Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज काही झालं नाही.
आज काही झालं नाही.
अनघाचा मूड चांगला करायला तिच्यासाठी होम थिएटर. तरी ती दुसऱ्या दिवशी लग्नाचा अल्बम बघत टिपे गाळतेय. कारण डोहखळजेवणाला तो नाही.
मग तडकाफडकी डोहाळजेवणाचा बेत. तोही उद्याच. तर अन्घाची आई म्हणते आमच्या गावाहून बऱ्याच बायका येतील.
गाव विरार किंवा पालघर असावं.
कालच्या भागात त्या येताना नेहमीप्रमाणे देशमुखा़साठी भरपूर काय काय घेऊन आल्या होत्या. आणि अरुंधती ने कशाला कशाला केलं.त्या पिशव्या आत आणायला म्हणून एकाला ड्रायव्हरचा रोल मिळालाय.
कांचनला आपल्या डोहाळजेवणाची, कडक डोहाळ्यांची आणि अनिरुद्धच्या वेळच्या बाळंतपणाची आठवण येते. तो तेव्हापासूनच त्रास देतोय तर.
यश अरुंधतीला आशुतोषशी लग्नाचं बोलायला पुन्हा आठवण करतो. आता ती पाय मागे घेते आहे. चिंगी येण्याचं सार्थक झालं.
आशुतोष आणि अरुंधती नव्या म्युझिक स्कूलसाठी बोलणी करायला जाताहेत. आशुबाळाला नितीन हवाच आहे मीटिंगमध्ये.
मी कालच लिहिलं की याने एकट्याने डील फायनल केली. त्याने लगेच पाणी ओतलं.
प्रोमो - कॅफे आणि अभिषेक.
हा दुसऱ्या शहरात जातो सांगून गेलाय ना?
कांचन अगदीच लाज नसल्या सारखी
कांचन अगदीच लाज नसल्या सारखी स्वतःच्या डोहाळ जेवणाबद्दल बोलत होती...आणि अप्प्पा म्हणे मला कांचन शिवाय करमत नाही!!!
काय नातवंडांसमोर प्रेमाच्या पांचट गोष्टी करतात!!
Amazing comments aahet, me he
Amazing comments aahet, me he comments wachte ani seriel baghte
झकास वृत्तांत भरत, मी पण गेले
झकास वृत्तांत भरत, मी पण गेले ३/४ दिवस बघितलं नाही अरु काय करतेय ते पण वृत्तांत वाचून लक्षात आलं अरु नी काही केलंच नाहिये. बाकी गीत द्वंद्वाची कल्पना अफाट आहे. मुळात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्पर्धेत शिक्षक भाग घेऊ शकतात असं हे भारतातील एकमेव काॅलेज असावं.
एकंदर अप्पांचा विस्मृतीचा आजार हा अनुवांशिक वाटतो जो वारसा हक्काने इशा आणि अभि कडे आलाय. आपण आईच्या लग्नाबद्दल नक्की कुठल्या बाजूने बोललो ते इशा विसरते आणि आधीच्या प्रसंगात जे बोलली/वागली त्याच्या बरोबर उलट बोलते.
आपल्या वडिलांनी आणि आपणही काय काय केलंय ते अभि विसरून जातो आणि आईने दुसर्यांदा लग्नाचा विचार केला म्हणजे बाकिच्यांवर काही तरी भयंकर अन्याय केला आहे अशा पद्धतीने आक्रस्ताळेपणा करतो. अप्पांना त्यांच्या विस्मरणाच विस्मरण झाले की ह्या दोघांचा आजार बळावतो असा काही तरी पॅटर्न आहे समृद्धी मध्ये.
बाकी मध्यंतरी अरु आणि आशुतोष गाण्यासाठी बाहेर गेले असताना कांचन ने अनिरुद्ध आणि संजना च ऐकून अरुला वेडंवाकडं बोलुन घेतले तेव्हा रागवुन अप्पा घर सोडून निघून गेले होते ह्याच विस्मरण सगळ्यांना एकाच वेळी झालंय. तेव्हा च अप्पांनी मी आशु आणि अरु च लग्न लावून देईन असे सांगितले होते ते विसरून कांचन परत तोच जुना राग आळवते आहे आणि अप्पा परत जुन्या हतबल मोडात आहेत आपण ह्या बाईला सुतासारख सरळ आणलं होतं हे विसरून.
विस्मरणाचा आजार मालिकेच्या
विस्मरणाचा आजार मालिकेच्या दिग्दर्शक पटकथाकार संवादलेखकाला आहे.
इशाला आईने काही समजावलं की तेवढ्यापुरतं समजतं. पण मग तिची मूळ मतं पुन्हा उफाळून येतात.
अभिषेक बापावर गेलाय. MCP.
आपल्या लग्नाला किती काळ झाला
आपल्या लग्नाला किती काळ झाला हे अन्घाला नक्की माहीत नाही. दीडदोन वर्षे म्हणे.
