डोळ्यात खुपणारी गाणी

Submitted by MazeMan on 20 July, 2022 - 05:22

आत्ताच्या पिढीला कदाचित हे दुःख समजणार नाही. कारण आता चित्रपट किंवा त्यातली गाणी नेत्रसुखद करण्यावर भर असतो. फराह खानसारखे कुशल नृत्यदिग्दर्शक एखाद्या चांगल्या गाण्याला चार चाँद लावतात. एक्झॉटिक लोकेशन्स, देखणे कलाकार, चकाचक सेट, मॉडेलसारखे दिसणारे किंवा भारतिय मानसिकतेला आवडतील असे कॉकेशिअन रंगरुपाचे बॅकग्राउंड डान्सर्स हे गरजेचे झालेले आहे. गाण्यांचे सेपरेट रिलीज होतात व हक्क विकले जातात त्यामुळे गाणे चांगले (असण्यापेक्षाही) दिसणे फार महत्वाचे होते आहे.

पण इंटरनेट, मोबाइलचा जमाना येण्यापूर्वी व उपग्रह वाहिन्यांचा सुळसुळाट होण्यापूर्वी असेही व्हायचे ना की एखादे गाणे ऐकायला खूप छान वाटायचे, कधी पाहिलेले नसायचे. मग एखाद्या दिवशी आपल्या दूर्दैवाने ते गाणे दिसायचे आणि 'क्या यही दिन दिखाने के लिए भगवान ने मुझे जिंदा रखा?' असं म्हणावेसे वाटायचे.

तर चला बनवूया अशा गाण्यांची लिस्ट….

(वि. सु. : गाण्यांचे व्हिडिओ स्वतःच्या हिंमतीवर पाहणे. कुठल्याही प्रकारच्या मानसिक छळास पोस्टलेखक जबाबदार नाही.)

सेहरा चित्रपटातील 'पंख होती तो उड आती रे'. हेच गाणे या पोस्टला (परिणामस्वरुपी तुमच्या डोकेदुखीला) कारणीभूत ठरले आहे. लताबाईंचा आवाज अप्रतिम लागलाय, संगीतही सुंदर आहे पण या गाण्यात संध्याबाईंनी जे काही (मी त्याला नृत्य म्हणण्याचे धाडस करणार नाही) केलेय त्याला तोड नाही. युट्युबरसुद्धा ऑडिओ ऐकते मी.
https://youtu.be/s3Kt97M0ANQ

'घुंगरू' चित्रपटातील 'प्यार के धागे' गाणे. साधना सरगम गोड गायल्या आहेत. मनहर उधासही वाईट नाहीत. लिरिक्सही चांगले आहेत. पण 'प्यार के धागे' म्हणून वडाला गुंडाळलेले दोरेच दाखवले पाहिजेत? गाणं डोळ्यासमोर आणा व खरं सांगा 'आता आठवतायत ते फक्त पांढरेशुभ्र बूट' असं होतं की नाही.
नंतर नंतर तर हिरो हिरॉईनकडे लक्ष जायच्या ऐवजी हिरोचे ते शिकारी/हायकिंग बूटच दिसत राहतात या गाण्यात
https://youtu.be/P43GZJ7lP2E

तसंच ते गॅंबलरमधलं 'दिल आज शायर है'. इतकी सुंदर शायरी किशोरकुमारने जीव ओतून गायली आहे, पण आठवतं काय तर देव आनंदची ती विअर्ड मिशी. मान्य आहे की हा पिक्चर येईपर्यंत तो ५०-६० च्या दशकातला 'राजस, सुकुमार' राहिला नव्हता. पण गाण्यात देव आनंद असताना त्याची मिशी लक्षात रहावी यापरता दैवदुर्विलास तो काय?
https://youtu.be/XRuqrlBmzAY

मदन मोहनचे अप्रतिम संगीत, लताबाईंचा दैवी आवाज मातीमोल करणारं हंसते ज़ख्म मधले 'आज सोचा तो आंसू भर आये'. काय ती प्रिया राजवंश, काय तो गॅरीश सिल्कचा ड्रेस, अगागा. त्यातून ती बिचारी देणार जेमतेम साडेतीन एक्स्प्रेशन्स. आता प्रिया तर नाहीच करत आहे मग तिच्या वाटचा अभिनयपण तुम्ही करुन टाका म्हणून वेठीला धरलेले के. एन. सिंग व रझा मुराद. वास्तविक हे दोन्ही अभिनेते एखादी भुवई उंचावून किंवा ओठाला हलकीशी मुरड पाडून बरंच काही सांगून जातात. पण त्यांनाही या गाण्यात कॅरीकेचरच्या लेव्हलला आणुन ठेवलंय.
https://youtu.be/PcOfJLdIh1M

तुम्हाला कुठली गाणी खुपतात?

