Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राजक्ता आशुरु आणि इनिश हे
प्राजक्ता आशुरु आणि इनिश हे अतिशय उच्च आहे. _/\_.
मला वाटतं अन्या चिंगी संवाद हा दोघांच्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत होता. बाकी इतक्या प्रेमात असलेल्या चिंगी मधली २०/२५ वर्षे त्याच्या कडे ढुंकूनही बघितले नाही आणि आता अचानक तिच्या प्रेमाला इतका बहर कसा काय आला? असा प्रश्न ह्यांच्या पैकी कुणालाच कसा पडला नाही?
प्राजक्ता आशुरु आणि इनिश हे
प्राजक्ता आशुरु आणि इनिश हे अतिशय उच्च आहे. _/\_.
मला वाटतं अन्या चिंगी संवाद हा दोघांच्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत होता. बाकी इतक्या प्रेमात असलेल्या चिंगी मधली २०/२५ वर्षे त्याच्या कडे ढुंकूनही बघितले नाही आणि आता अचानक तिच्या प्रेमाला इतका बहर कसा काय आला? असा प्रश्न ह्यांच्या पैकी कुणालाच कसा पडला नाही?
प्राजक्ता आशुरु आणि इनिश हे
प्राजक्ता आशुरु आणि इनिश हे अतिशय उच्च आहे >> अगदी अगदी.
सिरीयल फारच घसरतेय . ..आता उरली पिसं काढण्यापुरती
Btw ह्या गदारोळा अप्पांचा अल्झायमर मागे पडलेला दिसतोय. बाकी अल्झायमरच तो विसर पडणारच.
तू पूर्तता होशील का ह्या आशु
तू पूर्तता होशील का ह्या आशु च्या ओळीला यश चे समजून हसणे मस्त जमलं पण अरु चे एक्सप्रेशन नेहमीप्रमाणे गंडलेले
काय तो कॉलेजचा कार्यक्रम!
काय तो कॉलेजचा कार्यक्रम! सबकुछ देशमुख!
अशा कार्यक्रमांत सूत्र संचालनापासून व्यवस्था पाहण्यापर्यंत सगळं विद्यार्थीच करतात . इथे ईशाला फोनसुद्धा ऑफिसमधून येतो.
अनीश पडता क्षणी गाणं वाजायचं थांबतं आणि तो नाचायला लागल्यावर पुन्हा सुरू होतं. तो केळकर शोभत होता नाचताना. अरुंधती आणि यशला विंगेत कसं येऊ दिलं?
अरुंधती - अनुष्कासाठी टेलरमेड स्पर्धा.
इशाची पात्रयोजना साफ चुकलेली आहे.
भरत +९९९९९९
भरत +९९९९९९
फक्त देशमुख कुटुंब प्रेक्षक. त्या टवाळ मुलांना कोणीही कॉलेज ऑथोरिटी थांबवत नव्हतं. आशु व्यतिरिक्त अजून एक जज बळचं आणला होता.
ईशिश गाडी रुळावर आली आहे आशुरु चं काय होतं बघायचं.
माझा अंदाज आहे की अनुष्का रागावेल की आशु तू मला आधी का सांगितलं नाहीस की तुला अरुंधती आवडते, मी तुमच्या मधे आले नसते - हे सगळं स्वरांगीच्या गोड आवाजात वाचा
हो अगदी कहर बाळबोध प्रकारे
हो अगदी कहर बाळबोध प्रकारे चाललं होतं सगळं. सुरवातीलाच त्या निवेदन करणार्या प्राध्यापिकेने स्पर्धेच्या निकालासंदर्भात परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल हे ज्या पद्धतीने सांगितले ते अचंबित करणारे होते. कुठल्या काॅलेज मध्ये विद्यार्थ्यांना हे आधी समजावून सांगावे लागते? सोडवण्यासाठी इतक्या समस्या उपलब्ध असताना समस्त देशमुख मंडळी त्या दोन गुंड मुलांना दम देण्यात बिझी होते. बाकी ती दोन मुले पण कहर होती. केळकरांच्या सांगण्यावरून ट्रस्टींनी त्यांना काॅलेज मधुन सस्पेंड केले तरीही सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी बसून सगळ्यांना ऐकु येईल अशा पद्धतीने इनिश बॅशिंग करत होते. ह्यांना फक्त अरु चा उपदेशच सरळ करू शकतो असे दिसतेय.
