
मागच्या महिन्यातल्या एका रविवारच्या संध्याकाळी धोधो पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातच अडकून पडलो होतो. आंतरजालावर पुरेसे बागडून कंटाळा आला होता. मग वेळ घालवायचा म्हणून छापील इंग्लिश वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी बारकाईने पाहू लागलो. त्यातला एक लेख दुबईबद्दल होता. त्या शहराची अनेकविध वैशिष्टे सांगितल्यावर तिथल्या एका संग्रहालयाचा त्यात उल्लेख होता. त्यामध्ये सर्व देशांच्या आतापर्यंत छापल्या गेलेल्या चलनी नोटांचे प्रदर्शन आहे. त्यात जगभरातील जवळजवळ सर्व नोटा असून ‘त्या’ जगप्रसिद्ध १००ट्रिलियन झिंबाब्वे डॉलर किमतीच्या नोटेचाही समावेश आहे. हे वाचून स्तिमित झालो. कित्येक दिवसांनी एवढी मोठी संख्या ऐकली होती. आपल्या नेहमीच्या आर्थिक व्यवहारात दशलक्षच्या पुढे मोजायची वेळच येत नाही ! अगदी भारतीय लोकसंख्येबाबत बोलताना सुद्धा (दीड) अब्ज ही मर्यादा असते. हा अंक तर त्याच्याही पुढे पळत होता. मग गंमत म्हणून ही मोठी संख्या कागदावर लिहून काढली :
१००, ०००,०००,०००,०००
मराठी अंकमोजणीनुसार या संख्येला दशपद्म म्हणतात (चढती अंकमोजणी अशी : अब्ज, दशअब्ज , खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म.).
आतापर्यंत मी पाहिलेली भारताची सर्वाधिक मूल्याची नोट २,००० रु. ची. माझ्या लहानपणी मी दहा हजार रुपयांची नोट असल्याचे ऐकले होते पण नंतर १९७८मध्ये ती रद्द झाल्याने बघायला काही मिळाली नव्हती. अर्थशास्त्राचा माझा काही अभ्यास नाही. परंतु वरची झिम्बाब्वेची महाकाय रकमेची नोट त्या देशातील चलनाचे प्रचंड अवमूल्यन झाल्याचे सुचवते इतपत समजले. मग या विषयावरील कुतूहल चाळवले गेले. आर्थिक मागास देशांच्या चलनी इतिहासावर एक धावती नजर टाकली. तेव्हा लक्षात आले की वरील दशपद्मच्या झिम्बाब्वेच्या नोटेने चलनांच्या अवमूल्यन इतिहासात एक विक्रम घडवलेला आहे !
बरं, जेव्हा ती नोट वापरात होती तेव्हा तिचे बाजारमूल्य तरी काय असावे ? एखाद्याला वाटेल की त्या एका नोटेत एखादी लहानशी कार किंवा गेला बाजार, एखादी स्कूटर तरी येत असेल. पण छे ! तेवढ्या रकमेत जेमतेम ब्रेडचे एक पुडके किंवा सार्वजनिक बसचे शहरांतर्गत प्रवासाचे एक तिकीट येत होते !!
...
आता झिम्बाब्वेच्या 1980 ते 2009 पर्यंतच्या चलन इतिहासावर एक नजर टाकू. 1980मध्ये तिथे पूर्वीचा ह्रोडेशियन डॉलर रद्द करून त्या जागी झिंबाब्वे डॉलर ( ZWD) हे चलन अस्तित्वात आले. तेव्हा त्याचे अमेरिकी डॉलरशी १:१ असे समकक्ष नाते होते. सन 2000 पर्यंत हे चलन ठीक चालले. परंतु त्यानंतर मात्र तिथे प्रचंड चलनफुगवटा (hyperinflation) होत गेला. परिणामी त्यांच्या चलनाचे नीचांकी अवमूल्यन झाले. २००६-०९ च्या दरम्यान त्या चलनाचे तीनदा पुनर्मूल्यांकन केले गेले. तेव्हाच वर उल्लेखलेली दशपद्म ZWD ची नोट छापली गेली. अखेर एप्रिल 2009 मध्ये त्यांचे हे चलन पूर्णपणे रद्द करण्यात आले. त्यानंतरचा चलन इतिहास लेखाच्या कक्षेबाहेर आहे.
