
मागच्या महिन्यातल्या एका रविवारच्या संध्याकाळी धोधो पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातच अडकून पडलो होतो. आंतरजालावर पुरेसे बागडून कंटाळा आला होता. मग वेळ घालवायचा म्हणून छापील इंग्लिश वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी बारकाईने पाहू लागलो. त्यातला एक लेख दुबईबद्दल होता. त्या शहराची अनेकविध वैशिष्टे सांगितल्यावर तिथल्या एका संग्रहालयाचा त्यात उल्लेख होता. त्यामध्ये सर्व देशांच्या आतापर्यंत छापल्या गेलेल्या चलनी नोटांचे प्रदर्शन आहे. त्यात जगभरातील जवळजवळ सर्व नोटा असून ‘त्या’ जगप्रसिद्ध १००ट्रिलियन झिंबाब्वे डॉलर किमतीच्या नोटेचाही समावेश आहे. हे वाचून स्तिमित झालो. कित्येक दिवसांनी एवढी मोठी संख्या ऐकली होती. आपल्या नेहमीच्या आर्थिक व्यवहारात दशलक्षच्या पुढे मोजायची वेळच येत नाही ! अगदी भारतीय लोकसंख्येबाबत बोलताना सुद्धा (दीड) अब्ज ही मर्यादा असते. हा अंक तर त्याच्याही पुढे पळत होता. मग गंमत म्हणून ही मोठी संख्या कागदावर लिहून काढली :
१००, ०००,०००,०००,०००
मराठी अंकमोजणीनुसार या संख्येला दशपद्म म्हणतात (चढती अंकमोजणी अशी : अब्ज, दशअब्ज , खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म.).

आतापर्यंत मी पाहिलेली भारताची सर्वाधिक मूल्याची नोट २,००० रु. ची. माझ्या लहानपणी मी दहा हजार रुपयांची नोट असल्याचे ऐकले होते पण नंतर १९७८मध्ये ती रद्द झाल्याने बघायला काही मिळाली नव्हती. अर्थशास्त्राचा माझा काही अभ्यास नाही. परंतु वरची झिम्बाब्वेची महाकाय रकमेची नोट त्या देशातील चलनाचे प्रचंड अवमूल्यन झाल्याचे सुचवते इतपत समजले. मग या विषयावरील कुतूहल चाळवले गेले. आर्थिक मागास देशांच्या चलनी इतिहासावर एक धावती नजर टाकली. तेव्हा लक्षात आले की वरील दशपद्मच्या झिम्बाब्वेच्या नोटेने चलनांच्या अवमूल्यन इतिहासात एक विक्रम घडवलेला आहे !
बरं, जेव्हा ती नोट वापरात होती तेव्हा तिचे बाजारमूल्य तरी काय असावे ? एखाद्याला वाटेल की त्या एका नोटेत एखादी लहानशी कार किंवा गेला बाजार, एखादी स्कूटर तरी येत असेल. पण छे ! तेवढ्या रकमेत जेमतेम ब्रेडचे एक पुडके किंवा सार्वजनिक बसचे शहरांतर्गत प्रवासाचे एक तिकीट येत होते !!
...
आता झिम्बाब्वेच्या 1980 ते 2009 पर्यंतच्या चलन इतिहासावर एक नजर टाकू. 1980मध्ये तिथे पूर्वीचा ह्रोडेशियन डॉलर रद्द करून त्या जागी झिंबाब्वे डॉलर ( ZWD) हे चलन अस्तित्वात आले. तेव्हा त्याचे अमेरिकी डॉलरशी १:१ असे समकक्ष नाते होते. सन 2000 पर्यंत हे चलन ठीक चालले. परंतु त्यानंतर मात्र तिथे प्रचंड चलनफुगवटा (hyperinflation) होत गेला. परिणामी त्यांच्या चलनाचे नीचांकी अवमूल्यन झाले. २००६-०९ च्या दरम्यान त्या चलनाचे तीनदा पुनर्मूल्यांकन केले गेले. तेव्हाच वर उल्लेखलेली दशपद्म ZWD ची नोट छापली गेली. अखेर एप्रिल 2009 मध्ये त्यांचे हे चलन पूर्णपणे रद्द करण्यात आले. त्यानंतरचा चलन इतिहास लेखाच्या कक्षेबाहेर आहे.
