"ए मेरे बचपन .. !" - लहानपणीच्या निरागस समजुती

Submitted by छन्दिफन्दि on 27 November, 2022 - 20:07
bachpan

"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.

ह्या त्यातल्याच काही समजुती !

***

शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.

माणूस देवाघरी कसा जातो ह्याच एक चित्र बाल मनात तयार झालं, माणसं त्या व्यक्तीला देवळात घेऊन जातात आणि देवळात ठेवून परत येतात. नंतर रात्री (दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव) मारुतीबाप्पा येऊन हातावरून (जसा द्रोणगिरी पर्वत नेला होता तसा) देवाघरी घेऊन जातो.

***

नाटकामध्ये जेव्हा एखादं पात्र म्हणतं " चहा घेऊन येते.." तेव्हा वाटायच आत (विंगेत) एकदम मस्तपैकी स्वयंपाक घर आहे, तिकडेच चहा बनवून घेऊन येतात. पण तरी प्रश्न असेच " ह्यांचा चहा इतक्या पटकन कसा बनतो?

***

मराठी हिंदी सिनेमे बघून तर पक्की ठाम समजूत होती, प्रेमात पडलं की गाणी गायची, नव्हे नव्हे फुला- झाडाभोवती नाच पण करायचा.

एका मामाचा प्रेम विवाह ठरला, म्हणजे त्याने तसं जाहीर केलं. मग पहिला महत्वाचा पडलेला प्रश्न "हा मामा आणि होणारी मामी कोणत्या बरं बागेत नाच करत असतील, कुठलं गाणं म्हणत असतील ? "

***

" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत.

***

सुहाग रातचा सिन बघुन तर पक्की खात्री होती की

लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत/ येतं.

***

ह्या वाचताना तुम्हाला पण नक्कीच तुमच्या लहानपणच्या भाबड्या समजुती आठवल्या असतील आणि हसू आवरले नसेल तर नक्की शेअर करा .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५. अग्निशामक गाडीला कितीही वेगात जायला परवानगी आहे. जाताना तीन माणसे धडकून मेली तरी ड्रायवरला ते माफ असते.
>>>> मला पण असेच वाटायचे

ओमनी फक्त अपहरण करणारेच वापरतात असा माझा समज होता,>>>>
हो, रस्त्यावर कधी ओम्नी गाडी दिसली, मी खूप घाबरून अगदी आतल्या बाजूने चालायचे, जेणेकरून मला सहज कुणी पकडू शकणार नाही. Lol

४)अमेरीकेत लोक रोज आन्घोळ करत नाहीत तर त्यानी आन्घोलीची गोळी इन्व्हेन्ट केलिये असही साग्नितल होत, यावर विश्वास बसलाही होता...मोठ झाल्यावर त्या गोळिचा शोध आपल्यालाही लागला आहे हेही कळल.

Submitted by प्राजक्ता on 30 November, 2022 - 13:14 >>>
असे आमचे लहान काका लहानपणी सांगत जेव्हा ते एकदम कपडे आईकडे धुवायला देत आई ओरडायची रोज आंघोळ करायला काय होते वैग्रे वैग्रे।

१. सिद्धू ने एक खून केलाय शिक्षा म्हणून त्याचा एक अंगठा अर्धा आहे म्हणून तो ग्लव्ह कधी काढत नाही.
२. हरलेल्या उमेदवाराला मत दिले कि ते वाया जाते. हे लॉजिकली पटत नव्हते त्यामुळे काही कळायचे नाही.
३. सरदारजी ना एक खून माफ आहे
४. हा समाज नाही पण शाई पेन गळत असेल तर शाई डोक्याला पुसायची. एकदा एक जण मधल्या सुट्टीत पावसात भिजला आणि ती शाई त्याच्या चेहऱ्यावर आणि शर्ट वर आली.
५. गारेगार मध्ये अळ्या असतात आणि मीठ टाकले कि बाहेर येतात.
६. त्याकाळी देवीची/साईबाबांची पत्रे असत ती घेतल्यावर घरातली व्यक्ती मरते आणि ती मरु नये असा असेल तर ते पत्र दुसऱ्या कोणाला घ्यायला लागायचं. आणि ते फेकून दिले तर त्याचा अपमान होतो. दप्तरामध्ये कोणीतरी टाकल्यावर ते कोणी न घेतल्याने शेवटी वैतागून फाडून फेकून दिले.
७. ऑपरेशन या विषयी इतके पराकोटीचे गैरसमज होते कि त्यावर एक पुस्तक होईल.
८. उताऱ्यावर पाय पडला कि तो प्रॉब्लेम आपल्याकडे येतो.