ही सर्व माहिती संदर्भातून वाचता वाचताच मला पूर्वायुष्यातील एक प्रसंग आठवला- साधारण 2007 चा. तेव्हा माझे वास्तव्य परदेशात होते. तिथल्या आमच्या रुग्णालयात ८५ देशांचे डॉक्टर्स एकत्र काम करीत होते. त्यातले एकजण झिम्बाब्वेचे नागरिक होते. परंतु गेली 20 वर्षे ते अन्य देशांतच स्थिरावले होते. एकदा असेच आम्ही काहीजण चहापानासाठी एकत्र बसलो होतो. गप्पा मारताना गाडी विविध देशांच्या चलनाच्या विनिमय दरावर आली. मग प्रत्येक जण आपापल्या देशाच्या चलनाचा अमेरिकी डॉलरशी विनिमय दर सांगत होता. शेवटी या झिम्बावेच्या डॉक्टरांची पाळी आली. प्रथम ते कसेनुसे हसले. एखादा नापास विद्यार्थी जसे आपले गुण सांगायला अनुत्सुक असतो तसा त्यांचा चेहरा भासला. मग ते म्हणाले,
“मी जर माझी बचत झिंबाब्वे डॉलर्समध्ये रूपांतरित केली तर मला अक्षरशः पोतंभर पैसे मिळतील ! पण उपयोग काय त्या पैशांचा ? ते सगळं अवमूल्यित चलन आहे. तेव्हा मी तो नाद सोडला आहे. मी आता माझी सर्व बचत अमेरिकी डॉलर्समध्येच बँकेत ठेवतो”.
आज १०दशपद्म च्या नोटेसंबंधी वाचल्यावर मला त्यांच्या तेव्हाच्या उद्गारांचा खरा अर्थ समजला.
…
जेव्हा या मोठ्या चलनाच्या नोटा छापायची वेळ सरकारवर आली तेव्हाची झिम्बाब्वेची अवस्था दारूण झालेली होती. तिथल्या मध्यवर्ती बँकेला ज्या कागदावर चलन छापायचे तो कागद देखील परवडत नव्हता दुकानदार एकाच दिवसात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दुप्पट करून टाकत. लोकांना खरेदीला जाताना या नोटा अक्षरशः टोपलीत भरून नव्या लागत. ! राष्ट्राध्यक्षांनी विविध वटहुकूम काढून किमती नियंत्रणात ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
अशा प्रकारे नागरिकांमधील असंतोष शिगेला पोहोचला होता. विविध निषेधाचे फलक हातांत घेऊन लोकांचे देशभर मोर्चे निघायचे. त्यातला एक फलक लक्ष्यवेधी होता :
“आम्ही अब्जाधीश भिकारी आहोत”
2009 मध्ये या चलनाचा अमेरिकेशी अमेरिकी डॉलरची असलेला विनिमय दर हास्यास्पद पातळीवर उतरला होता :
१अमेरिकी डॉलर = (३४ अंकी संख्या) ZWD.
या सर्व कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीचा शेवट हे चलन रद्द करण्यात झाला. त्यानंतर तिथे अमेरिकी डॉलर आणि दक्षिण आफ्रिकी रँड ही चलने मुख्यत्वे वापरात आली.
झिंबाब्वे डॉलर्सचे निश्चलनीकरण पूर्ण झाल्यानंतर देशभर साठलेल्या त्या नोटांना पाय फुटले. अनेक बँकर्स व दलालांनी त्या परदेशातील आपल्या ओळखीच्या व्यक्तींना देऊन टाकल्या. आता वस्तुसंग्राहक जमातीचे या नोटांकडे लक्ष गेले नसते तरच नवल ! अशा शौकिनांकडून या बाद झालेल्या नोटांना मागणी येऊ लागली. मग त्या नोटा पुरवणारे देखील हुशार झाले. शालेय विद्यार्थ्यांपासून ते मुरलेल्या दलालांपर्यंत अनेकांनी या नोटा चढत्या भावाने विकण्यास सुरुवात केली. १-२ अमेरिकी डॉलरला ती नोट घेऊन विविध देशांमध्ये जास्तीत जास्त रकमेला विकण्याची चढाओढ सुरू झाली. इंग्लंडमधील एका पिता-पुत्रांनी याचा जोरदार धंदा केला आणि अल्पावधीतच त्यांनी त्यातून तब्बल १५००% टक्के नफा कमावला. तर काही गुंतवणूक सल्लागारांनी त्यांच्या अशिलांना ही नोट दाखवून चलनाचे अवमूल्यन म्हणजे काय ते समजावून दिले आणि योग्य त्या गुंतवणुकीचे महत्त्व पटवले.
