इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
पत्रा स्ट्राँग पण कमी जाडीचा
पत्रा स्ट्राँग पण कमी जाडीचा वापरून असेल किंवा वजन कमी करायला नको तिथे कात्री लावली असेल, कसंही असलं तरी मारुतीच्या गाड्यां चा ॲक्सीडेंट मधे लोळागोळा होतो हे सत्य आहे (या पैकी काही गाड्यांना 0 रेटिंग आहे)
ह्युंडे, किया वगैरेंच्या गाड्यांची इतकी वाईट हालत होत नाही (यांना २-३ रेटिंग आहे)
टाटा, महिंद्रा च्या गाड्या, मारुतीची जुनी ब्रेझा, फोक्स वागन, होंडा, मारुतीवाल्या सोडून इतर टोयोटा (४-५ रेटिंग वाल्या) यांचं ॲक्सीडेंट मधे खूप जास्त नुकसान झाल्याचं दिसत नाही
या उपर गाडी घेताना आपली मर्जी
आजही बहुसंख्य लोकं केवळ कितना देती है आणि किधर भी रिपेअर होती है हे दोनच निष्कर्ष लाऊन मारुती घेतात
आणि ते घेतात म्हणून मारुती वाले विकतात
ज्यावेळी लोकं घेणं कमी करतील तेंव्हाच मारुती सुधारेल
नव्या बालेनो च्या वेळी टीमला सेफ गाडी बनवण्यासाठी ताकीद मिळाली होती. नव्या गाडीच वजन पूर्वीपेक्षा जास्त आहे. रेटिंग टेस्ट चे रिझल्ट आले की कळेलच काय केलंय ते, पण किमान ३-४ रेटिंग आलं तर आश्चर्य वाटणार नाही. (आणि ब्रेझा ला ४-५)
अँकी नं १ , तुमचे मुद्दे
अँकी नं १ , तुमचे मुद्दे बरोबर आहेत. ते मागच्या प्रतिसादात पण मांडलेत. आता २०२१ साली बहुतेक कंपन्या सुरक्षेला प्राधान्य देत आहेत. २०२१ सालापासूनचे वरचे मॉडेल सुरक्षित असतील तुलनेने.
पण मग मध्यम वर्गाच्या बजेट
पण मग मध्यम वर्गाच्या बजेट मध्ये बसणारी तसच सुरक्षित असणारी गाडी कोणती आहे सध्या मार्केट मध्ये?
मध्यम वर्गाने वॅगनआर अल्टोचा
मध्यम वर्गाने वॅगनआर अल्टोचा नाद सोडुन टाटा tiago चा विचार करावा.
पण मग मध्यम वर्गाच्या बजेट
पण मग मध्यम वर्गाच्या बजेट मध्ये बसणारी तसच सुरक्षित असणारी गाडी कोणती आहे सध्या मार्केट मध्ये? >>> वर दिलेले तपशील हे वरवरचे आहेत. जेव्हां कार घ्यायचे ठरते तेव्हां आपण आवडणारी दोन तीन मॉडेल्स निश्चित करतो. त्यांच्या डीलर्स कडे जाऊन ४०% क्रॅश टेस्ट्सचे तपशीलवार रिपोर्ट्स मागवून घ्यावेत किंवा वेबवर अपलोड केले असतील तर पाहून घ्यावेत. काही कारणाने तांत्रिक बाबी समजत नसतील तर ओळखीच्या त्या क्षेत्रातल्या व्यक्तीकडून समजून घ्यावेत.
आता मारूती वॅगन आर सुद्धा ४०% क्रॅश टेस्ट साठी जाते म्हणून ती बाद करण्यात अर्थ नाही.
https://www.youtube.com/watch?v=DMMEWH6KXjM
हा व्हिडीओ बायस्ड नसावा असे वाटल्याने लिंक दिली आहे.
मित्रांनो मी खालील ३ मॉडेल
मित्रांनो मी खालील ३ मॉडेल मधुन कोणती गाडी घ्यावी.
