Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो अनिश कसाच शोभत नाहीये त्या
तो अनिश कसाच शोभत नाहीये त्या कॅरॅक्टरमधे. आशुतोशसारखाच.
आता अन्या चिंगीवर लाईन मारणार वाटतं. तिकडे वनराज ने अनुजच्या बहिणीसोबत केलं होतं तसं काहीतरी हा चिंगीसोबत करणार बहुतेक.
अभिला काय झटके येतात की काय वेडाचे? त्याच्या असल्या वागण्याला फारच मऊ उत्तर देतात सगळे. एखादी झणझणीत कानाखाली देऊन बघावी सगळ्यांसमोर. मग अपमान वगैरेची व्याख्या स्पष्ट होईल त्याच्यासाठी.
अभिला कानाखाली +१.
अभिला कानाखाली +१.
असे प्रसंग आतापर्यंत अनेकदा आलेत.
शेवटी अनिरुद्ध कडून पडली. पण सुधारत नाही.
आई आणि बायकोने मिळेना बडवला पाहिजे त्याला
अभिला कानाखाली +१.
अभिला कानाखाली +१.
असे प्रसंग आतापर्यंत अनेकदा आलेत.
शेवटी अनिरुद्ध कडून पडली. पण सुधारत नाही.
आई आणि बायकोने मिळेना बडवला पाहिजे त्याला
काल चि़गी म्हणाली, बोरिवलीत
काल चि़गी म्हणाली, बोरिवलीत अरुंधती राहते त्याच भागात मी कुठेतरी घर घेतलंय.
जसं काय भागाचं नाव घेतलं असतं तर प्रेक्षक या दोघींना भेटायला आले असते.
जसं काय भागाचं नाव घेतलं असतं
जसं काय भागाचं नाव घेतलं असतं तर प्रेक्षक या दोघींना भेटायला आले असते.
Submitted by भरत. on 23 December, 2022 - 04:17 >हा हा हा .......... मीच गेले असते असे पण मागे वझिऱ्याला राहतात असे म्हंटले गेले होते।
ही मालिका आता लूपमध्ये फिरतेय
ही मालिका आता लूपमध्ये फिरतेय.
फक्त अनिरुद्ध अनिश्काला बघून पाघळलाय हाच काय तो बदल. संजना तर हा असं करेल अशी अपेक्षा ठेवूनच नजर ठेवून होती.
केळकरांची कॉलेजातही वट आहे. डायरेक्ट ट्रस्ट्रीजशी बोलणार.
आशुतोष देशमुखांकडे येणार आणि
आशुतोष देशमुखांकडे येणार आणि त्याला अपमान करून हाकलणार हे इतकं नेहमीचं झालंय की तसा संवादच आला.
त्याच भागात कुठेतरीचं रहस्य उलगडलं. अनुष्का = चिंगी गौरीच्या घरी राहायला येतेय. अनिरुद्धला ही जाहिरात आठवेल.
पत्ता विचारायला तिने आशुतोष, अरुंधती यांच्याऐवजी पाच मिनिटे आधी भेटलेल्या संजनाची निवड केली. तीसुद्धा घरात राडा - अपमान होऊन बाहेर पडताना.
गौरी अमेरिकेत बसून मावशी किंवा बॉयफ्रेंडला कळू न देता घर भाड्याने देतेय / विकतेय.
भरत
भरत
तुमचा उत्साह किती..!
ती जाहिरात शोधून इथे चिकटविण्याचा !!
आणि खरेच ऑफ ऑल पीपल्..संजना ला पत्ता विचारला!!!
मी काय म्हणते आपली सासु आणि
मी काय म्हणते आपली सासु आणि नवरा ह्यांचे विचार आणि वागत ह्यांची पुर्ण कल्पना असतानाही दरवेळी आशुतोष आणि नितीन ला घरी घेऊन येण्याचा अरुला एवढा उत्साह कशाला असतो? निदान अप्पा आणि यश ची मदत घेऊन हे दोघं घरी नसताना ते दोघे येतील असं बघायचं ना.
बाकी आपल्या वडिलांच कर्तुत्व इशा ला माहिती नाही का निटस? (मी बघितले नाहीत ते एपिसोड) कारण दरवेळी ती इमानेइतबारे अरुंधती ला दोष देते. कांचन चे अरुंधती ला दोष देणे निदान लाॅजीकल आहे पण इशा आणि अभिच सतत आईवर आगपाखड करणं आणि वडिलांना यत्किंचितही दोष न देणे अतर्क्य आहे. स्पेशली घरात आजोबा, काका, आत्ता इ मंडळी आईच्या बाजुने बोलत असताना ह्या दोघांना फक्त वडिलांची आणि आजीची बाजु पटते हे काही समजत नाही.
