
मागच्या महिन्यातल्या एका रविवारच्या संध्याकाळी धोधो पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातच अडकून पडलो होतो. आंतरजालावर पुरेसे बागडून कंटाळा आला होता. मग वेळ घालवायचा म्हणून छापील इंग्लिश वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी बारकाईने पाहू लागलो. त्यातला एक लेख दुबईबद्दल होता. त्या शहराची अनेकविध वैशिष्टे सांगितल्यावर तिथल्या एका संग्रहालयाचा त्यात उल्लेख होता. त्यामध्ये सर्व देशांच्या आतापर्यंत छापल्या गेलेल्या चलनी नोटांचे प्रदर्शन आहे. त्यात जगभरातील जवळजवळ सर्व नोटा असून ‘त्या’ जगप्रसिद्ध १००ट्रिलियन झिंबाब्वे डॉलर किमतीच्या नोटेचाही समावेश आहे. हे वाचून स्तिमित झालो. कित्येक दिवसांनी एवढी मोठी संख्या ऐकली होती. आपल्या नेहमीच्या आर्थिक व्यवहारात दशलक्षच्या पुढे मोजायची वेळच येत नाही ! अगदी भारतीय लोकसंख्येबाबत बोलताना सुद्धा (दीड) अब्ज ही मर्यादा असते. हा अंक तर त्याच्याही पुढे पळत होता. मग गंमत म्हणून ही मोठी संख्या कागदावर लिहून काढली :
१००, ०००,०००,०००,०००
मराठी अंकमोजणीनुसार या संख्येला दशपद्म म्हणतात (चढती अंकमोजणी अशी : अब्ज, दशअब्ज , खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म.).
आतापर्यंत मी पाहिलेली भारताची सर्वाधिक मूल्याची नोट २,००० रु. ची. माझ्या लहानपणी मी दहा हजार रुपयांची नोट असल्याचे ऐकले होते पण नंतर १९७८मध्ये ती रद्द झाल्याने बघायला काही मिळाली नव्हती. अर्थशास्त्राचा माझा काही अभ्यास नाही. परंतु वरची झिम्बाब्वेची महाकाय रकमेची नोट त्या देशातील चलनाचे प्रचंड अवमूल्यन झाल्याचे सुचवते इतपत समजले. मग या विषयावरील कुतूहल चाळवले गेले. आर्थिक मागास देशांच्या चलनी इतिहासावर एक धावती नजर टाकली. तेव्हा लक्षात आले की वरील दशपद्मच्या झिम्बाब्वेच्या नोटेने चलनांच्या अवमूल्यन इतिहासात एक विक्रम घडवलेला आहे !
बरं, जेव्हा ती नोट वापरात होती तेव्हा तिचे बाजारमूल्य तरी काय असावे ? एखाद्याला वाटेल की त्या एका नोटेत एखादी लहानशी कार किंवा गेला बाजार, एखादी स्कूटर तरी येत असेल. पण छे ! तेवढ्या रकमेत जेमतेम ब्रेडचे एक पुडके किंवा सार्वजनिक बसचे शहरांतर्गत प्रवासाचे एक तिकीट येत होते !!
...
आता झिम्बाब्वेच्या 1980 ते 2009 पर्यंतच्या चलन इतिहासावर एक नजर टाकू. 1980मध्ये तिथे पूर्वीचा ह्रोडेशियन डॉलर रद्द करून त्या जागी झिंबाब्वे डॉलर ( ZWD) हे चलन अस्तित्वात आले. तेव्हा त्याचे अमेरिकी डॉलरशी १:१ असे समकक्ष नाते होते. सन 2000 पर्यंत हे चलन ठीक चालले. परंतु त्यानंतर मात्र तिथे प्रचंड चलनफुगवटा (hyperinflation) होत गेला. परिणामी त्यांच्या चलनाचे नीचांकी अवमूल्यन झाले. २००६-०९ च्या दरम्यान त्या चलनाचे तीनदा पुनर्मूल्यांकन केले गेले. तेव्हाच वर उल्लेखलेली दशपद्म ZWD ची नोट छापली गेली. अखेर एप्रिल 2009 मध्ये त्यांचे हे चलन पूर्णपणे रद्द करण्यात आले. त्यानंतरचा चलन इतिहास लेखाच्या कक्षेबाहेर आहे.