ही सर्व माहिती संदर्भातून वाचता वाचताच मला पूर्वायुष्यातील एक प्रसंग आठवला- साधारण 2007 चा. तेव्हा माझे वास्तव्य परदेशात होते. तिथल्या आमच्या रुग्णालयात ८५ देशांचे डॉक्टर्स एकत्र काम करीत होते. त्यातले एकजण झिम्बाब्वेचे नागरिक होते. परंतु गेली 20 वर्षे ते अन्य देशांतच स्थिरावले होते. एकदा असेच आम्ही काहीजण चहापानासाठी एकत्र बसलो होतो. गप्पा मारताना गाडी विविध देशांच्या चलनाच्या विनिमय दरावर आली. मग प्रत्येक जण आपापल्या देशाच्या चलनाचा अमेरिकी डॉलरशी विनिमय दर सांगत होता. शेवटी या झिम्बावेच्या डॉक्टरांची पाळी आली. प्रथम ते कसेनुसे हसले. एखादा नापास विद्यार्थी जसे आपले गुण सांगायला अनुत्सुक असतो तसा त्यांचा चेहरा भासला. मग ते म्हणाले,
“मी जर माझी बचत झिंबाब्वे डॉलर्समध्ये रूपांतरित केली तर मला अक्षरशः पोतंभर पैसे मिळतील ! पण उपयोग काय त्या पैशांचा ? ते सगळं अवमूल्यित चलन आहे. तेव्हा मी तो नाद सोडला आहे. मी आता माझी सर्व बचत अमेरिकी डॉलर्समध्येच बँकेत ठेवतो”.
आज १०दशपद्म च्या नोटेसंबंधी वाचल्यावर मला त्यांच्या तेव्हाच्या उद्गारांचा खरा अर्थ समजला.
…
जेव्हा या मोठ्या चलनाच्या नोटा छापायची वेळ सरकारवर आली तेव्हाची झिम्बाब्वेची अवस्था दारूण झालेली होती. तिथल्या मध्यवर्ती बँकेला ज्या कागदावर चलन छापायचे तो कागद देखील परवडत नव्हता दुकानदार एकाच दिवसात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दुप्पट करून टाकत. लोकांना खरेदीला जाताना या नोटा अक्षरशः टोपलीत भरून नव्या लागत. ! राष्ट्राध्यक्षांनी विविध वटहुकूम काढून किमती नियंत्रणात ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
अशा प्रकारे नागरिकांमधील असंतोष शिगेला पोहोचला होता. विविध निषेधाचे फलक हातांत घेऊन लोकांचे देशभर मोर्चे निघायचे. त्यातला एक फलक लक्ष्यवेधी होता :
“आम्ही अब्जाधीश भिकारी आहोत”

2009 मध्ये या चलनाचा अमेरिकेशी अमेरिकी डॉलरची असलेला विनिमय दर हास्यास्पद पातळीवर उतरला होता :
१अमेरिकी डॉलर = (३४ अंकी संख्या) ZWD.
या सर्व कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीचा शेवट हे चलन रद्द करण्यात झाला. त्यानंतर तिथे अमेरिकी डॉलर आणि दक्षिण आफ्रिकी रँड ही चलने मुख्यत्वे वापरात आली.
झिंबाब्वे डॉलर्सचे निश्चलनीकरण पूर्ण झाल्यानंतर देशभर साठलेल्या त्या नोटांना पाय फुटले. अनेक बँकर्स व दलालांनी त्या परदेशातील आपल्या ओळखीच्या व्यक्तींना देऊन टाकल्या. आता वस्तुसंग्राहक जमातीचे या नोटांकडे लक्ष गेले नसते तरच नवल ! अशा शौकिनांकडून या बाद झालेल्या नोटांना मागणी येऊ लागली. मग त्या नोटा पुरवणारे देखील हुशार झाले. शालेय विद्यार्थ्यांपासून ते मुरलेल्या दलालांपर्यंत अनेकांनी या नोटा चढत्या भावाने विकण्यास सुरुवात केली. १-२ अमेरिकी डॉलरला ती नोट घेऊन विविध देशांमध्ये जास्तीत जास्त रकमेला विकण्याची चढाओढ सुरू झाली. इंग्लंडमधील एका पिता-पुत्रांनी याचा जोरदार धंदा केला आणि अल्पावधीतच त्यांनी त्यातून तब्बल १५००% टक्के नफा कमावला. तर काही गुंतवणूक सल्लागारांनी त्यांच्या अशिलांना ही नोट दाखवून चलनाचे अवमूल्यन म्हणजे काय ते समजावून दिले आणि योग्य त्या गुंतवणुकीचे महत्त्व पटवले.
