क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"अकरा मधे नव्हता ?" - प्लेयिंग ११ डिक्लेअर न करता आक्खी टीमच रोस्टरवर होती. >> ती मुलाखत वाचली म्हणून अजून गडबड झाली . फक्त एक ओव्हर दिली नि तो प्लॅन आहे असेही म्हणाला. शमी कोव्हिड ने डाऊन होता नि NCA workout करून आलाय. मॅच प्रॅक्टिस नाहीये फारशी सध्या. तरीही एकच ओव्हर दिली म्हणून अजूनही पूर्ण फिट नसेल का अशी भिती वाटली Sad

कालच्या मोहम्मद शामी च्या अचानक दिलेल्या शेवटच्या ओव्हरमधल्या कामगिरीला टोटल रिस्पेक्ट! जरी वॉर्म अप गेमच होती तरी. होपफुली पुढच्या अ‍ॅक्च्युअल मॅचेस मधे तो प्रभाव टाकेल.

"कालच्या मोहम्मद शामी च्या अचानक दिलेल्या शेवटच्या ओव्हरमधल्या कामगिरीला टोटल रिस्पेक्ट" - ते दोन यॉर्कर्स खतरनाक होते. आणी तो कोहलीने लाँग ऑन बाऊंड्रीवर घेतलेला कॅच सुद्धा कमाल होता.

सैद मुश्ताक अली ट्रॉफीमधे आलेली सबस्टीट्यूट प्लेयर (सुपर सब रिवाईज्ड) प्रोव्हिजन पाहिली का? मला आवडली आयडिया. एकंदरीत बीसीसीआय स्वतः फारसं कल्पक नसलं तरी इतरत्र सापडलेल्या आयडियाज घासून-पुसून लक्ख करून, त्यात वर स्वतःचा मीठ मसाला हालून नविन डिश म्हणून सर्व्ह करण्यात पटाईत आहे. Happy

*एकंदरीत बीसीसीआय स्वतः फारसं कल्पक नसलं तरी इतरत्र सापडलेल्या .. नवीन डीश म्हणून सर्व्ह करण्यात पटाईत आहे. * - सुंदर स्क्वेअर ड्राईव, अगदीं विश्वनाथची आठवण व्हावी इतका !! Wink

एकंदरीत बीसीसीआय स्वतः फारसं कल्पक नसलं तरी इतरत्र सापडलेल्या .. नवीन डीश म्हणून सर्व्ह करण्यात पटाईत आहे. >> Happy जय शाह ने पण चौकार मारला आहे एशिया कप बाबत. पाकिस्तान ला काही फारसा पर्याय ठेवला नाहिये. वर्ल्ड कप बॉयकॉट करायचाय ? करा म्हणाव Happy

सैद मुश्ताक अली ट्रॉफीमधे आलेली सबस्टीट्यूट प्लेयर (सुपर सब रिवाईज्ड) प्रोव्हिजन पाहिली का? >>> काय आहे? लिन्क आहे का?

थँक्स फेफ. हे सुपरसब पेक्षा जास्त फ्लेक्झिबल दिसते. पहिले ५-६ लौकर उडाले तर त्या चार बेंचवरच्या लोकांमधून एक चांगला फलंदाज घ्यायचा. बोलिंगमधेही तसेच.

“हे सुपरसब पेक्षा जास्त फ्लेक्झिबल दिसते.” खूपच जास्त फ्लेक्झिबल आहे. थोडक्यात १२ ची टीम असणार आहे.

“सुंदर स्क्वेअर ड्राईव, अगदीं विश्वनाथची आठवण व्हावी इतका !! ” - धन्यवाद भाऊ!

आजचा सामना नक्की जिंकणार आपण. सूर्यकुमार आणि भुवनेश्वर चालला पाहिजे. तसेच हर्दिकची गोलंदाजी किफायतशीर व्हायला हवी.

आणि अजून एक
आत्या बाईला मिशा आल्या.

सुर्याचे भन्नाट शतक
शेवटच्या चारेक ओवर पाहिल्या. सुर्या काहीतरी अविश्वसनीयच क्रिकेट खेळतोय.