ही सर्व माहिती संदर्भातून वाचता वाचताच मला पूर्वायुष्यातील एक प्रसंग आठवला- साधारण 2007 चा. तेव्हा माझे वास्तव्य परदेशात होते. तिथल्या आमच्या रुग्णालयात ८५ देशांचे डॉक्टर्स एकत्र काम करीत होते. त्यातले एकजण झिम्बाब्वेचे नागरिक होते. परंतु गेली 20 वर्षे ते अन्य देशांतच स्थिरावले होते. एकदा असेच आम्ही काहीजण चहापानासाठी एकत्र बसलो होतो. गप्पा मारताना गाडी विविध देशांच्या चलनाच्या विनिमय दरावर आली. मग प्रत्येक जण आपापल्या देशाच्या चलनाचा अमेरिकी डॉलरशी विनिमय दर सांगत होता. शेवटी या झिम्बावेच्या डॉक्टरांची पाळी आली. प्रथम ते कसेनुसे हसले. एखादा नापास विद्यार्थी जसे आपले गुण सांगायला अनुत्सुक असतो तसा त्यांचा चेहरा भासला. मग ते म्हणाले,
“मी जर माझी बचत झिंबाब्वे डॉलर्समध्ये रूपांतरित केली तर मला अक्षरशः पोतंभर पैसे मिळतील ! पण उपयोग काय त्या पैशांचा ? ते सगळं अवमूल्यित चलन आहे. तेव्हा मी तो नाद सोडला आहे. मी आता माझी सर्व बचत अमेरिकी डॉलर्समध्येच बँकेत ठेवतो”.
आज १०दशपद्म च्या नोटेसंबंधी वाचल्यावर मला त्यांच्या तेव्हाच्या उद्गारांचा खरा अर्थ समजला.
…
जेव्हा या मोठ्या चलनाच्या नोटा छापायची वेळ सरकारवर आली तेव्हाची झिम्बाब्वेची अवस्था दारूण झालेली होती. तिथल्या मध्यवर्ती बँकेला ज्या कागदावर चलन छापायचे तो कागद देखील परवडत नव्हता दुकानदार एकाच दिवसात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दुप्पट करून टाकत. लोकांना खरेदीला जाताना या नोटा अक्षरशः टोपलीत भरून नव्या लागत. ! राष्ट्राध्यक्षांनी विविध वटहुकूम काढून किमती नियंत्रणात ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
अशा प्रकारे नागरिकांमधील असंतोष शिगेला पोहोचला होता. विविध निषेधाचे फलक हातांत घेऊन लोकांचे देशभर मोर्चे निघायचे. त्यातला एक फलक लक्ष्यवेधी होता :
“आम्ही अब्जाधीश भिकारी आहोत”
2009 मध्ये या चलनाचा अमेरिकेशी अमेरिकी डॉलरची असलेला विनिमय दर हास्यास्पद पातळीवर उतरला होता :
१अमेरिकी डॉलर = (३४ अंकी संख्या) ZWD.
या सर्व कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीचा शेवट हे चलन रद्द करण्यात झाला. त्यानंतर तिथे अमेरिकी डॉलर आणि दक्षिण आफ्रिकी रँड ही चलने मुख्यत्वे वापरात आली.
