Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही सिरीज अय्यर साठी चांगली
ही सिरीज अय्यर साठी चांगली ठरली >>> चांगली ठरणारच होती. सिरीज सुरू व्हायच्या आधी आमच्या व्हॉटसपग्रूपवर एक जण म्हणालेली की अय्यर असेल का अकरात, तेव्हा त्याला म्हटलेले की अकरातही असेल आणि चमकेलही. कारण ईथल्या खेळपट्ट्या आता संथ असतात. त्या उसळीवाल्या वेगवान विंडीज खेळपट्ट्या केव्हाच ईतिहासजमा झाल्या आहेत. आणि अय्यर अश्या स्लो पिचेस आणि स्लो बॉलरसमोर बाप खेळाडू आहे. खरे तर अजून कॅश करायला आवडले असते त्याला...
कालच्या सामन्यात चहलला
कालच्या सामन्यात चहलला सामनावीर मिळायला हवा होता. गिल च्या धावा महत्त्वाच्या होत्याच, >> हो मलाही असेच वाटले होते. कमीत कमी विभागून तरी द्यायला हवे होते.
आवेश खान आज पुन्हा डायरेक्ट
आवेश खान आज पुन्हा डायरेक्ट हिट मारून हिरो बनायला गेला अर्शदीपच्या ओवरला आणि ओवरथ्रोचा रन दिला..
लास्ट ओवरला १० हवे असताना पहिलाच नो बॉल. आयपीएल वाटली का याला? आणि मग फ्री हिटला अगदी हिट मी शॉर्ट ॲंड वाईड बॉल दिला की त्याला सिक्सच बसायचा होता...
पहिल्या सामन्यात कार्तिकला
पहिल्या सामन्यात कार्तिकला सामनावीर दिले. पण रोहीत शर्माची ईनिंग क्लास होती. कोणाचाच टाईम होत नव्हता तिथे तो निव्वळ प्लेसमेंटवर धावा जमवत होता त्याही वेगात..
कदाचित शर्माच बोलला असेल, द्या आमच्या पोराला सामनावीर. त्याला आत्नविश्वास द्यायचा आहे...
बाकी आज शर्मा लवकर जाता अवघड झाले..
आज चुम्मा खेळायला हवा होता मोठा.. पिचवर जसा सुरुवातीला बाऊन्स मिळत होता ते पाहता त्याच्यासारखाच प्लेअर चढून बसू शकत होता.. सुरूही झालेला.. पण वाहावत गेला आणि चुकला फटका मारण्यात..
असो.. छान झाले.. मालिका जिवंत राहील आता..
पहिल्या सामन्यात कार्तिकला
पहिल्या सामन्यात कार्तिकला सामनावीर दिले. पण रोहीत शर्माची ईनिंग क्लास होती. कोणाचाच टाईम होत नव्हता तिथे तो निव्वळ प्लेसमेंटवर धावा जमवत होता त्याही वेगात..
कदाचित शर्माच बोलला असेल, द्या आमच्या पोराला सामनावीर. त्याला आत्नविश्वास द्यायचा आहे...
बाकी आज शर्मा लवकर जाता अवघड झाले..
आज चुम्मा खेळायला हवा होता मोठा.. पिचवर जसा सुरुवातीला बाऊन्स मिळत होता ते पाहता त्याच्यासारखाच प्लेअर चढून बसू शकत होता.. सुरूही झालेला.. पण वाहावत गेला आणि चुकला फटका मारण्यात..
असो.. छान झाले.. मालिका जिवंत राहील आता..
“ कदाचित शर्माच बोलला असेल,
“ कदाचित शर्माच बोलला असेल, द्या आमच्या पोराला सामनावीर. त्याला आत्नविश्वास द्यायचा आहे” - अच्छा, अच्छा, असं ठरतं होय, मॅन ऑफ द मॅच! घ्या, आणि आम्हाला माहितंच नव्हतं
गंभीरने दिलेले म्हणतात एकदा
गंभीरने दिलेले म्हणतात एकदा कोहलीला
Indian batter Gautam Gambhir scored a rollicking 150 not out for the 'Men in Blue' in that match, and forged a scintillating stand of 224 runs with Kohli. At the end of the game, Gambhir won the Player of the Match award, but he gave the award to Kohli.
आवेश खान बद्दल रोहित काय
आवेश खान बद्दल रोहित काहीतरी वेगळेच बोलला खरे ........ असो.
बाकी आज शर्मा लवकर जाता अवघड झाले.. >> कदाचित शर्माचाच डाव असेल कि पोरांना अधिक खेळायला द्यावे. दर वेळी मीच का खेळायचे
आवेश खान बद्दल रोहित काहीतरी
आवेश खान बद्दल रोहित काहीतरी वेगळेच बोलला खरे
>>>
चांगलेच बोलला असणार. त्याला नाऊमेद करणारे कसे बोलणार..