बाकी चिंगी आता गौरीच्या घरी रहायला आली म्हणजे गौरीच्या कॅरेक्टर ने मालिकेतुन एक्झिट घेतली हे नक्की. कारण समृद्धी बंगला, केळकर सदन आणि अरुंधती कुटि ह्या तिनपैकी एकाच्या सानिध्यात रहाण हे मालिकेत रहाण्यासाठी अनिवार्य आहे.
ईशाने अनिशला मला तुझ्यासोबत
ईशाने अनिशला "मला तुझ्यासोबत असताना सेफ वाटतं ," असा voice message पाठवलाय आणि तो अनिरुद्धने ऐकला. ईशाचं पक्षांतर होतंय. टिकतंय का ते बघावं लागेल
मी काय म्हणते आपली सासु आणि
मी काय म्हणते आपली सासु आणि नवरा ह्यांचे विचार आणि वागत ह्यांची पुर्ण कल्पना असतानाही दरवेळी आशुतोष आणि नितीन ला घरी घेऊन येण्याचा अरुला एवढा उत्साह कशाला असतो? निदान अप्पा आणि यश ची मदत घेऊन हे दोघं घरी नसताना ते दोघे येतील असं बघायचं ना.>> +१ बर आशु,नित्या तर यायचेच वर काहितरी निमित्त काढुन अनिशलाही चिकटवतात आता चिन्गीची भर.
अरुची नोकरी आणी स्वतत्र राहणे हा एक हास्यास्प्द प्रकार आहे, देशमुखाकडे खुट्ट जरी वाजल तरी अरुनेच सोडवायला हव अस असल्याने नोकरी,शिक्षण सगळ लगेच बॅकफुटवर.केळकर लगेच रजा देतातच वर कॉलेजही आठवण आली तर कडेकडेनेच करायच अस्ल्याने अरुचा मेन जॉब देशमुखाकडचे प्रॉब्लेम सोडवणे, आइकान्चन नावाच्या विक्षिप्त बाइचे कौड कौतुक पुरवणे आणी त्याबद्दल बोलणे खाणे हा आहे.
अनुपमाचे शॉर्ट एपिसोड
अनुपमाचे शॉर्ट एपिसोड इन्स्तावर असतात ते अधुन मधुन बघितले तर त्यातही सगळे प्रॉब्लेम सोडवायलाही सगळीकडे अनुनेच धावायच असत त्यातला आशु उर्फ अनुज मात्र फार भारी आहे, आशु- द तेलकट एकदम पाणी कम चाय आहे त्याच्यापुढे.
<<<<अरुचा मेन जॉब देशमुखाकडचे
<<<<अरुचा मेन जॉब देशमुखाकडचे प्रॉब्लेम सोडवणे, आइकान्चन नावाच्या विक्षिप्त बाइचे कौड कौतुक पुरवणे आणी त्याबद्दल बोलणे खाणे हा आहे.>>>>
विक्षिप्त, कजाग, ढालगज, पोरकट आणि बरंच काही असं पॅकेज डील आहे ते.
माझं नम्र सजेशन असं आहे की नाही तरी मोघेंच्या बायकोला ह्या लोकांनी कायमच घालवलच आहे तर मोघेभाउजींच लग्न ह्या मंडळींनी त्या अरुच्या डॅशिंग मैत्रीणीशी लावुन द्यावं. तसंच चिंगी आता शेजारी रहायला आली आहे तर चिंगी च लग्न शेखरशी लावावं आणि मग चिंगी आणि ती मैत्रीण दोघिंनी मिळुन कांचनला एकदाची चांगली शिस्त लावावी. निदान बघणार्यांचा वेळ तरी बरा जाईल सध्याच्या सततच्या रडगाण्यापेक्षा.
<<<<अरुचा मेन जॉब देशमुखाकडचे
<<<<अरुचा मेन जॉब देशमुखाकडचे प्रॉब्लेम सोडवणे, आइकान्चन नावाच्या विक्षिप्त बाइचे कौड कौतुक पुरवणे आणी त्याबद्दल बोलणे खाणे हा आहे.>>>>
विक्षिप्त, कजाग, ढालगज, पोरकट आणि बरंच काही असं पॅकेज डील आहे ते.
