Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असामी
असामी
सर्फराज ने तरीही दुलीप फायनल मध्ये सेन्चुरी ठोकली कि राव.
जयस्वाल अजून लहान आहे, शिकेल हळू हळू. अडीचशे मारल्यावर नक्कीच हवेत चालत असणार.
वेस्ट झोन तसेही जवळपास मॅच जिंकलेले होते आणि तेजा/किशोर ला तेव्हा शिवीगाळ करण्याची काही गरज नव्हती.
माझ्या मते तरी रहाणे ने त्याला 5-6 ओव्हरसाठी त्याला ड्रेसिंग रूम मध्ये थन्ड व्हायला पाठवून योग्य निर्णय घेतला.
अंपायर ने डिसिप्लिनरी ऍक्शन घेण्या ऐवजी हे कधीही चांगले.
वरील सर्व मतांशी सहमत
वरील सर्व मतांशी सहमत
फालतू वाद आहे. आश्विन मस्त खेचतोय.
...
फिनिशर टीम ईंडिया
भारत 2021 पासून धावांचा पाठलाग करताना...
सामने 14, विजय 13, हार १
दिवसरात्र २०-२० सामन्यात चेस सोपा?
सर्फराज ने तरीही दुलीप फायनल
सर्फराज ने तरीही दुलीप फायनल मध्ये सेन्चुरी ठोकली कि राव. >> सध्या आपली बेंच स्ट्रेन्ग्थ बघता शेवटच्या इनिंग मधे एक सेंच्युरी पुरेशी नाही. नाणे खणखणीत वाजले पाहिजे - रणजी मधे होते वाजलेले तसे किंवा पटीडार चे वाजतेय तसे.
"सध्या आपली बेंच स्ट्रेन्ग्थ
"सध्या आपली बेंच स्ट्रेन्ग्थ बघता शेवटच्या इनिंग मधे एक सेंच्युरी पुरेशी नाही. नाणे खणखणीत वाजले पाहिजे " - सद्ध्याच्या टीमचं फिटनेस कल्चर पहाता, नुसत्या रन्स नाही तर फिटनेस सुद्धा उच्च हवा, विशेषतः बॅट्समेनसाठी. बॉलिंगमधे काही कच्चे दुवे (फिटनेस) आहेत.
आज न खेळल्याबद्दल भुवी भयंकर
आज न खेळल्याबद्दल भुवी भयंकर वैतागला असेल
फिटनेस बद्दल अनुमोदन पण कोहलीच्या वेळचा फिट असण्याचा अट्टाहास सध्या कमी झाल्यासारखा वाटतो आहे. किती जण फिट नसल्यामूळे आत-बाहेर करत आहेत बघ. एक चांगला प्रघात पडला होता तो तसाच राहू दे रे.
दुसरी एक चिंता करण्यासारखी एक
दुसरी एक चिंता करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आपले घसरते फिल्डिंग स्टँडर्ड्स.
कालच मी कुठे तरी स्टॅट्स वाचत होतो आपण कॅच सोडण्याच्या बाबतीत या वर्षी टॉप स्पॉट वर आहोत
आपल्या अगदी जवळपास अर्थातच पाकिस्तान आणि श्रीलंका आहेत.
अक, मघाशी असामीची पोस्ट वाचली
अक, मघाशी असामीची पोस्ट वाचली पण रिप्लाय द्यायला जमलं नव्हतं. तेव्हा हेच डोक्यात आलं होतं. कॅचेस, ग्राऊंड फिल्डींग (चहल, अर्शदीप, हर्शल ई.) आणि कार्थिक असेल तर किपींगसुद्धा जरा डळमळीत आहे. इंडियाने खूप मेहनतीनं आत्ताची पोझिशन मिळवली आहे. त्यात फिटनेस, फिल्डिंग स्टँडर्ड्सचा खूप मोठा वाटा आहे. Hope they won’t let it slide.