झिंबाब्वे डॉलर्सचे निश्चलनीकरण पूर्ण झाल्यानंतर देशभर साठलेल्या त्या नोटांना पाय फुटले. अनेक बँकर्स व दलालांनी त्या परदेशातील आपल्या ओळखीच्या व्यक्तींना देऊन टाकल्या. आता वस्तुसंग्राहक जमातीचे या नोटांकडे लक्ष गेले नसते तरच नवल ! अशा शौकिनांकडून या बाद झालेल्या नोटांना मागणी येऊ लागली. मग त्या नोटा पुरवणारे देखील हुशार झाले. शालेय विद्यार्थ्यांपासून ते मुरलेल्या दलालांपर्यंत अनेकांनी या नोटा चढत्या भावाने विकण्यास सुरुवात केली. १-२ अमेरिकी डॉलरला ती नोट घेऊन विविध देशांमध्ये जास्तीत जास्त रकमेला विकण्याची चढाओढ सुरू झाली. इंग्लंडमधील एका पिता-पुत्रांनी याचा जोरदार धंदा केला आणि अल्पावधीतच त्यांनी त्यातून तब्बल १५००% टक्के नफा कमावला. तर काही गुंतवणूक सल्लागारांनी त्यांच्या अशिलांना ही नोट दाखवून चलनाचे अवमूल्यन म्हणजे काय ते समजावून दिले आणि योग्य त्या गुंतवणुकीचे महत्त्व पटवले.
जगातील काही संग्रहालयांनी देखील ही ऐतिहासिक नोट जतन केलेली आहे. सध्या ही नोट काही इ-विक्री संस्थळांवर उपलब्ध आहे. ‘ॲमेझॉन’ वर ही एक नोट US $200 ला विक्रीस ठेवलेली आहे.
....
या ऐतिहासिक चलनाचा एक मजेशीर उपयोग अमेरिकेत केला जातो. तिथे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात विचित्र आणि विनोदी संशोधनासाठी ‘अज्ञान नोबेल पुरस्कार’ दिले जातात (https://www.maayboli.com/node/71538). त्यातील विविध विजेत्यांना १ पद्म झिंबाब्वे डॉलर्सची नोट समारंभपूर्वक भेट दिली जाते. २००९चे अंकगणिताचे अज्ञान नोबेल पारितोषिक तर चक्क झिम्बाब्वेच्या रिझर्व बँकेचे तत्कालीन गव्हर्नर Gideon Gono यांना देण्यात आले.
“त्यांनी केलेल्या नीचांकी अवमूल्यनामुळे सामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारात महाप्रचंड अंकांशी खेळण्याची संधी सहज मिळाली”.
असे मानपत्र देऊन गौरव समितीने त्यांचा सत्कार केला !!
Gono यांनी त्यांच्या या ‘संशोधनाची’ कारणमीमांसा करणारे हे पुस्तक लिहीले आहे :
Zimbabwe’s Casino Economy — Extraordinary Measures for Extraordinary Challenges.
दारूण अर्थव्यवस्थेचे प्रतीक असलेल्या झिम्बाब्वेच्या ऐतिहासिक चलनाची अशी ही कहाणी.
.....................................
१. मराठी अंकमोजणी संदर्भ : https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4...
२. चित्रे जालावरून साभार !
सोने हेच अंतिम चलन आहे
सोने हेच अंतिम चलन आहे
कारणे क्रिप्टो आता जरी चलनात असले तरी
१)सरकारे यावर कधीही बंधने आणु शकते.
२)बीट कॉइन सारखे चलन मोठ्या देशाची सेन्टृअल बॅन्क आणेल तर बीट कॉइन्ला कोणीही विचारणार नाही. (यामुळे बर्याच इन्व्हेस्टर्स चे धाबे दणाणले आहे व ते याचा कसोशीने विरोध करत आहेत)
३) क्रिप्टो हे सरकारच्या बंधना पासुन मुक्त नाही. उलट यामुळे सरकार तुमच्या प्रत्येक खरेदी आणि लोकेशन्स वर पण नजर ठेउ शकेल (भविष्यात)
४) क्रिप्टो ला बॅकिन्ग करणारे हार्ड असेट नसल्याने कोणेही स्वतःची करन्सी काढु शकते.
सोने यापासुन मुक्त आहे. आणि ते सुर्यापेक्षा फार मोठ्या सुपर्नोवा च्या ह्रुदयातच होउ शकते. तुम्हाला दुसरे तयार करता येणार नाही. बीट कॉइन्स आता एक्स्ट्रॅक्ट करायला फार उरली नाहित (फक्त १० वर्षात ९८% अस्टित्वात आहेत आणि आधिच क्लेम झाली आहेत)
याविरुध्ध सोन्याचा एक्स्ट्रॅक्शन रेट स्लो आहे यामुळे नविन पिढीला पण कमवायची संधी उपलब्ध आहे.
