आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनघा अभिसाठी नाही तर आजि-आप्पा साठी तिथे राहतेय म्हणे?? अरे काय लॉजिक यात?>>> हो. लग्न करताना सुद्धा तिचा फोकस अभिवर कधीच नव्हता. तेव्हा ती ताई-ताईच करत होती. त्याचे वागणे तेव्हाही तिला आवडत नव्हते पण ताईवरचे लक्ष काही हटत नव्हते त्यामुळे अभिकडे दुर्लक्ष झाले. लग्नानंतर तो हनिमूनला जाऊ, फिरायला जाऊ मग वेगळे राहू म्हणत होता पण तिला कुटुंबातच राहून त्यांची सेवा करायची होती. अरूताईने जशी सगळ्यांची काळजी घेतली तशी आता आपण घ्यायला हवी असे तिला वाटते. ताई तिचा आदर्श आहे.
सर्वात हुशार कांचन आहे. समोरच्याची ईच्छा काहीही असो आपल्याला काय पाहिजे आणि ते कसे साध्य करायचे ते तिला चांगले समजते.. कसेही बोलले/वागवले तरी अरू आणि अंघा कायम तिची सेवा करणार शिवाय आई कितीही कठोर बोलल्या तरी त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रेमच आहे असे त्यांच्या डोक्यात तिने फिट्ट बसवले आहे.

चक्क आशुने चिंगिला तू ती नाहीस हे सांगितलं. पण ती अरु आहे हे नाही सांगितलं. अर्थात मंद चिंगीने काही ओळखलं नाही किंवा तसं दर्शवलं नाही.

अंघा इथेच राहून अभिशी भांडत बसणार त्यापेक्षा गेलेली बरी. कांची / अरु होसुमीयाघ ची आजी नसल्याने ती काही अभिला बाहेर काढणार नाही.

आशु - चिंगीचे संवाद किती अनैसर्गिक होते. ओंकार गोवर्धनचं सगळंच बिघडलंय.
मुळात माझं तुझ्यावर प्रेम नाही हे सांगायला कॅफेमध्ये कोण भेटेल? जिला सांगायचंय तिचा आउटबर्स्ट झाला तर?
आणि तुझ्यावर प्रेम नाही, पण तू इथेच रहा. आपली मैत्री कायम ठेवू हे काय? याला पण अरुंधतीसारखा दोन दरडींवर पाय ठेवायचा असावा. फारच ताणताहेत आता.
अनुश्का (पण( यांच्या ऑफिसात पण लागली का? ऑफिस , म्युझिक स्कूल जवळ हवं म्हणे. कॉलेजातली नोकरी?

अभिषेकचा आजार डोस मिळाल्यावर आणखीनच उफाळलाय. समृद्धीमध्ये सतत भांडणं होणं आवश्यक आहे, त्यामुळे त्या दोघांना एकत्र ठेवलंय.
संजनापण डायव्होर्स झाल्यावर इथेच राहणार वाटतं.

अमांच्या शब्दांत सांगायचं तर देशमुखांकडे कोणाचंही धड नाही. विशेषतः लग्न. कांचनने अजून गुरुजींना विचारू, शांति करू असं काही कसं म्हटलं नाही? त्या कॅरॅक्टरने तो विचार सगळ्यात आधी करायला हवा. लेखिकेला तिच्या कॅरॅक्टरमध्ये शिरता येत नाही.

हो ना..नितीन रात्री दिवसा...सदैव आशु कडेच असतो. त्याला त्यापेक्षा भाऊ च का नाही दाखवला आशुचा ?

तो ती चूक होती असं मान्य करायला तयार नाही. अनघाला पाहिजे तर वडिलांकडे जा, पण मुलगी माझ्याकडेच राहील असं आज सांगितलं.
यशने डोक्यात प्रकाश पाडायचा प्रयत्न केला.

सध्या तेच तेच दळण चालू आहे. अभिचा विबासं, अरुंधतीच्या होकाराचं भिजतं घोंगडं, अनिष्काला आशुतोष बद्दल तसं वाटतंय हे मठ्ठाला न कळणं , अनिशला इशावरून चिडवणं.

अनिशची भूमिका करणार्‍या कलाकाराचा पाय प्रत्यक्षात दुखावला असेल का?

आशुतोष - अरुंधती - अनुष्का. उगाच गुंतागुंत वाढवताहेत. आशुतोष प्रेमाबद्दल बोलायला लागला की कोणाचा तरी फोन येऊन ते बोलणे अर्धवट राहिलेच पाहिजे.
माझं तुझ्यावर प्रेम नाही, असे त्याने अनुष्काला सांगितल्यावर तिने गप्प बसावे ना. पण ते नाही, मग तुझं कोणावर प्रेम आहे हे त्यालाच नव्हे तर अरुंधतीलाही विचारते. अरुंधती उत्तर देत नाही, त्यालाच विचारायला सांगते. इकडे अरुंधतीने आशुबाळाला अजून होकार दिला न सल्याने तो हे अनुष्काला सांगू शकत नाही वा सांगू इच्छित नाही. तरी आमच्यातच रहा, असे मात्र सांगतो. थोडक्यात तिच्यासाठी आणखी एका हार्टब्रेकची सोय.

अनिशच्या पाय दुखावण्याचे जास्तच नाटक. पडण्याचं कारणही जबरदस्तीचं.