कॅप्टन लडदू असल्यावर फिल्डिंग
कॅप्टन लडदू असल्यावर फिल्डिंग ढेपाळनारच
शर्मा सेफ हँड आहे. झेल अचूक
शर्मा सेफ हँड आहे. झेल अचूक पकडतो. याबाबतीत त्याच्यासारखा स्टँडर्ड सर्व टीमचा झाला तर बरेच प्रश्न सुटतील.
बुमराह आऊट !
बुमराह आऊट !
शर्मा कितीही अनफिट दिसत असला
शर्मा कितीही अनफिट दिसत असला तरी सेफ फिल्डर आणि कॅचर आहे.
सगळ्यात जास्ती सुधारणा आपल्या बॉलर मध्ये हवी आहे. फिल्डिंग च्या बाबतीत सगळेच आनंदी आनंद आहेत.
शर्मा कितीही अनफिट दिसत असला
शर्मा कितीही अनफिट दिसत असला तरी सेफ फिल्डर आणि कॅचर आहे. >> +१ पण तो फिटनेस बाबत फारसा उत्साही किंवा जागरुक वाटत नाही हे त्याच्या वाढत्या पोटाकडे बघून लक्षात येते. तो डेक्कन चार्जर कडून खेळत असताना गिब्ज नि तो ह्या दोघांमधे डाईव्ह मारणे, पळत बॉल पकडणे ह्यामधे चुरस असायची ती आठवली नि आजचा रोहित बघितला कि वाईट वाटाते. पाठीचे दुखणे आहे हे लक्षात ठेवूनही रोहित चा फिटनेस हा फारसा अभिमानाचा मुद्दा नाही. त्यामूळे एकंदर संघाचा फिटनेस पण खालवला असे वाटते. अर्थात रोहित च काय राहुल किंवा पंत हे ही त्याच रांगेमधले वाटतात.
बुमरा नसणे अर्शदीप साठी वरदान ठरेणार. मेक ऑर ब्रेक वर्ल्ड कप.
काल पंत किपिंगला आणि शर्मा
काल पंत किपिंगला आणि शर्मा स्लिपला बघून आमच्या घरचे म्हणाले की हे दोघे भाऊ भाऊ वाटतात
पंतच्या शरीराची ठेवणच तशी आहे का? कारण त्याच्या उछलकूद करतानाच्या ऊड्या जिमनॅस्टीक लोकांसारख्या असतात. त्याचे जिममधील विडिओही भारी असतात. त्याच्या बॉडीशेपकडे बघून हाच तो माणूस असे वाटू नये..
असामि
असामि
पन्त हा माझ्या वाचण्याअनुसार संघातला सगळ्यात फिट खेळाडूंमध्ये एक आहे.
एकतर विकेटकिपींग हा सगळ्यात फिसिकली डिमांडिंग रोल आहे आणि अजून तरी एखादा-दुसरा अपवाद सोडल्यास त्याला दुखापत झाल्याचे (गेल्या 6-7 वर्षात) माझ्या ऐकिवात नाही.
बुमरा दुखापतीमुळे बाहेर जाणे
बुमरा दुखापतीमुळे बाहेर जाणे हा मोठा धक्का आहे.
आता त्याच्या बदल्यात कोणाला ऑस्ट्रेलिया ला नेणार हे बघावे लागेल.
माझ्या मते तरी शमी हा बेस्ट ऑप्शन आहे. मीडिया म्हणतोय कि सिराज संघात येईल.
अक मी पंत फीट नाही असे म्हणत
अक मी पंत फीट नाही असे म्हणत नसून तोही रोहित सारखा फिटनेस बाबत फारसा उत्साही वाटत नाही असे म्हणत होतो. त्याच्या सध्याच्या वयात फीट नसण्यानेही फरक पडत नाही . दुखापत नि फिटनेस हातात हात घालून जातात असे नाही पण फिट असल्याने दुखापत होण्याचे चान्सेस कमी होतात ( आता फिट राहताना झालेल्या दुखापती - जाडेजा सारख्या धरू नये)
पंत कोरोनाकाळत स्थूल झालेला.