जगातील काही संग्रहालयांनी देखील ही ऐतिहासिक नोट जतन केलेली आहे. सध्या ही नोट काही इ-विक्री संस्थळांवर उपलब्ध आहे. ‘ॲमेझॉन’ वर ही एक नोट US $200 ला विक्रीस ठेवलेली आहे.
....
या ऐतिहासिक चलनाचा एक मजेशीर उपयोग अमेरिकेत केला जातो. तिथे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात विचित्र आणि विनोदी संशोधनासाठी ‘अज्ञान नोबेल पुरस्कार’ दिले जातात (https://www.maayboli.com/node/71538). त्यातील विविध विजेत्यांना १ पद्म झिंबाब्वे डॉलर्सची नोट समारंभपूर्वक भेट दिली जाते. २००९चे अंकगणिताचे अज्ञान नोबेल पारितोषिक तर चक्क झिम्बाब्वेच्या रिझर्व बँकेचे तत्कालीन गव्हर्नर Gideon Gono यांना देण्यात आले.
“त्यांनी केलेल्या नीचांकी अवमूल्यनामुळे सामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारात महाप्रचंड अंकांशी खेळण्याची संधी सहज मिळाली”.
असे मानपत्र देऊन गौरव समितीने त्यांचा सत्कार केला !!
Gono यांनी त्यांच्या या ‘संशोधनाची’ कारणमीमांसा करणारे हे पुस्तक लिहीले आहे :
Zimbabwe’s Casino Economy — Extraordinary Measures for Extraordinary Challenges.
दारूण अर्थव्यवस्थेचे प्रतीक असलेल्या झिम्बाब्वेच्या ऐतिहासिक चलनाची अशी ही कहाणी.
.....................................
१. मराठी अंकमोजणी संदर्भ : https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4...
२. चित्रे जालावरून साभार !
He असे अर्थ व्यवस्थेचे तीन
He असे अर्थ व्यवस्थेचे तीन तेरा वाजने हे राज्य कर्त्यांचेच पाप असते.
आर्थिक शिस्त न पाळणे.
कोणत्या ही वास्तू ची,सेवेची,एक ठराविक च किंमत असते ती उत्पादन मूल्य किंवा निर्माण होणाऱ्या वस्तू पासून चा फायदा ह्याच्या शी निगडित असते.
हे गणित बिघडले
2 रुपयाची वस्तू 200 रुपयांना विकली गेली.
तर 198 रुपये चा खड्डा हा पडणार च आज नाही तर उद्या.
स्किल किंवा शरिरक कष्ट करून दहा रुपये च निर्माण होत असतील आणि त्या साठी 15 रुपये खर्च झाले तर 5 रुपयाचं खड्डा पडणार च आज नाही तर उद्या
सत्ता धारी लोकांचे पाहिले कर्तव्य आहे आर्थिक शिस्त.
सरकारी पैसा उडवायचा नाही त्याच योग्य वापर योग्य ठिकाणीच करायचं
ज्या देशाचे राज्य करते सजक,हुषार,देश प्रेमी ,निष्ठावान असतात ते देश कधीच आर्थिक संकटात सापडत नाहीत
हेमंतभौ, तुमचे इच्चार लय
हेमंतभौ, तुमचे इच्चार लय उच्च आहेत. पन ते भांडवलशाहीची गाडी त्याच्यावर नाही ना पळू शकत. तिला ते संपत्तीचे पेट्रोल लागतच बघा.
चलनाचे इतके अमूल्य झिंबावे
चलनाचे इतके अमूल्य झिंबावे मध्ये झाले म्हणजे हाड पण चघळून खाल्ली भांडवलदार आणि सत्ता धारी लोकांनी.
आणि देश सोडून अगोदर च पसार झाले असणार.
झिम्बावे चलनाचे दुसऱ्या चलनात रूपांतर करून..
जग भर अशा लोकांना शोधून काढावे.