लगे रहो भरत
हे दोघे कुठेतरी कॅफे मध्ये भेटणार आहेत. अरुंधतीच्या घरी पेस्ट कंट्रोल चालू असावं.
चिंगीचा आशुशी बालविवाह झाल्यासारखाच आहे. फक्त गौना व्हायचा वाकी आहे.
>>>>>
कालच्या भागाची सुरुवात
कालच्या भागाची सुरुवात संजना- अनघा. सासू सून सुखसंवाद. अनिरुद्ध - अभिषेक कसे एका माळेचे मणी आहेत, तू हे दिवस एंजॉय करायला हवेत, यापुढे आपल्या बाळामध्येच आपलं सौख्य शोधायचं, तेच तुला ताकद हिंमत दिलासा देईल इ.इ. संजनाच्या समजुतदारपणाचा कालावधी यावेळी बराच लांबलाय.
बाहेर डोहाळजेवणाची तयारी. फुलांच्या माळा घरावर बाहेरून सोडायच्या आणि दिवे घरात लावायचे अशा सूचना अप्पा सजावटीचं सामान घेऊन आलेल्या माणसाला देतात आणि यात कोणाला काही चूक वाटत नाही. फक्त त्यांनी स्वतः काम करू नये, फक्त सूचना द्याव्यात इति अनिरुद्ध.
कोणाचा तरी वाढदिवस आहे अशा समजुतीत आप्पा. लगेच अमांचा खंग्री मॅन सस्पेन्स म्युझिक वाजवू पाहतो. पण अनिरुद्ध त्याला फार वेळ देत नाही. वाढदिवस नाही, अनघाचं डोहाळजेवण आहे हे कळल्यावर फळ्याशी जाऊन आपली मेमरी चिप नीट करून येतात. आप्पा= किशोर महाबोलेंचा अभिनय चांगला आहे. चेहर्यावरचे भाव बदलताना दिसतात, डोळ्यांतही भाव दिसतात.
यश ईशा एकमेकांना फुल गेंदवा मारत असताना काही गेंद अनीशला लागतात. यश त्याचं बहारों फूल बर साओ हे गाणं अर्धवट म्हणत स्वागत करतो आणि अनिरुद्ध हा कशाला इथे असा नेहमीचा डायलॉग मारतो. यशने त्याला गाणं बसवायला बोलावले आहे. ( आशुबाळाच्या वाढदिवसासाठी बसलेलं गाणं कधी पूर्ण करणार हे लोक ? ) यश अनिरुद्धचा अपमान करून घेतो आणि अनीश सजावटी च्या कामात मदत करतो. मग ईशासोबत मेरे मेहबूब टाइप सीन. ईशाचा आवाज चक्क खालच्या पट्टीत लागला आहे. अनिशची अन्घाच्या आईशी ओळख. तो इंदूरचा आहे हे कळल्यावर लगेच तिथल्या अन्नपूर्णेला नमस्कार सांगा असा डायलॉग टाकून संवाद लेखिका आपले भूगोलाचे -धार्मिक सांस्कृतिक पर्यटन स्थळांचे ज्ञान दाखवून देते..
तिकडे आशुबाळ, अरुंधती , नितीन दुसर्या म्युझिक स्कूलबाबत त्या कोणा बिझिनेसमन सोबत डील करायला हॉटेलमध्ये. हा माणूस अर्थातच अरुंधतीचा फॅन आहे. तिला आपली आयडॉल म्हणतो. पण डायलॉग डिलिव्हरी कांचनसारखी आहे. वाक्यात भलत्याच जागी विराम घेतो. नितीनने डॅएलचे सगळे डिटेल्स वर्क आउट केले आहेत, ते आताच तुला सांगतो म्हणून त्याला घेऊन जातो. तो माणूस आता (हॉटेलात) आलाच आहात तर जेवूनच जा असं आशु-अरूला सांगतो.
आशु अरूचं मुझे कुछ कहना है सुरू होतं. पण पहले न आपचे वळसे न घेता आशु आधी मी सांगतो , असे म्हणतो. आणि काय सांगावे त्याने तर त्याच्या आणि चिंगीच्य नात्याबद्दल , तिच्या स्वभावाबद्दल. एक बायको असताना दुस री करायची ट्रेंड मागे पडून एकाच वेळी दोघींशी लग्न करायची ट्रेंड सुरू होतेय असं वाटत असतानाच एक असताना दुसरी हे दाखवायला अभिषेक एका तरुणीसमोर तिथे येतो. दोघांमध्ये बरीच जवळीक आहे. अरुंधतीचं सगळं लक्ष त्यांच्याकडेच आहे. आशुबाळ काय सांगतोय हे तिला ऐकूही येत नाहीए. पण हे आशुबाळाला समजेपर्यंत अभिषेक+ मैत्रीण खाऊपिऊ करून निघतात सुद्धा. जाताना एकमेकांच्या कमरेत हात.
