा भाग परत आणला का?
रशिया, इस्राईल असे करत नाहीत.
आऊट असताना संधी का द्यायची.
आऊट असताना संधी का द्यायची.
छान केले !
छान केले !
सामन्यावर काही फरक नव्हता. तो छान खेळत होता. त्याचे डिझर्व्जिंग शतक होत होते. करू दिले.
“सामन्यावर काही फरक नव्हता.
“सामन्यावर काही फरक नव्हता. तो छान खेळत होता. त्याचे डिझर्व्जिंग शतक होत होते. करू दिले.” - तो क्लीन बोल्ड झाला असता/ कॅच गेला असता/रन-आऊट झाला असता/स्टंप झाला असता/एलबीडब्ल्यू झाला असता तरी हेच म्हटला असता का?
उगीच फिजूल फोका मारून राह्यलाय राव!
मी अश्या प्रकारे धावबाद
मी अश्या प्रकारे धावबाद करायचे समर्थनच करतो...
पण जरा वेगळा विचार करा..
१) जर शर्माने त्याला बाद होऊ दिले असते तर सामान्य क्रिकेटप्रेमींची सहानुभुती त्या शतक हुकलेल्या फलंदाजाला मिळाली असती. त्याने काय झाले असते तर अश्या प्रकारे धावबाद करण्याबद्दलचे जनतेचे मत कलुषित झाले असते जे आधीच वादाचा विषय आहे. आणि सरसकट अश्या केसेसमध्ये जो धावबाद करेल तो रडारवर आला असता.
२) दुसरे म्हणजे हे एक ब्रह्मास्त्र आहे. का उगाच वाया घालवा? जेव्हा अटीतटीचा सामना होईल तेव्हासाठी राखून ठेवूया ना. तेव्हा फलंदाजही गाफिल राहील. तसेच तेव्हा बाद केल्यावर कुठलाही वाद झाल्यास परवाचे उदाहरण दाखवता येईल. आम्ही खिलाडूवृत्ती दाखवत फलंदाजाला शतक करायची संधीही दिलीय. पण जर निर्णायक क्षणी कोणी याचा गैरफायदा उचलत असेल तर आम्ही त्याला तो घेऊही देणार नाही
बाकी बोल्ड स्टंपिंग झेलबाद वगैरे उदाहरणांना अर्थ नाही. हा नियम कालपरवा क्रिकेटमध्ये अधिकृतरीत्या आला आहे आणि आधी अखिलाडूवृत्ती समजले जायचे. याबद्दल चर्चा करताना वा याचा विचार करताना नेहमीचे मापदंड कामाचे नाहीत. ईथे मुत्सदीपणा गरजेचा. जो शर्मा वा धोनी यांच्यात ठासून भरला आहे..
शर्माने उगाच अपील मागे घेतले
शर्माने उगाच अपील मागे घेतले... तश्या प्रकारे धावबाद करणे म्हणजे अखिलाडुवृत्ती वगैरे मानसिकता आता सोडली पाहिजे.... खासकरुन सर्व नियम, खेळपट्ट्या, मैदाने वगैरे मधे गेल्या १५ - २० वर्षात फक्त फलंदाजास अनुकुलच बदल घडत असताना....
मला पुसटसे आठवत आहे ... सेहवाग ९९ वर असताना अन जिंकण्यास एक धाव हवी असताना सुरज रणदिव याने जाणुन बुजुन नो बॉल टाकला होता अन सेहवागला ९९ वर नाबाद ठेवला होता !!!! तो शुद्ध हलकटपणा होता..... रणदिव बरोबर अजुन कोणा एका खेळाडुलाही एक मॅच बॅन केला होता... दुसरा खेळाडु आठवत नाही.. पण तेव्हापासुन डोक्यात रडके नंबर २ श्रीलंका असं समीकरण डोक्यात बसलं आहे (१ नंबर रडके कायमच कांगारू)
सेहवाग ९९ वर असताना अन
सेहवाग ९९ वर असताना अन जिंकण्यास एक धाव हवी असताना सुरज रणदिव याने जाणुन बुजुन नो बॉल टाकला होता
>>>>>
हे सोशलमिडीयावर फार फिरते आहे आणि त्या अनुषंगाने शर्माचे जास्त कौतुक होत आहे
सेहवाग ९९ वर असताना अन
सेहवाग ९९ वर असताना अन जिंकण्यास एक धाव हवी असताना सुरज रणदिव याने जाणुन बुजुन नो बॉल टाकला होता
>>>>>
हे सोशलमिडीयावर फार फिरते आहे आणि त्या अनुषंगाने शर्माचे जास्त कौतुक होत आहे
कुलदीप आला आणि आज पुन्हा राडा
कुलदीप आला आणि आज पुन्हा राडा केला...
