डोळ्यात खुपणारी गाणी

Submitted by माझेमन on 20 July, 2022 - 05:22

आत्ताच्या पिढीला कदाचित हे दुःख समजणार नाही. कारण आता चित्रपट किंवा त्यातली गाणी नेत्रसुखद करण्यावर भर असतो. फराह खानसारखे कुशल नृत्यदिग्दर्शक एखाद्या चांगल्या गाण्याला चार चाँद लावतात. एक्झॉटिक लोकेशन्स, देखणे कलाकार, चकाचक सेट, मॉडेलसारखे दिसणारे किंवा भारतिय मानसिकतेला आवडतील असे कॉकेशिअन रंगरुपाचे बॅकग्राउंड डान्सर्स हे गरजेचे झालेले आहे. गाण्यांचे सेपरेट रिलीज होतात व हक्क विकले जातात त्यामुळे गाणे चांगले (असण्यापेक्षाही) दिसणे फार महत्वाचे होते आहे.

पण इंटरनेट, मोबाइलचा जमाना येण्यापूर्वी व उपग्रह वाहिन्यांचा सुळसुळाट होण्यापूर्वी असेही व्हायचे ना की एखादे गाणे ऐकायला खूप छान वाटायचे, कधी पाहिलेले नसायचे. मग एखाद्या दिवशी आपल्या दूर्दैवाने ते गाणे दिसायचे आणि 'क्या यही दिन दिखाने के लिए भगवान ने मुझे जिंदा रखा?' असं म्हणावेसे वाटायचे.

तर चला बनवूया अशा गाण्यांची लिस्ट….

(वि. सु. : गाण्यांचे व्हिडिओ स्वतःच्या हिंमतीवर पाहणे. कुठल्याही प्रकारच्या मानसिक छळास पोस्टलेखक जबाबदार नाही.)

सेहरा चित्रपटातील 'पंख होती तो उड आती रे'. हेच गाणे या पोस्टला (परिणामस्वरुपी तुमच्या डोकेदुखीला) कारणीभूत ठरले आहे. लताबाईंचा आवाज अप्रतिम लागलाय, संगीतही सुंदर आहे पण या गाण्यात संध्याबाईंनी जे काही (मी त्याला नृत्य म्हणण्याचे धाडस करणार नाही) केलेय त्याला तोड नाही. युट्युबरसुद्धा ऑडिओ ऐकते मी.
https://youtu.be/s3Kt97M0ANQ

'घुंगरू' चित्रपटातील 'प्यार के धागे' गाणे. साधना सरगम गोड गायल्या आहेत. मनहर उधासही वाईट नाहीत. लिरिक्सही चांगले आहेत. पण 'प्यार के धागे' म्हणून वडाला गुंडाळलेले दोरेच दाखवले पाहिजेत? गाणं डोळ्यासमोर आणा व खरं सांगा 'आता आठवतायत ते फक्त पांढरेशुभ्र बूट' असं होतं की नाही.
नंतर नंतर तर हिरो हिरॉईनकडे लक्ष जायच्या ऐवजी हिरोचे ते शिकारी/हायकिंग बूटच दिसत राहतात या गाण्यात
https://youtu.be/P43GZJ7lP2E

तसंच ते गॅंबलरमधलं 'दिल आज शायर है'. इतकी सुंदर शायरी किशोरकुमारने जीव ओतून गायली आहे, पण आठवतं काय तर देव आनंदची ती विअर्ड मिशी. मान्य आहे की हा पिक्चर येईपर्यंत तो ५०-६० च्या दशकातला 'राजस, सुकुमार' राहिला नव्हता. पण गाण्यात देव आनंद असताना त्याची मिशी लक्षात रहावी यापरता दैवदुर्विलास तो काय?
https://youtu.be/XRuqrlBmzAY

मदन मोहनचे अप्रतिम संगीत, लताबाईंचा दैवी आवाज मातीमोल करणारं हंसते ज़ख्म मधले 'आज सोचा तो आंसू भर आये'. काय ती प्रिया राजवंश, काय तो गॅरीश सिल्कचा ड्रेस, अगागा. त्यातून ती बिचारी देणार जेमतेम साडेतीन एक्स्प्रेशन्स. आता प्रिया तर नाहीच करत आहे मग तिच्या वाटचा अभिनयपण तुम्ही करुन टाका म्हणून वेठीला धरलेले के. एन. सिंग व रझा मुराद. वास्तविक हे दोन्ही अभिनेते एखादी भुवई उंचावून किंवा ओठाला हलकीशी मुरड पाडून बरंच काही सांगून जातात. पण त्यांनाही या गाण्यात कॅरीकेचरच्या लेव्हलला आणुन ठेवलंय.
https://youtu.be/PcOfJLdIh1M

तुम्हाला कुठली गाणी खुपतात?