पंत कोरोनाकाळत स्थूल झालेला. कारण तो लॉकडाऊनला जिथे अडकलेला तिथे जिमचीही फारशी व्यवस्था नव्हती असे ऐकलेले. जेव्हा त्या लॉकडाऊनंतर पहिले क्रिकेट आयपीएलच्या स्वरुपात सुरु झाले तेव्हा त्याचा गंडलेला फिटनेस, मंदावलेल्या हालचाली दिसत होत्या.
त्यानंतर त्याने त्या फेमस ऑस्ट्रेलियादौर्याआधी फार मेहनत घेतली असेही कानावर आलेले.
मग पुढे घडला तो ईतिहास सर्वज्ञात आहेच. पण तेव्हापासून आतापर्यंत सर्वात जास्त ईंटरनॅशनल क्रिकेट पंतच खेळला आहे. ते देखील कीपर म्हणून रोजची उठबस आणि खोर्याने धावाही केल्या आहेत. अर्थात चेंडू कमीच खेळला असेल, मॅरेथॉन खेळी खेळणार्यातील तो नाही. तरीही आयपीएलमध्येही कप्तानीची अतिरीक्त जबाबदारी घेऊन खेळत होता. तो खरेच फिटनेसबाबत बाबतीत स्पायडरमॅन सुपरमॅन आहे.
पण तरी अति होतेय क्रिकेट. या वर्ल्डकपनंतर त्याला २०-२० ईंटरनॅशनलमधून ब्रेक मिळाला तर बरे होईल. जेणेकरून तो मह्त्वाचे कसोटी सामने खेळेल. तसेच येत्या वनडे वर्ल्डपसाठी फिट राहील..
त्यानंतर त्याने त्या फेमस
त्यानंतर त्याने त्या फेमस ऑस्ट्रेलियादौर्याआधी फार मेहनत घेतली असेही कानावर आलेले. >> त्याने किपिंग वर मेहनत घेतली होती रे.
या वर्ल्डकपनंतर त्याला २०-२० ईंटरनॅशनलमधून ब्रेक मिळाला तर बरे होईल. >> तो फारसे २०-२० ईंटरनॅशनल खेळला नाहिये आय पील नंतर. मोजके सामने खेळलाय. २०-२० ईंटरनॅशनल पासून ब्रेक मिळणे अशक्य आहे. तो ब्रेड बटर आहे रे.
<<<पण तरी अति होतेय क्रिकेट.
<<<पण तरी अति होतेय क्रिकेट. ??>>>
अनुमोदन. मी तर बघतहि नाही, नुसतेच स्कोअर्स बघतो. तरी दर दोन दिवसांनी भारताचा कुठेतरी सामना असतोच.
त्याने किपिंग वर मेहनत घेतली
त्याने किपिंग वर मेहनत घेतली होती रे. >>> हो अर्थात, ते त्याचे कामच आहे. पण मी फिटनेसच्या अनुषंगानेही वाचलेले. (वाचतो कधीकधी आवडीच्या खेळाडूंबद्दल
)
त्या लॉकडाउन काळात सुरू झालेल्या युएई आयपीएलमध्ये आठवत असेल तो कसा बोजड झालेला. तिथून ऑस्ट्रेलियात जाईस्तोवर जो मधला काळ होता त्यात त्याने जिममध्येही घाम गाळलेला.
२०-२० ईंटरनॅशनल पासून ब्रेक मिळणे अशक्य आहे. तो ब्रेड बटर आहे रे. >>> हो ते तर आहेच. अगदीच ब्रेकची अपेक्षा नाही. पण रोटेशन पॉलिसीत त्याच्यावर दयामाया दाखवताना २०-२० मध्ये जिथे तो प्रभाव पाडू शकला नाही तिथे त्याला कमी खेळवतील अशी अपेक्षा. बाकी ब्रेड बटर तो आयपीएलमध्ये कमावेलच.