मिरच्या झोंबतील आता पुन्हा त्याला डावलणार्यांच्या..
२१६ चे आव्हान!
२१६ चे आव्हान!
शामी ची गोलंदाजी आजकाल शेपटाचे फलंदाज देखिल सहज खेळतात गेल्या दोन्ही सामन्या हे दिसून आले.
शनाकासह ५ मुख्य फलंदाज १२५ मध्ये परतल्यावर २१५ ही सामधानकारक धावसंख्या उभी केली लंकेने.
“ हा नियम कालपरवा
“ हा नियम कालपरवा क्रिकेटमध्ये अधिकृतरीत्या आला आहे” - कॅटेगोरिकली चुकीचं विधान आहे हे. हा नियम फार पूर्वीपासून होता आणि अनेकवेळा ह्या पद्धतीनं बॅट्समनला रन-आऊट करण्यात आलंय (अगदी त्या प्रसिद्ध ‘मंकडिंग’ प्रसंगाआधीपासून).
“ सामान्य क्रिकेटप्रेमींची सहानुभुती ” - ह्या कारणासाठी खेळ खेळत नाहीत. पॉप्युलॅरिटी कॉन्टेस्ट नाहीये ती.
“ सामान्य क्रिकेटप्रेमींची
“ सामान्य क्रिकेटप्रेमींची सहानुभुती ” - ह्या कारणासाठी खेळ खेळत नाहीत. पॉप्युलॅरिटी कॉन्टेस्ट नाहीये ती.
>>>>
सहानुभुती त्या शतक हुकलेल्या फलंदाजाला मिळाली असती आणि धावबाद करणार्या गोलंदाज व त्याच्या कर्णधाराला रोष पत्करावा लागला असता.
बाकी पॉप्युलारीटी कॉन्टेस्ट नसेना. पण त्याने फरक पडतो कोणत्याही संघाच्या वा खेळाडूच्या मानसिकतेवर.
आणि त्याने फरक पडतो त्याच्या परफॉर्मन्सवर.
हे तरी मान्य आहे का?
जर सामना अटीतटीचा असता आणि निकालावर फरक पडणार असता तर त्याने पॉप्युलॅरीटीच्या मागे लागून अशी दर्यादिली दाखवली नसती..
म्हणून तर मुत्सदी म्हटलेय मी शर्माला..
“ जर सामना अटीतटीचा असता आणि
“ जर सामना अटीतटीचा असता आणि निकालावर फरक पडणार असता” - नियमाप्रमाणे आऊट झालेल्या बॅट्समनच्या बाबतीत असले मुद्दे उपस्थितच होत नाहीत.
पण यामुळेच असं आऊट करणं
पण यामुळेच असं आऊट करणं चुकीचं असल्याची भावना बळावते
जर थेट फेकीवर / अन्य प्रकारे शानका आऊट झाला असता तर असंच अपील मागे घेतलं असतं का? >> पूर्णपणे मान्य. असे बाद करणे अखिलाडू आहे असे म्हणणारे 'फलंदाज धावा काढताना बाहेर निघून घेऊन गैर फायदा घेतो आहे' ह्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात असे माझे मत आहे.