ज्यांनी चलनाचे दुसऱ्या देशाच्या चलनात मोठ्या प्रमाणात विनिमय केला आहे
हेच आर्थिक संकटाचे निर्माते आहेतं
मुळात सोनं हे अर्थव्यवस्थेशी
मुळात सोनं हे अर्थव्यवस्थेशी कसे जोडले गेले याच्या काही कथा आहेत. त्यापैकी युरोपमधील एक रंजक आहे.
इसवी सन १५१९ मध्ये स्पेनच्या सैन्याने मेक्सिकोवर आक्रमण केले. तिथला प्रदेश त्यांनी पादाक्रांत केला. त्यानंतर त्यांनी स्थानिक प्रदेशात सोन्याचा शोध चालू केला. तिथले स्थानिक Aztec रहिवासी होते. त्यांना त्याचे खूप नवल वाटले. या धातूचा उपयोग ना खाण्यापिण्यासाठी ना शस्त्रे बनवण्यासाठी. मग हे बाहेरचे लोक एवढा अट्टहास का करत आहेत, हे त्यांना काही समजेना.
मग त्यांनी स्पेनच्या कप्तानाला विचारले, की तुम्हाला या पिवळ्या धातूत एवढा रस का आहे? याच्यावर त्याने सांगितले, की आमचे लोक हृदयविकाराने त्रस्त झाले आहेत आणि हा विकार फक्त सोन्याच्या वापरानेच बरा होतो !
(प्राचीन वैद्यकात विविध सुवर्णोपचार आहेत. आधुनिक वैद्यकातही सोने-क्षारांचा वापर RA या संधिवातासाठी काही काळ होत होता).
…. कालांतराने तो मौल्यवान धातू झाला. इ.स. पूर्व ६४० मध्ये प्रथम सुवर्णनाणी पाडली गेली.
सोने हा खरेच अमूल्य धातू आहे
सोने हा खरेच अमूल्य धातू आहे.अनेक क्षेत्रात त्याचा वापर आहे..
आणि दुर्मिळ पण आहे.
दागिने बनवणे हा काही त्याचा खरा उपयोग नाही.
कागदी चलन ही अशी एकमेव वस्तू असावी तिच्या उत्पादन खर्चापेक्षा तिची किंमत खूप जास्त ठरवली गेलेली असते.
चलनी नोटा ना तसे कोणतेच मूल्य नसते त्या काही कामाच्या नसतात
विनिमय मान्यता नसेल तर
l Inflation Rises To 7.41% In
Inflation Rises To 7.41% In September, Highest Since April.
काय होणार आहे आपले?
ठेवी वरील व्याजा पेक्षा जास्त
ठेवी वरील व्याजा पेक्षा जास्त टक्के वारी नी कर आकारणी जे सरकार करते ते योग्य आहे की अयोग्य.
Dry cleaning साठी कपडे दिले आणि त्याचा खर्च ३५० रुपये असेल तर ७० रुपये (cgst ,sgst मिळून ) gst सरकार वसूल करते.
इतक्या टक्के नी वसुली अर्थ शास्त्रात बसते का?
>>>काय होणार आहे आपले?>>>
>>>काय होणार आहे आपले?>>>
भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा रेपो दरात वाढ केली
जगातील अनेक देशांमध्ये महागाई शिगेला पोचली आहे.
सर्वाधिक महागाई असलेल्या १२ देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे.
https://maharashtratimes.com/business/business-news/12-countries-in-high...
>>>काय होणार आहे आपले?>>>
>>>काय होणार आहे आपले?>>>
भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा रेपो दरात वाढ केली
जगातील अनेक देशांमध्ये महागाई शिगेला पोचली आहे.
सर्वाधिक महागाई असलेल्या १२ देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे.
https://maharashtratimes.com/business/business-news/12-countries-in-high...
महागाई लं प्रचंड प्रमाणात
महागाई लं प्रचंड प्रमाणात सरकार ने कर आकारणे हे पण कारण आहे..
वर एक उदाहरण दिले च आहे.
Gst महागाई वाढण्यास कारणीभूत आहे.
असे मला तरी वाटत
पेट्रोल ,डिझेल chya किंमती सरकारी करा मुळेच प्रचंड वाढल्या आहेत.
दुखणं एका ठिकाणी आणि उपचार दुसऱ्याच ठिकाणी सरकार करत आहे.