"त्यात 'त्रिभुवन' हा शब्द मोठा आणि ठळक अक्षरात होता. बहुतेक ते कुणाचं तरी नाव असावं. पण मला ते त्या जागेचं (बागेचं) नाव वाटायचं." - ह्यावरून एक किस्सा आठवला (अवांतर आहे).

पुण्यात एस.पी. कॉलेजच्या च्या शेजारच्या गल्लीत पूर्वी दातार क्लासेस होते. त्याच्या समोरच्या बाजूला एक वडा-पाव, चहा वगैरे विकणारं - ज्याला रोडसाईड जॉइंट म्हणता येईल - तशी एक टपरी निघाली होती. त्याला काही नाव होतं का नाही ते माहित नाही, कारण बाहेर नावाचा बोर्ड नव्हता (व्हिजिबल तरी नव्हता), पण काऊंटर वर मोठ्या अक्षरात 'स्वयं-सेवा' असा बोर्ड होता. तेव्ह्या ''स्वयंसेवा' ला वडापाव खायला जाऊ' असं म्हणत म्हणत 'एस-एस ला वडापाव खाऊ' असं त्याचं स्थित्यंतर झालं. पुढे अनेक वर्षांनी पुण्यात गेल्यावर एका मावसबहिणीकडून 'एस-एस ला वडापाव खाल्ला / चहा प्यायला' असं ऐकलं आणि गंमत वातली. आपण नकळत काहीतरी एका परंपरेची सुरूवात करणार्या ग्रूपचा वगैरे भाग होतो कि काय अशी शंका आली. Happy

>> एक जाहिरात खूप दिवस लिहिलेली होती. जाहिरात म्हणजे हाताने रंगवलेला मजकूर होता फक्त.

अशाच जाहिरातीची माझीसुद्धा एक आठवण आहे. साध्या रंगाने पेंटरने रंगवलेली अक्षरे. त्या जाहिरातीत "लक्षात ठेवा" असे शब्द होते. पण पेंटरने लिहिताना त्यातला क्ष असा लिहिला होता कि ते "द न" असे दिसायचे. त्यामुळे "लक्षात ठेवा" चे सारखे सारखे "लदनात ठेवा" वाचले जायचे. लदनात म्हणजे कशात, काही कळत नव्हते. पण ते वाचून वाचून ते डोक्यात इतके फिट्ट इतके बसले कि आजसुद्धा "लक्षात ठेव" असे म्हणताना मी कधी कधी मजेत "लदनात ठेव" असे म्हणतो. समोरच्याला काहीही बोध होत नाही Lol

पण काऊंटर वर मोठ्या अक्षरात 'स्वयं-सेवा' असा बोर्ड होता >>> त्याला आम्ही सेल्फ सर्विस म्हणत असू Lol म्हणून एस-एस. पण आता विचार केल्यावर त्या टपरीला ( टपरीपेक्षा नक्कीच मोठं आहे ते ) कधी नाव होतं का खरंच मलाही आठवत नाहीये. तिथे आजही अप्रतिम चहा आणि वडापाव मिळतो. फेफ, आपण बहुधा अलिकडच्या-पलिकडच्या बॅचचे असणार.

डब्ल्यू डब्ल्यू एफच्या अंडरवेअरला सात जन्म आहेत असे आमच्याकडच्या पोरांना फार खरे वाटायचे. म्हणजे तो सहा की सात वेळा मारामारी करताना मेला तरी जिवंत होऊ शकतो. पडद्यावरच्या अमिताभ वा अलका कुबलसारखा नाही तर खराखुरा प्रत्यक्ष आयुष्यात. मी त्या मुलांना सांगायचो की मुळात ती मारामारीच खोटी खोटी स्क्रिप्टेड असते तर मला वेड्यात काढायचे.

मस्त धागा. जागेवरून आठवलं याज्ञवल्क्य आश्रमात सगळे ऋषी मुनी राहतात. म्हणजे भगवे कपडे, गळ्यात रुद्राक्ष माळा, मोठी दाढी अगदी तेव्हाच्या टीव्ही कार्यक्रमात दाखवतात तसेच. तो समज एव्हढा स्ट्राँग होता की कधी त्याची शहानिशा करायची गरजच नाही पडली. अजूनही त्या आश्रमाचं नाव ऐकलं की हेच डोक्यात येतं.
मीठ सांडलं की मेल्यावर पापण्यांनी उचलावं लागतं. कित्ती कठीण काम म्हणुन मीठ/मीठाची बरणी वापरताना फार काळजीपूर्वक हाताळत असू.