नियमाप्रमाणे आऊट झालेल्या बॅट्समनच्या बाबतीत असले मुद्दे उपस्थितच होत नाहीत. >> +१ "मुत्सदी" शर्माच्या हे लक्षात आले नाहीका कि असे करून त्याने त्याच्या एस स्पिनर अश्विन नि महिला क्रिकेट मधली एस दिप्ती ह्यांच्या कृती वर ठपका ठेवणार्यांना प्रोत्साहन दिले आहे ? उद्या रोहित ने हेच अटि तटीच्या सामन्यामधे केले तर त्याला मुत्सद्दी न म्हणता दुतोंडी का म्हणू नये ?
“सामन्यावर काही फरक नव्हता. तो छान खेळत होता. त्याचे डिझर्व्जिंग शतक होत होते. करू दिले.” >> छान खेळत असला तर शतक डिझर्व्जिंग होते का ? गावस्कर च्या शेवटच्या सामन्यामधे पाकिस्तान ला किंवा सचिन च्या शेवटच्या सामन्यामधे विंडीज ला हे कोणी सुचवले का नाही बुवा ?
महिला क्रिकेट मधली एस दिप्ती
महिला क्रिकेट मधली एस दिप्ती ह्यांच्या कृती वर ठपका ठेवणार्यांना प्रोत्साहन दिले आहे
https://www.bbc.com/hindi/sport-64223545
हे घ्या लगेच हरमणप्रितवर अप्रत्यक्षपणे टीकाही चालू झाली
उद्या रोहित ने हेच अटि
उद्या रोहित ने हेच अटि तटीच्या सामन्यामधे केले तर त्याला मुत्सद्दी न म्हणता दुतोंडी का म्हणू नये ?
>>>
हो, शर्मा हेटर्स बोलतीलच.
त्याचे तो काही करू शकत नाही. ना मी काही करू शकत. कारण मनुष्य द्वेषात आंधळा होतो.
बाकी दुतोंडी म्हणायला शर्माने कुठेही असे म्हटले नाहीये की असे बाद करणे चुकीचे आहे वा अखिलाडू आहे.. त्याने त्याच्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटले ते याच पोस्टमध्ये पुढे दिले आहे..
अरे हो, सोशलमिडीयावर द्रविड विरुद्ध शर्मा अशीही पोस्ट फिरत आहे.
एकीकडे आपला कोच राहुल द्रविड ज्याने आपल्याच संघसहकाऱ्याचे (सचिनचे) द्विशतक होऊ दिले नाही. तर दुसरीकडे कर्णधार शर्मा ज्याने प्रतिस्पर्धी खेळाडूचे शतक होऊ दिले. मग आता द्रविड ट्रोल होतोय त्याचेही बिल शर्मावर फाडावे का?
या ट्रोलर्सचे काय. शर्माने बाद केले असते तरी दिप्तीही तशी, आश्विनही तसा आणि शर्माही तसाच म्हणत तणतणत आले असतेच. ट्रोलिंग ही एक वृत्ती आहे. तिला घाबरून कसे चालेल. उलट त्यांचा मुत्सदीपणे वापर करावा..
आता तो फलंदाज चांगला खेळत होता आणि आम्ही त्याला अश्या प्रकारे बाद करू शकत नाही हे स्टेटमेंट खुद्द शर्माचेच आहे. माझे बोल नाहीयेत ते...
सचिन गावस्कर कसे बाद झाले होते त्यांच्या शेवटच्या सामन्यात? उगाच वडाची तुलना वांग्याशी करण्यात काय अर्थ आहे?
एक ज्वलंत प्रश्न
एक ज्वलंत प्रश्न
कुलदीप आज पुन्हा सामनावीर ठरला.
आता पुन्हा बसवणार का त्याला?
