क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल आल्यापासून काहि ना काआहे, कुठे ना कुठे छोटी गफलत होण्याचे प्रमाण वाढलय. ओव्हर थिंकिंग चा परीणाम असावा अशी आशा धरूया.

अय्यर मॅन ऑफ द सिरीज हवा होता, पुजारा चांगला खेळला पहिल्या सामन्यामधे हे धरूनही अय्यर च्या सगळ्या इनिंग्स मॅच डीफायनिंग होत्या.

येनीवेज, शास्त्रीबुवांना परत आणायला हवे.. >> Lol ह्या वाक्याचा अर्थही जे लिहिलय तोच घ्यायचा कि अजून काही रे - अश्विन अक्षर सारखाच ?

अश्विन अक्षरचा अर्थ कुठे वेगळा होता. उलट पहिल्या ईनिंगला अश्विनचा नंबर फलंदाजीत अक्षरच्या वर हवा होता असे मी म्हटले तर तुम्हीचा अक्षरचा जॅक आहे असा अर्थ काढला.

शास्त्रीबुवा नक्कीच द्रविडपेक्षा चांगले कोच ठरत होते. टीम संतुलित होती. एकजूट होऊन खेळत होती. ड्रेसिंग रूममध्ये काय सीन होता हे आपल्याला माहीत नसले तरी मैदानावर जे दिसत होते, जो रिझल्ट येत होता तो बोलका होता. सध्या जे संघात वातावरण आहे ते पाहता हा संघ वर्ल्डकप जिंकेल असे बिलकुल वाटत नाही.

देव करो आणि माझे खोटे ठरो. पण त्या आधी मला कसोटी चॅम्पियनशिप मध्ये जास्त ईंटरेस्ट आहे. भारत ऑस्ट्रेलिया फायनल कसोटी आणि ती सुद्धा ईंग्लंडला बघायला मजा येईल. फक्त त्या आधी येत्या मालिकेत या फिरकीला लोटांगण घालणाऱ्या फलंदाजांनी घाण नाही केली पाहिजे. ऑस्ट्रेलियात लायनसोबत कोण फिरकी आहे सध्या जो आपल्याला टेंशन देऊ शकतो...

पुजाराला मालिकावीर पुरस्कार देणे अनाकलनीय आहे.
मालिकावीराच्या स्पर्धेत अय्यर, पंत, केवळ एक कसोटी खेळूनही कुलदीप हे सर्व त्याच्यापुढे होते ..
पुजारा दुसरी टेस्ट पुर्ण फ्लॉप होता. बरे एकाच कसोटीतील कामगिरीवर पुरस्कार द्यावा म्हटले तरी त्यातही तो अव्वल नव्हता कारण सामनावीर कुलदीप होता.

ऑस्ट्रेलियात लायनसोबत कोण फिरकी आहे सध्या जो आपल्याला टेंशन देऊ शकतो... >>>

मी टॉड मर्फी चं नाव ऐकत आहे. अजून खूप नवखा आहे पण फर्स्ट क्लास मध्ये सुरुवात झकास केली आहे.

उंचपुरा ऑफस्पिनर ज्याची जमेची बाजू त्याची अचूकता, टॉप स्पिन आणि बाउन्स आहे.

त्याला मालिकेपूर्वी महिनाभर आधीच भारतात कंडिशनशी ऍडजस्ट करायला पाठवणार अशी वदंता आहे

दुसरे ऑप्शन ऐष्टन अगार (लेफ्ट आर्म स्पिन), कुहनेमान (लेफ्ट आर्म स्पिन) किंवा स्वेप्सन (लेग स्पिन).

“टीम संतुलित होती. एकजूट होऊन खेळत होती.” - सर, तुम्हाला गैरसोयीचा होईल असा पण एक निश्कर्ष निघू शकतो - कोहलीच्या कॅप्टन्सीमधे टीम जास्त आक्रमकपणे, विजिगीषु वृत्तीनं खेळत होती. शर्माच्या कॅप्टन्सीने ती जिगर घालवून टाकली.