चिंगी प्रकरण तर च्युइंगम सारखं ताणत चाललेत. तिने शाॅर्ट नोटिस वर केळकरांच्या घरी मुक्काम ठोकला हे ठीक पण म्हणून तिने आशुतोष बरोबर त्याच्या ऑफिसात जाण्याच काय प्रयोजन? चिंगी ने आशुतोष ला प्रपोज केले पण त्याने नकार दिला. कदाचित पुढे तो त्याचा निर्णय बदलु शकतो की तशी शक्यता नाही हे ठरवण्यासाठी तिला त्याच्या आयुष्यात इतर कुणी आहे का ते माहीत करून घ्यायचे होते ते ही तिला कळले. मग आता चिंगीला त्या दुसऱ्या म्युझिक स्कूल मध्ये कायमची पाठवुन तिला सध्याच्या स्टोरीत उल्लेख मात्र ठेवण्याची वेळ आली आहे खरंतर.
अनिरुद्ध तर स्वगतात सुद्धा लाॅजिकल बोलत नाही हल्ली. अरुंधती गेली तर घराची व्यवस्था बघणारी कुणी नसेल म्हणून मी तिचं लग्न होऊ देणार नाही म्हणे. अनघा लग्न करून घरी आल्या पासून तिचं बघतेय ना. मग हे काय आता? मागे एकदा स्वगतात मी अरुंधतीला इतर कुणाबरोबर असलेले सहन करु शकत नाही हे सांगून झालय त्याच मग आता स्वतः शी बोलताना हे आडवळण कशासाठी? पण तरिही माझि लेखिका आणि संबंधित मंडळिंना नम्र विनंती आहे कि अनिरुद्ध ला संवादांऐवजी फक्त स्वगत द्या इथुन पुढे. त्याची ती शिक्षा ताणुन संतापात बोलण्याची पद्धत असह्य आहे अगदी.
अनीश पडता क्षणी गाणं वाजायचं
अनीश पडता क्षणी गाणं वाजायचं थांबतं आणि तो नाचायला लागल्यावर पुन्हा सुरू होतं. .. हे शक्य आहे ना? एकतर यश म्युझिक organizer होता, आणि तसेही तो पडला म्हणून बंद केले असेल. इशाने इशारा दिला..तेव्हा पुन्हा सुरू केले!!
तो केळकर शोभत होता नाचताना...
म्हणजे?
मला तर आवडली कोरिओग्राफी ..त्याच्या पायाला लागलं आहे त्याला अनुसरून होती अगदी.
त्याचं नृत्यकौशल्य पाहूनच
त्याचं नृत्यकौशल्य पाहूनच त्याला पाय दुखवून सुद्धा नाचतोय असं दाखवलं असावं. त्याच्याकडे पाहून तो पाय धड असताना फार काही वेगळं नाचू शकला असता असं वाटत नाही.
यश विंगेत नुसताच उभा होता. रियलिस्टिक दाखवायचं तर तो पडल्यावर काही वेळ तरी म्युझिक चालायला हवं होतं.
आशुतोषला धड काही जमत नाही हे दाखवायला तो दोघींनाही विनर घोषित करणार आहे.
सगळा प्रकार फारच पीळ होता. दोन्ही स्पर्धा ओढून ताणून होत्या.
परीक्षकांसमोर पॅड , पेन काही होतं का?