Group content visibility: 
Use group defaults

'धर्मेंद्रची पोळ्या लाटतानाची दुर्मिळ क्लिप' >> Lol

किती सुंदर गाणं आहे ते वावे! ह्यात रफीने मींड ह्या प्रकाराचा इतका सुंदर वापर केला आहे, ... जाऊ दे, इथे नको. मामींचा कुठला तरी धागा आहे ना, सौंदर्यस्थळे की काहीतरी, तिथे लिहायला पाहिजे.

पण आता पोळ्याच आठवणार. >>> हा विचार करुन हे गाणे आज परत पाहिले . हा हा
पण गाणे सुंदर आहे , तनुजा आणी माला सिन्हा सुंदर दिसतात आणी शब्दरचना तर फारच भारी आहे

बहारें फ़िर भी आएँगी मधलं गाणं आहे ते. गुरूदत्त ला घेऊन तो सिनेमा सुरू केला होता. पण गुरूदत्त च्या अकाली मृत्यूमुळे धर्मेंद्रला घेऊन तो पूर्ण केला.

आपके हसीन रूख पे हे गाणं आधी गुरूदत्तवर चित्रीत झालं होतं. धर्मेंद्रचे सीन्स नंतर शूट करून गाण्यात घातले आहेत. त्यामुळे ह्या गाण्यात धर्मेंद्र दोन्ही अभिनेत्र्यांबरोबर एका फ्रेममधे दिसत नाही.

>>माला सिन्हा सुंदर दिसतात
माला सिन्हा कधी सुंदर दिसत नाही?
तिचे विभ्रम, अदा सारेच गोड असते. खव्याची बर्फी आहे ती.

'धर्मेंद्रची पोळ्या लाटतानाची दुर्मिळ क्लिप' >> Lol बाकी पियानो वाजवताना हीरोंचा अभिनय हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.

भन्नाट आहेत सगळीच.
पोळ्या लाटणे Lol
किती ते फॅड असायचं पियानो वाजवण्याचं त्या काळात. शास्त्र असतं ते सारखं. पार्टी, पियानो, रसनाचे ग्लास, सुट बुट, निर्विकार चेहेर्‍याची माणसं.. सगळंच फनी

पियानोचा उल्लेख आला आहे तर हे गाणे विसरू नका..

https://youtu.be/jBpRItrod-Q

या क्लिपमध्ये तो फेमस पियानो सीन आला नाहीये. पण तो हे गाणे बघून आठवेलच सर्वांना. हा चित्रपट न बघितलेला कोणी नसेलच ईथे..

मला सिन्हा छानच दिसतेय पण तिचे दुर्दैव कि बाजूला तनुजा आहे.. तनुजा च्या सौन्दर्यापूढे साधारण दिसतेय माला ...

मला सिन्हा छानच दिसतेय पण तिचे दुर्दैव कि बाजूला तनुजा आहे.. तनुजा च्या सौन्दर्यापूढे साधारण दिसतेय माला ...

बाय द वे तो नया नूर कोणाच्या हसीन रूखपर आहे? दोघीही हे आपल्याबद्दलच चालले आहे अशा समजुतीत दिसत आहेत Happy

Mazeman - नोटेड. तेवढे सुचले तर नक्कीच Happy याचा जनरल उल्लेख मी एका लेखात केला होता, की पियानोवरच्या मधल्या ४-५ कीज वर बोटे फिरवून कोणत्याही सुरातील गाणे वाजवता येते हिंदी पिक्चर मधे Happy

च्रप्स जोक्स छान करता. सौंदर्यातही विविधता असते. एक रेघ खोडल्याखेरीजही दुसरी रेघ मोठी करता येते. दर वेळेला एक रेघ खोडावीच लागत नसते.

फा, पियानो वाजवणाऱ्या हिरोंची ही कथा तर मग बासरी सतार वगैरे वाजवणारे नेहमीचे यशस्वी जग्गू दादा, सुनील शेट्टी, राजेश खन्ना वगैरे तर विचारायलाच नको. सतारीवर तर दोन्ही हात खालीवर फिरवतात हे लोक. उजव्या हाताने फक्त स्ट्रोक द्यायचा असतो. काही पिक्चर मध्ये तानपुरा वाजताना दिसतो आणि आवाज सतारीचा येतो. कुठे ते आत्ता आठवत नाहीये. (ताराच खाजवायच्या ना - आठवलं तिथे)

“ बाय द वे तो नया नूर कोणाच्या हसीन रूखपर आहे?” - मला वाटतं, माला सिन्हा -> धर्मेंद्र - तनुजा असा त्रिकोण आहे तो.