उगाच वडाची तुलना वांग्याशी
उगाच वडाची तुलना वांग्याशी करण्यात काय अर्थ आहे? >> मूळ वाक्प्रचार माहित करून घेतलात तर अर्थ नि कुठे वापरला तर योग्य ठरेल ते कळेल. तुझ्या "“सामन्यावर काही फरक नव्हता. तो छान खेळत होता. त्याचे डिझर्व्जिंग शतक होत होते. करू दिले.” ह्या नि तूच कोट केलेल्या शर्माच्या "आता तो फलंदाज चांगला खेळत होता आणि आम्ही त्याला अश्या प्रकारे बाद करू शकत नाही हे स्टेटमेंट खुद्द शर्माचेच आहे" ह्या वाक्यांमधला फरक तुला लक्षात कधी येईल ? 'चांगले खेळत असल्यामूळे शतक होऊ देणे जरुरी आहे' ह्या भंपक आर्ग्युमेंट्ला दिलेले ते उतर होते. तुला कळेल अशा शब्दांमधे विचारतो " अटीतटीच्या सामन्यामधे विरोधी संघाचा एखादा खेळाडू चांगला खेळत असला तर तर याला मंकड ने केले त्याप्रकारे बाद केले पण शर्माने त्याला परत बोलावले नाही नि "डिझर्व्जिंग" शतक होऊ दिले नाही नि पर्यायाने विरोधी संघाला सामना जिंकू दिला नाही संघालातो प्रकार ह्या सामन्याशी तुलना करता दुतोंडीपणा कसा नाही ? ह्यात द्वेष, हेट वगैरे उगाच असंबंद्ध फाटे का फोडतोयस ? मुत्सद्दीपणाच दाखावयचा होता तर तो स्वतःच्या एस बॉलर ला सपोर्ट करून - विशेषतः टेस्ट फायनल चे भवितव्य ज्या सिरीज वर ठरणार आहे त्यात ट्रंप कार्ड ठरतील अशी शक्यता असलेल्या अश्विन ला - त्याचे तुझ्या वरच्या पोस्ट मधले मोराल वगैरे वाढवणे जास्त मुत्सद्दीपणाचे लक्षण ठरणार नाही का ?
रोहित चे उद्गार हे होते
"I had no idea Shami had done that," Rohit told Star Sports after the game. "When he went up in an appeal… Again, he [Shanaka] is batting on 98. The way he batted was brilliant. We got to give it to him. We cannot get him out like that. We wanted to get him out the way we thought we would get him out. But that was not something that we thought of. But again, hats off to him, he played really well." ह्याचा अर्थ मला तरी रोहित ला अशा तर्हेने बाद करणे पटत नाही एव्हढा दिसतो नि ह्याचाच अर्थ पुढेही असे कधी झाले तर तो अपील मागे घेणार ह्यापेक्षा वेगळा कसा लावणार ? उगाच मुत्सद्दीपणा काय नि काय काय !!
“ सामान्य क्रिकेटप्रेमींची
“ सामान्य क्रिकेटप्रेमींची सहानुभुती ”
डोंबल! सहानुभुती काय चाटायची आहे? एकदा नग्गद पैका मिळाला की मन मानेल तसे करावे.
यातूनच मनाचा थोरपणा कळतो.
<<<'फलंदाज धावा काढताना बाहेर निघून घेऊन गैर फायदा घेतो आहे' ह्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात असे माझे मत आहे.>>>
मी एका मुलाखतीत वाचले की फलंदाज जर असे करत असेल, तर गोलंदाज व पंच त्याला वार्निंग देतात. तरी ऐकले नाही तर खुश्शाल मंकंडींग करतात. तुम्ही वाईट उदाहरणे देऊन तसेच करावे असे म्हणू नका! भारतीय संस्कृति (बर्याच परदेशात तरी) अजून जिवंत आहे.
हा खेळ आहे.
कुलदीप आज पुन्हा सामनावीर
कुलदीप आज पुन्हा सामनावीर ठरला.
आता पुन्हा बसवणार का त्याला? >> 'तो सामनावीर ठरतोय म्हणून पुढच्या सामन्यामधे त्यांला बसवतात' असे गृहितक धरणे "मुत्सद्दी" रोहित नि द्रविड ह्यांच्या क्रिकेट मधल्या समजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखे नाही का ?
भारतीय संस्कृति (बर्याच परदेशात तरी) अजून जिवंत आहे. >> नंद्या प्रस्तुत प्रसंग भारतामधे घडलाय ,परदेशात नाही तेंव्हा परदेशातली अजून जीवंत भारतीय संस्कृती काय डोंबलाची कामाला येणार
*टंग ईन चीक रीप्लाय* त्यापेक्षा जायंट्स वीकेंडला काय कमाल दाखवणार ह्यावर चिंतन करूया 
असामी सही पकडा है.