लहानपणीच्या समजुती -
१. दोन व्यक्तींनी एका वेळी पाणी प्यायलं तर आधी पाणी पिणाराच्या पोटात दुखते.
२. ज्याच्या डोळ्यात तीळ असते त्याला भुतं दिसतात.
३. उजव्या मांडीवर तीळ असणारी व्यक्ती खूप भाग्यवान असते.
४. जेव्हा बाळं जन्माला येतात तेव्हा त्यांना कोणतेच जेंडर नसते. जरा मोठी झाली की काहीजण मुले होतात काहीजणी मुली होतात.

आई वडिलांनी करून दिलेल्या समजुती -
१. मी देवळात सापडले. मी त्यांची biological मुलगी नाही.
२. गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री बारा वाजता खरा गणपती आकाशातून खिडकीतून आत गणपतीच्या मूर्तीमध्ये प्रवेश करतो.
३. दात किडला की डेंटिस्ट डायरेक्ट बंदुकीने दातात गोळी घालतात. दात उपटायच्या भानगडीत पडत नाहीत. आणि अक्षरशः त्या भीतीने मी दातांची इतकी काळजी घेतली की माझी पहिली दाढ आयुष्याच्या २८ व्या वर्षी किडली. Lol

दोन भवरे दोन बायका यावर माझा फार विश्वास होता.
दोन भवरे असणाऱ्यांवर फार जळायचो मी. कारण लहानपणी दोन लग्ने म्हणजे डबल आनंद वगैरे गैरसमज असतात आपले.
त्यामुळे नाव्ह्याकडे केस कापायला बसलो की त्याला केसात दुसरा भोवरा करून देता येईल का असेही विचारावेसे वाटायचे. पण सोबत "एकदम बारीक काटो भैय्या" सांगायला आई बाबा कोणीतरी जातीने हजर असायचे. त्यामुळे कधी हिंमत झाली नाही.

"त्याला आम्ही सेल्फ सर्विस म्हणत असू" - येस्स! ते स्वयं-सेवा चं काही दिवसांनी (इंग्लिश = फॅशनेबल) सेल्फ-सर्व्हिस झाल्याचं आठवतंय. कदाचित तुम्ही म्हणता तसं आपण पुढच्या-मागच्या बॅचचे असू (किंवा एस-एस जनरेशन्स टू जनरेशन्स पॉप्युलर आहे Happy )

पूर्वी दूरदर्शनवर दोन कार्यक्रमांच्या मधला वेळ भरून काढायला 'समूहगीत' दाखवायचे. ५-७ बायका, ५-७ पुरूष एकसारख्या वेषातले, स्टुडिओत उभं राहून गायचे. पुढे वादक वगैरे बसलेले असायचे. (शतकानंतर आज पाहिली, पहिली रम्य पहाट - हे अगदी कॉमन गाणं असायचं.) >>> उधळीत शतकिरणा पण कॉमन गाणं होतं.

तर, मला ते गायक बाया-पुरूष म्हणजे लग्न झालेल्या नवरा-बायकोच्या जोड्या वाटायचे कायम >>> अरे हाहाहा.

नाही, तो मान मारुती ओमनी चा >>> नंतर ओमनीचा, तेव्हा मी कॉलेजात होते. लहानपणी तो मान अँबासॅडरचाच होता, त्यामुळे ती मला आवडायचीच नाही, किती ढबोली ती असं वाटायचं. त्यात बाबा प्रिमियरमधे असल्याने आमची आवडती कार प्रिमियर पद्मिनीच.

रुणम्या त्याचे नाव अंडर टेकर आहे रे. मला त्याच्या बरोबरचा तो अर्न घेउन येणारा सूट बूट वाला माणूस पण आव्डायचा.

म्हाळसा , माऊमैय्या यांचे किस्से एकदम रिलेट झाले. थोडाफार फरक असेल. हपा मस्त किस्सा.
मापृ .. तीन नंबरचा किस्सा थोडा बदलून. नंतर लिहीन .

झकासराव भारी किस्से.

आराम हराम एकच नंबर

बाकीचे पण मस्तच किस्से. स्ट्रेसबस्टर धागा आहे.

हिरोच्या लहानपणीचे सीन्स हे बहुतेक तो लहान असताना शूट केलेले असतील आणि मोठा झाल्यावर बाकीचे शूटींग झाले असेल असा एक समज होता. तसेच हिरो मरायच्या आधीच सगळे सिनेमे शूट केलेले असतील आणि मरायच्या आधी मरायचे सीन्स शूट करून ते सिनेमे एकामागून एक येत असतील असे वाटायचे.