पंत ची २०-२० खेळायची इच्छा नसूनही खेळवितात का?
साऊदी ची हट्रिक पंड्या हुडा सुंदर. शेवटचे षटक सूर्या प्रेक्षक

पंत ची २०-२० खेळायची इच्छा नसूनही खेळवितात का?
>>>>
यामागे अर्थकारणही असावे.
पण ते मांडले तर कोणाला पटत नाही. लोकांना क्रिकेट हा फार साफसुथरा खेळ वाटतो. पण तो तसा नाहीये Happy

<<लोकांना क्रिकेट हा फार साफसुथरा खेळ वाटतो. पण तो तसा नाहीये >>
खरे आहे.

पुष्कळदा जमिनीवर चिखल असतो, जर झेल घेताना किंवा चेंडू अडवताना पडलात तर सगळी पँट घाण होते. कसोटी सामन्यात तर जो तो आपला लालभडक चेंडू पँटीवर घासून पँट लाल करतात (मग कुणाची जास्त लाल यावर प्रेमळ भांडणे होतात)
पूर्वी (१९५०-६०) भारतीयांचा खेळ मात्र साफसुथरा असायचा. कारण चेंडू अडवणे झेल घेणे असल्या गोष्टींसाठी कुणीहि कपडे मळणार नाहीत याची खबरदारी घेत असे. धोब्याचा खर्च वाचवा अशी सक्त ताकीद असे खेळाडूंना (म्हणे).

हुडाला ईशान बरोबर ओपनिंग करवून पंतला खाली खेळवले पाहिजे. पंत खाली खेळला तर खेळला. Opening la thode प्रयोग करायला हरकत नाही , जसे पृथ्वी , जैस्वाल, वॉशिंग्टन, हूडा ई.

पंतला निव्वळ कीपर म्हणून खेळवायला हवे. फलंदाजीचा हट्ट धरू नये. त्यालाही तसे कळवण्यात यावे. काही सामन्यात त्याला फलंदाजीला आठ नऊ विकेट गेल्याशिवाय पाठवूच नये. मग एके दिवशी अचानक महत्वाच्या सामन्यात नाजूक क्षणी सगळ्यांच्या पुढे पाठवावे..

पंतला निव्वळ कीपर म्हणून खेळवायला हवे. फलंदाजीचा हट्ट धरू नये. त्यालाही तसे कळवण्यात यावे. >> त्वरित.

“पंतला निव्वळ कीपर म्हणून खेळवायला हवे. फलंदाजीचा हट्ट धरू नये. ” Rofl पंतला खेळवलंच पाहिजे असा काही हट्ट नाहीये. नसेल जमत तर राहू दे.

पंतला खेळवलंच पाहिजे असा काही हट्ट नाहीये. नसेल जमत तर राहू दे.>>> हे १०० % सत्य!
पांढरा चेंडू बहुदा त्या नीट दिसत नसावा.

हो. तसही त्याला 2-5 नाही तर 65 T20I खेळूनही आपला जम बसवता आलेला नाही.

पंत ला कसोटी / ODI खेळू दे आणि संजू ला आता तरी T2OI मध्ये कंसिस्टन्टली चान्स द्या.

त्याने गेल्या दोनेक वर्षात कसोटीत ज्या काही एक्स्ट्रा ऑर्डीनरी ईनिंग खेळल्या आहेत, यात ईंग्लंड वनडे शतकही जोडा, त्यामुळे त्याची ब्रांड वॅल्यू ईशान वा संजूपेक्षा बरीच जास्त झाली आहे. त्यामुळे त्याला सातत्याने चान्स मिळत आहेत. ईतके सहजी फुल्ली नाही पडणार त्याच्या नावावर. तरी आता त्याला काही काळ ब्रेक देणे ऊत्तम.

दिल्लीने अय्यरला टाटाबायबाय करून पंतलाच कर्णधार ठेवायचे कारणही पंतची ब्रांड वॅल्यूच आहे.

२४ इनिंग पैकी ६ वेळा ५०+
३६ सरासरी १०८ स्ट्राईकरेट
कुत्रा छत्री नाही म्हणता येणार हे..

तुम्ही सर्व लोकांनी ताबडतोब BCCI ला contact करा. त्यांनी नुकतीच चेतन शर्मा सह सर्व निवडणूक समितीची हकालपट्टी केली आहे. तेंव्हा तुम्हाला संधि आहे.ब्निदान त्यांना पत्राने तरी कळवत जा आपली मते. उपयोग होईल.

Pages