खरे तर एक क्रिकेटचा चाहता म्हणून जो आनंद कसोटी चॅम्पियनशिप वा वन डे वर्ल्डकप जिंकण्यात आहे तो या २०-२० वर्ल्डकप जिंकण्यात नाहीये. त्यामुळे आवडीच्या खेळाडूने आधीचेच फॉर्मेट गाजवावे आणि त्यातच जास्त खेळावे असे वाटते.
असामी
असामी
२०-२० ईंटरनॅशनल पासून ब्रेक मिळणे अशक्य आहे.>>
माझ्या मते येत्या वर्षी २०-२० ईंटरनॅशनल कमी असतील.
वर्ल्ड कप असल्या कारणाने सगळ्यांना तयारी म्हणून का होईना वन डे टूर्नामेंट खेळाव्याच लागतील.
दिपक चहरने रोहित / द्रविड /
दिपक चहरने रोहित / द्रविड / बीसीसीआयचे काय घोडे मारलेय की सिराज आधी आत येतोय??? (मला वाटलं वर्ल्डकपसाठी, पण थँकफुली, दक्षिण अफ्रिकेपुरता तरी…)
माझ्या मते तरी शमी हा बेस्ट
माझ्या मते तरी शमी हा बेस्ट ऑप्शन आहे. मीडिया म्हणतोय कि सिराज संघात येईल. >> सिराज ईट इज. मला वाटते शमि ला पहिल्या चॉईस मधे नघेऊन आधीच क्लीयर संकेत दिला होता कि शमी ला टी २० च्या भावी प्लॅन मधे धरले जात नाही आहे. शमिची लाईक टू लाईक रिप्लेसमेंट ( कमी अनुभव असलेली) म्हणून सिराज - पेस आहे, रन्स लीक करणार, बर्स्ट मधे विकेट घेतल्या जाणार - हे साहजिक आहे. सिराज एखाद दुसरा सामना खेळेल फार तर - भुवी, अर्शदीप नि हर्शल हे तिघेच असतील. पांड्या बॅकप. सिराज खेळेल तेंव्हा बॉलिंङ ओपन करेल नि त्याचा कोटा पांड्या पुरा करेल असे मला वाटते.
वाचतो कधीकधी आवडीच्या खेळाडूंबद्दल >> म्हणजे तेंडूलकर, द्रविड नि गांगूली आवडत नाही असे म्हणातोस ना
माझ्या मते येत्या वर्षी २०-२० ईंटरनॅशनल कमी असतील. >> बाकीच्या देशांच्या कमी असतीलच आपल्या कमी करणे मला कठीण वाटते. अ संघ घेऊन खेळतील.
असामी, कधी कधी
असामी, कधी कधी
२०-२० कमी नाही होत बाकी.. वन डे वर्ल्डकप आहे तर कसोटी कमी असतील. २०-२० मध्ये पैसा आहे. त्या राहणारच दर दौर्यात.
इराणी चषक पहिला दिवस -
इराणी चषक पहिला दिवस -
सर्फराज चे अजून एक शतक. ROI 18 ला 3 असताना चॅलेंजिंग पीच वर कडक खेळी केली आहे.
तत्पूर्वी सौराष्ट्र पहिल्या इंनिंग मध्ये 87 ला ऑल आऊट झाले होते. ROI च्या वेगवान गोलंदाजांनी अनुकूल पीचचा पुरेपूर फायदा उठवला होता.
“सर्फराज चे अजून एक शतक” -
“सर्फराज चे अजून एक शतक” - कडक सेन्च्युरी मारलीय सर्फराझ ने.
कुलदीप सेनला सद्ध्या बरीच संधी मिळतेय. त्याचा त्याने उपयोग केला तर बरं होईल. चांगला बॉलर आहे.
हो.
