कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुन्या टायरवर व्हील अलायनमेंट केली तर थोड्याच दिवसात परत अलायनमेंट बिघडण्याची शक्यता जास्त असते. नक्षी शाबूत असली तरी आतल्या बाजूला (क्रॉस सेक्शन) टायर खचला नाही ना हे पाहावे. आतली बाजू खचली असल्यास अलायनमेंट बॅलेंसिंग करून उपयोग नाही. अशा वेळी गाडीच्या स्टेरिंग मेकॅनिसम वर परिणाम होऊ शकतो. गाडी अजून वापरणार असल्यास ६०००० किमी वर टायर बदलावा.
IMHO, अलायनमेंट बॅलेंसिंग कंपनीच्या सर्व्हिस सेंटर मध्ये न करता बाहेर चांगल्या ठिकाणी करावे.

ओके. हे चेक करते. आपले आपल्याला येते का चेक करता?
> > IMHO, अलायनमेंट बॅलेंसिंग कंपनीच्या सर्व्हिस सेंटर मध्ये न करता बाहेर चांगल्या ठिकाणी करावे. > >
ओह! याचे काही खास कारण?

कंपनीच्या सर्विस सेंटर मध्ये अलायनमेंट बॅलेंसिंग ला कमी महत्व दिले जाते. तसेच ते केले आहे का किंवा नीट केले आहे का हे पटकन तपासता येत नाही. अगदीच गाडी एका बाजूला खेचली जात असल्यास किंवा स्टेरिंग खूप गदागदा हलत असल्यास व्हेरिफाय केले जाऊ शकते पण इतर वेळी तपासता येत नाही. नवीन टायर जिथून घ्याल तिथे ४-५ वेळा अलायनमेंट बॅलेंसिंग फुकट करून मिळेल अशी बार्गेनिंग करून घ्या.

व्हील अलाइनमेंट साधारण दर ५-१० हजार किमी च्या दरम्यान करावे. पावसाळ्यात गाडीचा वापर झाला असेल तर पाऊस संपल्यावर हमखास करावे कारण भारतात शहरातले रस्ते आणि गावातील रस्ते यात पावसाळ्यामध्ये खुपसा फरक नसतो. टायर जुने झाले कि पंक्चर होण्याचे प्रमाण वाढते अगदी नक्षी शाबूत असली तरी. टायरच्या बाहेरील बाजूस तडे दिसू लागतात आणि गाडी जर उन्हात उभी राहत असेल तर नक्कीच बदलावे ५०-५५ कमी नंतर. कार्स करता साधारण ३०-५० हजार किमी नंतर टायर बदलले जातात कुठल्या कंपनीचा टायर आहे आणि गाडी कुठल्या रस्त्यावर (डांबरी, काँक्रिट, खड्डे असलेला); कशी चालवतो यावर ठरते.

ओके चांगली माहिती!
सर्वांचे आभार!
वसईत टायरवाला शोधण्यापासून तयारी आहे. विचारते इथे लोकांना.

टायर सेट बदलला नाही तरीही व्हील अलाईनमेंट करून घेता येते का? >>> हो. जिथे ऑटोमॅटीक मशीन आहे अशा कोणत्याही ठिकाणी केले तरी चालते. ५० हजार झाले आसतील किंवा ५ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर बदललेले बरे. हार्ड होतात टायर्स.

10 वर्ष झाली म्हणजे नक्कीच बदलले पाहिजेत कारण ते रबर आहे, त्याला तडे जातात किंवा रबर लवचिक रहात नाही.

टायर सेट साधारण ५ वर्षे जातो, नंतर बदलावा. Thread depth किती उरली आहे, त्याच्यानुसार आधी पण बदलावा लागेल.
मी फक्त मिशेलिन कंपनीचे टायर वापरतो, तुमचा प्रेफरन्स कदाचित वेगळा असेल.

व्हील अलाईंमेंट कधीही करता येते, पण टायर बदलले की नक्की करा. मग उगीच आधीसुद्धा करून काय फायदा?