आज बाकी आवेशनेच पुन्हा आपला गेम केला. नुसता मार नाही खाल्ला तर दर ओवरला मार खाल्ला. दर वेळेला त्यांना गरज असताना मोमेंटम दिले.
तो पण रोहित चा गेम प्लॅन
तो पण रोहित चा गेम प्लॅन असेल -
१. आवेश खान ला वर्ल्ड कप साठी बॅकप तयार करणे.
२. आवेश खान ला मार खायला लावून संघाबाहेर काढणे.
तुला काय वाटते ?
आज पण सूर्या नि श्रेयस ला खेळायला मिळावे म्हणून रोहित ने पुल खेळून स्वतःचा मसल पुल केलाय.
रोहित च्या फिटनेस चा प्रॉब्लेम वर्ल्ड कपच्या वेळी उफाळून येऊ नये म्हणजे मिळवली.
छोटिशी ट्रिव्हिया : सय्यद
छोटिशी ट्रिव्हिया : सय्यद किरमाणी कुठल्या देशासाठी खेळला ?
गूगल करू नका
ईंटरनेशनल सामना होता का?
ईंटरनेशनल सामना होता का?
मी क्रिकैन्फो चेक केले. त्यात तर सारे ईंटरनॅशनल सामने भारतासाठीच दिले आहेत.
बाकी स्पेसिफिक प्रश्न गूगल नाही केला..
ईंटरनेशनल सामना होता का? >>
ईंटरनेशनल सामना होता का? >> हो .
India
India
पाकिस्तान. पण मला हा प्रश्न
पाकिस्तान.
पण मला हा प्रश्न माहिती होता. 
डोक्यात तर पाकिस्तानच आलेले
डोक्यात तर पाकिस्तानच आलेले पहिले. एक गेस म्हणून..
पण ईंटरनॅशनल सामना होता तर करीअर रेकॉर्डसला का दिसला नाही..
आता आणखी गूगल करायला हवे..
सय्यद किरमाणी म्हणजे झहीर
सय्यद किरमाणी म्हणजे झहीर अब्बास
कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या च्या धर्तीवर त्यांनी अगदी कुणी सय्यद घ्या, कुणी झहीर घ्या असं केलं .
Syed Zaheer Abbas Kirmani PP,
Syed Zaheer Abbas Kirmani PP, popularly known as Zaheer Abbas, is a former Pakistani cricketer.
आई ग्ग
“ सय्यद किरमाणी म्हणजे झहीर
“ सय्यद किरमाणी म्हणजे झहीर अब्बास” - मस्त! क्रिकेटप्रेमींच्या ग्रूपमधे घालायला छान कोडं आहे.
आज आवेशने सुरूवातीपासून जबरदस्त बॉलिंग केली. गेल्या एक-दोन मॅचेसच्या डळमळीत परफॉर्मन्सेस नंतर आज तडाखेबाज कामगिरी केली. असे स्पेल्स खेळाडूला सेन्स ऑफ बिलाँगिंग देऊन जातात.
धमाल मॅच चालूय बायकांची
धमाल मॅच चालूय बायकांची गोल्ड मेडलसाठी.. टिपिकल ईंडिया ऑस्ट्रेलिया मॅच.. कोणी बघतेय का रे..
हो ... पण ...
हो ... पण ...
सेम ओल्ड स्टोरी.. जिंकायच्या
सेम ओल्ड स्टोरी.. जिंकायच्या सिच्युएशनला कच खातात या पोरी नॉक आऊटला निर्णायक सामन्यात.. यावर काम करायची गरज.. फिनिशर तयार करायची गरज.. महिला क्रिकेटने धोनी-युवराज शोधायला हवेत.
असो..
रौप्य पदकसाठी अभिनंदन पोरींचे..
ऑस्ट्रेलियाला झुंजवायची / हरवायची ताकद मला तरी यास्पर्धेत याच संघात दिसत होती.. जिंकलो असतो तर मजा आली असती
२०१७ ची वर्ल्डकप फायनल, २०२२
२०१७ ची वर्ल्डकप फायनल, २०२२ टी-२० वर्ल्डकप सेमीफायनल, आजची मॅच - प्रेशर गेम्समधे कच खातेय ही टीम. ह्या टीमला एखाद्या पॅडी अप्टनची नितांत गरज आहे. फॅन फॉलोइंग - पैसा - सुविधा हे दुष्टचक्र आहे. पण तरी बीसीसीआयने थोडी जास्त गुंतवणुक केली तर कदाचित ही टीम अधिक चांगलं परफॉर्म करू शकेल असं वाटतं.