ऑल्सो बीट कॉइनची कमिटी उद्या ठरवेल तर ते (एस हेच ए २५६) ऐवजी (एस हेच ए ५१२) अल्गोरिथम वापरु शकतात. यामुळे उपलब्धी एकदम सध्याच्या २^२५६ पट वाढेल यामुळे व्हॅल्युएशन्स काय होतिल हे पण तपासुन पहावे.
चलन आणि बार्टर ह्या गोष्टी
चलन आणि बार्टर ह्या गोष्टी चर्चा करण्या पलीकडे गेल्या आहेत. एवढी अवाढव्य अर्थव्यवस्था सांभाळायची म्हणजे चलन पाहिजेच पाहिजे. मला आठवतंय की आमच्या पाचवीच्या मराठीच्या पुस्तकात यावर एक धडा होता.
आता काय आहे कि काही थोड्या लोकांकडे संपत्ती एकवटते आहे. आणि बहुसंख्य नागरिक दिवसेंदिवस गरीब होत आहेत. एक जण आपल्याला जादूचे खेळ दाखवून आपले लक्ष खेचून घेत आहे आणि त्याचवेळी त्याचा हंडीबाग आपली पाकीट मारत आहे.
यावर इलाज काय आहे? आहे. मी इथे काही जास्त लिहीत नाही. पण ज्यांना तो जाणून घ्यायचा असेल त्यांनी
The Second Intelligent Species
How Humans Will Become as Irrelevant as Cockroaches
by Marshall Brain
आणि
Life 3.0 : being human in the age of artificial intelligence / by Max Tegmark.
ही पुस्तके मिळवून जरूर वाचा.
पण त्या आधी निश्चित करा कि तुम्ही कुठल्या वर्गात मोडता. आहेरे कि नाहीरे.
चलन लं सरकार नी मान्यता दिली
चलन लं सरकार नी मान्यता दिली तर च ते चलन.
Crepto la सरकारी मान्यता नसेल ,crepto कोणत्याच देशाच्या चलनात बदलत नसेल तर त्याला काही किंमत नसणार हे सरळ आहे.
1 crepto घेवून मला कोणी रुपये,डॉलर देणार नसेल तर त्या भासमय चलनाला भासमय जगात च किंमत असेल.
म्हणजे हवाला जगात.
वडापाव कोणी देणार नाही त्या बदल्यात.
संपत्ती एकवट ते आहे काहीच
संपत्ती एकवट ते आहे काहीच लोकांकडे ह्याची कारण आहेत .
केंद्रीय करण..
केंद्र सरकार ल सर्व अधिकार न देता राज्यांना पण अधिकार देवून अधिकार चे विकेंद्रीकरण करण्या च हेतू च तो आहे संपत्ती आणि अधिकार काही मोजक्याच लोकांकडे जावू नयेत..
Uber, ola नि शहरी वाहतुकीचे केंद्रीकरण केले आणि ह्या व्यवसाय मधून येणारा पैसा मोजक्याच लोकांकडे गेला.
सामूहिक शेती चा हेतू पण तोच आहे..
असंख्य लोकात विभागला गेलेला शेती हा व्यवसाय काहीच लोकांच्या हातात जावा..मोठ मोठ्या अंतर राष्ट्रीय कंपन्या तेच करतात
काही व्यवसाय चे विकेंद्रीकरण.
म्हणजे घरगुती उद्योग ,लहान उद्योजक ह्यांना संरक्षण देणे.
काही काम ही घरगुती च केली जातील ह्याची सक्ती
काही उद्योगात अंतर राष्ट्रीय कंपन्यांना पूर्ण बंदी
.
शेती चे विकेंद्रीकरण कोणत्या ही स्थिती मध्ये कायम राहिले पाहिजे
नाही तरी खूप मोठे संकट येईल.
शेती कायद्यानं विरोध त्या मुळेच झाला.