कंपन्या काय करतात खर्च कमी
कंपन्या काय करतात खर्च कमी करतात.
आपण पण तेच करायचे असते जेव्हा मंदी येईल आणि आपला इन्कम कमी होईल असा अंदाज आला की.फालतू खर्च पूर्ण बंद,गरजेच्या खर्चात पण शक्य होईल इतकी काटकसर.
चार तास एसी वापरत असाल तर दोन च तास वापरणे.
गरजा कमी करणे,बचत वाढवणे.
महागाईचे मुख्य कारण आहे कि
महागाईचे मुख्य कारण आहे कि इकॉनमी मध्ये पैशाचा पुरवठा वाढला पण त्या मानाने वस्तूचे उत्पादन /पुरवठा नसेल तर मालाच्या किमती वाढतात. Too much money chasing too few goods गेल्या एक दोन वर्षात सरकारने आर्थिक प्रगती व्हावी म्हणून चलन पुरवठा वाढवला. तो सगळा पैसा शेअर मार्केट मध्ये गेला आणि इंडेक्स दे दणादण वाढत गेला, तेव्हा सरकार मजा बघत होते, आता भोगा त्याची फळंं! इकॉनमी हि मोठ्या दगडासारखी असते, तो दगड डोंगरावर न्यायला अथक परिश्रम करावे लागतात. पण जरा जरी दुर्लक्ष झाले तर तो दगड एका क्षणात गडगडत पायथ्याशी जातो.
**इकॉनमी हि मोठ्या दगडासारखी
**इकॉनमी हि मोठ्या दगडासारखी असते
>>> ही उपमा आवडली.
आपण पण रुपया ऐवजी पैसे वापरले
आपण पण रुपया ऐवजी पैसे वापरले तर 1000 रुपयांसाठी एक लाख पैसे घेवुन जावे लागले असते.
सर्वात मोठे नाणे म्हणजे 50 पैसे म्हणजे 50 पैसे ची 2000 नाणी लागली असती दीड किलो तूप घेण्यासाठी किंवा 10 ltr petrol साठी.
एक नाणे 2 ग्राम वजनाचे पकडले तरी 4 kg वजनाचं चलन लागले असते.
डोक्यावर पाटी मध्येच पैसे घेवून बाजारात जावं लागले असते.पाच दहा हजार रुपयांच्या खरेदी साठी.
मुंबई मध्ये वडापाव विकणाऱ्या व्यक्ती पा पण टेम्पो करावा लागला असता दिवसाचा गल्ला घरी घेवून जाण्यासाठी
जपानच्या येन या चलनाचे
जपानच्या येन या चलनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे दोन प्रकारचे उपविभाग आहेत :
Sen = 1/100 of the yen
Rin = 1/1,000 of the yen
पण प्रत्यक्षात रीन चा वापर होतो की नाही याची कल्पना नाही
**इकॉनमी हि मोठ्या दगडासारखी
**इकॉनमी हि मोठ्या दगडासारखी असते >> +१ , जेवढा मोठा देश तेवढा मोठा दगड .
जपान मध्ये सेन , रीन वापरात नाही, १०० येन ला पण खुप कमी किंमत आहे, ट्रेन मध्ये कमित कमी १५० येन चे तिकिट आहे.
कुठल्याही देशाचे चलन हे त्याचा आयात - निर्यात मधिल तफावत झाल्यास त्याची किंमत कमी जास्त होते. झिंब्बावे ने त्याचे चलन अमेरिकन डॉलरशी पेग केल्याने आयात खुप वाढली आणि निर्यात कमी झाली त्यामुळे त्या देशाची करंसी ची किंमत कमी झाली. श्रीलंकेमध्ये पण आयात निर्यातापेक्षा खुप वाढल्याने त्याचा रुपयाची पत कमी झाली आणि झिंब्बाबे च्या दिशेने वाटचाल सुरु केली. पण वेळीच पेट्रोल -डिझेल वर प्रति गाडी विक्रीवर बंधने आणुन रुपयाला सध्या तरी ३६० वर ठेवले आहे. पेट्रोल- डिझेल वर ओपन मार्केट मध्ये विकण्यास बंदी आणल्याने आयात कमी झाली आणि आयात- निर्यात मधील अंतर कमी झाले.
