झिम्बाब्वे

(१०, ००, ००,००, ००, ००,०००) : अबब आणि अरेरे !

Submitted by कुमार१ on 9 October, 2022 - 21:59

मागच्या महिन्यातल्या एका रविवारच्या संध्याकाळी धोधो पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातच अडकून पडलो होतो. आंतरजालावर पुरेसे बागडून कंटाळा आला होता. मग वेळ घालवायचा म्हणून छापील इंग्लिश वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी बारकाईने पाहू लागलो. त्यातला एक लेख दुबईबद्दल होता. त्या शहराची अनेकविध वैशिष्टे सांगितल्यावर तिथल्या एका संग्रहालयाचा त्यात उल्लेख होता. त्यामध्ये सर्व देशांच्या आतापर्यंत छापल्या गेलेल्या चलनी नोटांचे प्रदर्शन आहे. त्यात जगभरातील जवळजवळ सर्व नोटा असून ‘त्या’ जगप्रसिद्ध १००ट्रिलियन झिंबाब्वे डॉलर किमतीच्या नोटेचाही समावेश आहे. हे वाचून स्तिमित झालो.

Subscribe to RSS - झिम्बाब्वे