जगातील काही संग्रहालयांनी देखील ही ऐतिहासिक नोट जतन केलेली आहे. सध्या ही नोट काही इ-विक्री संस्थळांवर उपलब्ध आहे. ‘ॲमेझॉन’ वर ही एक नोट US $200 ला विक्रीस ठेवलेली आहे.
....
या ऐतिहासिक चलनाचा एक मजेशीर उपयोग अमेरिकेत केला जातो. तिथे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात विचित्र आणि विनोदी संशोधनासाठी ‘अज्ञान नोबेल पुरस्कार’ दिले जातात (https://www.maayboli.com/node/71538). त्यातील विविध विजेत्यांना १ पद्म झिंबाब्वे डॉलर्सची नोट समारंभपूर्वक भेट दिली जाते. २००९चे अंकगणिताचे अज्ञान नोबेल पारितोषिक तर चक्क झिम्बाब्वेच्या रिझर्व बँकेचे तत्कालीन गव्हर्नर Gideon Gono यांना देण्यात आले.
“त्यांनी केलेल्या नीचांकी अवमूल्यनामुळे सामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारात महाप्रचंड अंकांशी खेळण्याची संधी सहज मिळाली”.
असे मानपत्र देऊन गौरव समितीने त्यांचा सत्कार केला !!
Gono यांनी त्यांच्या या ‘संशोधनाची’ कारणमीमांसा करणारे हे पुस्तक लिहीले आहे :
Zimbabwe’s Casino Economy — Extraordinary Measures for Extraordinary Challenges.
दारूण अर्थव्यवस्थेचे प्रतीक असलेल्या झिम्बाब्वेच्या ऐतिहासिक चलनाची अशी ही कहाणी.
.....................................
१. मराठी अंकमोजणी संदर्भ : https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4...
२. चित्रे जालावरून साभार !
ह्यालाच केळ्याचे राज्य
ह्यालाच केळ्याचे राज्य म्हणतात.
Banana republic.
Banana republic.
एकदम योग्य शब्द
आणि त्याचा जोडशब्द :
आणि त्याचा जोडशब्द :
"आम" आदमी .
आम आदमी.
आम आदमी.
ह्याला दुसरा अर्थ असतोच.
मुलांच्या शिक्षणावर करोड तरी खर्च होतात.
खर्च करणाऱ्या आई वडिलांना (ते गुंतवणूकदार आहेत) रिटर्न काय मिळते.
काही नाही.
पण समाजाला चांगले डॉक्टर मिळतातं,सरकार लं योग्य कल्पक नोकर मिळतातं.
कंपन्या ना स्किल worker मिळतातं.
अगदी फुकट.
Investment je करतात त्यांना काय मिळते.
काही नाही.
पण देशाला मिळते.
हे उदाहरण आहे.
शब्दशः घेवू नका
तसे सवलती ज्या समाजात काही कमजोर लोकांना दिल्या जातात
त्या मधून पण असाच काही तरी फायदा देशाचा होत असतो.
बाकी नियम,तत्व ज्ञान,उपदेश
बाकी नियम,तत्व ज्ञान,उपदेश फक्त लहान सहान उद्योग,दुकानदार,शेतकरी. ह्यांच्या साठी असतात.
>>> +११११११११११११.... पद्म...नील...... इतक्या वेळा
माझ्या एका मित्राने नुकतीच जुनी सदनिका विकत घेतली. त्यासाठी त्याने “भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या” कर्जासाठी अर्ज केला होता. बिचारा सहा महिने अक्षरशः खेटे मारून रडकुंडीला आला होता. शेवटी काम झाले खरे. आता तो म्हणतो,
“कर्ज पहावे काढून” यावर एक पुस्तिका लिहिता येईल मला !”
मोठ्या चलनी नोटा म्हणजे मोठा
मोठ्या चलनी नोटा म्हणजे मोठा भ्रष्ट कारभार करण्यास सुलभता..
चलनी नोटा मुळेच भ्रष्टाचार करणे शक्य आहे.