केंद्रीय जल आयोग.
केंद्रीय शेती आयोग
केंद्रीय उद्योग विभाग
जे काही केंद्रीय आहे त्याला विरोध झालाच पाहिजे.
तेव्हाच संपत्ती काही मोजक्याच लोकांकडे ekvatnar नाही
संपत्ती एकवट ते आहे काहीच
संपत्ती एकवट ते आहे काहीच लोकांकडे ह्याची कारण आहेत .
केंद्रीय करण..
केंद्र सरकार ल सर्व अधिकार न देता राज्यांना पण अधिकार देवून अधिकार चे विकेंद्रीकरण करण्या च हेतू च तो आहे संपत्ती आणि अधिकार काही मोजक्याच लोकांकडे जावू नयेत..
Uber, ola नि शहरी वाहतुकीचे केंद्रीकरण केले आणि ह्या व्यवसाय मधून येणारा पैसा मोजक्याच लोकांकडे गेला.
सामूहिक शेती चा हेतू पण तोच आहे..
असंख्य लोकात विभागला गेलेला शेती हा व्यवसाय काहीच लोकांच्या हातात जावा..मोठ मोठ्या अंतर राष्ट्रीय कंपन्या तेच करतात
काही व्यवसाय चे विकेंद्रीकरण.
म्हणजे घरगुती उद्योग ,लहान उद्योजक ह्यांना संरक्षण देणे.
काही काम ही घरगुती च केली जातील ह्याची सक्ती
काही उद्योगात अंतर राष्ट्रीय कंपन्यांना पूर्ण बंदी
.
शेती चे विकेंद्रीकरण कोणत्या ही स्थिती मध्ये कायम राहिले पाहिजे
नाही तरी खूप मोठे संकट येईल.
शेती कायद्यानं विरोध त्या मुळेच झाला.
केंद्रीय जल आयोग.
केंद्रीय शेती आयोग
केंद्रीय उद्योग विभाग
जे काही केंद्रीय आहे त्याला विरोध झालाच पाहिजे.
तेव्हाच संपत्ती काही मोजक्याच लोकांकडे ekvatnar नाही
1 crepto घेवून मला कोणी रुपये
1 crepto घेवून मला कोणी रुपये,डॉलर देणार नसेल तर त्या भासमय चलनाला भासमय जगात च किंमत असेल.
म्हणजे हवाला जगात.
>>
म्हणुनच मला या अप्रामाणिक ते बद्दल तिरस्कार आहे. मध्ये फ्लोरिडातल्या एका मेयरने सांगितले की तो क्र्य्प्टोत पगार घेणार. अरे पण त्याचा पगार ६०००० डॉलर्सच आहे तो काही त्यावेळे एक बिट्कॉइन घेत नव्हता आणि या बदल्यात क्रिप्टो इन्डस्त्री त्याला निवडणुकीसाठी "मदत" करत होती.
सामान्य जनतेशी हे फसवणुक आहे.
सोने, रुपे हेच बर्यापैकी स्टोर ऑफ व्हॅल्यु आहे. बफेट म्हणतो की जमिनीतील गुंतवणुक पीक देते तसे मौल्यवान धातु काही देत नाहित आणि हे खरे आहे. म्हणुन काही टक्के गुंतवणुक शेती उद्योगात आवश्यक आहे. पण कोलोरॅडो नदी पण काही वर्षे सुकी वाहु शकते अशा काळात दुष्काळी जमिनीपेक्षा मौल्यवान धातु (किंवा कमोडिटीज) तुम्हाला काहितरी व्हॅल्यु वाचवुन देउ शकतात).