पुणे रेल्वे स्टेशनजवळ अलंकार सिनेमाहॉलला पडदा जिथे आहे त्याच्या खाली शेरे पंजाब आहे. त्याचं एण्ट्रन्स पडद्याच्या रेषेत आहे. बसने जाताना रोज एण्ट्रन्स दिसायचा. त्या वेळी पडद्यावर दिसणारे हिरो हिरॉइन्स शेरे पंजाब मधून आत जात असतील आणि मागून त्यांच्यावर लाईट मारल्याने ते मोठे दिसत असतील असे वाटायचे. त्या वेळी आधी बालनाट्ये पाहून मग सिनेमे पाहीलेले होते.

रात्रीची जाग आली तर पाणी प्यायला जायची भिती वाटायची कारण बेडखाली वाघ सिंह हिंस्त्र प्राणी दबा धरून बसलेत असे वाटायचे.

भूत आले तर स्वत:भोवती पटकन धार मारून रिंगण केले तर ते आत येत नाही.

हेच ते शेर ए पंजाब आणि अलंकार. आता ते तिथेच आहे का, अलंकार चालू आहे का हे माहीत नाही. कदाचित तिथे मल्टिप्लेक्स आले असेल.
Screenshot_20221202-082026_Chrome.jpg

महान आहेत किस्से.

बसमध्ये बसल्यावर बस रस्त्याने जाताना बाजूने चालणार्‍या लोकांच्या पायावरून जात असणार असं मला नेहमी वाटायचं.

साधारण पाच - सहा वर्षांची असेन, तेव्हाची गोष्ट. ३१ डिसेंबरला रात्री नविन वर्षासाठी आईबाबा आणि आम्ही बहिणी जागत होतो. बरोब्बर १२ वाजता आईबाबांनी डिक्लेअर केलं की नवं वर्ष सुरू झालं. मग मला प्रश्न पडला की जुन्या वर्षाचं काय झालं. तर ते म्हणे गेलं. तेव्हा ते जुनं वर्षं घरासमोरून असं म्हातार्‍या माणसासारखं काठी टेकत चालत चालत निघून गेलं असं काहीसं वाटलेलं आणि खिडकीतून ते वर्षं जाताना आपण का पाहिलं नाही याची खंत वाटलेली.
(म्हणजे बघा टाईम, स्पेस, ऑब्झरवर असे किती बारीक सारीक तपशील कसे झटक्यात डोक्यात येऊन गेले.)

आमची धाकटी बहीण झुरळाला भयंकर घाबरायची. अजूनही घाबरते. एकदा ती सिंकमध्ये भांडी वगैरे विसळत होती. कचर्‍यामुळे थोडे पाणी साठले. तिनं कचरा काढल्यावर ते पाणी आवाज करत जायला लागलं. तर हिला वाटलं त्या पाईपात झुरळ आहे आणि ते किंचाळतंय. 'झुरळ किंचाळतंय, झुरळ किंचाळतंय' म्हणून रडून रडून हैदोस घातला तिनं.

लहान मुलांना पळवून नेण्यासंबधीचे किस्से +१
आपण आणि आपल्या आसपासचे लोक यांच्यापेक्षा वेगळे पेहराव वगैरे केलेले कुणी अनोळखी आसपास फिरताना दिसणे म्हणजे panic attack असायचा Happy हे खरे तर विस्मरणात गेलेले. इथे वाचून पुन्हा आठवले. असाही एक काळ होता यावर आपलाच विश्वास बसत नाही आता.

>> दोन भवरे दोन बायका
हे सुद्धा प्लस वन. ही समजूत आमच्या इकडे सुद्धा प्रचलित होती.

>> बस रस्त्याने जाताना बाजूने चालणार्‍या लोकांच्या पायावरून जात असणार असं मला नेहमी वाटायचं.
Lol Lol वाह! अगदी अगदी!! आणि ट्रक मध्ये पुढे बसल्यावर तर तो ट्रक आजूबाजूच्या गाड्यांवरून धावत आहे असे वाटायचे. ज्यांनी लहानपणी ट्रक मध्ये पुढे बसायचा अनुभव घेतला आहे ते सहमत होतील.

हा माझ्या लेकीचा किस्सा

ती ३-४ वर्षांची असताना, मी काहीतरी सांगताना तिला म्हणाले, की काही वर्षांनी मी पण म्हातारी होणार. तर ती एकदम दु:खी झाली आणि मला म्हणाली, " मी तरीपण तुला मम्मीच म्हणणार." मला आधी कळेचना. पण नंतर लक्षात आलं, तिला वाटत होतं, की मी म्हातारी झाल्यावर मला आजी म्हणावं लागेल. जाम हहपुवा झालेली तेव्हा.