चलनी नोटा च नसतील आणि सर्व व्यवहार डिजिटल झाले तर एक एक रुपया कुठे गेला,कोणाकडे गेला हे नाहीत पडेल.
भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचा हा रामबाण उपाय आहे.
अशी माझी मत खूप वर्ष होती.
मोदी नी ह्या दिवशी नोट बंदी केली
तेव्हा रात्री 20.30 च्या सुमारास ट्रेन मध्ये आमच्या ग्रुप मध्ये ह्या मोठ्या नोटा विषयीच नी माझे मत व्यक्त करत होतो.
मोठ्या नोटा बंद च झाल्या पाहिजेत असे बोलत होता...
तेव्हा एक समोर गुजराती बसला होता तो बोलला बंद झाल्या पाहिजेत नाही बंद झाल्या आता च अर्ध्या तासा पासून.
आणि ती नोट बंदी ची घोषणा झाली त्या विषयी सांगितले.
त्या नंतर जी स्थिती निर्माण झाली .
तेव्हा चलनी नोटांचा किती महत्व आहे त्याचे practical च मिळाले.
मोठ्या किंमतीच्या नोटा पण गरजेच्या आहेत ह्याचे practical च मिळाले
समांतर एक वेगळीच अर्थ व्यवस्था डिजिटल करन्सी वर नाही तर रोखड्यावर चालते हे समजले.
प्रतेक व्यवहार सरकार च्या नजरे त येणे किती धोकादायक आहे हे समजले.
टोकाच्या भूमिका चुकीच्या असतात.
लवचिक पना आणि चारी बाजूंचा विचार करून ठरलेली सरकारी धोरण योग्य असतात.
>>>*इकॉनमी हि मोठ्या
>>>*इकॉनमी हि मोठ्या दगडासारखी असते >> +१ , जेवढा मोठा देश तेवढा मोठा दगड .>>> +९९९
>>>भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचा हा रामबाण उपाय आहे.>>>> आपण कलियुगात आहोत भौ.
हे पुस्तकात वाचण्यापुरते असते राव.
तंत्रज्ञानात आपल्याहून प्रगत
तंत्रज्ञानात आपल्याहून प्रगत असलेल्या जपानमध्ये सुद्धा बहुसंख्य नागरिकांना रोखीचे व्यवहार पसंत आहेत.
इथे त्याचा उहापोह आहे : https://www.cashmatters.org/blog/why-japan-prefers-cash
रोख पसंत करण्याची प्रमुख कारणे :
१. डिजिटल व्यवहारात वैयक्तिक माहितीची गोपनीयता राहत नाही.
२. तसेच त्यात माणूस गरजेपेक्षा जास्त खर्च करून बसतो.
तिथले नागरिक नोटांना अतिशय निष्ठेने आणि काळजीपूर्वक सांभाळतात. नोटांना घडी पडणार नाही अशा प्रकारची लांबरुंद पैशांची पाकिटे ते वापरतात.
कॅश खिशात असेल तर पैसे
कॅश खिशात असेल तर पैसे असल्याची पूर्ण खात्री असते.
बँक अकाऊंट मध्ये लाखो आहेत. payment app मोबाईल मध्ये आहे पण पैसे असल्याची खात्री नसते .तशी एक भीती मनात असते
हॉटेल मध्ये जेवलो आणि बँकेचा सर्व्हर डाऊन झाला तर? हा तर अन्न गोड लागून देत नाही.
पैसे account मध्ये असून पण फजिती
अनेक वेळा असे घडते पण.
ऐन वेळेला दगाफटका मिळतो.
माझ्या बाबत पण असे घडले आहे.त्या मुळे कॅश खिशात थोडी तरी असतेच .
दोन वेगळ्या बँकेची account. UPI ल joint आहेत.
एका बँकेचा server down असेल तर दुसरी कामाला येईल
समारोप
समारोप
Dubai diaspora या नावाचा एक लेख माझ्या वाचनात आला आणि त्यातून प्रस्तुत लेखनासाठी प्रेरणा मिळाली. आपण सर्वांनी या अभ्यासपूर्ण व रंजक चर्चेत भाग घेतलात याचा आनंद वाटतो.
