कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव धन्यवाद,

लोकहो, २००५ च्या नंतर साधारण याच प्रकारचे मॅन्युअल गिअर्स भारतात सगळ्या कार्समधे आहेत. अपवाद असतील.
हे तंत्रज्ञान बहुपयोगी आहे. गिअर शिफ्टींग खूप स्मूथ आहे. या प्रकारच्या गिअर मधून ऑटोमॅटीक गिअर वर शिफ्ट होऊन फारसे काही साध्य होत नाही असे मत बनले आहे. विशेषतः गिअर बॉक्सचे काम निघाले किंवा मेकॅट्रॉनिक्स यंत्रणेत दोष निर्माण झाला तर अवघड आहे. पण जर सर्वच कार्स सेमी ऑटोमॅटीक ऑटोमॅटीक कार्सच बाजारात आणणार असतील तर मग दुसरा पर्याय नाही. माझ्याकडे शेवर्लेट च्या कार्स होत्या तेव्हांपासून हेच गिअर्स वापरात आहेत. शेवीच्या इतके स्मूथ गिअर्स माझ्या नंतर आलेल्या इनोव्हात सुद्धा वाटले नाहीत. गर्दीच्या भागात या कार्स अगदी मख्खन कि तरह चालतात.अजूनही. त्या आधी घेतलेली इंडीका वैतागून विकून टाकली. गिअर शिफ्टींगचा त्रास होता. खूप हार्ड होते. इनोव्हा डिझेल त्या मानाने खूप स्मूथ. यातली कोणतीच कार ऑटोमॅटीक नाही. बहुतेक नव्हत्याच तेव्हां. २००९ पर्यंत नव्हत्याच.

https://www.youtube.com/watch?v=o1ED4FQjDGk
या व्हिडिओतले गिअर शिफ्टींग मेकॅनिजम पहा.

या आधीच्या मारूतीच्या कार्स मधे थोडे वेगळे गिअर बॉक्स होते. पण त्या ही स्मूथ होत्या. त्यामुळे मारूती कार्स अजूनही आवडतात. भावाकडे अजूनही मारूतीच्याच कार्स आहेत. कुठलीच ऑटोमॅटीक नाही. कधीही गिअर बदलताना त्रास झालेला नाही. मेन्टेनन्स जास्त नाही.

मी honda city वापरतो 2017 पासून (this is a facelift of Honda city 4th gen launched in 2017) CVT technology for auto transmission. मुंबई- ठाणे असा दैनंदिन वापर आहे. आधी इंडिका v 2 आणि स्विफ्ट dezire (2009 च मॉडेल) वापरली आहे. शहरात तरी ऑटो transmission that too cvt is a boon.

रघु आचार्य पाहिला व्हिडीओ
सिंक्रोमेश म्हणतात बहुद्धा ह्याला

किल्ली
मारुतीचा इन्श्युरन्स नसतो पण मारुती ने टायअप केलेला असतो काही कंपन्यासोबत.
शोरूम किंवा सर्व्हिस सेंटर मध्ये मिळेल.
हा पॉलिसि बाजार पॆक्षा थोडा महाग असेल कारण मारुती ह्यात एजंट झाली.
हा घेतला तर क्लेम औथोराईज सर्व्हिस सेंटर मध्ये कॅशलेस पास होईल.
आपल्या डोक्याला कमी कटकट.
अर्थात इथेही IDV किती आणि काय काय फॅसिलिटी देणार हे विचारूनच घ्यावे.

इन्शुरन्स मध्ये
१. Third party
२. Own damage
३. Personal accident (mandatory)

एवढे तीनच घ्यावेत अशा मताचा मी आहे. यात personal accident 15 lakhs or more अशी दुसरी पॉलिसी आपल्याकडे असली किंवा एकाच व्यक्तीच्या नावे दोन गाड्या / एक दुचाकी + १ कार असेल आणि त्यातील एका साठी personal accident policy आधीच असेल तर दुसऱ्या गाडीसाठी परत pa coverage घेण्याची आवश्यकता नाही.

या व्यतिरिक्त NCB प्रोटेक्ट ऍड ऑन असतो त्यात वर्षात एकच क्लेम केला तर NCB जात नाही पुढल्या रिन्युवलला. या ऍड ऑनची किंमत जास्त नसेल तर तो घेणे फायद्याचे ठरेल खास करून नव चालकांना.