ते पुरेसे लांब गेल्यावर अरुंधती त्यांच्या मागे धावते आणि आशुबाळ तिला मागे ओढतो. नितीनही तिथे येतो आणि हा अभिषेक होता ना? असं विचारते. अरुंधती सुद्धा तोच प्रश्न त्याला विचारते.
प्रोमोमध्ये अन्घा डोहाळजेवण. सजलेली अन्घा. अभिषेक येतो आणि अशा वेळी बाहेर गावाहून आलेल्या अरुंधतीला जसे टोमणेवजा प्रश्न अनिरुद्ध विचारी तसा प्रश्न अरुंधती विचारते. मग आरडाओरडा. अभिषेकच्या तोंडून माझ्याही काही गरजा आहेत असं एक वाक्य आणि अनघाला चक्कर येणं.
अरुंधतीने हॉटेलमध्येच त्याला कन्फ्रंट करून त्या मुलीलाही सावध करायला हवं होतं. कदाचित तिलाही हा विवाहित असल्याचं माहीत असेलच.
तर अशा प्रकारे अरुंधतीच्या संसारात जे पंचविसाव्या वर्षी झालं ते ज्यु अरुंधतीच्या संसारात दीडदोन वर्षातच झालं आहे. नवी पिढी फास्ट असते की नाही?
आता अभिचं लफडं. लेखकुला
आता अभिचं लफडं. लेखकुला लफड्याशिवाय काही सुचत नाहीये.
समृध्दी बंगल्याचं नाव लफडे सदन ठेवा.
एकही सिरीयल अशी नाही ज्यात विंबास नाही. २ हिरो/ हिरोईन १ हिरोईन/हिरो नाहीत.
शिवाय स्वतः:च्या दिरावर लाईन मारणे, कुणाच्या पदराला पेटवले, प्रसादात विष/पाल घालणे, घरच्या कुटुंबातील सदस्यांवर जीवघेणा हल्ला करणे / जीव घेणे हे खुपचं एंटरटेनिंग आहे.
<<<समृध्दी बंगल्याचं नाव लफडे
<<<समृध्दी बंगल्याचं नाव लफडे सदन ठेवा.>>>
सस्मित खुप हसले. खरंतर अमिता जो मुख्य आक्षेप आहे तो मतभेद आणि त्याचा स्वार्थी पणा हायलाइट करायला पुरेसा आहे शिवाय अरुंधतीला वेळी अवेळी टोमणे मारणे तो करतच असतो प्रेक्षकांना राग येण्यासाठी एवढे पुरेसे असताना त्याला अफेअर का करायला लावलं कोण जाणे.
बाकी मिटींग म्हणजे अशक्य प्रकार होता. इतक्या बाळबोध संवादाला मिटिंग म्हणणारे लोक धन्य आहेत.
भरत वृत्तांत एकदम मस्त.
बाकी मिटींग म्हणजे अशक्य
बाकी मिटींग म्हणजे अशक्य प्रकार होता. इतक्या बाळबोध संवादाला मिटिंग म्हणणारे लोक धन्य आहेत. >>>>>> म्युझिक स्कूलची शाखा म्हणजे हाईट आहे. एक आहे तिथे अरु सलग ४ दिवसही गेली नसेल. अजून एक काढून तिकडे शिकवणार कोण ?
अभि पण बावळटच आहे. विबासं करायचे तर ते मुंबईतच कशाला ? आशुरु च्या लग्नात अडथळा म्हणून हा ट्रॅक आणलाय एवढचं.
अंघाची आई अलका कुबल सारखी दिसते आणि स्टाईल पण मारते तशी. तिलाही बर्याच दिवसांनी चांस मिळाला आहे झळकण्याचा.
बाकी लफडे सदन म्हणजे द्रौपदीच्या थाळीसारखं आहे. लोकं वाढतात तशा खोल्या वाढत जातात बहुतेक. अविनाश आला त्याला अकॉमडेट केलं. आता अरु आल्ये.
अरुंधतीच्या अंगात येण्याची
अरुंधतीच्या अंगात येण्याची लक्षणं दिसताहेत. मागे ती आणि आशु रेकोर्डिंगनंतर ओव्हरनाइट अडकल्यावर परत आल्यावर अनिरुद्ध आणि कांचनने तिच्यावर संशय घेतल्यावर तिला मोठा संवाद होता. आणि तो अर्थातच छान झाला होता. तसंच काहीतरी आता होईल. तिचा आवाजही बदलला. आशुतोषने तिला अभिषेकच्या मागे जाण्यापासून रोखलं. दिसतं तसं नसेलच असं त्याचं म्हणणं, हे तो चिंगी आणि तो स्वतः यांच्याबद्दल म्हणतोय का?
अभिषेक त्या हॉटेलात काय करत होता याची माहिती नितीन काढणार आहे. याला सगळ्यांची सगळी लफडी ठाऊक असतात. कामथ, अनिरुद्धचा नवा पार्टनर... सीबीआय , ईडी, एन आय ए, एन सी बी, सी आय ए, केजीबी, मोसाद हे सगळे याला रिपोर्ट करतात. पण चिंगीबद्दल त्याला काही माहीत नव्हतं.