स्पर्धेच्या वेळेस चिन्गीला
स्पर्धेच्या वेळेस चिन्गीला कॉलेज मधे प्रोफेसर म्हणून अनाउन्स केल का?मग एक शिक्षक आणी एक विद्द्यार्थी अशी स्पर्धा कशाला म्हणे? अरु आणी चिन्गीची जुगल बन्दी हा अतर्क्य प्रकार. एकदम बालिश कल्पना.
कान्चन आज्जी सगळिकडे धिगभर दागिने ,गजरा घालुन लग्नी अवतारातच.
बाकी जे काय असेल ते पण गॅदरिन्ग मधले रखुमाई गाणे छान कोरिग्राफ केले होते आणी केलेही छान त्या मुलिनी.
अनिश इशाला सांत्वनार्थ बक्षीस
अनिश इशाला सांत्वनार्थ बक्षीस चाललं असतं. पहिलं कशाला ? बाकीचे काय गोट्या खेळायला आले होते का?
अनुष्काच्या आलापीचा पुढच्या गाण्याशी काही संबंध जाणवत नाही.
मालिकेतले सगळ्यात जास्त पुस्तकी सुविचार संपृक्त रटाळ संवाद आशुबाळाला असतात. याआधी इतकं भजं कॅरॅक्टर कोणत्याही मालिकेत पाहिल्याचं आठवत नाही.
मी काही दिवसांनी स्टार प्रवाह अनसब्स्क्राइब करणार आहे. सध्या इंग्रजीही काही बघण्यासारखं दिसत नाही आणि अजून ओटीटीच्या वाटेला गेलो नाहीए म्हणून घोडं अडलंय.
केबल ऑन केलं की बाय डिफॉल्ट कलर्स हिंदी लागतं. त्यावर कायम मॉडर्न- मायथॉलॉजिकल मालिका असतात.
भरत !
मॉडर्न- मायथॉलॉजिकल मालिका !!
बळच अनीश ईशा ला पाहिलं बक्षीस! खरेतर तो परीक्षकांचा पुतण्या आहे हे सगळ्यांना माहिती आहे..तर त्याला द्यायचेच नाही बक्षीस आशुतोष ने..खरा निस्पृह वगैरे असेल तर!!
आणि मला तरी चिंगीचेच गाणे आवडले जास्ती .
अरुंधती ला खूपच काकूबाई टाईप
अरुंधती ला खूपच काकूबाई टाईप साड्या नेसवतात....!!

ती अनुश्का पुढे अगदीच काकू दिसत होती.
आणि आशुतोष कायम तेलकट, अरु आवडत असण्याचा गिल्ट मनात ठेवून वावरतो..!!
मला तर ती निवेदिकाच खूप आवडली...!!
एकंदर प्रकार काॅलेजमधिल
एकंदर प्रकार काॅलेजमधिल कार्यक्रम न वाटता रिअलिटी शो वाटला. अरु आणि अनुष्का ला चक्क एक सेपरेट मेकअप रुम दिली होती. काॅलेजेस मध्ये उभं राहून आरशात बघुन तयार होणे शक्य नसते अशा वेळी आणि इकडे ह्या दोघि निवांत गप्पा मारत होत्या.
दोघिच स्पर्धक असलेल्या कॅटेगरीत दोघिंना विभागुन बक्षीस आणि त्याच इतक कौतुक ? अरुंधती ला अल्बम/चित्रपटात गायची मिळालेली संधी, तिचा दिवाळी पहाट चा कार्यक्रम इ पेक्षा हे बक्षीस कांचन ला मोठे वाटले आणि तिने अरु ला ओवाळले. देशमुख मंडळी विशेषतः कांचन कायम "आली लहर, केला कहर" मोडत असते.
तिकडे इशा बरोबर राहून राहून अनिश ही डोक्यावर पडल्या सारखा वागायला लागला आहे. तिने फोन उचलला नाही म्हणून काय ती घालमेल आणि १५ मि ५० वेळा फोन करणं, धन्य प्रकार होता.