घरी एक वाहन एका पेक्षा अधिक लोक वापरत असतील तर ज्या व्यक्तीच्या नावे वाहन आहे तिला personal accident cover मिळतो मोटर इन्शुरन्स मधून. इतर व्यक्तींना नाही. तेव्हा त्यांच्यासाठी वेगळी pa policy घेणे इष्ट.
साधारण 300 - 400 premium असतो. HDFC ergo अशी वाहनासाठी वेगळी फक्त pa पॉलिसी देते. इतर कंपन्यांच्या साईट वर pa आरोग्य विम्या खाली इतर अनेक राईडर्स सोबत आहे जो महाग असतो १२००-१५००.

र आ, मी द्यु का उत्तर? तर काहीही अडचण नाही येत घाटात सिंगल लेन ओव्हरटेक इ करता. माझ्याकडे फिफ्थ जेन सिटी सिव्हीटी आहे. पेडल शिफ्टर, स्पोर्ट्मोड इ. सुद्धा वापरायची गरज पडत नाही.
अ‍ॅक्टीवा चालतेच ना सगळीकडे नीट... सेम याही गाड्या चालतात.

सिव्हीटी म्हणजे व्हेरीओ ड्राईव्ह का ?
अच्छा. बेल्ट पुली म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही.

योकु
ट्रान्समिशनमधे गिअर आणि बेल्ट / चेन असे दोन प्रकार असतात. बेल्ट / चेन मधे मूव्हींग पार्ट्स कमी होतात. व्हेरिअबल डायमीटर पुलीमुळे गिअरबॉक्स मिनिमाईज होतो . फुल्ली ऑटोमॅटीक मधे पीजीबी नावाचे नवीन तंत्रज्ञान आलेले आहे किंवा टॉर्क कन्व्हर्टर नव्याने आलेले आहे त्यातले मूव्हींग पार्ट्स आणि मेन्टेनन्स या दृष्टीने त्यापेक्षा मॅन्युअल ए एम टी बरे असे वाटते.

व्हेरिओ ड्राईव्ह खूप जुना आहे. सीव्हीटीबद्दल आक्षेप नाही. पण खूप पळवण्यासाठी त्याचा उपयोग नाही. शहरातल्या गर्दीत ती स्मूथ आहे.

र आ योकु जे म्हणतात ते परफेक्ट आहे. मुंबई पुणे रूट वर घाटात किंवा ठाण्यात येऊर ची वळण घेताना 5 लोक बसेल असताना देखील काहीहि समस्या जाणवली नाही (with AC on) 1.5 engine आहे त्याची मदत होते ह्या बाबतीत असे वाटते.

मला वाटतं प्रत्येकाने आपला जास्तीत जास्त वाहन वापर कुठच्या प्रकारच्या प्रदेशात होणार आहे - शहरी सपाट रस्ते आणि महिन्यातून एखाद वेळी शहराबाहेर जसे कि पुणे मुम्बइ किंवा मुंबई नाशिक किंवा ग्रामीण भाग जेथे रस्ते धड नाहीत - ह्याचा विचार करून ठरावावे. नुसते मोठं engine वाली गाडी घेऊन मग इंधन खर्चची चिंता करण्यात काही हशील नाही हे. मा. वै. मी.

मोद, सिव्हीटी आणि फुल्ली ऑटोमॅटीक ट्रान्समिशन यात फरक आहे. पुली, चेन मुळे डायरेक्ट कॉण्टॅक्ट नाही गिअर शिफ्टींग करताना. तुमचे म्हणणे बरोबर आहे असे वर लिहीले आहे. सिव्हीटी जुने तंत्रज्ञान आहे. कायनेटिक होंडा मधे होते. मेकॅनिकल नसेल घ्यायची तर सिव्हीटीच बरी असे मत झाले आहे.

माझ्या बाबतीत चार सिलिंडरवाले इंजिन खूप स्मूथ आहे. मॅन्युअल गिअर्स सुद्धा स्मूथ आहेत. बाजारात जरी नेली तरी काहीच प्रॉब्लेम नाही. सवय इतकी झालीय कि गिअर कधी पडतो माझ्याकडून समजत सुद्धा नाही. तेच मुलीला घेऊन देताना इलेक्ट्रीक किंवा सेमी ऑटोमॅटीक किंवा फुल्लली ऑटोमॅटीक असा विचार करत होतो. सध्या तीन सिलींडर्सवाली इंजिनंच असल्याने तूर्तास लांबणीवर.

तीन सिलींडर इंजिन आणि चार सिलींडर... यात चालवणे, मेंटेनन्स या दृष्टिने बराच फरक पडतो का.?
Hyundai Venue आणि Kia Sonet Automatic ला तीन सिलींडर इंजिन आहे. चार सिलींडर फक्त Manual Transmission ला च आहे.