१ Maruti wagon r zxi+
२. Tata tiyago xz.
३. Hyundai grand i10 nios.
गावात फिरणे, महिन्यातून एकदा गावी जाणे, जास्त फिरणे नाही.
आम्ही दोघे हि ५ फूट ८ इंच आहोत.
बजेट सात लाख आहे
शांत प्राणी, वीरू धन्यवाद.
शांत प्राणी, वीरू धन्यवाद.
आम्ही टाटा पंच / मारुती डियायझ घ्यायचा विचार करत आहोत
जाई. ऑक्टोबर नंतर सेफ्टीचे
जाई. ऑक्टोबर नंतर सेफ्टीचे नवीन नियम येतील. त्यानंतर घेतली तर छान होईल.
तुमच्या गरजे प्रमाणेच
तुमच्या गरजे प्रमाणेच माझ्याही सेम टू सेम गरजा आहेत. मागील २ महीन्यांपासून गाडींवर संशोधन करत होतो. वरील तीनही गाड्यांपकी एक घ्यायची असं मी ठरवलं. माझी ऊंची सहा फूट असल्याने पहीली पसंती वॅगनार ला होती. पण तीचा डब्बा लूक मूळे तीच्यावर काट मारला, टीआगो नी ग्रॅंड आय१० मध्ये एक फिक्स करायची होती. टाटाच्या सर्वीस बद्दल मा साशंकं होतो तयेच लूक वाईस मला ग्रॅंड आय १० स्पोर्ट्स आवडली. मग परवाच ती बूक केली.
Ok शांत प्राणी
Ok शांत प्राणी
गावात फिरणे, महिन्यातून एकदा
गावात फिरणे, महिन्यातून एकदा गावी जाणे, जास्त फिरणे नाही.>> अनुभवावरुन सांगतो, जास्त वापर नसेल तर used car चा पर्यायही फायदेशीर ठरतो.
मित्रांनो मी खालील ३ मॉडेल
मित्रांनो मी खालील ३ मॉडेल मधुन कोणती गाडी घ्यावी.
Hyundai i10 Grand Nios हे ऑप्शन निवडा. हॅचबॅक गाड्यांमध्ये हा सर्वोत्तम पर्याय आहे.
@वीर , १५ वर्षेच ( + ५ वर्षे
@वीर , १५ वर्षेच ( + ५ वर्षे फिट असल्यास) कार वापरता येणार असेल तर युज्ड कार किती वर्षे वापरता येणार ?
@ अप्पा
गाड्यांची क्रॅश टेस्ट घेऊन
गाड्यांची क्रॅश टेस्ट घेऊन त्यांना ग्लोबल एनकॅपचं सेफ्टी रेटिंग मिळतं. कितपत तथ्य असतं या सगळ्यात?
हे विचारण्यामागचा हेतू एवढाच आहे की अगदी ह्युंदाईच्या गाड्यांचं रेटिंगही २-३ स्टार इतकंच आहे. मारूतीच्या गाड्यांची कथाही तीच आहे किंवा कदाचित त्याही पेक्षा वाईट परिस्थिती.
हे जस्ट माहितीसाठी म्हणून विचारतेय.
आमरेंद्र भाऊबली जी आपल्याला
आमरेंद्र भाऊबली जी आपल्याला ग्रँड आय १० स्पोर्ट ऑन रोड कितीला पडली, काही डिस्काउंट भेटला का.
१५ वर्षेच ( + ५ वर्षे फिट
१५ वर्षेच ( + ५ वर्षे फिट असल्यास) कार वापरता येणार असेल तर युज्ड कार किती वर्षे वापरता येणार ?>>नवीन कार घेतल्यावर साधारणत: ७ ते ८ वर्ष वापरली जाते. कार बदलण्याची कारणे वेगवेगळी असू शकतील जसे की वरच्या श्रेणीतील कार घेणे, बाजारात त्या त्या वेळी उपलब्ध होणारे नवीन पर्याय इ.