माझं नम्र सजेशन असं आहे की नाही तरी मोघेंच्या बायकोला ह्या लोकांनी कायमच घालवलच आहे तर मोघेभाउजींच लग्न ह्या मंडळींनी त्या अरुच्या डॅशिंग मैत्रीणीशी लावुन द्यावं. तसंच चिंगी आता शेजारी रहायला आली आहे तर चिंगी च लग्न शेखरशी लावावं आणि मग चिंगी आणि ती मैत्रीण दोघिंनी मिळुन कांचनला एकदाची चांगली शिस्त लावावी. निदान बघणार्यांचा वेळ तरी बरा जाईल सध्याच्या सततच्या रडगाण्यापेक्षा.
अर्र.. आज कायबी न्हाय?
अर्र.. आज कायबी न्हाय?
चला घरला जाउया...
गौरी राहत होती तो बाहेरून
गौरी राहत होती तो बाहेरून बंगला दिसत असला, ती बंगल्यांची कॉलनी असली तरी, खरं तर फ्लॅट होता. तेही भाड्याने घेतलेला.
यशला काहीतरी डा यलॉग असायला हवेत म्हणून गौरी तो सोडून इतरांशी बोलते. तो आपल्या रिलेशनशिपचं भवितव्य हा विषय सोडून दुसर्या कशावर बोलत नाही , म्हणून ती त्याला टाळते असं तरी दाखवायचं.
मी म्हटलं तसं अनुष्काला म्युझिक स्कूलची एक ब्रँच मिळणार. तीही मूळ. आता आशुबाळ म्हणतंय दुसर्या ब्रँचची जागा लांब आहे आणि अरुंधतीला जायला यायला कठीण पडेल. पहिलीच ब्रँच त्यांच्या महिला आश्रमाजवळ म्हणजे पनवेलला होती ना? आणि त्या आश्रमाचं ऑफिस बोरिवलीला ! अरे कुठे नेऊन ठेवलाय . यांच्यातल्या कोणालाच मुंबई आणि परिसराची माहिती नाही?
अचानक सगळ्यांचे उद्योगधंदे बंद पडले. अनिरुद्धचा बिझिनेस, संजनाची नोकरी, अरुंधतीचं कॉलेज (हा तर मोठा जोकच आहे) यशचं ऑफिस आणि स्टुडियो. एकटा अभिषेक बिचारा कामाला जातो
अरुंधती अनिरुद्धसाठी अनुष्काचं स्थळ घेऊन सुलेखाताईंना भेटेल अशी लक्षणं आहेत.
अरे पण यश तर त्या नील कामत
अरे पण यश तर त्या नील कामत प्रकरणातुन बाहेर आल्यावर केळकरांकडे काही तरी काम करत होता ना? आशुतोष आणि नितिन सतत देशमुखांकडे पडिक असल्याने आणि आल्या गेल्या संकटात देशमुखांच्या पाठीशी उभे रहाण्यात बिझी असल्याने केळकर उद्योग समूहाचे सगळे बिझनेस बंद झाले तर नवल नाही.
संजनाची पण नोकरी गेली का परत? मध्यंतरी तिला नितिन आणि आशुतोष ने फायर केले पण त्यानंतर तिला जुन्या ऑफिस मधल्या बाॅस ने तिला नोकरी दिली होती ना?
किती तो अभ्यास देशमुख
संजनाची नोकरी आहे. पण ती
संजनाची नोकरी आहे. पण ती कामाला जाताना किंवा कामाबद्दल बोलताना दाखवत नाहीत.
एकदाचं आशुने क्लीअर केलं की
एकदाचं आशुने क्लीअर केलं की त्याला अरुच आवडते फक्त अनुष्का नाही. अर्थात हे प्रोमो मधे, म्हणजे २-३ दिवसात. बहुतेक आता अन्या डोरे डालणार अनुष्कावर.
अन्या रोज वेगळा वागतो. खरी ग्रे शेड म्हणावं असा.
काल यांच्या कामधंद्यांबद्दल
काल यांच्या कामधंद्यांबद्दल लिहिलं आणि आज लगेच यशला दोन दोन कामं मिळाली.
लेखिकेने साउंड डिझायनिंग हा शब्द शोधला. रेसुल पुकुट्टीला स्लमडॉग मिलियनरच्या साउंड डिझायनिंगसाठी ऑस्कर मिळालं होतं. यश संगीतकार आहे म्हणजे त्याचं आणि ए र रेहमान या दुसर्या ऑस्कर विजेत्याचं काम एकटाच करतो. शिवाय तो गाणी सुद्धा लिहिणार आहे. म्हणजे गुलजार या तिसर्या ऑस्कर विजेत्याच्याही पोटावर पाय.