नवीन कार्स बाबत मी अनभिज्ञ आहे.
पण चार सिलिंडर इंजिन हे खूप स्मूथ असतं. तीन सिलिंडर्स इंजिन फ्युएल एफिशियंट असतं. आता सगळेच तीन सिलिंडर्स देण्यामागे अंदाज असा आहे कि सध्याची जिएसटी आणि सेस कर प्रणाली अशी आहे कि त्यामुळे चार सिलिंडरच्या ऐवजी कंपन्या तीन सिलिंडर कडे वळत आहेत. हे इंजिन गेल्या शतकात वापरणे बंद झाले होते. सहा, पाच वरून चार वर सगळ्या कंपन्या आल्या आणि स्थिरावल्या. तीन सिलिंडर हे इंटर्नल कंबशन इंजिन मधलं शेवटचं स्टेशन आहे.

कार्बन फूटप्रिंट आणि पर्यावरण मानकं याचाही परिणाम असावा. तसेच महत्वाचे कारण म्हणजे तीन सिलिंडरचे इंजिन आकाराने छोटे असते. त्यामुळे बूट स्पेस वाढवता येते. जी काही पावर कमी होते ती टर्बो चार्ज्ड इंजिनने भरून काढता येते. इंजिनचे वजन कमी झाल्याने गाडीची बिल्ड क्वालिटी मजबूत ठेवता येते. तिथे वजन वाढलेले चालू शकते. चार सिलिंडर ने जागाही जास्त लागेल, वजनही वाढेल मग गाडीच्या बॉडीचं वजन कमी करावं लागेल नाहीत फ्युएल एफिशिएन्सी मार खाईल.

हे फार ट्रिकी सिलेक्शन आहे. चार सिलिंडर्सचं इंजिन चालवत असल्याने स्मूथनेस अनुभवला आहे. त्यावरून तीन सिलिंडर वर जाणे त्रासाचं असणार आहे.

यावर प्रत्येकाचे अनुभव वाचायला आवडतील. आधी कार घेताना एव्हढे डोके लावावे लागत नसे.
आता फॅन्सी नावांमुळे नेमके काय विकताहेत ते समजून घेतानाच वेळ खर्ची पडतोय. विकताहेत तेच. जसे व्हेरीओड्राईव्हला सिव्हीटी म्हणणे.

टर्बो चार्ज्ड फ्लुईड इमर्स्ड फ्लायव्हीलचे नामकरण टॉर्क कव्हर्टर असे करणे. असे वाटते कि कोणती तरी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. ग्राहक पण याच डिलिमात राहतो कि मी जगाच्या वेगासोबत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे प्रॉडक्ट मी वापरत आहे. कार इंडस्ट्री मधे जे कुणी कार्यरत असतील त्यांनी विविध तंत्रज्ञानाचा आढावा घेणारी मालिका लिहावी. सर्वांना उपयोगी ठरेल ते.

४ सिलिंडर + ६ गिअर म्हणजे अधिक काळ इंजिनची शाश्वती
पण तेच ३ सिलिंडर असल्यावर लवकर स्क्रैप मध्ये काढायची वेळ येणार. हल्ली यूज आणि थ्रो चा जमाना असल्याने फ़ार काळ टिकणाऱ्या (उदा. २००३ च्या क्वालिस अजून सुद्धा मस्त चालतात) गाड्या बनवल्या तर पुढे नवीन काय विकणार बुवा ! अश्या प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रैटेजीमुळे कदाचित ३ सिलिंडर वरती सर्वांचा भर असावा.
आणि हल्ली माइलेज चा मुद्दा बऱ्याच जणांना जास्त महत्वाचा वाटतो त्यांना तर ४ सिलिंडर पेक्षा ३च बऱ्या वाटत असाव्यात. जो ज्यादा बिकता है वही मार्केट में चलता है ।

I’m not from engineering background so all the technical discussion above is beyond my understanding. When I bought car in 2017 I mainly went thru reviews on Teambhp. In B segment sedans city, ciaz and vento/scoda were the options. City off course had the aspirational value. There were lot of doubts about DSG technology then (still persisting as I can read in above discussions) plus there was a sizeable transmission hump in middle so vento / scoda was out. Their ASS was also hit or miss as per TeamBhp. Coming from Dzire, interiors of ciaz were ditto like Dzire and didn’t justify the pricing point. Honda City had sunroof (which was a novelty then) no transmission hump on backseat and pretty huge leg space even for back seat sealed the deal for us even though compared to ciaz it was costlier by ~ 4 lacs. Although Ciaz was the biggest as far as total length is concerned, it was more like Dezire with a diff outer packing…..