७-८ वर्षांनी कारची किंमत अंदाजे ६० टक्क्यापर्यंत कमी होते. कार कर्जाने घेतली असेल तर त्यावरील व्याज, देखभाल खर्च हा सगळा विचार करता जर वापर कमी असेल तर used car घेतलेली फायदेशीर ठरते.
आमरेंद्र भाऊबली जी आपल्याला
आमरेंद्र भाऊबली जी आपल्याला ग्रँड आय १० स्पोर्ट ऑन रोड कितीला पडली, काही डिस्काउंट भेटला का.
हो. सीएनजी ओनरोड मला ८.५ ला पडली. त्यात वरतून १० हजाराची एक्सेसरीज ही मिळनार आहे, ऊदा. सिट कवर नी रबर मॅट. गाडी एका आठवड्यात मिळतेय, ईतर ठिकाणी एक ते तीन महीने वेटींग आहे. मुंबईच्या शोरूम मधून घेऊन पुणे पासींग करून मिळतेय, आवडता कलर पण मिळाला. फक्त डिलीवरी साठी मुंबई जावं लागेल, पण चालतंय. माझ्या ओळखीचा कार कन्सल्टंट आहे त्याच्या ओळखीने हे सर्व झाले. त्याने ५ हजार रूपये आकारले त्याचे, पण एका आठवड्याच्या डिलीवरीसाठी चालतंय ईतकं.
कार घ्यायला कन्सल्टंट लागतो?
कार घ्यायला कन्सल्टंट लागतो?
चांगले बिझनेस मॉडेल आहे पण.
https://www.google.com/url?sa
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://auto.hindus...
इथे युज्ड कारचा कोणाचा काय
इथे युज्ड कारचा कोणाचा काय अनुभव असेल तर सांगाल कां? घेताना काय बघून घ्यावं? एखादा चांगला डिलर असेल (मुंबईत) तर प्लीज सुचवा.
revised safest SUVs in india
revised safest SUVs in india
आश्चर्य म्हणजे चाईल्ड रेटिंग 5स्टार.. हे max रेटिंग आहे पहिल्यांदा.
थोडासा वेगळा प्रश्न आहे,
थोडासा वेगळा प्रश्न आहे, परंतु दुचाकीशी संबंधित आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रेल्वे स्थानकाजवळ ( किंवा निदान कणकवलीत मुंबई-गोवा महामार्गालगत) दुचाकी भाड्याने (2-wheeler on rent) देणारा कोणी 'चांगला, विश्वासू' माणूस ओळखीत आहे का? असल्यास कृपया त्याचा संपर्क क्र. द्यावा.
Just Dial वर शोधायचा प्रयत्न अगोदरच केला आहे, फारसा फायदा झाला नाही.
दुचाकी non-geared (Honda Activa, Suzuki Access) वगैरे हवी.
कणकवली स्थानकाजवळ नसल्यास कुडाळ रेल्वे स्थानकाजवळ असेल तरी एखाद वेळेस विचार करता येईल.
दुचाकी मध्ये - होंडा shine
दुचाकी मध्ये - होंडा shine आणि CD ११० ह्या पैकी कोणती सुचवाल ?
personally मला CD ११० आवडली , shine थोडी bulky वाटते आहे , shine ची test ride घेतली आहे , CD ११० ची नाही मिळत असे सांगत आहेत
उत्तरादाखल एकही प्रतिसाद आला
उत्तरादाखल एकही प्रतिसाद आला नाही म्हणून पुन्हा विचारतो आहे.
.
.
थोडासा वेगळा प्रश्न आहे, परंतु दुचाकीशी संबंधित आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रेल्वे स्थानकाजवळ ( किंवा निदान कणकवलीत मुंबई-गोवा महामार्गालगत) दुचाकी भाड्याने (2-wheeler on rent) देणारा कोणी 'चांगला, विश्वासू' माणूस ओळखीत आहे का? असल्यास कृपया त्याचा संपर्क क्र. द्यावा.