अनघाच्या अशा अवस्थेत अभिषेकचं लफडं समोर आणाणं बरं नाही हे अरुंधतीला सांगितलंय. पण तिला उमगत नाही.
अभिषेक येतोय म्हणून अनघाला भलताच आनंद झालाय. बहुतेक सगळं ठीक आहे असं तिला वाटू लागलंय. कडेलोटाची तयारी.
अनिरुद्ध ने अरुंधतीची जशी उलटतपासणी केली अगदी तशीच अरुंधती अभिषेकची करते. तसं सांगतेही. सुरुवात संजना करून देते. चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक हेही ती बोलून दाखवते. पोलिस एखाद्या गुन्हेगारालाच कसं खबरी म्हणून तयार करतात!
आपण पकडले गेल्याचे भाव अभिषेकच्या चेहर्यावर बराच वेळ ठेवून बाकी सगळ्यांचे रिअॅक्शन्सचे क्लोज अप एकेक करून. पण मग तो कॉन्फिडंटली उत्तर् देतो.
पुढच्या भागात मेजर राडा. अनघाला चक्कर येणार. अरुंधतीला तिच्या स्थितीचं गांभीर्य न कळल्याने अनघाची डिलिव्हरी लवकर आणि आणखी कठीण होईल. त्यात अभिषेकचं लफडं बाजूला राहील.
नॉर्मली अशा वेळी त्या बाईपासून सगळं लपवून ठेवायचं अशी मालिकांमधली रीत आहे. मिहीर मेल्याचं तुलसीला कितीतरी दिवस सांगितलंच नव्हतं. तिथून ती सुरू झाली.
<<<<बाकी लफडे सदन म्हणजे
<<<<बाकी लफडे सदन म्हणजे द्रौपदीच्या थाळीसारखं आहे. लोकं वाढतात तशा खोल्या वाढत जातात बहुतेक. अविनाश आला त्याला अकॉमडेट केलं. आता अरु आल्ये.>>>>
हे आणि
<<<<नॉर्मली अशा वेळी त्या बाईपासून सगळं लपवून ठेवायचं अशी मालिकांमधली रीत आहे. मिहीर मेल्याचं तुलसीला कितीतरी दिवस सांगितलंच नव्हतं. तिथून ती सुरू झाली.>>>
हे वाचून इतकी हसले कि अक्षरशः डोळ्यात पाणी आले.
देशमुख घराण्यातील समस्या म्हणजे बॉटमलेस पिट आहे त्यांना अंतच नाही आणि त्या समस्या अरु ने च फक्त सोडवायच्या हा नियम असल्याने तिला स्वतः च्या आई ची तब्येत, स्वतः चे काम म्हणजे संगीत शिकवणे, स्वतः चा अभ्यास आणि लग्न या सारख्या बिनमहत्वाच्या गोष्टींसाठी अजीबात वेळ नाही. कांचन ची प्रत्येक पोरकटातली पोरकट इच्छा पूर्ण करणे हे आधी तिचे आणि आता तिच्या सोबत अनघा चे जीवनध्येय आहे. पन्नास वेळा कांचन च्या शिव्या खाऊन ह्या दोघी ५१ व्या वेळी तितक्याच तत्परतेने तिचा शब्द झेलायला जातात.
दगडावर दगड आपटुन अचानक एखादी ठिणगी उडावी तसा अनिश कडुन अरुंधतिच्या प्लॅन बद्दल ऐकल्यानंतर नितिनच्या बुद्धी ची चमक अचानक दिसली आणि त्याने आशुतोष ला चिंगी पुराण आवरत घ्यायला सांगितले. एरवी ह्याचे ९९% बोलणे फक्त खाण्या संबंधि असते. ह्याची बायको सुगरण आहे असं सगळे एका सुरात एकमेकांना सांगत असतात आणि हा मात्र जाईल त्याच्या घरी आयुष्यात कधी खायला न मिळाल्यासारखे चरत असतो. पण आशुतोष आणि अरुंधती मध्ये बावळटपणाची स्पर्धा असल्याने आशुतोष चिंगी बद्दल आणि अरु आशुतोष बद्दल कायम डिनायल मोडत असते.
ह्या गॅंग ची शिरोमणी शोभावी अशी अन्घाई आहे. आपल्या मुलीचे हे दुसरे लग्न आहे, तिने आधिच्या नवर्याकडुन मारहाण सहन केली होती, सध्याचा जावई ऐन साखरपुड्याच्या दिवशी भलत्याच मुलीशी लग्न करुन आला होता हा सगळा पुर्वातिहास डोळ्यासमोर असताना आपली मुलगी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करते आहे तिकडे लक्ष द्यायचं सोडून ही बाई अप्पांचे खाण्यापिण्याचे चोचले पुरवत बसली आहे.