माझं गाडी घेण्याचं घोंगडं गेल्या १० वर्षांपासून भिजतच पडलंय. त्याचं कारण नवऱ्याला गाडी घेण्याची अजिबात इच्छा नसणं हे आहे.

हम्म तर, मागच्या वर्षीपासून मी खूप गाड्यांचे रिव्ह्यूज बघतेय. मागच्या वर्षी मी शॉर्टलिस्ट केलेल्या गाड्या होत्या - कियाची सेल्टॉस, महिंद्रची XUV 300, होंडाची जॅझ, क्रेटा पण होती तशी कधीतरी. XUV700 पण मनात भरली होती लॉंचच्या आधीपासूनच पण किंमत बघून मागे पडली ती.

ह्यातली सेल्टॉस रिव्ह्यूज बघून मागे पडली. ह्या सगळ्यात मात्र XUV 300 अजूनही पहिल्या नंबरवर आहे. कारणं - सेफ्टी फर्स्ट, ड्रायव्हिंग कम्फर्ट खूप चांगला आहे (असं रिव्ह्यूजमध्ये बघितलं आहे), कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे.

३ एक महिन्यांपूर्वी मी सेकंड हॅंड जॅझची टेस्ट ड्राईव्ह घेतली. जॅझ लूक्सवाईज खूप आवडते मला. चालवायचा कम्फर्ट छान होता. कलर वगैरे इतका आवडला मला की रात्रभर मी त्याचीच स्वप्न बघत होते. दोन दिवसांनी माझा इंटरेस्ट कळवला तर गाडी विकली गेली होती. Sad दोन दिवस मी डिप्रेशनमध्येच गेले होते.

मग मी आणि माझी एक मैत्रिण एका युझ्ड कार डिलरच्या अॉफिसमध्ये गेलो. तिथे त्याच्याकडे सुझुकी स्विफ्ट, बलेनो व फोक्सवॅगनच्या पोलोची टेस्ट ड्राईव्ह घेतली. पोलो बाद केली मी तिथेच. स्विफ्ट होती ती गेल्या वर्षीचच मॉडेल होतं आणि फक्त १८०० किमी रनिंग झालं होतं म्हणून ती फायनल केली आणि ३ दिवसांनी डिलीव्हरी पण घेतली. पण हाय रे कर्मा, त्या गाडीत एक इश्यू निघाला. खर्च बराच येणार होता त्यामुळे डील कॅन्सल करून पैसे परत घेतले.

२-३ आठवड्यांपूर्वी मी XUV300 बघून आले. टेस्ट ड्राईव्ह नाही घेतली. नवऱ्याने गाडी मोठी वाटतेय असं म्हणत तिथल्या तिथेच बाद केली. माझ्या समोर सध्या अजून एक अॉप्शन आहे, टाटा अल्ट्रोज. हॅचबॅक सेगमेंटमध्ये ५* सेफ्टी रेटींग. मी अॉटो ट्रान्समिशन व पेट्रोल बघते आहे.

इथल्या जाणकारांचं काय मत?

राहायला कुठे असाल त्या भागातील रस्ते कमी ग्राउंड क्लिअरन्स असला तरी चालेल का ह्यावर जॅझ आणि अल्ट्रोज लिस्ट मध्ये ठेवा अन्यथा ह्या २ही गाडया खुप छान असून सुद्धा ह्याच एका कारणाने त्रासदायक ठरतील. नवीन घेणार तर टाटा नेक्सॉन अधिक बरी. पण जिकडे xuv३०० ला सुद्धा लांबीने मोठी म्हणून तुमच्या कडून नाकारली गेलीय तिकडे चॉईस फार लिमिटेड होवून एस-प्रेसोपाशी येवून थांबतील. त्यापेक्षा अल्ट्रोज लाख गुना अच्छा सौदा !

कुठे राहणार त्यावर ग्राऊंड क्लिअरन्स कसा अवलंबून? आपल्याकडे स्पीडब्रेकरच्या उंचवट्याची काहीही युनिफॉर्मिटी नाही, अगदी भारतात कुठेही रहा मग.