शर्माच्या कॅप्टन्सीने ती जिगर घालवून टाकली.
>>
शर्मा पूर्णवेळ कॅप्टन झाल्यापासून किती सिरीज मधे पार्ट टाईम कॅप्टन खेळले हे बघणं रोचक ठरेल. ही टीम शर्मा ची टीम वाटतच नाही... (आधीची टीम ही कोहलीची टीम / धोनी ची टीम / दादा ची टीम वाटायची)

शास्त्रीबुवा नक्कीच द्रविडपेक्षा चांगले कोच ठरत होते. टीम संतुलित होती. एकजूट होऊन खेळत होती. ड्रेसिंग रूममध्ये काय सीन होता हे आपल्याला माहीत नसले तरी मैदानावर जे दिसत होते, जो रिझल्ट येत होता तो बोलका होता. >> आयडी नक्की हॅक झाला असे म्हणायला वाव आहे आता ! Lol

अश्विन अक्षरचा अर्थ कुठे वेगळा होता >> आधीचे तुझे स्पष्टीकरण (?) - "त्याला आश्विनच्या आधी कश्याला पाठवला. आश्विन कसोटीत बाप फलंदाज आहे." ह्या वाक्यांचा अर्थ "बाकी अक्षरबद्दल काही म्हणने नव्हते. तर कुलदीपबाबत अन्याय होतो असे वाटते हा मुद्दा होता." अक्षरला अश्विनच्या आधी पाठव्ला म्हणजे कुलदीपवर अन्याय झाला असा होत असेल तर बोलणेच खुंटले. रच्याकाने जॅकचा मुद्दा अक ला उद्देशून होता , तुला नाही. फिक्सिंग सारख्या जटील विषयावर तुझ्यासारख्या चक्षु:रवेसत्यम माहिती असणार्‍या दिग्गज व्यक्तीशी आम्ही बापडे काय बोलणार ?

. (आधीची टीम ही कोहलीची टीम / धोनी ची टीम / दादा ची टीम वाटायची) >> +१. तू म्हणतोस तसे शर्मा सलग कमी वेळ खेळलाय कप्तान म्हणून - आणि जेंव्हा खेळला तेंव्हा बारिक सारिक टीम बरोबर खेळला आहे - मजबूत संघांविरुद्ध अशक्यप्राय विजय जवळजवळ नाहीत त्यामूळे इंपॅक्ट कमी वाटतो. पुढच्या सिरीजमधे चार सामने खेळलो नि २-०, ३-० वगैरे निकाल लागला तर तशी कमांड येऊ शकेल. वैयक्तिकरित्या हि सिरीज ट्फ जाईल असे वाटते कारण त्यांची मिदल ऑर्डर आता भारतात टेस्ट खेळण्याचा अनुभव जमा झालेली आहे. फ्रेश हेझलवुड नि स्टार्क रिव्हर्स स्विंग चांगला करतात त्यामूळे पाचव्या दिवशी सामना खेचला गेला नि आपली बॅटींग असेल तर भारी पडेल.

ऑस्ट्रेलिया आपल्याला नक्कीच जड जाणार आहे. ना आपल्याकडे 5-6 सेशन्स खेळणारी फलंदाजी आहे की 20 विकेट घेणारी घातक गोलंदाजी. बांगलादेश सारख्या नवख्या टीम तोंडाला फेस आणतात तर Australia पूर्ण भरात आहे. सिरीज ड्रॉ झाली तरी पुरेसे आहे.

लंकेसाठी संघनिवड झाली..

पंतला गरजेचा ब्रेक आहे.
बाकी संघनिवड अपेक्षित आहे. काही धक्के नाहीत.
हे वर्ष वन डे वर्ल्डकपचे आहे तर तिथे सारे संभाव्य खेळाडू आहेत. ईतरांना म्हणजे गायकवाड, संजू, त्रिपाठी यांना २०-२० मध्ये संधी मिळाली आहे. जेणेकरून यांना कधी संधीच मिळत नाही असा आरडाओरडा होऊ नये.
वनडेचा फलंदाजीचा कोअर जवळपास ठरलेला आहे. ही नावे वर्ल्डकप पर्यंत फार हलणार नाहीत. ईशान किशानच्या द्विशतकीय झंजावातानंतर आणि शुबमन गिल वनडे फॉर्मेटमध्ये दाखवत असलेल्या सातत्यामुळे धवन सध्या अपेक्षेप्रमाणे बाहेर आहे.