चांगली माणसं = बिनडोक माणस असा देशमुख सेंटर्ड युनिव्हर्स चा नियम आहे.
<<<<बाकी लफडे सदन म्हणजे
<<<<बाकी लफडे सदन म्हणजे द्रौपदीच्या थाळीसारखं आहे. लोकं वाढतात तशा खोल्या वाढत जातात बहुतेक. अविनाश आला त्याला अकॉमडेट केलं. आता अरु आल्ये.>>>>
हे आणि
<<<<नॉर्मली अशा वेळी त्या बाईपासून सगळं लपवून ठेवायचं अशी मालिकांमधली रीत आहे. मिहीर मेल्याचं तुलसीला कितीतरी दिवस सांगितलंच नव्हतं. तिथून ती सुरू झाली.>>>
हे वाचून इतकी हसले कि अक्षरशः डोळ्यात पाणी आले.
देशमुख घराण्यातील समस्या म्हणजे बॉटमलेस पिट आहे त्यांना अंतच नाही आणि त्या समस्या अरु ने च फक्त सोडवायच्या हा नियम असल्याने तिला स्वतः च्या आई ची तब्येत, स्वतः चे काम म्हणजे संगीत शिकवणे, स्वतः चा अभ्यास आणि लग्न या सारख्या बिनमहत्वाच्या गोष्टींसाठी अजीबात वेळ नाही. कांचन ची प्रत्येक पोरकटातली पोरकट इच्छा पूर्ण करणे हे आधी तिचे आणि आता तिच्या सोबत अनघा चे जीवनध्येय आहे. पन्नास वेळा कांचन च्या शिव्या खाऊन ह्या दोघी ५१ व्या वेळी तितक्याच तत्परतेने तिचा शब्द झेलायला जातात.
दगडावर दगड आपटुन अचानक एखादी ठिणगी उडावी तसा अनिश कडुन अरुंधतिच्या प्लॅन बद्दल ऐकल्यानंतर नितिनच्या बुद्धी ची चमक अचानक दिसली आणि त्याने आशुतोष ला चिंगी पुराण आवरत घ्यायला सांगितले. एरवी ह्याचे ९९% बोलणे फक्त खाण्या संबंधि असते. ह्याची बायको सुगरण आहे असं सगळे एका सुरात एकमेकांना सांगत असतात आणि हा मात्र जाईल त्याच्या घरी आयुष्यात कधी खायला न मिळाल्यासारखे चरत असतो. पण आशुतोष आणि अरुंधती मध्ये बावळटपणाची स्पर्धा असल्याने आशुतोष चिंगी बद्दल आणि अरु आशुतोष बद्दल कायम डिनायल मोडत असते.
ह्या गॅंग ची शिरोमणी शोभावी अशी अन्घाई आहे. आपल्या मुलीचे हे दुसरे लग्न आहे, तिने आधिच्या नवर्याकडुन मारहाण सहन केली होती, सध्याचा जावई ऐन साखरपुड्याच्या दिवशी भलत्याच मुलीशी लग्न करुन आला होता हा सगळा पुर्वातिहास डोळ्यासमोर असताना आपली मुलगी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करते आहे तिकडे लक्ष द्यायचं सोडून ही बाई अप्पांचे खाण्यापिण्याचे चोचले पुरवत बसली आहे.
चांगली माणसं = बिनडोक माणस असा देशमुख सेंटर्ड युनिव्हर्स चा नियम आहे.
हल्ली मालिकांत गुपित ठेवत
हल्ली मालिकांत गुपित ठेवत नाहीत. सगळ्या भानगडींचा सोक्षमोक्ष लगेच लावला जातो.
पर्णीका, अन्घाई, नितीन सगळं
पर्णीका, अन्घाई, नितीन सगळं पर्फेक्ट. तुम्हीही नेमाने लिहा इथे. मालिकावाले वाचत असावेत असं मला वाटतं.
अमा, परत या. सोमवारी समरप्रसंग आहे. त्याचा अपडेट सकाळीच टाका , म्हणजे मला संध्याकाळी एपिसोड नीट तयारीने बघता येईल.
मस्त लिहिलंय पर्णीका
मस्त लिहिलंय पर्णीका

भरत सीबीआय , ईडी, एन आय ए, एन सी बी, सी आय ए, केजीबी, मोसाद हे सगळे याला रिपोर्ट करतात. हे भारी आहे!
थॅंक्यु भरत आणि वाले, ह्या
थॅंक्यु भरत आणि वाले, ह्या सिरियल च मनोरंजन मुल्य शुन्य आहे, इथे सगळे मिळून ज्या चिंध्या करतो त्यातच सगळी मजा येते म्हणून माझी दोन पैसे ऍडिशन.