साहिल
साहिल
छान माहिती दिलीत.
धन्यवाद ! तुमचा चांगला अभ्यास दिसतो आहे.
तुम्ही माझ्या वरील १००० :१ असे चलन ( ५ देशांचे) का, याचे उत्तर सांगू शकाल
व्यावहारिक रोज च्या दैनंदिन
व्यावहारिक रोज च्या दैनंदिन जीवनात येणारे अनुभव आठवले आणि थोडा विचार केला तरी अर्थ शास्त्र समजून येईल.
त्या साठी कठीण अर्थ शास्त्राचे किचकट नियम पाठ करायची गरज नाहीं
आयात वाढली की चलनाचे चे दर उतरतात .
असे काही नाही
अनेक कारणं पैकी ते एक कारण आहे.
असे अनेक देश आहेत तिथे सर्व च आयात होते पण चलन strong आहे.
पर्यटन , service sector मध्ये प्रगत असणारे देश त्याच प्रकारात आहेत.
निर्यात न करता पण खूप मोठे परकीय चलन त्यांना मिळते
१००० :१ असे चलन असण्यासाठी
१००० :१ असे चलन असण्यासाठी काही उत्तर नाही. मला वाटते त्याचा चॉईस असावा. भारतात पण दशमान पध्दत येण्यापुर्वी १६ आणे = १ रुपया होता . ब्रिटन मध्ये पण दशमान पध्दत येण्यापुर्वी पाउड, शिलिंग ( २० शिलिंग = १ पाऊड ) आणि १२ पेन्स म्हणजे १ शिलिंग होता.
हेंमत३३: तुमचे बरोबर आहे , आयात -निर्याती बरोबर पर्यटन, शिक्षण आणि परदेशी नोकरी ह्या सर्वाचा चलनावर परिणाम ठरतो. मालदिव सारखे छोटे देश निर्यात खुप कमी करतात पण आयातीला लागणारे चलन हे मुख्यतः पर्यटनातुन येते. देशात येणारा पैसा हा जाण्यारा पैस्यापेक्षा जास्त झाल्यास चलनाची पत कमी होते.
आभार !
आभार !
......
आखाती देश आणि भारतीय रुपया यांच्या विनिमय दरासंबंधी बऱ्याच लोकांमध्ये एक गैरसमज आढळतो. यासंबंधीचा एक मजेदार किस्सा सांगतो.
मी शिकत असताना माझ्याबरोबर एक केनियाचा विद्यार्थी होता तो म्हणाला, “शिक्षण पूर्ण झाल्यावर माझं ठरलंय, कुवेतमध्ये जाणार मी.”
म्हटलं, चांगलय. पण तेच का ?
तो म्हणला, कुवेती दिनार हे सर्वात श्रीमंत चलन आहे: डॉलर व पौंडापेक्षाही भारी !
तेव्हा माझा यात फारसा अभ्यास नव्हता. बरं म्हटलं.
आता आपण जर त्या देशांच्या चलनांवर नजर टाकली तर आजच्या भारतीय रुपयाशी (फक्त पूर्णांकात) विनिमय दर असा:
यु ए ई २२
सौदी २२
कतर २३
आणि आता ..
ओमान २१४
कुवेत २६५ .
आता गंमत अशी आहे :
जे लोक ओमान व कुवेत चे १००० : 1 हे नातं लक्षात घेत नाहीत त्यांना तो 265 आकडा म्हणजे लय भारी वाटतो !
जेव्हा आपण ते १००:१ असे समकक्ष करून घेऊ, तेव्हा तो दर बाकीच्या आखाती देशांच्या जवळपासच येतो ( २१.४ व २६.५ )
सोन्याचा भाव आज चा भारतात
सोन्याचा भाव आज चा भारतात 52000 हजार आणि अमेरिकेत 45000 भारतीय चलनात च्या आसपास आहे म्हणजे खूप मोठा फरक नाही.
म्हणजे 1 डॉलर बरोबर 82 रुपये ह्याचा काही सबंध नाही
डॉलर चा विनिमय दर सोन्याच्या दरा शी
संबंधित असावा.
असे वाटत
Invest ment वर योग्य रिटर्न
Invest ment वर योग्य रिटर्न नाही मिळाले की अर्थव्यवस्था कमजोर होते.