अनिरुद्ध - अभिषेक बदफैली नवर्‍यांच्या आणि पित्याच्या व्यथा मांडत आहेत

भरत Lol
बदफैली नवर्‍यांच्या आणि पित्याच्या व्यथा...!!

त्या अनुश्का च्या चेहेर्‍यात काहीतरी प्रॉब्लेम ए. वरचे दात अंमळ जास्तीच आत गेल्या सारखे वाटतात. ( तोंडात गुळणी धरल्या सारखी बोलते....)
पण तिचे कॉस्च्युम्स मात्र भारी असतात.

अभिषेक काय मध्यरात्री बाळाला घेउन बागेत गेला? वेड लागलेय का?

आजचा भाग चांगला रंगवला सर्व पात्रांनी. बघणीयच आहे एकदम.

खरे तर अरूने डोजे च्या दिवशीच. ऐनवेळी नको ते पचकून टाकले त्याचे दूरगामी परिणा म ह्या जोडप्यावर झाले आहेत. ते होतील हे तिला कळलेले नाही. एकदम सत्यवादी आदर्शवादी महिला बनायला जाते. ती अनघा खरेच फार ताई ताई करते. तिचा फोकस म्यारेज वर कमी. फिर ताइसे शादी करना था . अनघाची तब्येत बिघड ली प्रिमेचुअर डिलिव्हरी झाली. बाळाची हेल्थ पण सफर झाली. अभी चे मानसिक संतुलन बिघडले रिलेशन शिप खराब झाली. व्हेरी डॅमेज्ड. दोघे ही अगदी प्राणी लेव्हल ला आले आहेत. हे सर्व अरु नको तिथे बोलल्याने झाले आहे.
अभीच्या पार्ट्याने चांगले काम केलेले आहे.

अनुपमा मध्ये काय तेच तेच दळण चालले आहे. मी आत्ता बघत गवार मोडत बसले होते. मध्येच धोबी आला त्याला कपडे देउन आले तरी स्वगत चालूच अनुपमाचे. पण सेट वर काय खर्च करतात स्टार वाले.

मी कालचा भाग मिस केला. शेवटी अनिरुद्ध अभिषे कच्या आणखी एक थोबाडीत् देतो हे दिसलं. आजच्या भागाचा प्रोमो असावा.

देशमुख कुटुंब गाढ झोपलेले,आणि बाळाला शोधायला बाहेर पडल्यावर अख्खी दुनिया जागी,किराणा,भाजी वगैरे. . आशुबाळ पण मस्त पुस्तक वाचताना दाखवलाय..

पहाटे लवकर उठाव लागतं मग रात्री लवकर झोपतात..
अभ्यास आजच्या भागात अगदीच केविलवाणा दाखवला आहे. जणू आता रडू लागेल

मी गेले दोन आठवडे बाहेर गावी होते. इथल्या पोस्ट वाचून लक्षात आलं अजुन ह्यांची गाडी स्टेशनातच आहे.

ह्या स्पीड ने खरच छकुली शाळेत जाईपर्यंत काही अरु-आशुच लग्न होतं नाही. आधी त्या चिंगी ला आणुन टाइमपास केला आणि आता सीम्स लाइक ती जबाबदारी अभिषेक वर आहे. सध्या अनिरुद्ध ला बाजुला सारुन अभिषेक ला लीड व्हिलन केलंय असं दिसतंय. कांचन असतेच कायम तोंडि लावायला.
देशमुखांच अगदी टाॅम ऍंड जेरी सारखं चाललंय. टाॅम आलटून पालटून बदलत रहातो एवढाच काय तो फरक. बाकी अरु च्या नावाने शंख करणं आणि मग तिने त्यांचे प्राॅब्लेम्स सोडवण मागील पानावरून पुढे चालू.

अनुष्का आशुकडे रहायला येणार म्हणून लगेच अरु मनातलं सांगणार नाही - प्रोमोत दाखवलं. आशुचं मत एका दिवसात बदलेल असं वाटतयं का तिला ? ताणण्याला पण लिमिट नाहीये.

Happy हो ना..
आता परत अनुष्का ला आशु कडे कशाला आणत आहेत? तेच ते दळण! झाला ना 'आशुष्का' चा ट्रॅक एकदा...?

आशुरुचं (न दिसणारं) प्रेम बघून अनुष्का त्याग करेल आणि पुन्हा अन्याचा पोपट. कॉलेजचा ईव्हेंट आशुरु - ईशिश जोडीचं भवितव्य ठरवणार आहे असं दिसतयं.

यशचं बरोबर होतं. अरुंधतीने आशुतोषला अजून हो म्हटलेलं नाही, मग त्याने अनिश्काला तिच्याबद्दल का सांगावं?

Happy भरत... इतका विचार त्या संवाद लेखिकेने देखिल केला नसेल ...... ते आपलं सहज जमून आलं!
अनुष्का ला ऑब्व्हियस गोष्टी दिसत नाहीत का? उदा आशु च्या डोळ्यातील अरुंधती बद्दलचे प्रेम इ इ... (म्हणजे आपल्याला नाही दिसत तो तेल्कट दिसतो म्हणून.. पण अनुष्काला तर आवडतो ना?)
नितीन जास्त लॉजीकल आणि स्मार्ट आहे. आता आशु ला तिला घरात घ्यायची काय गरज होती? कैच्याकै!
कुणी असं बळंच घरात सामान घेऊन घुसतं का?

Pages