@ भरत तुम्ही निवांत वेळ काढून बुधवारी सरसावुन बसा अरु चा रुद्रावतार बघायला. माझ्या अंदाजाप्रमाणे तो बुधवारीच दिसेल. मधले दोन एपिसोड: अन्घाई कडुन जावाईबापु आणि अरु च कौतुक, नित्या चा आशु ला - आशुचा अरुला- अरु चा नित्या ला फोन, त्यामुळे अरु चे अभि ला सुप्त संकेत त्यावर संजना चे संशयी, अनघाचे करुण आणि उरलेल्या सगळ्यांचे त्यांचे त्यांचे सिग्नेचर एक्स्प्रेशनस्, उर्सेकरणीवरु अप्पांची थट्टा आणि कांचन चा त्रागा, अनिश आणि इशा ची ओढून ताणून आणलेल्या योगायोगाने एकामेकांशी वरचेवर टक्कर आणि त्यावर अनिरुद्ध चार त्रागा ह्यात सहज जातील.
मस्त लिहिलंय पर्णीका Lol
मस्त लिहिलंय पर्णीका Lol
सध्या प्रेशर कुकर गॅसवर
सध्या प्रेशर कुकर गॅसवर ठेवलेला आहे. अरुंध तीच्या चेहर्यावर प्रेशर वाढताना दिसते आहे.
काल मातृत्वाचे गोडवे गाणं चाललं होतं. आई झाल्याशिवाय स्त्रीच.... मला गौरी आणि तिच्या आई न होऊ शकण्याबद्दलचा एक अख्खा एपिसोड , ज्याचं या लोकांनी स्वतःच कौतुक केलं होतं, तो आठवला.
सुलेखाबाईंनी बाळाला काय होतंय ते सगळं आईला न सांगता कळतं असं आख्यान लावलं. त्यात मूल खोटं बोलत असलं तरी कळतं हे वाक्य होतंच.
जुन्या रीतीभीतींचं ग्लोरिफिकेशन , महत्त्व समजावणं सुरू आहे. पेढा की बर्फी वर कांचनबाई मुलाला पेढा आणि मुलीला बर्फी आवडते असं सांगतात ( आपल्या जुन्या ग्रंथांत लिहिलेलं आहे, हे वाक्य नव्हतं) . बॅलन्स करायला सुलेखाताईंना , अगं तेवढीच गंमत असा संवाद दिला.
अरुंधतीने अन्घाला तुझं बाळ तुझ्यासारखंच स्वतंत्र विचारांचं व्हावं असा आशीर्वाद दिला. घ्या भिंतीवर डोकं आपटून.
अन्घाची आई जास्तच नटली होती. त्यावरून कांचनच्या नटण्यावर आणि संजनाच्या तरुण असण्यावर गाडी गेली.
अनिरुद्धला तो आणि अरुंधती आजोबाआजी व्हायच्या गप्पा मारायचे (जब हम होंगे साठ साल के और तुम होगी पचपन की) ते आठवलं. म्हणजे अनघाला बाळ झालं की अरुंधती आहेच आजीची ड्युटी करायला.
यश अनीशला नक्की काय हाक मारतो - अनीशबियो म्हणजे काय?
ब्रो, भाई, भाऊ यातलं काही आहे
ब्रो, भाई, भाऊ यातलं काही आहे का?
Looney Tunes Head Bang
हेडबँग स्मायली कशी टाकायची ?
कुकरची पहिली शिटी झाली.
कुकरची पहिली शिटी झाली. डोहाळजेवणात नाचगाणी सुरू असताना अरुंधतीला आपला फोन वाजल्याचे बरोबर ऐकू आले.
आधीच्या भागातही सगळे एकत्र असताना अरुंधती फोन घ्यायला गेली तेव्हा अनिरुद्धने तिला आशुतोषचा फोन आला असेल इ.इ विहिणीसमोरच बोलून घेतलं. त्यावेळी हॉटेलवाल्यांनी आमच्या ग्राहकांचा खाजगीपणाचा हक्क असं सांगून अभिषेकच्या हॉटेल स्टेबद्दल माहिती द्यायला नकार दिला होता. पण नितीन फिक्की, चेंबर ऑफ कॉमर्स, असोचेम इ.चा अध्यक्ष असेल किंवा यांनी हॉटेलवाल्याला कर्ज दिले असेल त्यामुळे हॉटेल मालकाने ही माहिती दिली. अभिषेक आदल्या रात्रीच हॉटेलात राहायला आला होता . दिवसभर थांबून संध्याकाळी गेला. सोबत एक मुलगी होती.
अरुंधतीला असं हॉटेलात राहण्याचा अनुभव नाही. त्यामुळे एक स्त्री आणि एक पुरुष हॉटेलात एकत्र राहिले तर त्याचा काय अर्थ काढायचा हे तिला कळत नव्हतं (असं तीच म्हणाली). पण याचा काय अर्थ काढायचा हे निरागस आशुतोषला तरी कसं माहीत असेल? तो तिला दिसतं तसं नसतं इ.इ. सांगत राहिला.
हे बोलणं अन्घाच्या आईने मागे उभं राहून ऐकलं. माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे इ.इ. सांगून तिने अरुंधतीकडून माहिती काढायचा प्रयत्न केला. अरुंधतीच्या डोळ्यांसमोर अनिरुद्ध - संजना आणि तिच्या आयुष्यातील घटनांचा स्लाइड शो ..