हो.
तो आणि उमरान दोघेही सौराष्ट्र फलंदाजांना आज टू क्विक टू हॅन्डल वाटत होते.
पण अजूनही दोघांनाही लेंग्थ आणि अचूकतेवर काम करायची गरज आहे.
ROI च्या वेगवान गोलंदाजांनी
ROI च्या वेगवान गोलंदाजांनी अनुकूल पीचचा पुरेपूर फायदा उठवला होता. >> सौराष्ट्र ची दुसरी इनिंङ बघता पिच कडक उरले होते का पण ? फे फ चा लाडका जयदेव पण धुमाशून बॅटींग करून गेलाय . सर्फराज बद्दल अक मी हेच म्हणत होतो कि त्याने सलग असा द्नणका लावला तर त्याला डावलणे अशक्य होईल. तोवर तो फार तर फ्रिंज वर येऊन परत बाहेर जाईल. त्याचे आय्पील कामगिरी यथा तथाच असल्यामूळे पब्लिक मेमरी मधे फारसा राहात नाही. टेस्ट साठी आय पील का बघता वगैरे मधे शिरू या नको. मी ते फॅक्ट ऑफ लाईफ असे धरून चालतो आता.
“फे फ चा लाडका जयदेव पण
“फे फ चा लाडका जयदेव पण धुमाशून बॅटींग करून गेलाय” -
माझं माहित नाही, पण आयपीएल फ्रँचाईज चा लाडका आहे तो. असे बरेच डोमेस्टिक स्टॉलवर्ट्स आहेत/होऊन जे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचू शकले नाहीत (झाकली मूठ) किंवा पोहोचून अपेक्षाभंग करते झाले.
इंडियाची पुढची टेस्ट सिरीज बांगलादेशविरूद्ध आहे. कदाचित त्या सिरीजमधे काही नविन चेहरे ईंडियन ड्रेसिंग रूममधे दिसू शकतील. प्लेयिंग ११ मधे कितपत संधी मिळेल ते माहित नाही पण १५ च्या संघात सर्फराजला किंवा रजत पाटीदारला संधी मिळू शकेल.
@ असामी,
@ असामी,
मागे मी तुम्हाला एका विंडीज विरुद्धच्या क्लोज वनडे सामन्यात बोललेलो बघा, की तो आवेश खान गरज नसताना हिरो बनायचा प्रयत्न करत होता. आणि मॅचची वाट लावली. पण पुढे अक्षर पटेलने काढली ती मॅच.
तेव्हा तुम्हाला ते पटले नव्हते.
आज पटतेय का बघा.
आजही त्याने तेच केले. १२ बॉल ३७ हवे होते. आवेश खान स्ट्राईकला होता. समोर ६०-७० धावांवर खेळणारा सेट बॅटसमन संजू सॅमसन नॉन स्ट्राईकर एंडला. पण याने एका मागोमाग एक पाच बॉल आंधळे पट्टे फिरवले. ज्यात तीन वेळा बॉल याच्या बॅटलाही लागला नाही. एक लागला त्यात कॅच सुटून दोन रन्स आले. दुसरा लागला त्यात कॅच पकडली गेली. १२ बॉल ३७ ची मॅच याने हिरो बनायच्या हव्यासापोटी ७ बॉल ३५ केली. संजू मात्र नॉनस्ट्राईकर एंडलाच. तिथूनही संजूने काही चौके छक्के मारून सामना ९ धावांनी पराभवावर आणून संपवला.
आवेशने त्या सेकंडलास्ट ओवरच्या पहिल्याच बॉलला काय करायला हवे होते हे सांगायला कुठल्याही क्रिकेटतज्ञाची गरज नाही. अशी वृत्ती असलेले खेळाडू संघात नसलेलेच बरे
भले मी क्रिकेटची पुस्तके वाचत नाही,
पण अश्या खेळाडूंची वृत्ती मी बरोबर ओळखतो.
Pages