उद्या अनुष्का आशुतोष आणि अरुंधती वर फसवणुकिचा आरोप करणार आहे असे प्रोमो मध्ये दाखवले (आजकाल प्रोमो मध्ये दाखवलेल्या गोष्टी दुसरे दिवशी दाखवतात आधी सारखे ३ दिवस लावत नाहीत). १५/२० वर्षे संपर्कात नसलेला मित्र आणि त्याच्या प्रेयसिने आपापल्या प्रेमाची कबुली अनुष्का जवळ द्यावी ही अपेक्षा म्हणजे बालिशपणाची कमाल आहे. आता हे रडगाणे अजून किती ताणतात काय माहित.
अतिशय बालिशपणा. मी लिहून देते
अतिशय बालिशपणा. मी लिहून देते की अन्याचा पोपट होणारे - अनुष्का व्हिलनगिरि न करता आशुरु च लग्न लावून देईल.
गाण्याचा निकाल आशुतोष यांनी
गाण्याचा निकाल आशुतोष यांनी सादर करावा!
आँ?
कोण कोणापेक्षा चांगलं गातं हे शोधणं हा या स्पर्धेचा उद्देश नव्हता. इतरांना गाणं शिकायला प्रेरणा देणं हा स्पर्धेचा उद्देश होता.
आँ आँ?
वीणा संगीत विद्यालयाची जाहिरात होती तर.
कांचनबाईंनी चक्क बुड हलवून आरतीचं तबक स्वतः तयार केलं.
आशुतोष अरुंधती यांना थोबाड उचकटून एकमेकांना हो म्हणता येत नाही म्हणून अनुष्काचं पात्र , तिचं गाणं आणि स्पर्धा. आशिक स्वतःच कासिद बनून प्रेमिकेचा निरोप प्रेमिकाला पोचवते.
तसेच होऊ देत प्राजक्ता, आणि
तसेच होऊ देत प्राजक्ता, आणि ह्या लोकांनी नवीन (समस्येचे) झाड पकडावे आता. सोडवण्यासाठी पेंडिंग समस्या बघितल्या तर अजून ५०० एपिसोड सहज लागतील. त्या सोडवुन फायनली आपल्याला मुक्त करावे.
समस्यांची यादी खालीलप्रमाणे:
(१) प्रकृतिच्या गंभीर तक्रारींच निवारण
अप्पा, अरु, अरु ची आई, आशुतोष ची आई
(२) लग्ने
गौरी -यश, ईशा-अनिश, मोघे काका, देविका, अरुचा भाऊ, अनुष्का
(३) पालकांच्या सद्यस्थितीत अपग्रेड आणि सुस्ंस्कारात वाढ
संजनाचा मुलगा, अरुचा भाचा, छकुली
(४) घरवापसी
वीणा
(५) संपुर्ण गर्वहरण आणि अरु कडे क्षमायाचना
संजना, कांचन, अभिषेक आणि अनिरुद्ध
<<<<वीणा संगीत विद्यालयाची
<<<<वीणा संगीत विद्यालयाची जाहिरात होती तर.>>>
तिथे विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक जास्त आहेत ना, करेल नाही तर काय.
सर्फिंग करताना निहार
सर्फिंग करताना निहार (अरुंधतीचा भाचा) नवनाथांची गाथा मालिकेत दिसला. तिथे त्याला कसला आनंद झाला होता माहीत नाही, पण कायम टुथपेस्टच्या जाहिरातीतल्यासारखा बत्तीशी दाखवत स्माइल करत होता.
संजनाची आईसुद्धा जिवंत आहे. पण तिचा कधी उल्लेख करत नाहीत.
शेखरचं सुद्धा लग्न लावता येईल. शिवाय केदारला नोकरीधंदा. अजून केळकरांकडे कसं नाही चिकटवलं त्याला?
भरत ...तुम्हाला तो नीहार का
भरत ...तुम्हाला तो नीहार का कोण तो..आठवतो...आणि दुसरीकडे दिसला तर लगेच आठवलेही!! कमाल आहे!!