अनिश सेमी क्लासिकलच्या नावाखाली चित्रपट गीतं म्हणताना नाचतो सुद्धा.
काल आशु बाळाच्या तोंडी एक वाक्य होतं - आपण जागा घेताना दहा वेळा विचार करतो. पण अनुष्का मागचा पुढचा कसलाही विचार न करता निर्णय घेते.
याच बाळाने दुसर्या म्युझिक स्कूलसाठी मिळत असलेली जागा कुठे आहे, आताच्या स्कूलपासून किती लांब आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार न करता क्षणार्धात होकार दिला होता आणंइ आता अरुंधती दोन टोकाला असलेली दोन म्युझिक स्कूल ( त्याआधी देशमुखांचं घर, वेळ मिळाला तर कॉलेज, गाणं) कशी सांभाळणार म्हणून काळजीत आहे. अर्थात ही काही फार मोठी समस्या नाही. तो अरुधतीसाठी एक हेलिकॉप्टर घेऊ शकेल. अरुंधती खूप हुशार असल्याने हेलिकॉप्टर चालवायलाही चटकन शिकेल
अरुंधतीला आधीची तिची तीन मुलं, मग दुसर्या शैशवातले सासू सासरे धरून पाच्, नातवंड हे सहावं पोर . शिवाय भावाचं आणि संजनाचं
पोर धरलं तर ती अष्टपत्या. त्यात आणखी आशुबाळ नकोच . म्हणून ती लांबचं म्युझिक स्कूल निवडून त्याच्या पासून लांब जाऊ पाहतेय आणि अनुष्का आणि तो यांना एकमेकांच्या गळ्यात घालतेय.
ऑस्कर
ऑस्कर
देशमुख आणि केळकर दोन्ही घरात
देशमुख आणि केळकर दोन्ही घरात क्रायसिस.
कालच्या भागात अन्घा माहेरला जाते हो नाखवा, तिच्या सोबत यश आणि अनिशवा.
अनुष्काने अरुंधतीकडे आशुबाळाबद्दल इजहार ए इश्क केला. अरुंधतीला हे अगदी अपेक्षितच होतं.
आज तिने ते आशुबाळाला सांगितल्यावर हा निरागसपणे म्हणतो, मी तिला तशा हिंट्स कधीही दिल्या नाहीएत. तिला तसं वाटत असेल तर तो तिचा प्रॉब्लेम आहे.
अनुष्का असते त्या भागात किमान एकदा तरी या दोघांच्या लग्नाचा विषय निघतोच. ती फिजिकली सुद्धा त्याच्या गळ्यात पडते. कां चनने तिला आशुशीच लग्न कर असं सुद्धा सांगितलं होतं. त्यावर त्या दोघांची काय रिअॅक्शन होती ते विसरलो. तर हे सगळं नितीन लाउडस्पीकरवरून सांगत आलाय. तरी आशुबाळाला कळत नव्हतं. शेवटी अनिशने ते अगदी स्पष्टपणे दिसतंय असं त्याला एक घाव दोन तुकडे करत सांगितलं.
तिकडे अन्घा निघतेय, त्यावरून लोकसभेतल्यासारखी चर्चा , कांचन आजारी प डण्याचं हुकुमी शस्त्र काढतेय तोच अन्घापिता दारात हजर. हे ऐतिहासिक चित्रपटातून आल्यामुळे स्वतःचा उल्लेख आम्ही असा करतात. अभि षेकला थोडे डायलॉग फेकून मारतात. तरीपण त्याचं माझं वागणं बोलणं चुकलं असेल इ.इ. च चालू आहे. अजूनही तो आपलं चुकलं हे १००% मान्य करायला तयार नाहीत. मग अन्घापिता - मी माझ्या मुलीला कायमचा न्यायला आलोय असा बाँब काढतात. पण पुढल्या भागात तो बाँब फोडायचा की नाही हा निर्णय अन्घावर सोडतात. अरुंधती.२ कायमची माहेरी जाणार? वाट बघा!
ज्या कॉलेज फेस्टची इतकी चर्चा, मारामारी चालू आहे तो नेमका कधी होणार आहे त्याचा पत्ता नाही.