ऑस्ट्रेलिया आपल्याला नक्कीच जड जाणार आहे
>>>
बॉल वळू लागला पहिल्या दिवसापासून आणि तीन स्पिनर त्यांच्यावर सोडले की ऑस्ट्रेलियाचा सध्याचा पुर्ण भरातील खेळ पुर्ण बदलेल.. . भारताला हरवणे अवघड आहे त्यांना..

बाकी संघनिवड अपेक्षित आहे. काही धक्के नाहीत. >> एक रजत पतिदार ला काही चान्स न देता बाहेर बसवणे सोडले तर हो, बर्‍यापैकी अपेक्षित असलेले खेळाडू आहेत. ध्वनचीकेस कळालीनाही. म्हणजे फॉर्म नाही हे ठी़क आहे पण जवळजवळ वर्षभर रोहित किंवा कोहली नसताना तो कप्तान म्हणून खेळवला गेला ह्याचा अर्थ त्याला वल्ड कपसाठी ईयरमार्क केले असा नसेल तर विचित्रपणा आहे सगळा. त्यापेक्षा सरळ आधीपासून एखाद्या इतर खेळाडूला कप्तान ठेवायचा ना ?

रोहित किंवा कोहली नसताना तो कप्तान म्हणून खेळवला गेला..
>>>
यात राहुलही जोडा. मध्यंतरी राहुल येताच धवनची कप्तानी काढून राहुलला दिलेली. म्हणजे धवन गिणतीत नव्हता. कदाचित ईतर कोणाला कप्तानीचे गाजर दाखवायचे नसल्याने धवन सेफ गेम होता. धवन केवळ वर्कलोड मॅनेज करायला होता आणि त्याला कमी महत्वाचे सामने खेळवायचे जिथे सारे सिनिअर विश्रांती घ्यायचे. आता वनडे वर्ल्डकप तयारीच्या दृष्टीने सर्व वन डे महत्वाच्या झाल्या आणि धवन बाहेर गेला.

अपेक्षित संघनिवड ह्या मुद्द्याशी सहमत.

धवनला वर्षभर संधी (बी टीमबरोबर) मिळाली, पण ह्या कालावधीत त्याचे रन्सही उल्लेखनीय नाहीत आणि स्ट्राईकरेटही ७०‘ज मधे आहे. त्यामुळे आणि तरूण ऑप्शन्स अ‍ॅव्हेलेबल असल्यामुळे त्याची जागा गेली असावी.

भुवनेश्वर चा (पूर्णतः) अँड शमी चा (T20 मधून) पत्ता फायनली कट झालेला दिसतोय.

प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर योग्य निर्णय.

भुवनेश्वर चा (पूर्णतः) अँड शमी चा (T20 मधून) पत्ता फायनली कट झालेला दिसतोय. >> भुवीची केस थोडी विचित्र आहे. तो मह्त्वाच्या सामन्यामधे कच खात आलाय पण त्या आधी चांगला असतो. त्याची लाईक तो लाईक कॉपी चहर फिट नसताना भुवीचा पत्ता पूर्ण कट करायची गरज नव्हती. मलिक, प्रसिद्ध, आवेश खान , वगैरेंना अजून बरेच शिकायचे आहे. भुवी / बुमरा बरोबर पार्टनर करून त्यांना ग्रूम करता आले असते.

त्यामुळे आणि तरूण ऑप्शन्स अ‍ॅव्हेलेबल असल्यामुळे त्याची जागा गेली असावी. >> +१ हो फक्त त्या ऑप्शन्स मधले कोणी - रोहित नि शेवटच्या सिरीजमधे इशान वगळता क्लिक झाले नाहीत. बाकी तिथे आट्यापाट्याच सुरू होत्या म्हणून नवल वाटले.

“रोहित नि शेवटच्या सिरीजमधे इशान वगळता क्लिक झाले नाहीत. ” - तुला (रोहित ऐवजी) बहुदा शुभमन म्हणायचंय का?