एकं, दहं, शतं, सहस्त्र,
एकं, दहं, शतं, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अर्व, दशअर्व, खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म, नील, दशनील, शंख, दशशंख, क्षिति, दशक्षिति, क्षोभ, दशक्षोभ, ऋध्दि, दशऋध्दि, सिध्दि, दशसिध्दि, निधि, दशनिधी, क्षोणी, दशक्षोणी, कल्प, दशकल्प, त्राही, दशत्राही, ब्रम्हांड, दशब्रम्हांड, रुद्र, दशरुद्र, ताल, दशताल, भार, दशभार, बुरुज, दशबुरुज, घंटा, दशघंटा, मील, दशमील, पचूर, दशपचूर, लय, दशलय, फार, दशफार, अषार, दशअषार, वट, दशवट, गिरी, दशगिरी, मन, दशमन, बव, दशबव, शंकु, दशशंकु, बाप, दशबाप, बल, दशबल, झार, दशझार, भीर, दशभीर, वज्र, दशवज्र, लोट, दशलोट, नजे, दशनजे, पट, दशपट, तमे, दशतमे, डंभ, दशडंभ, कैक, दशकैक, अमित, दशअमित, गोल, दशगोल, परिमित, दशपरिमित, अनंत, दशअनंत.>>>> हे अफाट आहे
पण इतक्या मोठ्या कुठल्या संख्या आपले पूर्वज मोजत होते?
फक्त तारे च इतक्या संख्येने असू शकतात
तेही अब्ज पलीकडे मोजण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान होत का
हे वर्तुळ आहे .सुरुवात,
हे वर्तुळ आहे .सुरुवात,
मध्यम पना ,प्रगती,उच्च प्रगती ,अधोगती.
ही सर्व वर्तुळ अनेक वेळा मानवी इतिहासात झाली आहे त.
फक्त ती समजण्याची कुवत आपल्यात नाही.
पण इतक्या मोठ्या कुठल्या
पण इतक्या मोठ्या कुठल्या संख्या आपले पूर्वज मोजत होते? >> त्रिकालदर्शी मंडळी होती! मायबोलीकरांसाठीच तर इतकी गणना करून गेले. आपण नुसतं "इतके धागे काढतो, तितक्या पोस्टी मारतो/ते" म्हणून कुरकुरणार. ते 'इतकं' नि 'तितकं' मोजायला तर यायला हवं. सोल्यूशन फोकस्ड मंडळी कुणी होती म्हणून आपलं बरं चाललं आहे (सर्वांनीच
).
कुमारसर, लेख छान आहे आणि सर्व
कुमारसर, लेख छान आहे आणि सर्व प्रतिक्रियाही वाचनीय आहेत.
उत्तम चर्चेबद्दल सर्वांचे
उत्तम चर्चेबद्दल सर्वांचे आभार !
…
*सोने हेच अंतिम चलन आहे
*थोड्या लोकांकडे संपत्ती एकवटते आहे.
*काही काम ही घरगुती च केली जातील ह्याची सक्ती
*जमिनीतील गुंतवणुक पीक देते तसे मौल्यवान धातु काही देत नाहित आणि हे खरे आहे.
>>>>
हे सर्व मुद्दे महत्वाचे व अभ्यासनीय आहेत.
मागच्या पानावर जर्मनीतल्या
मागच्या पानावर जर्मनीतल्या त्या उपासमारीचा संदर्भ आलाय. " अन्नाच्या बदल्यात(च) वस्तू/सेवा".
…. यावरून समजा, असे विधान केले तर :
"अन्न हेच अंतिम चलन आहे" ?
तर ते अर्थशास्त्रानुसार योग्य आहे का?
अन्नधान्य नाशवंत आहे; टिकावू नाही हे कळतंय.
तरी पण ही एक शंका.
सोने हेच अंतिम चलन आहे :>
सोने हेच अंतिम चलन आहे :> सोने हे चलन नाही होणार . सोने घेउन बाजारात वस्तु नाही घेउ शकत. सोने हे गुंतवणुक आहे.
१९३० पर्यन्त अमेरिका, भारत आणि बर्याच देशात सोने आणि चलन याचे गुणोत्तर सारखे होते. पण जागतिक मंदी नंतर ते काढुन टाकले.
बाकी चलन फुगवटा का होतो त्याबद्दल लिहिन नंतर . मोबाईल वर टाईप करणे जड जात आहे . कम्प्युटर रिपेरिंगला टाकला आहे येइल आज किंवा उद्या.