असामी सही पकडा है.
We wanted to get him out the
We wanted to get him out the way we thought we would get him out. But that was not something that we thought of.
>>
यात we कोण? शमी त्यात येत नाही का?
शर्मा नी इतर कुणाशी डिस्कस करून अपील मागे घेतलं की एकट्याने? (मी हायलाईट्स पाहिले त्यात मला काही डिस्कशन दिसलं नाही)
मग मोठेपणा घ्यायला शर्मा पुढे, अन् ब्लेम यायची शक्यता आली की we?? हाच तो ' मुत्सदी ' पणा (डबल ढोलकी) का??
आसामी, तू मुत्सद्दी पणा बद्दल बोलतोयस, तो वेगळा असावा...
कुलदीप सामनावीर ठरल्यावर आता
कुलदीप सामनावीर ठरल्यावर आता पुन्हा त्याला बसवणार का असे उपरोधाने विचारले असता त्याला सामनावीर मिळाले की बसवतात असे गृहीतक मी मांडतोय असा अर्थ काढणे कमाल आहे
असे जर पोस्टचा अर्थ काढत असाल तर शर्माचा मुत्सद्दीपणा पटणे अवघड आहे
आश्विन वा दिप्ती शर्माबाबत एकच निरीक्षण सांगू ईच्छितो की सोशल मिडीयावर जे क्रिकेटप्रेमी दिप्ती शर्मा केसमध्ये तिच्या बाजूने उभे होते तेच सारे आता शर्माचे कौतुक करत आहेत.
सामान्य क्रिकेटप्रेमी ईतका बावळट नसतो ओ.. त्याने क्रिकेटचे ब्लॉग आणि पुस्तके न वाचताही त्याला बेसिक कॉमनसेन्स असतोच. दिप्ती शर्माने जे नियमात राहून केले ते ब्रिलियंट होते आणि रोहीत शर्मानेही जे खेळाच्या स्पिरीटमध्ये केले ते कौतुकास्पद आहे हे त्यांना समजते. त्यामुळे एका शर्माने दुसऱ्या शर्माला खोटे पाडलेय असे ईथे काही झाले नाही.
आता काही मूठभर ट्रोलर काही झाले तरी सक्रिय होणारच. शर्माने काहीही केले असते तरी हल्लाबोल करत आले असतेच. अश्या लोकांना किती महत्व द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे
आश्विन वा दिप्ती शर्माबाबत
आश्विन वा दिप्ती शर्माबाबत एकच निरीक्षण सांगू ईच्छितो की सोशल मिडीयावर जे क्रिकेटप्रेमी दिप्ती शर्मा केसमध्ये तिच्या बाजूने उभे होते तेच सारे आता शर्माचे कौतुक करत आहेत. >> ह्याबद्दल काही आकडेवारी देऊ शकतोस कि तू बोललास हे ब्र्हमवाक्य म्हणून घ्यायचे ? मी क्रिकिंफोच्या तीन क्रिकेट फोरम्स चा भाग आहे ज्यात जगभरातले वेगवेगळे लोक आहेत आणि तिथे लोकांनी शर्मा च्या वागण्याकडे बोट दाखवत अश्विन नि दीप्तीवर ठपका ठेवला आहे. आता बोल कि ह्या दोन वेगळ्या गोष्टी कशा रीकंसाईल करशील ?
दिप्ती शर्माने जे नियमात राहून केले ते ब्रिलियंट होते आणि रोहीत शर्मानेही जे खेळाच्या स्पिरीटमध्ये केले ते कौतुकास्पद आहे हे त्यांना समजते. त्यामुळे एका शर्माने दुसऱ्या शर्माला खोटे पाडलेय असे ईथे काही झाले नाही. >> परत मुद्दा वेगळा आहे तो इथून तिथे फिरतोस आहेस. खेळाचे स्पिरीट कसे डीफाईन करणार ? ह्याच बाफावर ह्या मुद्द्याबद्दल वेगवेगळे लोक ह्याचे समर्थन नि धि:क्कार करत आहेत. स्पिरीट ही वाकवू तशी वाकवणारी गोष्ट झाली. नियम तसे नसतात (बहुतांशी) . म्हणून नियमांनाच प्राधान्य. तुझ्या मुत्सद्दीपणाचा उल्लेख घेऊन तू स्पिरीट हवे तसे वळवतो आहेसच ना ? आज रोहित ने केलेले कृत्य योग्य आहे पण उद्या ह्यामूळेच मॅच हरण्याची परिस्थिती आली असती तर त्याने बाद करून वेगळे स्पिरीट ठेवावे असेही वर सुचवले आहेसच परत.