ब्लैक आणी व्हाइट मध्ये क्लोज अप मध्ये छान सौदर्य पकडणे सोपे नाहिये, आजकाल टेक्नोलोजी असुनहि अशी सुंदरता टिपता येणार नाहि. आणी दुसरे कि या गाण्यात माला सिन्हा जास्त सुंदर दिसते कि तनुजा हा प्रश्न नाहिये - दोघीहि एकमेकांना पुरक आहेत. माला सिन्हा नसती तर या गाण्यात तर तनुजा इतकी सुंदर वाटली नसती.
दोघींचे आपल्यासाठीच गाण गायल जात आहे असे वाटुन दाखवलेले विभम लाजबाब आहेत

सहसा गाण्यातील आशय चित्रीकरणात प्रतिबिंबित व्हावा, निदान काही प्रमाणात तरी आशय चित्रीकरणात उतरावा ही सामान्य अपेक्षा.
"बन्या बापू" मराठी चित्रपटातील "प्रीतीचं झुळझुळ पाणी" हे गाणं काही प्रमाणात एका तळ्याच्या अवतीभोवती चित्रित केले आहे. गाण्याच्या शब्दरचनेनुसार हे गाणे एखादा झरा किंवा धबधबा याच्या आसपास चित्रित व्हायला हवे होते.
"लक्ष्मीची पाऊले" या चित्रपटातील सुधीर मोघे लिखित "फिटे अंधाराचे जाळे" हे गाणे रंजना आणि रवींद्र महाजनी यांच्यावर चित्रित झाले आहे. गाण्यात सूर्योदयाचे निनान्तसुन्दर वर्णन आहे, आणि चित्रीकरण भर दुपारचे वाटत आहे.
त्याचप्रमाणे "गोलमाल" चित्रपटातील "आनेवाले पाल जानेवाला है" हे गाणे पण फक्त एका रूम मध्ये चित्रित झाले आहे. गाण्याच्या प्रकृतीनुसार हे गाणे मोकळ्या मैदानात चित्रित करायला हवे होते, निदान स्वप्नरंजनाचा सहारा घेऊन चित्रीकरण प्रशस्त ठिकाणी चित्रित झाले असते तर किशोरकुमारच्या आवाजाला न्याय मिळाला असता.

माझ्यासाठी टॉर्चर गाणी :

रंगीला रे (प्रेम पुजारी).

वहीदा रहमान आवडती कलाकार. “मैंने तो सींची रे तेरी ये राहें, बाहों में तेरी क्यूँ औरों की बाहें” अश्या सेंसिटिव भावना पण तिचा तो डांस, मधूनच थबकणे, तो गेटअप, एक्सप्रेशन्स, एक्टिंग के जौहर ..॥ उफ़्फ़ ! या गाण्याचं जे काही शेण केलयं उस के लिए कभी माफ नहीं करूँगा !

झनक झनक पायल बाजे (सर्व गाणी)

या संध्याबाईंचे “facial expressions” फारच भयंकर आहेत सर्वच गाण्यात. गाणी सुमधुर आणि कर्णप्रीय. पण चित्रण बटबटीत, फुल्ल मातेरे !

वर आलयं ते “हुजूर इस कदर भी ना इतरा के” - सुंदर गाणे + शबाना. टोटली वेस्टेड.

अभिमान मधल्या सर्वच गीतांमधे (विशेषत: नदिया किनारे हेराय आयी कंगना) जया भादुरीने भयंकर वेडेवाकडे तोंड करून मजरूहच्या शब्दांचा + बर्मन सिनियरच्या संगीताचा पदोपदी कचरा केलाय की ज्याचे नाव ते !

'एक प्यार का नगमा है' - सुंदर गीताचे शेण चित्रण.

खूप आहेत अजून Happy

या धाग्याचे दोन उपधागे बनू शकतात

१. डोळे बंद करून ऐकायची गाणी
२. कान बंद करून पहायची गाणी.

दुसर्‍या धाग्यावर इतक्यातच तुम बिन जाऊं कहा - भारतभूषण बद्दल लिहीले. ते पहिल्या विभागात टाका.