चर्चेतील उत्साहवर्धक अभिप्राय, पूरक माहिती, अंकमापनातील नील- पद्म ही चूक दुरुस्ती आणि भारताच्या सध्याच्या आर्थिक स्थितीवरील भाष्य या अनेक मुद्द्यांबाबत मी आपला आभारी आहे.
आपणा सर्वांचे आर्थिक आरोग्य उत्तम राहावे या शुभेच्छांसह हा समारोप !
जागतिक भूक निर्देशांकात
जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण; शेजारी देशांपेक्षाही भयंकर स्थिती
https://thepointnow.in/india-global-hunger-index-2022/
A worldwide survey was
A worldwide survey was conducted by the UN. The only question asked was: "Would you please give your honest opinion about solutions to the food shortage in the rest of the world?" The survey was a huge failure. In Africa they didn't know what "food" meant. In Eastern Europe they didn't know what "honest" meant. In Western Europe they didn't know what "shortage" meant. In China they didn't know what "opinion" meant. In the Middle East they didn't know what "solution" meant. In South America they didn't know what "please" meant. And in the USA they didn't know what "the rest of the world" meant.
A worldwide survey ...
A worldwide survey ...
आपल्या भारतीयांचा काय प्रतिसाद असेल असे वाटते?
चढत्या डॉलरमुळे अन्नधान्य
चढत्या डॉलरमुळे अन्नधान्य आयात कराव्या लागणाऱ्या देशांची बोंब होतेय. जागतिक अन्नतुडवड्याबद्दल आयएमएफ ने चिंता व्यक्त केलीय.
https://www.straitstimes.com/world/soaring-us-dollar-leaves-food-piled-u...
अन्नधान्याचा तुटवडा या
अन्नधान्याचा तुटवडा या विषयावर कृपया इथे चर्चा नको. वाटल्यास नवीन धागा काढा.
बहुतेक देशांमध्ये आता चलन
बहुतेक देशांमध्ये आता चलन मापनाची दशमान पद्धत आहे (दहाच्या पटीतील नाते). परंतु आधुनिक वजनमापे आणि इलेक्ट्रॉनिक प्रगती होण्यापूर्वी अनेक देशांमध्ये बिगर दशमान पद्धतीची पारंपरिक चलने होती. त्या पद्धतीमध्ये तत्कालीन जीवनात अनेक प्रसंगी विशिष्ट प्रकारचे ‘वाटे’ करण्यासाठी फायदा होत होता. याची दोन उदाहरणे पाहू :
१. विकीवर दक्षिण जर्मनीतील एक उदाहरण दिले आहे. त्या चलनात
६० उपचलने = १ चलन असे नाते होते.
६० अंकाचा फायदा असा की त्याला दहा प्रकारच्या अंकांनी भागले जाते
( 2,3,4,……..30).
https://en.wikipedia.org/wiki/Denomination_(currency)
२. भारतात प्रथम ४ पैसे =१ आणा,
१६ आणे = १ रु. = ६४ पैसे
व नंतर :
६ पैसे =१ आणा,
१६ आणे = १ रु. = ९६ पैसे असे होते.
६४ ला ८ ने भाग जातो. तर
९६ ला ३ व ८ ने भाग जातो. याचा काही फायदा ठराविक व्यापारात होत होता असे अन्यत्र वाचनात आले. (अर्थात १० ने भाग जात नाही हा तोटा असावा).
खूपच चढत गेलेल्या डॉलरमुळे
खूपच चढत गेलेल्या डॉलरमुळे इतर जगामध्ये खूप हलाखीची परिस्थिती निर्माण होत आहे आणि जागतिक मंदी उंबरठ्यावर आहे असे इथे म्हटले आहे:
https://www-livemint-com.cdn.ampproject.org/v/s/www.livemint.com/news/wo...
थोडक्यात आणि समजेल असे विश्लेषण वाटले. विकसनशील देशांबरोबरच युरोपमधील विकसित देशांनाही याची झळ पोचलेली आहे.
डॉलर च वापरला पाहिजे अशी काय
डॉलर च वापरला पाहिजे अशी काय जबरदस्ती आहे काय.
समजा आपल्याला हवी वस्तू नेपाल कडे आहे आणि नेपाल लं जे हवं आहे ते आपल्याकडे आहे.
आपण आपल्या चलनात व्यवहार का करू नये.
डॉलर कशाला हवंय
मंदी चा फायदा पण असतो काही
मंदी चा फायदा पण असतो काही घटकांना.