पुण्यात 25 लाख चा फ्लॅट घेवून पाच हजार भाडे मिळत असेल तर तो फ्लॅट घेणाऱ्या व्यक्ती ची आर्थिक स्थिती बिघडते.
25 लाख ही अयोग्य किंमत असते .फुगा असतो.
हेच देशा विषयी पण घडते..
श्रीलंका असू किंवा ब्राझील ह्यांनी कर्ज घेवून नवीन उद्योग चालू केले,नवीन infra निर्माण केले.
परदेशी पैसा कर्ज रुपात आला .
अर्थ व्यवस्था खूप सुधारली लोकांकडे पैसा आला.
पण परत फेड करायची वेळ आली तेव्हा ते प्रोजेक्ट काहीच उत्पादन देण्याच्या लायकीचे नव्हते हे माहीत पडले किंवा.
प्रमाण पेक्षा जास्त पैसे त्या प्रोजेक्ट वर खर्च केले गेले.
मग परतफेड कशी करणार .घ्या अजून कर्ज हे चक्र सुरू.
आणि शेवटी सत्यानाश.
हेच घडले आहे ह्या देशात.
ओमानी रियाल १००० baisa चा
ओमानी रियाल १००० baisa चा असण्याने त्याचे रुपयांतले मूल्य बदलत नाही. ते त्यांचे अंतर्गत चलन आहे.
असे पण वाचले आहे.
असे पण वाचले आहे.
ज्या देशांना परकीय चलन मिळण्याचे कोणतेच साधन नाही त्यानी काय करावे उत्तर मिळाले
अशी पण बँकिंग व्यवस्था आहे तिथे तुम्ही तुमचे चलन युरो मध्ये परावर्तित करू शकता.
म्हणजे भारतीय पैसे ठेवा.
युरो चलन तुम्हाला दिले जाईल.
युरो डॉलर,युरो येन, युरो रुबेल अशा प्रकारात .
व्यापार वाढण्यास ही सुविधा उत्तम आहे.
पण जागतिक व्यापार त्या मुळे युरो मध्येच होतो हा युरोपियन देशांचा फायदा.
अगदी बरोबर.
भरत
अगदी बरोबर.
म्हणून ओमान व कुवेत मधले पगार जर चार अंकी असतील, तर समकक्ष कामाचे बाकीच्या आखाती देशांमध्ये ते पाच अंकी असतात.
परंतु हे माहीत नसलेले माझ्या परिचयाचे बरेच लोक आहेत
अर्थ शास्त्र चे काही नियम खूप
अर्थ शास्त्र चे काही नियम खूप फसवे असतात.
मागणी किती आहे ह्या वर वस्तूचा दर असतो.
ह्याचे अनेक खरे अर्थ.
1,) मागणी जास्त आणि पुरवठा कमी.
२)Monopoly काही मोजकेच लोक ते निर्माण करतात (इथे सरकारी परवानग्या हा घटक कार्यरत असतो)
३) वस्तू लपवून ठेवणे, साठा करून ठेवणे आणि तुटवडा निर्माण करणे.
असे अनेक प्रकार आहेत..
पण भांडवल वादी अर्थ शास्त्राचा एकच नियम सांगतात .
मागणी जास्त पुरवठा कमी.
फसवा अर्थ शास्त्रीय नियम.
उत्पादक खर्चावर काही टक्के नफा पकडुन च त्या वस्तू ची किंमत जगात असावी. तसा कायदाच करावा. तुटवडा असेल तरी.
मला नाही वाटत त्या नंतर आर्थिक संकट जगात येतील .आणि महागाई वाढेल चलन परिवर्तन करावे लागेल.
उत्पादक खर्चावर काही टक्के
उत्पादक खर्चावर काही टक्के नफा पकडुन च त्या वस्तू ची किंमत जगात असावी. तसा कायदाच करावा. तुटवडा असेल तरी.>>>
हा इथेच तर ग्यानबाची मेख आहे!
इथूनच काळ्या बाजाराची सुरवात होते. उत्पादन वाढवणे हाच ह्यावरचा खरा उपाय आहे. आपण गेली सत्तर वर्षे हेच बघत आहोत.
मला covid ची लस उत्पादित
मला covid ची लस उत्पादित करायची आहे.
देतील का करून.
नाही देणार.
मला घरी वीज निर्मिती करायची आहे आणि त्याचे वितरण पण करायचे आहे देतील का करून.