आशु बाळ किती साधं आहे की
आशु बाळ किती साधं आहे की मुलगी हिंट देत्ये तरी कळत नाही.
अंघा पिता गाडी पाठवणार होते तर अनिश का गाडी घेऊन येईल ?
कांचीने आशु अनु लग्न सुचवलं तेव्हा प्रतिक्रिया दाखवल्याच नव्हत्या कोणाच्या.
प्राजक्ता....
प्राजक्ता....
.. गाडी पाठ्विणार होते ना खरंच..?
किती बारकाईने पाहतेस सीरीज !
करेक्ट निरीक्षणे!
अंघापिता..
आणि ते आधी पासूनच 'आम्ही' म्हणतात का? मला नाही आठवते. काल त्यांनी 'आम्ही' म्हटल्यावर मला वाटले अंघाची आई ही आलीये...म्हणून मी पुन्हा थोडे मागे घेऊन पाहीले.....तर नाही !!
त्यांचा गेटअप का बदलला? आधी चा फ्लॅश बॅक दाखवत होते काल...त्यात वेगळेच दिसत होते.
आणि अनीश चा काय संबंध जायचा?
येस्स.. आणि आई कांचन ने आशु-अनुष्का लग्न प्रपोज केले तेव्हा कुणाच्याच प्रतिक्रिया दाखवल्याच नाहीत!
सो कंव्हिनीयंट !!
{अंघा पिता गाडी पाठवणार होते
{अंघा पिता गाडी पाठवणार होते तर अनिश का गाडी घेऊन येईल ?}
Lack of communication.अन्घापिता गाडी पाठवणार हे यशनिषला माहीत नाही. अनिष
अन्घाच्या माहेरी जाणार हे आशुबाळाला माहीत नाही.
कांचनचा तो यांच्याशीच लग्न करा डायलॉग फक्त प्रोमोज मध्ये दाखवून सोडून दिला की काय? की तो डायललॉग मारल्यावर ब्रेड घेतला आणि पुढचं दाखवलंय नाही?
किती ते loose threads?
ब्रेड..?
ब्रेड..?
खळी साठी काहीही केलं नाही असा
खळी साठी काहीही केलं नाही असा मधुराणी ने खुलासा केलाय
https://www.facebook.com/100064260206192/posts/pfbid0335RVcEsg8g7vcpfw8N...
अनघा माहेरी निघाली आहे का
अनघा माहेरी निघाली आहे का युक्रेनला? नाहि एवढ काळजी करण्यासारख काय होत त्यात? ५-६ आठवड्याची बाळ घेवुन विमान प्रवास सुद्धा करतात लोक,
छकुली म्हणून जे बाळ घेतलय ते जाम गोड आहे पण त्याची एक दोन झलकच दाखवतात, ते बाळ छान काय नाजुक वैगरे आहे अस वाटत तरी नाही छान हसर गुटगुटित बाळ आहे.
अनघा अभिसाठी नाही तर आजि-आप्पा साठी तिथे राहतेय म्हणे?? अरे काय लॉजिक यात?? बर त्यातल्या आप्पाना लेखिकेच्या सोयिने विसरायला होत आणी आइ कान्चन नावाच्या रद्दड बाइला एक हक्काची मोलकरीण हवी असते.अरु नाहितर अन्घा... कान्चन प्रिय ताइशी कशी वागलिये हे अन्घा बघितलय तरी अन्घाच वेगळच चर्हाट असत.
अनघा माहेरी निघाली आहे का
अनघा माहेरी निघाली आहे का युक्रेनला? नाहि एवढ काळजी करण्यासारख काय होत त्यात? ५-६ आठवड्याची बाळ घेवुन विमान प्रवास सुद्धा करतात लोक,
छकुली म्हणून जे बाळ घेतलय ते जाम गोड आहे पण त्याची एक दोन झलकच दाखवतात, ते बाळ छान काय नाजुक वैगरे आहे अस वाटत तरी नाही छान हसर गुटगुटित बाळ आहे.
अनघा अभिसाठी नाही तर आजि-आप्पा साठी तिथे राहतेय म्हणे?? अरे काय लॉजिक यात?? बर त्यातल्या आप्पाना लेखिकेच्या सोयिने विसरायला होत आणी आइ कान्चन नावाच्या रद्दड बाइला एक हक्काची मोलकरीण हवी असते.अरु नाहितर अन्घा... कान्चन प्रिय ताइशी कशी वागलिये हे अन्घा बघितलय तरी अन्घाच वेगळच चर्हाट असत.
Pages