1) कंपनी तोट्यात गेली असे दाखवले जाते.
आणि घेतलेले कर्ज बुडीत मध्ये जाते.
सरकार ते माफ करते.
२) कामगार ना काहीच त्यांची देनी न देता त्यांना कामावरून काढून टाकले जाते.
३) सरकार विविध सवलती देते. कमी व्याजात अगोदर कर्ज असले तरी अजून कर्ज देते.
४) विविध करुडो रुपयाची packages sarkar देते.
.फायदाच फायदा.
नुकसान फक्त सामान्य लोकांचे होते ते गरीब होतात
त्यांना स्वस्त कर्ज काही मिळत नाही पण त्यांच्या ठेवी वरील व्याज मात्र कमी होते.
सामान्य लोकांच्या ठेवी वर जास्त व्याज देणे हे अर्थ व्यवस्थेला धोकादायक असते ना .
तसे तज्ञ सांगत असतात
पण किती ही मंदी आली तरी .
उद्योग पती आणि राजकारणी ह्यांची संपत्ती कधीच कमी होत नाही .
उलट मंदी मध्येच ह्यांची संपत्ती वाढते.
डॉलर च वापरला पाहिजे अशी काय
डॉलर च वापरला पाहिजे अशी काय जबरदस्ती आहे काय.
>>>
आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी यु एस डॉलर, युरो आणि येन या चलनांना पसंती असते.
2009 मध्ये रशिया व चीन यांनी एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चलन असावे अशी मागणी केलेली आहे.
2016 पासून चीनचे renminbi हे चलन वरील चलनांच्या पंक्तीत जाऊन बसलेले आहे. परंतु अजूनही ते पूर्णपणे जागतिक नाही.
डॉलर क्र. १ चे जागतिक चलन का झाले वगैरेचा इतिहास इथे थोडक्यात चांगला दिला आहे :
https://www.thebalancemoney.com/world-currency-3305931#:~:text=A%20globa....
सरकारशी हातमिळवणी केलेले काही
सरकारशी हातमिळवणी केलेले काही उद्योगपती सोडले तर कोणी गंमत म्हणून कंपन्या दिवाळखोरीत काढत नाहीत. त्याचेही परिणाम असतात. पुन्हा कर्ज, गुंतवणूक मिळणे अवघड होते. ते देणारे लोक/संस्था/बँका अशा कंपन्यांचे संचालक, अध्यक्ष बदलायची मागणी करतात. त्यांच्याही नोकर्या जातात. मुळात कंपन्या म्हणजे कोणीतरी रिस्क घेउन, जीवनातील काही वर्षे त्यात गुंतवून केलेला उद्योग असतो. त्यांना रिस्क जास्त, व फायदाही जास्त. तुलनेने कामगार्/नोकरवर्गाचा रिस्क कमी असतो. त्यांची मेहनत वगैरे असते, पण तशी ती मालकांचीही असते.
ते नको असेल तर त्यांनी नोकरी करण्यापेक्षा कंपन्या काढाव्यात. रिस्क घ्यावा. काही ते ही करतात. पण मग नंतर ते ही या वरच्या मालकांसारखेच वागतात.
उद्योगपतींची वैयक्तिक मालमत्ता कधीच धोक्यात नसते. "लिमिटेड लाएबिलिटी"च्या नियमामुळे ती सुरक्षित असते. पण त्याचबरोबर पाहिजे तेवढा नफाही ते स्वतःकडे वळवू शकत नाहीत. कंपनीच्या संचालकांच्या मर्जीवर ते असते. एखादा संस्थापक मनमानी करेलही पण त्याचा त्या उद्योगाच्या यशात तितका वाटा असेल तरच इतर लोक ते चालवून घेतात. नाहीतर कधीच हाकलून देतात.
@ Hemant 33
@ Hemant 33
काही वेगळ्या देशांबद्दल इथे माहिती आहे
भारत-रशिया रुपयांमध्ये व्यापार करण्याबाबत
https://economictimes.indiatimes.com/news/economy/foreign-trade/india-to...
ऑस्ट्रेलिया कॅनडा व साउथ कोरियाच्या करन्सी त व्यापार करण्याबाबत
https://www.imf.org/en/Blogs/Articles/2022/06/01/blog-dollar-dominance-a...
छान.
छान.