एक्झॅक्टली, नेक्सॉन चालली तर xuv300 च घेईन नां मी. होंडाच्या गाड्या घासतात खालून आपल्याकडे है माहितीये. आणि दुसरं म्हणजे ती प्रिमीयम हॅचबॅक कॅटेगरीमध्ये मोडते. १०.५० लाखाच्या आसपास जाते गाडी आणि त्या मानाने मग फीचर्स कमी.

सुझुकीच्या गाड्यांचा विचार नाहीये करत मी.

१२-१२.५ लाखापर्यंत चांगली एसयूव्ही कुठली पडेल ? फाईव्ह सीटर असली तरी स्पेशियस असावी. एव्हरेज जरा डिसेंट असावे, लॉंग ड्राईव्हला जाईल बरीच त्यामुळे डिझेल पण चालेल. ७ सीटर सुचवलीत तर सोन्याहून पिवळे.

आभार!

@नीधप..
मी माझ्या डिझायरचे टायर ८ वर्षांनी बदलले. किमी ६०००० पर्यंतच झाले होते. केवळ रनिंगमुळेच नाही तर idle राहिल्यानेही टायर खराब होऊ शकते. मी जरा दुर्लक्ष करत होतो. पण एकदा नाशिकला जाताना वाटेत पुढचा टायर फुटला. वेग मर्यादीत होता म्हणून काही नुकसान झाले नाही.

Investigation केले तेव्हा टायरवाला म्हणाला की अजून दोन टायर कसे काय फुटले नाहीत. यानंतरही दोन वेळा नाशिक टुर केली (हळू चालवत ) आणि सर्व टायर १५ दिवसांपुर्वी बदलले. बोरीवलीत i c colony मध्ये एक चांगला टायरवाला आहे त्याच्याकडून ब्रिजस्टोनचे टायर टाकले . तिथेच लगेच wheel balancing करून घेतले.

बोरीवलीत i c colony मध्ये एक चांगला टायरवाला आहे... नाव पत्ता???

टायरचा विषय आलाच आहे म्हणून एक.
Amazon वर बऱ्याचदा चांगले deal मिळते. अशा वेळी तिथून एखाद्या चांगल्या कंपनीचे टायर्स मागवून जवळील टायरवाल्याकडून (ज्याच्याकडे ते tyre changing machine असेल) बदलून घेणे हा पर्याय कितपत योग्य आहे???

कोणतीही गाडी घ्या पण मारूती घेऊ नका.. मागच्या वीस वर्षांपासून मायलेज च्या चक्करमधे भारतीयांना मारूतीने भुलवून ठेवलंय.

>>आमज़ॉन वर बऱ्याचदा चांगले डील मिळते. अशा वेळी तिथून एखाद्या चांगल्या कंपनीचे टायर्स मागवून जवळील टायरवाल्याकडून (ज्याच्याकडे ते टाइयर चेंजिंग मशीन असेल) बदलून घेणे हा पर्याय कितपत योग्य आहे???

शक्यतो असे करूनका. ऑनलाइन कोणत्या वर्षात बनलेला टायर देतील याची शाश्वती नाही. तसेच वॉरेंटी क्लेम करायची वेळ आली तर ती होईलच याची पण गॅरेंटी नाही. वर तुम्ही जाउन कोणाची मानगुट पण धरू शकणार नाही. टायर घेताना त्याची मॅन्यूफॅक्चरिंग डेट जास्तीत जास्त एक वर्ष जुनी घ्यावी. टायर वर बरीच इन्फर्मेशन लिहिलेली असते, त्यापैकी एक टायारची साइज़, स्पीड रेटिन्ग आणी मॅन्यूफॅक्चरिंग इयर असते. ते चेक करूनच घेणे.