तरीही ती मला पण नक्की माहीत नाही. त्याच्याशी बोलायला लागेल असं म्हणाल्यावर मात्र अन्घाई तिच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे , त्याला ग्रहण लावू नका, इ.इ. सांगते.
ही बाई पुढे मुलीला असू दे गं, तुझ्या बाळाकडे बघ, दुर्लक्ष कर असं सांगू शकेल.
अरुंधतीला मात्र सोक्षमोक्ष लावायचाच आहे. फक्त अभिषेकला बाजूला घेऊन विचारायचं असा तिचा विचार आहे. पण अर्थातच तिला तेवढा धीर धरवणार नाही आणि ती आजच्या भागात सगळ्यांसमोरच विचारणार आहे.
दरम्यान वाटीखालून बर्फी निघालेली आहे.
भरत
भरत
)
तेच मला समजेना...परवाही आणि कालही ...अरुंधती आशुतोष शी बोलायला म्हणून बाहेर गेबा? सेम सिक्वेंस?
परवा प्रायव्हसी ब्रीच होते म्हणून न मिळालेली माहिती आज मिळाली....!!
(कारण नितीन फिक्की, चेंबर ऑफ कॉमर्स, असोचेम इ.चा अध्यक्ष असेल..!!
अरु ने तरी धक्का कशाला द्यायचा अनघाला ? आता प्रि मॅच्युअर च्या भानगडी कोण निस्तरणार...?
मस्त लिहिताय भरत
मस्त लिहिताय भरत
आई कुठे काय करते <<< सिरियल
आई कुठे काय करते <<< सिरियल चे नावच चुकले आहे. हे नाव पाहिजे - बाबा कुठे काय काय करतात
थॅंक्यु प्राजक्त. झकास आढावा
थॅंक्यु प्राजक्त. झकास आढावा भरत.
कालच्या नांदीनंतर आज अपेक्षेप्रमाणे कीर्तन झाले. आपल्या जावयाने मुलीशी प्रतारणा केली असा संशय खुद्द त्याच्या आईला आहे हे कळल्यावर कोणतिहि बाई, खचेल, संतापेल, मुलीच्या वडिलांच्या कानावर घालायचा विचार करेल. मुलीला त्या घरातुन ताबडतोब घेऊन जाण्याची व्यवस्था करेल,इ. पण शिरोमणी अन्घाई ने ह्यापैकी काहीच केले नाही तिने शांतपणे अरुला आज अनघा आनंदात आहे त्यामुळे आपणही आत जाऊन सेलिब्रेशन सुरू ठेवु असं सांगितलं. ते ऐकून अरुपण चक्रावली पण मग तिने विचार केला की उद्या सकाळी अभिशी बोलले तर आज रात्री परत सगळ्यांच साग्रसंगीत खाणंपिणं, उद्या चार ब्रेकफास्ट इ अंगावर घ्यायला लागेल त्यामुळे तिने कठोरपणे अन्घाई ची विनंती अमान्य केली. त्यामुळे अन्घाईचा नाईलाज झाला आणि पुढच्या नाट्यात तिने प्रेक्षकांची भुमिका स्वीकारली.
समारंभ खास देशमुख प्रोटोकॉल प्रमाणे सुरू असल्याने त्यात नात्याने जवळची माणसं म्हणजे अरुची आई, भाऊ आणि भाचा, विशाखा ची मुलगी आणि सासुबाई, अन्घाई ने आमंत्रण दिलेल्या त्यांच्या गावाकडच्या बायका यापैकी कुणीही उपस्थित नव्हते पण सुलेखा ताई आणि अनिश मात्र होते. अरु च आख्यान सुरू होण्याची चिन्हे दिसताच त्यांनी अनिश ला घेऊन तिथुन काढता पाय घेतला.
होऊ घातलेल्या तमाशा आधी सुलेखा ताईंची एक्झिट हा प्रकार रुपाली भोसलेला पण ओळखीचा वाटला आणि तिने तिच्या देजावु फिलिंग बद्दल सगळ्यांना सांगितलं. पण आपल्या सारखे प्रेक्षक हे रुपाली भोसले ला संजना म्हणून बघत असल्याने तो प्रकार मला तरी अनिरुद्ध आणि संजनाच्या पास्ट मधल्या अफेअर चा टोमणा संजना अनिरुद्ध आणि अभि ला मारतेय असा वाटला.
अभिपण माझ्या सारखाच ह्या अनपेक्षित आणि अतार्किक हल्ल्याने सटपटला आणि त्यामुळे त्याने झटकन आपल्या प्रतारणेची कबुली सर्वांना दिली. फक्त आपण मानसिक रित्या त्या मुलींमध्ये गुंतलो नसल्याने आपलं हे प्रकरण अनिरुद्ध आणि संजनाच्या अफेअर इतकं निषिद्ध नाही अशी पुस्ती जोडली. वर अनघाला तु काउन्सिलर आहेस त्यामुळे समजून घे असंही सांगायला तो विसरला नाही. काउन्सिलर लोकांच्या लग्नात अशा प्रकारची प्रतारणा खपवून घेतली जाते ही एक नवीन गोष्ट मला ह्या निमित्ताने कळली.