ASS - After sales service. One thumb rule l read on team BHP was European / American cars cost more to maintain n fetch less resale value. Japanese / Korean cars are the opposite. Hyundai Verna that time was due for new launch and strangely Hyundai seems to have some strategy where their top end version is not auto or lack some other function ( forgot what exactly was the issue) so Verna was out of contention in 1st round and didn’t even take a test drive

नेक्सॉन चा मॅग्नेटी मरेली चा
>>
गिअर बॉक्स टाटा चाच आहे.
मॅग्नेटी मरेली चं AMT किट आहे (जे हायड्रॉलिक सिस्टीम नी क्लच ऑपरेट करतं).
हेच किट टाटा च्या ही सर्व AMT कार मधे आहे (नॅनो ते नेक्सॉन) आणि मारुती च्या ही. ह्युंदाई चं स्वतः चं किट आहे जे निसान अन् रेनो पण वापरतात. महिंद्रा कुठलं वापरतं माहीत नाही.

अँकी नं १
१. हा व्हिडीओ कंपनीच्या ऑफिशियल चॅनेलचा आहे.
२. वर ड्युएल क्लच चे इतर देशातले अनुभव लिहीलेले आहेत.
३. आपल्या देशात अशा पद्धतीने डीसीटी तंत्रज्ञान पडताळून पाहण्याची काय व्यवस्था आहे ?
४. कार्स माघारी घेण्याबाबत कायदेशीर व्यवस्था काय आहे ?
५. त्या व्हिडीओत टॉल क्लेम केलेले आहेत. कूलिंग टेक्नॉलॉजी करेक्टिव्ह अ‍ॅक्शन घेते म्हणजे काय करते समजले नाही.
६. मशीन लर्निंग लगोरिदम म्हणजे काय नेमके ? ओव्हरटेक करताना या अल्गोरिदम ने भलतेच काही केले तर ?
७. वेट क्लच टेक्नॉलॉजी नवीन नाही. अवंती गरेली नावाची मोपेड ८० च्या दशकात आली होती. त्या मोपेड मधे ऑईल मधली क्लच प्लेट दिली होती.
- पीजीबी हे नवीन तंत्रज्ञान आहे असे त्यात म्हटलेय.
-घाटात उतरणीला काय प्रॉब्लेम येतात याचा अनुभव दिलेला नाही.
- कंपनीचे टॉल क्लेम्स तपासणार कसे ?
कार देखो ने केलेल्या रिव्ह्यू मधे हायवेला टाटा अल्ट्रोज डीसीटी हायवेला प्रॉब्लेम्स देते असे म्हटले आहे. ओव्हरटेक करताना रिलायबल नाही. शहरात चालवायची असल्यास घेऊ शकता.

3 सिलिंडर 4 सिलिंडर चालवताना फरक जाणवतो.
जुनी वॅगन आर 1065 सीसी 4 सिलिंडर होती
नवीन बहुतेक 2010 पासून आलेली K सेरीज इंजिन 999 सीसी 3 सिलिंडर अशी अंधुक माहिती आहे.

1.2 लिटर AMT सिंगल लेन रोड वर overtake करताना त्रास देईल. मॅन्युअल सारखे नाही होणार.
जास्त सीसी इंजिन असेल तर हा त्रास कमी जाणवत असेल. हे इकडेतिकडे वाचलेले, ऐकलेले वै

लेटेस्ट वॅगन आर मध्ये १ ली - ३ सिलिंडर आणि १.२ ली - ४ सिलिंडर; दोन्ही इंजिन ऑप्शन्स मध्ये एएमटी आणि मॅन्युअल गिअर बॉक्स चे पर्याय आहेत. अ‍ॅडिशनली, १ ली इंजिन मध्ये सिएनजी चाही पर्याय अर्थात मॅन्युअल मध्येच (सिएनजी/एलपीजी बायफ्युल मध्ये ऑटो-बॉक्स कुणी देत नाही माझ्या माहीतीप्रमाणे)

सिएनजी/एलपीजी बायफ्युल मध्ये ऑटो-बॉक्स कुणी देत नाही माझ्या माहीतीप्रमाणे)>> मॅन्युअल मध्येच पिकअपची मारामार ऑटो मधे तर अजुन वाट लागेल.

हो.
बायफ्युल मध्ये ऑटो कोणीच देत नाही
कोणी बाहेरून किट बसवून घेतले आहे असेही माहीत नाही. कदाचित RTO देखील परवानगी देत नसेल.

Pages