कोणतीही गाडी घ्या पण मारूती घेऊ नका.. मागच्या वीस वर्षांपासून मायलेज च्या चक्करमधे भारतीयांना मारूतीने भुलवून ठेवलंय.>> १०० टक्के बरोबर आहे. अजूनही ते त्या मानसिकतेमधून बाहेर यायला तयार नाहीत आणि सांगतात की त्यांच्या गाड्या भारत सरकारचे सुरक्षीतता मार्गदर्शक तत्वे पळवून गाड्या बनवते, आता काय तर ६ एअर बॅग्स देऊ शकणार नाही कारण त्यामुळे गाडी परवडणार नाही. १०-१२ वर्षांपूर्वी हे एअर बॅग optional म्हणून जास्तीचे पैसे घेऊन विकत असे. अर्थात लोकांनी पण मारुतीच्या मायाजालातून बाहेर येऊन इतर गाड्या वापरून पहिल्या पाहिजेत.

मारूतीच्या कार्स फक्त मायलेजसाठी नाहीत घेत. त्यांच्या पेक्षा जास्त मायलेज शेवीच्या कार्स देतात. पण शेवीने गाशा गुंडाळला. माझी कार पण अधांतरी आहे पार्ट्सच्या बाबतीत. मारूतीचं सर्विस सेंटर भारतात कुठेही जा, आहेच. पार्ट्स स्वस्त आहेत. कोणताही रोड साईड कार मेकॅनिक ही कार नीट करू शकतो. ह्युंदाई ने मारूतीच्या निम्म्याने सर्विस नेटवर्क उभारल्यावर लोक ह्युंदाई कडे वळले. आता टाटा.

अर्थात एके काळी राजदूतची पण अशीच ख्याती होती. त्या वेळी येऊ घातलेल्या नव्या मोटरसायकल्सप्रमाणे बदल न केल्याने कंपनी बुडाली.

कोणतीही गाडी घ्या पण मारूती घेऊ नका.. मागच्या वीस वर्षांपासून मायलेज च्या चक्करमधे भारतीयांना मारूतीने भुलवून ठेवलंय.>> मी कालच ह्युंदाई आय १० ग्रॅंड निओस स्पोर्ट्झ बूक केलीय. नंबर प्लेट भापासूंगींग घ्यावी की महाराष्ट्र? महाराष्ट्र पासींग ला एकदम १५ वर्षाचा ६० हजरा टॅक्स भरायचाय. भारत पासींगला दर दोन वर्षाने १३ हजार.

भारत पासिंग साठी एक तर सरकारी कर्मचारी असावे किंवा तुमच्या कंपनीचा प्रेसेन्स 4 राज्यात असावा लागतो. लोन वर गाडी घेणार असाल तर भारत पासिंग घ्या. तुमचा लोन चा emi आणि पर्यायाने इंटरेस्ट कमी होते आणि दर वर्षाला साधारण 6500 जमा करणे एकदम 60000 देण्यापेक्षा सोप पडेल असे माझे मत आहे. जर 5-6 वर्षानी कार बदलून EV घेणार असाल तर भारत पासिंग नक्की घ्या. पण एकदम 60000 देऊन फारसा फाइनान्षियल लोचा होणार नसेल तर MH पासिंग घेतली तरी चालेल.

इथे कोणाला Citroen चा स्वानुभव किंवा माहितीत कोणी वापरणारं आहे का? टेस्ट drive झाली आहे. नेटवर Reviews, YouTube वरची माहिती सगळ काही पाहुन झालं आहे, पण कोणा प्रत्यक्ष वापरणाऱ्याकडून ऐकायला जास्त आवडेल. ( किंमत 45लाख - incl insurance, 5yrs maint and 2yrs extended warranty)
Citroen Vs Harrier / Jeep compass याबद्दल काय मत?

कोणतीही गाडी घ्या पण मारूती घेऊ नका.. मागच्या वीस वर्षांपासून मायलेज च्या चक्करमधे भारतीयांना मारूतीने भुलवून ठेवलंय.>> हे खुप बायस्ड विधान आहे. मी स्वतः Dzire Zxi वापरतो आहे गेली ८वर्षे. काहीही प्रोब्लेम दिला नाही कारने. Service center maintained आहे. मला तरी कंफर्टेबल वाटते. अजुनही मायलेज उत्तम आहे maintenance cost कमी आहे. १११ रु / लिटर पेट्रोलच्या जमान्यात मायलेज महत्वाचे आहे. पण आता मी दुसरा ब्रँड ट्राय करीन पण मारुती बाबत माझे मत चांगलेच राहील.