पण आपल्या प्रेमाचे असे जाहीर धिंडवडे अभिने काढले हे सहन न होऊन अनिरुद्ध ने त्याच्या दोन कानफाटात मारल्या. सगळ्या जग अनिरुद्ध बद्दल जाणून असताना अभिने त्याचा उल्लेख आणि त्याची स्वतःशी तुलना का करायची नाही ह्याच कुठलही लाॅजिकल स्पष्टीकरण मात्र त्याने दिले नाही (आखिर देशमुख जो ठहरा).
शेवटी हा सगळा लाॅजिकशी पुर्ण पणे काडिमोड घेऊन चाललेला तमाशा अनघाला असह्य झाला आणि तिने अभिला मला ह्या पुढे तुझ्याशी एक शब्द ही बोलायचा नाही असे ठामपणे सांगितले. पण नेमकी त्याच वेळी तिला भावनातिरेकाने चक्कर आली. हा विकार फक्त सिनेमा आणि सिरियल मध्ये च दिसतो प्रत्यक्ष आयुष्यात मी कुणालाही दु:ख किंवा संताप असह्य होऊन बेशुद्ध पडताना पाहिले नाही पण ते एक असोच. त्यामुळे पुढचे काही दिवस देशमुखांच्या घरातिल कलगीतुर्यापासुन अनघाची आणि आपली सुटका नाही लोक्स.
हायला. पुरुषाने एक्स्ट्रा
हायला. पुरुषाने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणं अगदी नॉर्मल आहे असा अभिषेकचा समज झालाय.
मला आज मोघेबुवांची आठवण आली. कोणत्या सिनेमात त्यांना महाराजांचा रोल मिळालाय का? नाहीतर रियल इस्टेटवाल्याचा प्रोजेक्ट लंडनला कशाला असेल?
नेमकी त्याच वेळी तिला
नेमकी त्याच वेळी तिला भावनातिरेकाने चक्कर आली. हा विकार फक्त सिनेमा आणि सिरियल मध्ये च दिसतो >> खरंच. जरा धक्कादायक काही कळलं की लगेच यांना चक्कर येतेच. आमच्यावर डोंगर कोसळले पण आम्ही नाही कोसळलो ब्वा.
बर्याच वेळा प्रेग्नन्सीत करणारी धक्कादायक बातमी अशी लफड्याचीच असते सिरियल मधे.
अभी बापा कडून शिकलाय. सगळंच. चूका करायला आणि त्यांची भलावण करायला.
पण आता नकट्यांचं लग्न राहिलंच मग.
आशुरु च लग्न लांबण्याचं हे
आशुरु च लग्न लांबण्याचं हे १७८५ वं कारण असेल.
इतकं होऊनही अंघा मोठ्या मनाने अभिला माफ करेल कारण तिला ताईसारखी सासू मिळणार नाही दुसरिकडे :ड
अरुंधतीला अभि षेकला फोटो
अरुंधतीला अभि षेकला फोटो सेशनमधून अगदी हाताला धरून बाहेर काढायची काही गरज नव्हती. कार्यक्रम संपल्यावर त्याला एकट्याला गाठता येणं सहज शक्य होतं. पण मग नाट्य कसं आणता आलं असतं. तिथेही मातेच्या महत्तेचं महन्मंगल स्तोत्र गायलंच.
अभिषेकची रिअॅक्शन निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखी होती. असं काही होऊन गेल्यावर जर ते पहिल्यांदाच आणि तो म्हणतो तसं न ठरवता झालं असेल तर त्याला घरात पाय टाकल्यापासून चोरट्यासारखं वाटायला हवं. मायबोलीवर एक कथा आहे तशी. शिवाय त्याचा जो स्वभाव दाखवलाय त्याच्याशीही हे विसंगत होतं. अर्थात हे माझे आडाखे. जे विबासं करतात त्यांनाच नक्की काय ते माहीत. अरुंधतीचं ऑर्ग्युमेंट टिपिकल मायबोलीवरच्या वादविवादातलं होतं. चूक होतं असं म्हणत नाही. ते ऐकून कांचनबाईंना पाप पाप असं झालं. तोवर झालं नव्हतं.
संजनाशी लग्न करावं लागलं. अरुंधतीला पंख फुटले , नवा जोडीदारही मिळू शकतो याचा राग अनिरुद्धने अभिषेकवर काढला.
अनघाला अभिनयाची संधी मिळाली. आवाजात कंप, चेहर्यावर शक्य तितका तणाव. तिने अभिषेकला सोडू नये. पण त्याच्या त्या गरजाही पूर्ण करू नयेत.
Pages