चार शब्द मोलाचे! कर्णधार
चार शब्द मोलाचे! कर्णधार रोहितचे ‘ते’ मार्गदर्शन करणारे बोल आवेशला बनवून गेले झिरोचा हिरो
https://mahasports.in/we-are-backing-you-rohit-sharma-word-to-avesh-khan...
एखाद्या पॅडी अप्टनची नितांत
एखाद्या पॅडी अप्टनची नितांत गरज आहे. >> हो काल असच वाटले. हातातली मॅच घालवली. एकदम ९० ची भारतीय टीम वाटली.
कालची आवेश खान ची २ बॉल ची बॅटींग बघून कोणाला काय वाटले ?
अय्यर नि यादव ला ओपन करण्यामागे राहुल किंवा रोहित वर्ल्ड कप ला फिट नसला तर .. हा विचार आहे का ? इशान किशन एकदम पाठी का ढकलला गेला ?
"एकदम ९० ची भारतीय टीम वाटली.
"एकदम ९० ची भारतीय टीम वाटली." - खरंय. असे कितीतरी चुटपुटते निकाल त्या काळात लागले आहेत.
"अय्यर नि यादव ला ओपन करण्यामागे राहुल किंवा रोहित वर्ल्ड कप ला फिट नसला तर .. हा विचार आहे का ? इशान किशन एकदम पाठी का ढकलला गेला " - मला वाटतं ही 'प्रॉसेस ओरिएंटेड टीम' तयार करण्याचा, वेगवेगळ्या प्लेयर्स ना वेगवेगळ्या सिच्युएशनसाठी 'तयार' करण्याचा भाग असावा. आयर्लंडमधे आणि कालच्या मॅचमधे सुद्धा किशन ने ओपन केलं. त्यामुळे तो मागे पडला नसावा. विकेटकिपिंगमधे सुद्धा पंत, संजू, कार्थिक - सगळ्यांना आलटून पालटून संधी मिळालीय. त्यामुळे हा सगळा ऑलराऊंड टीम तयार करण्याचा भाग असावा असा माझा अंदाज आहे.
मला वाटतं ही 'प्रॉसेस
मला वाटतं ही 'प्रॉसेस ओरिएंटेड टीम' तयार करण्याचा, वेगवेगळ्या प्लेयर्स ना वेगवेगळ्या सिच्युएशनसाठी 'तयार' करण्याचा भाग असावा >> मला आधी असे वाटले होते पण ह्यातले काही निर्णय कुतूहलजनक आहेत. मधली फळी हा आपला कमकुवत दिवा असताना त्यात ग्रूम केल्याचे प्रयत्न तोकडे वाटतात. एक कार्थिक वगळता खूप आट्या पाट्या खेळल्या गेल्या आहेत. पांड्या चार वर नि पंट्/स्काय किंवा अजून कोणी ह्यांचा पाचवा आकडा कायम ठेवून त्यांना गेल होण्याला वेळ द्यायला हवा होता असे वाटत राहिले. कोहलीचा प्रश्न टांगता आहेच पण वर्ल्ड कप पुरता तरी तो तिसरा असणारच असे दिसतेय. रोहित बरोबर येणार्या प्लेयर्स नी आक्रमक खेळून मोठे टारगेट ठेवायचा सराव घेतल्यानंतर एकदम राहुल नि तिसर्या क्रमांकावर कोहली आल्यावर काय होईल कोण जाणे. हूडाचा रोल क्ल्य व्हायला हवा होता असे ही वाटतेय. अर्श दीप कि आवेश खान ह्यातला तिसर्आ किंवा चौथा बॉलर्स कोण असणार आहे (भुवी, बुमरा नि हर्शद च्या पाठी) ह्याचे कुतूहल आहे.
प्लेयर्स ना बॅकप केले जातेय हे आवडलेय.
आशिया चषकासाठी भारतीय संघ-
आशिया चषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
____
या संघावरून वर्ल्डकपच्या संघाचाही अंदाज येतो. बुमराह आणि हर्षल पटेल आत येतील. त्या जागी आवेश खान आणि बिश्नोई बाहेर जातील असे वाटतेय.
ईंग्लंड दोन्ही इनिंग मिळून
ईंग्लंड दोन्ही इनिंग मिळून फक्त ८३ ओवर खेळले. एक दिवसही नाही.
आणि ३१४ धावा मारत दोनदा ऑलआऊट झाले. बाझबॉल चालले नाही वाटते ईथे. डावाने पराभव झाला. आफ्रिका कसोटी चॅम्पियनशिप फायनलसाठी आपली दावेदारी मजबूत करतेय..
दावेदारी >> दावा म्हणायचेय
दावेदारी >> दावा म्हणायचेय का तुला ? बाझबॉल लाँग टर्म मधे किती चालणाह्यावर आधीपासूनच सी. बघूया. अजून एक समर पण पूर्ण झालेला नाहिये बाझबॉल चा.
Pages