पण सुरक्षितता म्हणजे नक्की काय ? अगदी ५ स्टार रेटिंग असलेली suv किंवा हॅचबैक गाड़ी हायवेला ट्रक सोबत टक्कर झाल्यावर किंवा दरीत घसरल्यावर खरेच किती सुरक्षा देणारेय !!

सत्य कधी कधी बीटर असते पण त्यावर हि चर्चा व्हायला हवी. मी मारूतीविरोधी नाहीये.मारूती खरंतर standards maintain करू शकले असते पण मायलेज आणि टर्नौवर च्या चक्कर मधे कॉस्ट कटिंग केले आहे.
मारूतीचा रिसेंट चेअरमन आर.सी.भार्गवा हा standard six air bag पॉलिसी च्या अगेन्स्ट आहे..जे कि दुसऱ्या विकसित देशांत manadatory आहे...त्यांची mentality बघा, माणूस जर पाच लाखाची गाडी घेत असेल तर पन्नास हजाराची सिक्स एअर बैग पॉलिसी घेऊ शकत नाही का?
मायलेजच्या नादात त्याने स्टीलचा थीकनेस एवढा कमी केलाय कि , 80 च्या वर गाडी थरथरू लागते. त्यातल्या त्यात vitara briza आणि s-cross या गाड्या चांगल्या आहेत ज्या वेगळ्या प्लाटफॉर्मवरच्या आहेत..बाकी सगळ्या tin cans आहेत.

2014 मधे मारुती नी heartect प्लॅटफॉर्म लॉन्च केला
यात गाडीचं वजन कमी होऊन मायलेज वाढणं, वायाब्रेशन्स कमी होणं आणि स्त्रेंथ कॉमप्रोमाईज न होणं एक्सपेक्टेड होतं.

पण जास्ती मायलेजदेणारी गाडी बनवायच्या नादात पत्र्याचा थिकनेस ही कमी केला अन् ॲक्सिदेंत नंतर लोळागोळा झालेल्या बलेनो चे फोटो खूप वायरल झाले. त्यात या गाड्यांना एन कॅप रेटिंगही खूप कमी / ० आलं. अन् मारुती = टिन कॅन ही इमेज व्हायला लागली

गाडीचा पत्रा जाड असला म्हणजे ती सेफ असते हा गैरसमज आहे.
कोणतीही पॅसेंजर कार कोलिजन मधे किती टिकेल यासाठी तिची ४०% क्रॅश टेस्ट घेतली जाते. अगदी सुरूवातीच्या मारूती कार्स या जपानच्या सुझुकी कार्स च्या आंतरराष्ट्रीय मॉडेल प्रमाणे असत. नंतर मात्र मोनोपॉली आणि भारतात सुरक्षिततेच्या टेस्टसबाबत नसलेले नियम याचा फायदा उठवत मारूतीने वजन कमी करून मायलेज वाढवण्याकडे लक्ष दिले. फायबरचा वापर ते कमी गेजचा पत्रा वापरणे इत्यादी त्यांनी केले.
लवकरच ह्युंदाई आणि देऊ कंपनीची माटिज कार आली. त्यांच्या कार्स तुलनेने सुरक्षित होत्या. पण महाग होत्या. काही काळानंतर ह्युंदाईने सुद्धा कॉस्ट कटिंगमधे पत्रा पातळ केला. फोक्सवॅगनच्या सुरूवातीच्या कार्स मधे आंतरराष्ट्रीय मानक होती. पण आता त्यातही मारूतीप्रमाणे पातळ पत्रा वापरला आहे. शेवर्लेटच्या गाड्या मात्र तडजोड न केल्याने महाग राहिल्या होत्या. लवकरच त्यांना इथला गाशा गुंडाळावा लागला.