सोने हेच अंतिम चलन आहे :>
सोने हेच अंतिम चलन आहे :> सोने हे चलन नाही होणार . सोने घेउन बाजारात वस्तु नाही घेउ शकत. सोने हे गुंतवणुक आहे.
१९३० पर्यन्त अमेरिका, भारत आणि बर्याच देशात सोने आणि चलन याचे गुणोत्तर सारखे होते. पण जागतिक मंदी नंतर ते काढुन टाकले.
बाकी चलन फुगवटा का होतो त्याबद्दल लिहिन नंतर . मोबाईल वर टाईप करणे जड जात आहे . कम्प्युटर रिपेरिंगला टाकला आहे येइल आज किंवा उद्या.
लेखाच्या शीर्षकात
लेखाच्या शीर्षकात स्वल्पविरामाची जागा एके ठिकाणी चुकली आहे असे वाटतेय. Comma हा उजवीकडून सुरू करून प्रत्येक तिसऱ्या संख्येनंतर किंवा शुन्यानंतर हवा आहे.
१०००,००,०००,०००,००० हे
१००,०००,०००,०००,००० असे हवे.
मला खात्री नाही पण हे खटकतेय.
लेख व प्रतिक्रिया वाचून प्रतिसाद देईन.
अस्मिता,
उपयुक्त पूरक माहिती उत्तम !
.......
अस्मिता,
:
तुमच्या म्हणण्याप्रमाणे सुधारणा केली आहे.
माझे निरीक्षण सांगतो. ब्रिटिश, अमेरिकी व भारतीय अशा अंक मोजण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यात सुद्धा स्वल्पविराम ठिकाणाचे फरक दिसतात. उदाहरणार्थ विकिपिडीयावरील ही संख्या बघा (https://en.wikipedia.org/wiki/Zimbabwean_dollar
1,000,000,000,000
त्यांनी सुरुवातीच्या १ अंकाला एकटाच टाकून दिला आहे !
भारतात आपल्याकडे लक्ष ,दशलक्ष आहे. त्यांच्याकडे ' लक्ष' नसल्यामुळे ते एकदम हंड्रेड थाउजंड असे म्हणतात व पुढे मिलीयन. त्यामुळे इथं नक्की आंतरराष्ट्रीय संकेत काय आहे हे मला माहीत नाही.
देशादेशागणिक फरक असू शकेल.
अर्थात ००० हे समान त्रिकूट बघायला चांगले दिसेल.
धन्यवाद !
कुमार म्हणतात तसं भारतातल्या
कुमार म्हणतात तसं भारतातल्या गणना पद्धतीनुसार हजार या संख्येवर तीन शून्ये असतात. पुढे लक्ष, कोटी या संख्यांसाठी प्रत्येकी दोन शून्ये वाढत जातात. त्यामुळे स्वल्पविरामही तसेच द्यावेत असं माझं मत.
वरची संख्या दहा नील आहे, तर स्वल्पविराम दहानंतर हवा.
भरत
भरत
बरोबर आहे. मलाही आधी तसेच वाटले होते. प्रत्यक्ष लेख चढवायच्या वेळेला चित्रे वगैरे कसरत करता करता शीर्षकातल्या अंकाकडे फार बारकाईने पाहता आले नाही.
तसाही तो अंक लिहिताना देखील गरगरायला होतेच असो
मला आठवतय त्यानुसार मराठी
मला आठवतय त्यानुसार मराठी आकड्यांमधे हजारपासून पुढे सगळे आकडे नाव, दशनाव असे आहेत. जसे हजार, दहा हजार, लाख, दहा लाख. त्यामुळे उजवीकडून पहिला स्वल्पविराम तिसऱ्या अंकाला अन मग पुढचे दर दुसऱ्या आकड्याला. जसे १,००,००,००,०००
तर इंग्रजीत सरळ उजवीकडून दर तिसऱ्या आकड्यानंतर स्वल्पविराम असतो. जसे 1,000,000,000
चूभुद्याघ्या
रच्याकने...
रच्याकने...
अमेरिकेच्या ३ अर्थशास्त्रज्ञांना २०२२ चे अर्थशास्त्र-नोबेल पारितोषिक,
बँका-आर्थिक संकटावरील संशोधनासाठी सन्मान.