ग्रेट स्मरणशक्ती !!!
पर्णका यादी मस्त आहे!!
विशेषतः..
संपूर्ण गर्वहरण....!!
थॅंक्यु आंबटगोड आणि हो केदार
थॅंक्यु आंबटगोड आणि हो केदार आणि शेखर ला साफ विसरूनच गेले मी. प्राजक्ता_शिरिनचा तर्क एकदम बरोबर. आता पुढचा महिनाभर लगिनघाई समृद्धी मध्ये.
यॅस, अंदाज बरोबर आला. तरीही
यॅस, अंदाज बरोबर आला. तरीही आशुरु दोघांनाही कोणीतरी फोर्स करावं लागलं मन की बात सांगायला.
अरुंधतीने आशुतोषशी लग्न
अरुंधतीने आशुतोषशी लग्न करायचं ठरवलंय हे नितीन आशुतोषला सांगतो तेव्हाचे आशुतोषचे एक्स्प्रेशन्स प्राइसलेस. तोंड उघडं आणि काय काय!
अनुष्काने कॉलेजमधल्या कार्यक्रमात स्टेजवरूनच या दोघांच्या लग्नाची घोषणा केली असत्ती तर मज्जा आली असती.
आशु आणी अरु दोघाना तरल भावना
आशु आणी अरु दोघाना तरल भावना दाखवताच येत नाहित, आशु तस करताना वेडसर दिसतो आणि अरु ब्रेनफॉग झाल्यासारखी.त्याच्यात काही बॉन्डीग आहे अस वाटतच नाही.
एकदम पर्फेक्ट वर्णन प्राजक्ता
एकदम पर्फेक्ट वर्णन प्राजक्ता:).
अनुपमा मध्ये जितके छान रिलेशन
अनुपमा मध्ये जितके छान रिलेशन डेव्हलप झाले त्या दोघांचे तेव्हढे यांचे अजिबात वाटत नाही।
खरंय
भरत.. प्राईसलेस एक्स्प्रेशन्स!

खरंच..त्या दोघांमधे काहीच केमिस्ट्री दिसत नाही! किंबहुना म्हणूनच...ते एकमेकांसाठी योग्य आहेत...नो केमिस्ट्री.. जस्ट फिजीक्स!
नो केमिस्ट्री.. जस्ट फिजीक्स!
नो केमिस्ट्री.. जस्ट फिजीक्स! Happy >>> पण त्यांना जमेल का ?????ठोकळे नुसते !
रविवारी एक तासाचा पीळ आहे.
रविवारी एक तासाचा पीळ आहे. त्यात अरुंधती आशुतोषला मी तुमच्याबरोबर लग्न करायला तयार आहे हे शक्य तितक्या कडू चेहर्याने सांगते आहे.
तिला प्रपोझ करण्यासाठी आशुतोष पुष्पगुच्छ घेऊन आणि डबल तेल लावून आला आहे. पुष्पगुच्छ गुंडाळायला जे काही वापरलंय ते पारदर्शक नाही आणि त्यातून फुलं दिसतच नाहीत. गुलाबाचं एक फूल द्यायचं ना? कॉलेजमध्ये परीक्षक कम प्रमुख पाहुणा म्हणून मिळालेला पुष्पगुच्छ रिसायकल केला का?
काल अरुंधती देवासमोर हात जोडून उभी असताना तिला आशुबाळाचे सगळे प्राइसलेस एक्स्प्रेशन्स आठवले.
रविवारी स्पेशल एपिसोद म्हणजे
रविवारी स्पेशल एपिसोद म्हणजे मधले दोन दिवस भरपुर टाइम्पास असणार आहे. भरपुर आठवणि आणि एक्स्प्रेशन उजळणी. अन्याचे शीरा ताणुन डायलॉग आणि बाकि पब्लीक चे एकत्र जमुन अरु - अनिरुध्द संवाद ऐकणे.
Pages