Group content visibility: 
Use group defaults

Happy खूपच गाणी खुपतात!
गाणं सुंदर पण picturizarion poor अशी कैक उदाहरणे आहेत..
किसी नजर को तेरा इंतजार आज भी है ...
गाणं सुंदर..पण सुरेश ओबेरॉय आणि आपला खोड रब्बर ....वात आणतात..! Happy

अश्विनी येना अजिबात खुपत नाही उलट अशोक मामांचा युनिक डान्स आणि किशोर कुमार चा आवाज कडक कॉम्बो आहे एकदम. मला आवडतं हे बघायला पण. खासकरून ती गोल बनवायची स्टेप Lol १.३० ला आहे.

व्हाईट व्हाईट फेस देखे
दिलवा बीटिंग फास्ट
ससुरा चान्स मारे रे
भेरी हॅप्पी इन माय हार्ट
दिल डान्स मारे रे

या पेक्षा खुपणारं गाणं असू शकेल का???

अश्विनी येना अजिबात खुपत नाही उलट अशोक मामांचा युनिक डान्स आणि किशोर कुमार चा आवाज कडक कॉम्बो आहे एकदम. मला आवडतं हे बघायला पण. खासकरून ती गोल बनवायची स्टेप Lol १.३० ला आहे.

>>>>अनुमोदन!!

गाणे आठवत नाही पण जितेंद्रचा नाच आठवतो आहे. टणाटण उड्या मारायचा.. एक गिरकी घ्यायचा आणि नटीला एक फटका मारायचा. मग नाचतच तिचा एक पाय धरून ओढत तिला फरफटवायचा..आणि त्याच लयीत तीही नाचत असते.

झनक झनक तोरी बाजे पायलियाँ - राज कुमारचा गाण्यात अभिनय करायचा वकूब बी. आर. चोप्राने जितका ओळखला (हमराज मधलं ‘नीले गगन के तलें - फक्त लाँग शॉट्सवर आणि निसर्ग दाखवत काढलंय) तितका कुणीच ओळखला नाही, म्हणून आपल्यावर ‘झनक झनक’ सारखी गाणी ‘बघण्याचे’ भोग ओढवले.

“ हा पिक्चर येईपर्यंत तो ५०-६० च्या दशकातला 'राजस, सुकुमार' राहिला नव्हता.” - ब्लॅक अँड व्हाईट नंतर देव आनंद पडद्यावर नसता आला तरी चाललं असतं. तो ब्लॅक अँड व्हाईटमधेच छान दिसायचा.

सांज ये गोकुळी हे गाणं ऐकायला जितकं गोड आहे तितकं पाहायला अत्याचार ...

गाण्याच्या शब्दाचा आणि चित्रीकरणचा काहीएक संबंध नाही

ब्लॅक अँड व्हाईट नंतर देव आनंद पडद्यावर नसता आला तरी चाललं असतं. तो ब्लॅक अँड व्हाईटमधेच छान दिसायचा. >>> फेफ - इन जनरल सहमत. पण गाइडचा प्रचंड मोठा अपवाद.
https://www.youtube.com/watch?v=7J1nr0-2O60

काय ग्रेस आहे वहिदाची आणि देव आनंदही कंट्रोल मधे आहे. रानाच्या या टोकाहून त्या टोकाला पळत सुटलेला नाही.

>>पण गाइडचा प्रचंड मोठा अपवाद.<<
यात देव आनंदचा दोष नाहि, अथवा इंन्फ्लुंस हि नाहि. ती विजय आनंदची कमाल आहे. लगे हात हे गाणं बघा...

बाय्दवे, संध्याची स्टाइल आता काहिंना बटबटित वाटंत असेल; तो तिचा युएस्पी होता हे लक्षात घ्या...

आश्विनी ये ना खुपते?
अयाकॉनिक डान्स आहे तो..
आम्ही लहानपणी बड्डे पार्टीला ते हमखास लावायचो आणि नाचायचो..
अगदी आजही कित्येक ईंग्लिश गाण्यांना त्याचा विडिओ टाकून मजेशीर रिमिक्स बनवतात ते बघायला भारी वाटते

"पण गाइडचा प्रचंड मोठा अपवाद." - अपवाद आहेतच रे. तसा तो ज्वेल थीफ मधेही वाईट नाही दिसलाय (तेव्हढं मारामारीचं प्रकरण वगळून. ते त्याला कधीच नाही जमलं). पण मी 'ब्रॉडली स्पीकिंग' म्हणत होतो. ब्लॅक अँड व्हाईटमधे तो दिसलाय ही छान (शेवटी एक वय असतंच की) आणि ते सिनेमेही त्याच्या प्रकृतीला मानवणारे होते. अगदी जाल सारख्या निगेटीव्ह हीरोच्या भुमिकेत सुद्धा देव आनंद छान सूट झालाय.