यु एस डॉलर्सवरचे अवलंबित्व कमी करण्याचे हे प्रयत्न दिसत आहेत.
टंचाई आहे दोन देश त्रस्त आहेत
टंचाई आहे दोन देश त्रस्त आहेत.
आणि एकमेका कडे दोघांची गरज भागेल असे गरजेचे सामान आहे.
मग कशाला हवा डॉलर .
दोन देश सहमती नी योग्य त्या चलनात व्यवहार करू शकतात.
डॉलर चा भाव वाढला म्हणून अन्न धान्य टंचाई .
हे कारण ही एक सबब झाली.
हेमंत
हेमंत
मी वर दिलेल्या तो दुवा तुम्ही नीट वाचलात का ?
समजा, A या देशाला व्यापारात B देशाचे चलन प्रथमच स्वीकारायचे असेल तर A त्याची आंतरराष्ट्रीय स्थिरता बघणार ना !
ती न बघता जर त्याने व्यापार केला आणि त्याने स्वीकारलेल्या चलनाचे बाजारमूल्य कोसळले तर मोठा फटका बसेल.
अनेक वर्षांच्या आंतरराष्ट्रीय अनुभवावरून सध्याची तीन व्यापार चलने प्रस्थापित झालेली आहेत.
म्हणून प्रत्येक देश त्यांचा साठा करतो ( reserve currency).
....
अभ्यासू लोक अधिक योग्य प्रकारे सांगू शकतील.
गरज भागवणे आणि व्यापार करून
गरज भागवणे आणि व्यापार करून नफा कमावणे .
ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.
साधं उदाहरण.
आपण दोघे शेजारी आहोत.
दोघांना चहा बनवायचं आहे.
पण माझ्या कडे साखर खूप आहे.पण चहा पावडर नाही.
तुमच्या चहा powder आहे पण साखर नाही.
दोघांची गरज भागेल अशा वस्तू आपल्या दोघांकडे आहेत.
बाहेरून म्हणजे तिसऱ्या देशातून साखर आणि चहा पावडर विकत घ्यावी लागेल आणि त्याला चलन लागेल.
पण मी तुम्हाला साखर दिली आणि तुम्ही मला चहा powder दिली तर दोघांची गरज भागते आहे.
आणि चलनाची गरज नाही.
स्वतःच्याच चलनात आपण त्या वर फायदा मिळवू शकतो.
अजून चार माणसांना तुम्ही आणि मी चहा पाजून पैसे कमवू शकतो.
कशाला हवं चलन
पण मी तुम्हाला साखर दिली आणि
पण मी तुम्हाला साखर दिली आणि तुम्ही मला चहा powder दिली तर दोघांची गरज भागते आहे.
>>>> चहाची गरज भागली हे बरोबर.
परंतु सर्व गरजा भागणार नाहीत ना, फक्त एका देशाशी संबंध ठेवून.
१००% स्वावलंबी/ स्वयंपूर्ण असा कोणता देश असू शकेल का ? मला नाही वाटत.
असेल तर उत्तमच
वस्तुविनिमयात अडचणी असतात
वस्तुविनिमयात अडचणी असतात म्हणून तर चलन वापरात आलं. माझ्याकडे साखर , पण मला चहा नको, दूध हवं. मग काय करायचं?
मी टंचाई ग्रस्त स्थिती मध्ये
मी टंचाई ग्रस्त स्थिती मध्ये असताना.
असे व्यवहार करावेत असे बोलत आहे.
. मुंबई मध्ये महापूर आला अन्न मिळणे मुश्कील झाले जे पाण्यात अडकले होते त्यांना.
तेव्हा सर्वांना वडापाव आवडत होता.
अन्न म्हणून फक्त वडा पाव च उपलब्ध होता.
शेवटी जगणे महत्वाचे.
टंचाई ग्रस्त स्थिती असेल तर कोणी दूध असेल तर च चहा पिवू असा हट्ट कोणी करणार नाही
अमेरिकेने इराणवर निर्बंध
अमेरिकेने इराणवर निर्बंध घातले होते तेव्हा भारताने तेलासाठी इराणला रुपयांत पेमेंट करायचा प्रयत्न केला. ते पैसे वापरून इराण तांदूळ, इ. आयात करीत असे. पण आपली निर्यात आयातीपेक्षा कमी असल्याने डॉलर पेमेंट करणे भाग होते.
Pages