Just Dial वर शोधायचा प्रयत्न अगोदरच केला आहे, फारसा फायदा झाला नाही.
दुचाकी non-geared (Honda Activa, Suzuki Access) वगैरे हवी.
कणकवली स्थानकाजवळ नसल्यास कुडाळ रेल्वे स्थानकाजवळ असेल तरी एखाद वेळेस विचार करता येईल.
घरात १३ वर्षे जुनी कार आहे.
घरात १३ वर्षे जुनी कार आहे. दोन वर्षांनी पुन्हा आरटीओ कडे फिटनेस सर्टिफिकेटसाठी जावे लागेल.
जुन्या कार्स इलेट्रीक वर करून मिळतात असे ऐकले आहे. आरटीओ अॅप्रूव्ह्ड किट्स पण आहेत.
मला असा प्रश्न पडला आहे कि जर फिटनेस टेस्ट च्या भानगडीत न पडता इंजिन काढून टाकून कार सरळ इलेक्ट्रिक वर कन्व्हर्ट केली तर फिटनेस टेस्ट द्यावी लागेल का ? इलेक्ट्रिक कारला आरटीओच्या नियमा प्रमाणे १५ - २० वर्षे असे आयुष्य आहे का ? कव्हर्शनला किती खर्च येतो ? कि नवीन छोटी कार येईपर्यंत थांबावे ?
बॅटरी लाईफ , बॅटरी ची किंमत.
बॅटरी लाईफ , बॅटरी ची किंमत.
हे पण विचारात घ्या.
आता car बॅटरी चार्ज करण्यासाठी कोणतेच निर्बंध नाहीत..कारण अजून त्यांची संख्या कमी आहे..lpg गॅस नवीन आला तेव्हा 90 रुपयाला होता.
टीव्ही चे चॅनेल 110 रुपयात सर्व दिसायचे.
ग्राहक वाढले की आज चे भाव सर्वांना माहीत आहेत.
इलेक्ट्रिक वाहना न ची संख्या वाढली की charging वर अनेक निर्बंध येतील आणि युनिट 100 रुपये होईल.
डिझेल,पेट्रोल,बायोडेझल ह्यांना पर्याय नाही.
सर्वात स्वस्त इंधन तेच असेल
आता पण आणि पुढे पण
जुन्या कार्स इलेट्रीक वर करून
जुन्या कार्स इलेट्रीक वर करून मिळतात असे ऐकले आहे. आरटीओ अॅप्रूव्ह्ड किट्स पण आहेत.
हे कधी ऐकले नाही.
कार कन्व्हर्ट करून घेताना
कार कन्व्हर्ट करून घेताना त्याचेही RTO registration करावे लागते.
उदा. पेट्रोल महाग आणि CNG स्वस्त होते तेव्हा, बर्याच जणांनी CNG किट बसवून घेतले.
RTO approved म्हणजे तुमच्या RC बुक वर तशी नोंद करून देणे.
इलेक्टरीक साठी फिटनेस टेस्ट असते का माहीत नाही.
हेमंत नी लिहिलेलं आता फार fetched वाटलं तरी नंतर चार्जिंग चार्जेस जास्त लागू शकतात ह्यात तथ्य आहे.
CNG जर 59 वरून 92 रु 6 महिन्यात वाढतो तर युनिट चार्ज का नाही वाढणार?
बसण्यास कंफर्टेबल जागा,
बसण्यास कंफर्टेबल जागा, सुरक्षा हे सर्वात जास्त महत्वाचे आहे.
Milage हा दुय्यम मुद्धा आहे
अगदी चांगल्या चांगल्या ब्रँड
अगदी चांगल्या चांगल्या ब्रँड च्या गाड्यांच्या सीट चुकीच्या डिझायनिंग केलेल्या असतात.
लांब प्रवासात खूप त्रास देतात.
Pages