अभिनन्दन !
अक्षौहिणी नाही यात? कौरवांचे
अक्षौहिणी नाही यात? कौरवांचे सैन्य अठरा अक्षौहिणी होते ना?
आणि कुमार सरांचा वरचा आकडा उजवीकडून मोजला तर..
तर वरती एसएसजे यान्नी लिहील्याप्रमाणे मोजल्यास ( एकं, दहं, शतं, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अर्व, दशअर्व, खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म, नील, दशनील,..)
एकावर पंधरा शून्य म्हणजे दशपद्म पर्यंतच होते आहे...

मला वाटते अर्व- दश अर्व स्किप करायला हवे..किंवा ते म्हणजेच कोटी दश कोटी....!! तसे केल्यास हिशेब बरोबर जमतो!!
मराठी अंक मापनात संदर्भानुसार
मराठी अंक मापनात संदर्भानुसार काही परिमाणे वेगळी आहेत. म्हणून मी तळटीपेमध्ये विकिपीडियाचा संदर्भ दिलाय (भारतीय दशमान पद्धत) त्यानुसार मी असं मोजले आहे :
एक , दहा , शंभर , हजार , दहा हजार , लाख , दशलक्ष , कोटी , दशकोटी , अब्ज, दशअब्ज , खर्व , दशखर्व , पद्म , दशपद्म .
औक्षणी याचा मुख्यत: वापर
औक्षणी याचा मुख्यत: वापर सैन्य शक्ती, अर्थात रथ, घोडे, हत्ती, सैनिक यांचे एकत्रित किती सैन्यबल आहे, यासाठी केला जाई.
एक औक्षणी सैन्यात
१. रथ - २१८७०, रथाला ८७,४८० घोडे, २१८७० योद्धा, २१८७० सारथी.
२. हत्ती - २१८७०, माहुत - २१८७०, योद्धा - २१८७०,
३. घोडेस्वार - ६५६१०, घोडे - ६५,६१०
४. भूदल सैनिक - १,०९,३५०
हे एकत्रित अक्षौहिणी असे समजले जात असे.
+११
+११
अक्षौहिणी = A hundred trillions.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%...
म्हणजे प्रस्तुत लेखातील चलना एवढेच झाले !
१ दशपद्म
तेव्हा ची लोकसंख्या च काही
तेव्हा ची लोकसंख्या च काही लाखात असेल.इतके मोठे सैन्य दल ज्यांची संख्याच लाखात आहे असणे तार्किक वाटत नाही.
इतके मोठे आकडे शोधून काढण्याची गरज त्या वेळी का पडली असेल हा प्रश्न च आहे.
माझा तर्क असा आहे ,
माझा तर्क असा आहे ,
की अंकगणिताचा अभ्यास हा तर खूप प्राचीन असणार. मग विविध घातांक शिकवण्यासाठी म्हणून इतके मोठे आकडे सांगितले असावेत.
प्रत्यक्षात उपयोग तेव्हा नसेल तरी तो भविष्यात होऊ शकेल असा विचार असावा
छान धागा. नवीन नवीन माहिती
छान धागा. नवीन नवीन माहिती मिळतेय.
कुमार सर, तरीही..... वरच्या
कुमार सर, तरीही..... वरच्या संख्येत एकावर चवदा शून्ये आहेत..म्हणजे आपल्या कॅलक्युलेशन नुसार
१,००,०००,०००,०००,००० म्हणजे
दशपद्म च होत आहे !! दश नील नाही!!
Hemant 33
Hemant 33
प्रत्येक गोष्टीला कारण पाहिजे हा अट्टाहास का. हा जुना वाद आहे. गणित हे Invention आहे का डिस्कवरी आहे? त्या संख्या तिथे होत्याच आपण त्यांना फक्त नावे दिले.
का? असे विचारू नका. ते तिथे आहे म्हणून मी त्याचा अभ्यास करतो.
आंबट गोड
आंबट गोड
ओ !
क्षमस्व. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद !!!
Pages