आंघोळीची गोळी मला पण खरोखरच असते, असं वाटायचं. त्यात कोणीतरी अजून ज्ञान दिलेलं की, ती गोळी घेतली की, भरपूर घाम येतो. मग तो घाम पुसला, की झाली आंघोळ.
हा समज अगदी कॉलेजला जाईपर्यंत पक्का होता.

काही काही किस्से वाचून लहानपणी आपलेही असेच समज होते हे आठवतेय. सहसा नसते आठवले. त्यामुळे या धाग्याचे आणि असे किस्से देणार्‍यांचे आभारच मानायला पाहीजेत. किती तरी गोष्टी आठवत सुद्धा नाहीत आता.

अंडरटेकर ने हा धागा वाचला तर रुनमेशच्या चुकीला माफी नाही द्यायचा तो Lol

किस्से भारीच सुरू आहेत.

मला बस म्हणजे सिटी बस शहरात फिरणारी
आणि शहराबाहेर गावात घेऊन जाते ती म्हणजे एसटी असेच वाटायचे.
बस हे कॉमन नाव हेच कळत नव्हते.
ही बस कुठे जाते असे विचारणाऱ्याला मोठ्या तोऱ्यात ही एसटी आहे, बस नाही असे सांगितले आहे.
Lol
अतुलने टाकलेले खूपसे किस्से relate झाले.

आधी जकात नाके असायचे.
कोपुत एक फेमस जकातचोरी करणारा व्यक्ती होता.
न्यूजपेपर मध्ये बातम्या यायच्या त्याविषयी.
जकात कशी चोरी करतात हे कळत नव्हते तेव्हा.

मोनिका सेलेस आणि स्टेफी ग्राफ ह्या भारतीयच आहेत असे वाटायचे, कारण न्यूजपेपर मध्ये खेळ विभागात त्या कुठे कुठे जिंकलेल्या बातम्या सारख्या असायच्या.

मी पहिली-दुसरीत असेन.
इन-लँड लेटर, पोस्टकार्ड हे शब्द मोठ्यांकडून ऐकले होते. दोन्हीतला फरक माहिती होता. पण इन-लँड हा शब्द मला कायम इंग्लंड असा ऐकू यायचा.
एकदा सुट्टीत आजोळी गेले होते. अगदी लहानसं गाव, आजीच्या घराच्या कोपर्‍यावरच पोस्ट-ऑफिस होतं. आजीनं मला इन-लँड लेटर घेऊन ये म्हणून पाठवलं.
मी पोस्टात जाऊन अगदी टेचात "एक इंग्लंड लेटर द्या" सांगितलं.
पलिकडचा माणूस मला वाड्यातल्या आजींची नात म्हणून ओळखणारा होता. तो हसत म्हणाला, "इंग्लंड गेलं अमेरिकेला"
Biggrin Biggrin
मी रडवेल्या चेहर्‍याने घरी आले.

>> कोपुत एक फेमस जकातचोरी करणारा व्यक्ती होता.

[थोडे अवांतर सुरु]
अतुल शहा. जकात तस्कर म्हणून कुख्यात होता. अतुल च नाव होते त्याचे म्हणून लक्षात राहिला Lol
त्या काळात सातत्याने पेपरला बातमी असायची त्याची.
[थोडे अवांतर बंद]

लहानपणी एरियात एकच टीव्ही होता, तिथे छायागीत बघायला जायचो, तेव्हा मला वाटायचं सगळे हीरो हिरॉईन केवढे सुंदर गातात, एक ताई सांगायची अग ते फक्त तोंड हलवतात, गाणारे दुसरे असतात. माझा विश्वासच बसायचा नाही तेव्हा.>>>>> मला वाटायचं हे हीरो आणि हिरोईन गाणी म्हणता म्हणता डान्स करतात तेव्हा त्यांना दम कसा लागत नाही आपल्याला लागतो तसा.
हे झाल माझं, आता लेकाच. आम्ही आमची जुनी कार विकून नवीन कार घेण्याविषयी घरी बोलत होतो. किमतींवर बोलताना आपण generally पूर्ण आकडा बोलण्यात येत नाही दोन लाख, सात लाख वगैरे. तर आमची आधीची गाडी 2 लाखाला विकली गेली आणि नवी गाडी 7 लाखाला मिळाली ही गोष्ट सतत बोलली जात होती ती अशी: "जुनी दोन ला गेली आणि नवी सात पर्यंत आहे" लेकाला वाटलं नवी कोरी गाडी सात रुपयांना मिळणार आहे.

Pages