द किलर चित्रपटातलं 'फिरता रहूँ दरबदर' गाणं आठवलं. या गाण्यात सुरूवातीला केकेची खणखणीत आणि स्टाईलिश साद आहे. पिक्चर इमरान हाश्मीचा आहे. तेव्हा मस्त रोमँटिक काहीतरी पहायला मिळेल असं वाटलं. पण प्रत्यक्षात हे गाणं एक माणूस फुल्ल गझल गात असल्यासारखा स्टेजवर उभं राहून गातो आहे. त्याचे कपडे पण एकदम कुर्ता पायजमा शाल वगैरे. आणि केकेचा आवाज त्याला अजिबात मॅच होत नाहीये. हताश झाले मी हे गाणं पाहून. थँकफुली पुढे इमरान दाखवला आहे. त्यामुळे हे गाणं त्याच्या फक्त सुरूवातीला (आणि शेवटी काही सेकंद) खुपतं Proud

हुजुर इस कदर ला अनुमोदन
----------------------------------------------------

https://www.youtube.com/watch?v=wM1kBO2lrYQ

हुज़ूर इस कदर भी न इतरा के चलिये
खुले आम आँचल न लहरा के चलिये

कोई मनचला गर पकड़ लेगा आँचल
ज़रा सोचिये आप क्या कीजियेगा
लगा दें अगर बढ़के ज़ुल्फ़ों में कलियाँ
तो क्या अपनी ज़ुल्फ़ें झटक दीजियेगा
हुज़ूर इस ...

बहुत दिलनशीं हैं हँसी की ये लड़ियां
ये मोती मगर यूँ ना बिखराया कीजे
उड़ाकर न ले जाये झोंका हवा का
लचकता बदन यूँ ना लहराया कीजे
हुज़ूर इस ...

बहुत खूबसूरत है हर बात लेकिन
अगर दिल भी होता तो क्या बात होती
लिखी जाती फिर दास्तान-ए-मुहब्बत
एक अफ़साने जैसे मुलाक़ात होती

हुज़ूर इस ...

आहाहा!!!!

'दिल आज शायर है' बद्दल अगदीच सहमत! गाण्याचे बोल किती सुरेख आहेत, पण पूर्ण बघूच शकले नाही.
अशाच एका वाईट्ट क्षणी मी हे माझे आवडते गाणे बघितले. का, का, का? असेच फीलिंग बराच वेळ होते.
आणि हे अजून एक. फारच हसलो होतो आम्ही हे पहिल्यांदा बघितल्यावर. Rofl

'एक प्यार का नगमा है' गाणं पाहिल्यावर अगदी हिरमोड झाला होता. कॅमेऱ्याची करामत दाखवण्याच्या नादात पार कचरा केला आहे. फार पूर्वी पॉवरपॉइंट शिकण्याच्या काळात असतील नसतील ते सगळे स्लाईड इफेक्ट्स वापरून टाकायची हौस असायची तसाच हा प्रकार वाटतो Proud

फार पूर्वी पॉवरपॉइंट शिकण्याच्या काळात असतील नसतील ते सगळे स्लाईड इफेक्ट्स वापरून टाकायची हौस असायची तसाच हा प्रकार वाटतो >>> हे फारच पटलं Rofl

जान चली जाए, जिया नहीं जाय (अंजाना)
https://www.youtube.com/watch?v=O_S9e0Dc0F0
गाण्याचा ठेका काय, रा.कु.च्या हालचाली काय, काहीही मेळ नाही. Biggrin

काय ग्रेस आहे वहिदाची >>>
'प्यार करने वाले .... जल जल मरेंगे' या (लताच्या) ओळींच्या वेळी स्क्रीनवर देव आनंद पाठमोरा आणि मागून वहिदाचे फक्त डोळे दिसतात. पण तरी ती गाते आहे हे तिने केवळ मानेच्या हालचालींमधून दाखवलंय !!

तुम जो मिल गये हो... के जहा मिल गया...
ह्या पेक्षा दु:खदायक काही नसेल.>>> Rofl
मला ही हेच गाणे आठवले. एकाहून एक सरस ठोकळे चेहरे Rofl

अजून मिलो न तुमसे हम घबराये..त्यात रा.कु. ने केलेला डान्स Wink Rofl

कौन है जो सपनोंमें आया गाणं ऐकायला छान पण ते अशक्य हातवारे राजेंद्र कु. चे. अक्षरशः जोड्याने हाणावेसे वाटते त्याला.

Pages