उपरोधाने विचारले असता त्याला सामनावीर मिळाले की बसवतात असे गृहीतक मी मांडतोय असा अर्थ काढणे कमाल आहे > काय आहे बघ की हा उपरोध होता कि नाही ह्याबद्दल मला तुझ्या एकंदर पोस्ट्स वरून खरच शंका होती. तुला उपरोध दर्शवायचा असता तर सर्वसामान्य लोक सोशल मिडीयावर अशा वेळी इमौजी वापरतात तसे मला काही दिसले नाही तेंव्हा तू जे लिहिले ते मी शब्दशः घेणे माझ्या मते अधिक सेफ आहे. मला तुझे मन वाचण्याची शक्ती प्राप्त झाली नाहिये.
आसामी, तू मुत्सद्दी पणा बद्दल बोलतोयस, तो वेगळा असावा... >> अँकी "मुत्सद्दीपणा" ऋन्मेऽऽष घेऊन आलाय. On the spur of moment केलेले कृत्य ह्यापेक्षा त्यात अधिक काही नाही असे माझे मत आहे. सो कॉल्ड मुत्सद्दीपणा वगैरे तर नालाही नाही. बाकीची सगळी सारवासारव आहे.
असामी, ब्रह्मवाक्य तर तुमचेही
असामी, ब्रह्मवाक्य तर तुमचेही घेऊ शकत नाही. मी ज्या ग्रूप्सवर सक्रिय असतो तिथे क्रिकेटप्रेमी आहेत, जे क्रिकेटवर चर्चा करतात. तुम्ही बहुधा अश्या ग्रूप्सवर असाल जिथे ट्रोलर्स जास्त जमत असतील. ज्यांना अश्या वादात रस असेल. शक्य झाल्यास ग्रूप बदला. अश्यांची संगत टाळा
कुलदीपबद्दल लिहिलेले काय टोनमध्ये आहे समजायला ईमोजी गरजेची होती का..
मागेही यावर चर्चा झालेली की बिचाऱ्याला डावलले जातेय, कोणी त्याचा गेम करायला टपलेय, त्याला चमकायची संधीच टाळली जातेय.
अर्थात क्रिकेटमध्ये फिक्सिंग वा संघनिवडीचे काही राजकारण चालत नाही असे आपले मत असल्याने आपल्याला हे पटणे अवघड
तुम्ही बहुधा अश्या ग्रूप्सवर
कुलदीपबद्दल लिहिलेले काय टोनमध्ये आहे समजायला ईमोजी गरजेची होती का.. >> एक संकेत असतो, तुला कळेल ह्यावर विश्वास नाही.
अर्थात क्रिकेटमध्ये फिक्सिंग वा संघनिवडीचे काही राजकारण चालत नाही असे आपले मत असल्याने आपल्याला हे पटणे अवघड >> मित्रा नेहमीप्रमाणे तू मी जे म्हटलेले नाही ते माझ्या तोंडी घालत आहेस. माझा आक्षेप नेहमी तुझ्या नि फक्त तुझ्याच , फक्त तुला वाटले म्हणून काडिचाही पुरावा नसताना मारलेल्या फिक्सिंग नि संघनिवडीच्या लोणकढ्यांना नि पर्यायाने तुझ्या खेळाडूंच्या सरसकट नियतीवर अकारण उठ्सूट शंका घेण्याला आहे. तुझ्याकडे दुर्लक्ष करणे शक्य आहे पण 'म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो' ह्यावर माझा विश्वास आहे म्हणून रे निव्वळ.
Pages