नाही.
उत्पादन करणे हीच एकाधिकार शाही असेल तर उत्पादन वाढवणार कोण.
ओपेक नी पेट्रोल ,डिझेल चे कमी उत्पादन घेतले आणि भाव वाढले तर
डिझेल ,पेट्रोल उत्पादन घेणे शक्य च नाही तर उत्पादन वाढवणार कोण.
महाराष्ट्र नी ठरवले की स्वतःची रेल्वे खेड्या padyat चालू करावी.
रस्ते बांधणी पेक्षा रेल्वे लाईन टाकणे स्वस्त पडेल.वीज तर आहेच
देतील का करून.
नाही.
केशव कुल तुम्ही कागदावरच असलेले नियम सांगत आहात
व्यवहारात तसे घडत नाही
पण भांडवलवादी अर्थ शास्त्राचा
पण भांडवलवादी अर्थ शास्त्राचा एकच नियम सांगतात .
>>>
माझा यातला मूलभूत अभ्यास नाही. वरील चर्चेतून समजून घेतोय.
दरम्यान हे वाचनात आले :
‘मार्क्स इन सोहो’ या नाटकातला उतारा :
....या व्यवस्थेत स्वतः माणूसच एक क्रयवस्तू होतो. केवळ कारखान्यातील कामगारच नव्हे, तर डॉक्टर, वैज्ञानिक, वकील, कवी, चित्रकार सर्वांना जगण्यासाठी स्वतःचे श्रम विकून टिकून राहावे लागते. पण आपल्या सर्वांचा शत्रू हा एकच आहे, ही गोष्ट जेव्हा सर्वांच्या लक्षात येईल, तेव्हा सर्व जण एकत्र येतील.
भांडवलशाहीला जागतिक बाजारपेठ हवी असते. अधिकाधिक फायदा मिळवण्यासाठी मुक्त बाजारपेठ हा तिचा आक्रोश असतो. या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये भांडवलशाही अनिश्चेने का होईना, एक जागतिक संस्कृती निर्माण करत आहे. मानवी इतिहासामध्ये ही कधीही न घडलेली गोष्ट आहे. आज कल्पनेच्या पलीकडे जगातील लोक अनेक देशांच्या सीमा ओलांडत आहेत. ते आपल्याबरोबर विचारदेखील घेऊन जातात. यातून विचारांची देवाणघेवाण होते. नव्या गोष्टींची निर्मिती होते. ही एक अपरिहार्य गोष्ट आहे…..
https://www.aksharnama.com/client/article_detail/6361
हेही समजून घेतोय हळूहळू ....
५ G सेवा दोन च कंपन्या
५ G सेवा दोन च कंपन्या पुरवणार.
Jio आणि एअरटेल.
दोघांची युती झाली तर ५G सेवेचा दर काही ही असू शकतो.
लोकांना पर्याय नाही.
इतक्या मोठ्या देशात दहा सर्वच कंपन्यांना ५G चे हक्क विभागून दिले पाहिजे होते.
Enron ल विरोध कशावर केला गेला.
ते वीजनिर्मिती करणार रोज ची काही unit मध्ये .
तुम्हाला गरज असो किंवा नसो ती विकत घेतली पाहिजे आणि ठराविक दर नीच.
अशी अट होती.
सर्व भांडवलशाही नियम ठेवले ना गुंडाळून.
मोठ्या कंपन्या फक्त उपदेश करतात पण त्यांना हक्काचे मार्केट हवं असते.
स्पर्धा पण नको असते.
आणि रिस्क पण नको असते
मुंबई मध्ये लिहून दिलेले औषध पुण्यात मिळत नाही.
हेच नाही तर मुंबई मधील एका भागात लिहून दिलेले औषध दुसऱ्या भागात मिळत नाही
असा अनुभव पण लोकांना असेल.
विदेशातील जुन्या गाड्या भारतात का विक्री la येत नाहीत.
गाडी उद्योगांना संरक्षण देण्यासाठी च.
हे सर्व संघटित क्षेत्रात आणि मोठ्या उद्योगात घडतेच.
बाकी नियम,तत्व ज्ञान,उपदेश फक्त लहान सहान उद्योग,दुकानदार,शेतकरी. ह्यांच्या साठी असतात.
Pages