मला वनडेमधे ओपनरच्या जागेसाठी ऋतुराजकडूनही बर्याच अपेक्षा होत्या.

मला वनडेमधे ओपनरच्या जागेसाठी ऋतुराजकडूनही बर्याच अपेक्षा होत्या. >>>>

त्याला खेळवलाच नाहीए (द आफ्रिकेविरुद्ध 1 ODI सोडल्यास).

इतर टूरला तो वॉटर बॉय म्हणुनंच राहिलाय.

मला वनडेमधे ओपनरच्या जागेसाठी ऋतुराजकडूनही बर्याच अपेक्षा होत्या.
>>>>
त्या आहेतच. फक्त तो या वर्ल्डकपनंतर रडारवर येईल असे वाटते.. सध्या रोहीतसोबत ओपनर म्हणून गिल ईशान झाल्यास राहुल वा आल्यास धवन या लोकांतच ट्राय केले जाईल. नवीन स्पर्धक घुसवणार नाहीत.

भुवीची केस थोडी विचित्र आहे. तो मह्त्वाच्या सामन्यामधे कच खात आलाय >>>> थोडक्यात तो गोलंदाजीतील राहुल आहे.:)

“ त्याला खेळवलाच नाहीए ” - लंकेची संपूर्ण सिरीज खेळला होता, पण आऊट ऑफ सॉर्ट वाटला होता. विजय हझारे किंवा आयपीएल मधली सफाई, अ‍ॅश्युअरन्स दिसला नव्हता - त्याचं वाईट वाटलं होतं.

“लंकेविरुद्ध ची T20 मालीका होती.” - ओके. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी फक्त त्याच्या बॅटींगच्या फ्लुएन्सीबद्दल बोलत होतो.

तीन फॉर्मेट, तीन पूर्णतः वेगवेगळे संघ, तीन कॅप्टन आणि तीन कोच Happy
आपल्याकडे नक्कीच तेव्ह्ढा टॅलेंट पूल आहे.... फॉर्मातले लोक लायनीत उभे राहण्यापेक्षा खेळू दे त्यांना Happy

तीन फॉर्मेट, तीन पूर्णतः वेगवेगळे संघ, तीन कॅप्टन आणि तीन कोच >> पूर्णतः वेगळीच हवी असा अट्टाहासही नको. फक्त वनडे -टी २० नि टेस्त वेगळ्या मापाने मोजले जावे. वनडे -टी २० मधे तूफान खेळला म्हणून लगेच टेस्ट मधे वर्णी नको नि व्हाईस वर्सा. दोन कप्तान नि एक कॉमन मेन कोच - दोन फॉर्मॅट स्पेसिफिक असिस्टंट कोच असे केले तर काँफ्लिक्ट टाळता येतील. कॉमन मेन कोच हा कंपनीच्या सीईओ टाईप्स काम करू शकतो.

तुला (रोहित ऐवजी) बहुदा शुभमन म्हणायचंय का? >> नाही रे - वाक्यरचना गंडली. रोहित वेगळ्या गृपामधे येतोय. मी त्याला अजून १-२ वर्षे तरी लिमिटेड क्रिकेट मधे धरतोय. त्याने इनफ चेंजेस दाखवले आहेत अ‍ॅप्रोच मधे .

“ रोहित वेगळ्या गृपामधे येतोय. मी त्याला अजून १-२ वर्षे तरी लिमिटेड क्रिकेट मधे धरतोय. त्याने इनफ चेंजेस दाखवले आहेत अ‍ॅप्रोच मधे” - ओह ओके.

हो, डाऊट आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर सेकंड इंनिंग मध्ये तो आणि कॅम ग्रीन दोघांच्याही हाताला दुखापत झाली.

तरी स्टार्क ने मोडलेल्या बोटानेही 18 ओव्हर टाकल्या आणि ग्रीन हि फलंदाजीला परत येऊन 50 वर नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलिया ने दक्षिण आफ्रिकेला अक्षरशः धुतला. वाईट हेच वाटते कि आपण या दक्षिण आफ्रिकेच्या कमजोर बॅटिंग समोर हरलो.

Pages