टाटाला सततच्या अपयशानंतर नवीन काही हवे होते. त्यांनी सुरक्षितता यावर फोकस आणि मार्जेटिंग केले. त्यांच्या कार्स या आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे आहेत हा प्रचार सुरू केला. त्याप्रमाणे त्या खरंच मजबूत आहेत. त्याचा फायदाही त्यांना झाला. त्यानंतर मारूतीसहीत सर्वच कंपन्या आता ४०% क्रॅश टेस्ट करून घेतात.
२०२१ मधे ४०% क्रॅश टेस्ट यशस्वीरित्या पास केलेल्या कार्स खालीलप्रमाणे :

१. टाटा मोटर्स
टाटा टिगोर ईव्ही ( दोन एअरबॅग्ज) / टाटा पंच ( दोन एअरबॅग्ज) / टाटा अल्ट्रोज ( दोन एअरबॅग्ज) / टाटा नेक्सॉन ( २ एअरबॅग्ज) / टिएगो - टिगोर ( २ एअरबॅग्ज)

२. रेनॉ
ट्रायबर ( २ एअर्बॅग्ज) / डस्टर ( १ एअरबॅग - ड्रायव्हर) / क्विड ( १ एबॅ - ड्राय्व्हर )

३. महिंद्रा
एक्सयूव्ही ३०० ( २ एअरबॅग्ज) / मराझ्झो ( २ एअरबॅग्ज) / थार ( २ एअर र्बॅग्ज ) / स्कॉर्पिओ ( नो एअरबॅग्ज)

४. फोक्सवॅगन
पोलो ( २ एअर्बॅग्ज)

५. मारूती सुझुकी
व्हिटारा ब्रेझा ( २ एअरबॅग्ज) / एर्टिगा ( २ एबॅ) / स्विफ्ट ( २ एबॅ) / वॅगन आर ( १ एअरबॅग) / एसप्रेसो ( १ एबॅ) / एको ( नो एअरबॅग)

६. फोर्ड
एस्पायर ( २ एअर्बॅग्ज)

७. किया मोटर्स
सेल्टोज ( २ एबॅ)

८. ह्युंदाई
ग्रॅण्ड आय १० Nios ( २ एबॅ) / सँट्रो ( १ एबॅ)

९. डॅटसन
रेडी गो ( नो एबॅ)

ज्या कार्स जुन्या आहेत त्यात एकच किंवा शून्य एअरबॅग मिळते. त्यानुसार रेटींग मिळते. ४०% क्रॅश टेस्ट मधे फक्त गाडी किती चेपते हेच महत्वाचे नसून आतल्या पॅसेंजर वर काय परिणाम होतो याचेही रेटींग ठरते. एअरबॅग जितक्या कमी तितके रेटींग कमी. वरच्या लिस्ट मधे एकाही कारने चार किंवा सहा एअरबॅग दिलेल्या नाहीत. सर्वच्या सर्व २ किंवा १ देतात.

पत्र्याचा गेज कमी असला तरी मटेरिअल बदलल्याने त्याची स्ट्रेंथ वाढते. याच धाग्यावर हे येऊन गेलेले आहे. मायक्रोअलाईड स्टील्सचा वापर केल्यास स्ट्रेथ वाढत असल्याने पत्र्याचा गेज कमी ठेवला तरी चालतो. तसेच पत्र्याच्या ज्या भागावर कोलिजन मधे सर्वात जास्त स्ट्रेस येतो तिथे कॉरुगेशन डिजाईन मुळे एक्स्ट्रा स्ट्रेंथ मिळते. मिलिटरी व्हेईकलची टेक्नॉलॉजी आता पॅसेंजर कार्स मधे सुद्धा पहायला मिळते.

वरच्या एअरबॅगच्या लिस्टमध्ये त्या गाडीचं बेस मॉडेल पकडलं आहेत कां? कारण XUV300 च्या W8 व W8 (O) मध्ये ६ एअरबॅग्ज येतात. पूर्वी ७ यायच्या आता एक कमी केली आहे. नवीन स्कॉर्पियोमध्ये एअरबॅग नाहीत?? Uhoh

Pages