रंगिला रे ….. खरेच भयंकर आहे… वहिदाने कशी काय असली विचित्र कोरिओग्राफी सहन केली देव जाणे… देवच्या प्रोडक्शनमध्ये तिने जबरदस्त गाणी दिलीत…. देव आनंदला पण सहन झाले नाही, शेवटी त्याने तिच्या डोक्यावर पाण्याचा भरलेला जग रिकामा करुन स्वतःची सुटका करुन घेतली Happy

संध्याबद्दल बोलण्यात अर्थ नाही पण तिने झनक्न्झनक मधली गाणी सुंदर केलीत.. ती कथक डान्सर नसुनही तिने कमाल केलीय. सोबत तयार कथक डान्सर गोपीकृष्ण… ही गाणी पाहणे ही मेजवानी आहे खरेतर…

ती स्वतःच दारु पिते.. मी पाहिलाय तो भयंकर पिक्चर.. देव अनंदने गोल्डीची साथ सोडल्यावर स्वतःच्या दिग्दर्शनाखाली जे काही भयंकर चित्रपट बनवले त्याचा प्रेम पुजारी हा एक मुकुटमणी… आता त्याने दिग्दर्शित केलेले सगळेच आचरटपणात मुकुटमणी शोभत होते.. त्या गर्दीत हा…

प्रत्येक फ्रेममध्ये आचरट पणा… देवला युद्धे आवडत नसतात, यावर उतारा काय??? तर स्वतः सैन्यात भरती होऊन युद्ध सुरु झाले की मी बंदुक उचलणार नाही म्हणुन आपल्या तुकडीला तोंडावर पाडायचे…. युद्ध आवडत नसणारे हे वीर पुढे भारतीय हेर खात्यात सामिल होतात…. देशांदरम्यान उघड किण्वा छुपे वैमनस्य असते म्हणुन हेरखात्याचा जन्म झालाय ना.. ह्या शांतीवीराला करीअर काय निवडावे हे कधीही कळत नाही.. आधी सैन्य, मग हेर….. पाकिस्तानविरुद्ध हेरगिरी करायला लंडनला कशाला जायला हवे?? पण तो जातो.. तो गेला म्हणुन हिरोइनला पण पाठवतात, मिस वर्ल्ड बनायला… ह्या गाण्याच्या सिनमध्ये तो तिथे हेरगिरी करायला गेलेला असतो, सोबत हेरीण पण असते पण हिरविनीच्या डोक्यात प्रकाश पडेल तर… डोक्यावर एवढे मोठे घरटे ठेवल्यावर प्रकाश तसाही पोचणारच नाही म्हणा…. हेरणीला पाहुन तिला लगेच सवतीमत्सराची लागण होते.. हेरगिरी करायची इतकी जय्यत तयारी केलेली हिच्यामुळे वाया जाणार हे बघुन शेवटी पाण्याचा जग रिकामा करुन हा सुटका करुन घेतो… पुढे काय होते आठवत नाही. पण अशा बॅकवर्ड बाईशी हिरोने शेवटी लग्न करु नये हेमावैम. होणार्‍या नवर्‍याला एकतरी करिअर धड करु द्यावी की नाही माणसाने???

हे सगळे प्रेम पुजारी मधे आहे? Happy प्राचीन काळी पाहिला आहे पण लक्षात नाही. बापाची बोलणी खातो इतकेच लक्षात आहे. युद्धात बंदूक न उचलण्याबद्दल "हॅकसॉ रिज" नावाचा एक सुंदर पिक्चर आहे. प्रत्यक्षातल्या एका व्यक्तीवर आधारित आहे. देव आनंदच्या डोक्यात ती कल्पना होती की काय माहीत नाही. कदाचित विजय आनंदने याहून चांगला पिक्चर काढला असता व तो वहिदाचा डान्सही ग्रेसफुल झाला असता.

मलाही तो डान्स विचित्र वाटतो. स्लो मो मधे ब्रेक डान्स करत आहे असे सुरूवातीला वाटते. एकूण बॉडी लँग्वेज तू मला दगा दिलास म्हणून भर मैफिलीत मी स्वतःलाच जलील करत आहे टाइप वाटते. देव आनंदच्या दिग्दर्शनात त्याला कॅमेर्‍याचे अँगल्स जमत नसावेत. रॅण्डम गाण्यांमधे दिसणारे "फेसलेस" गोरे लोक हे ही त्याच्या पिक्चर्स मधे कॉमन असते Happy अर्थात आमच्या पंटरभोवती गोर्‍या मडमा फिरत आहेत हे केजो पासून ते साउथ पिक्चर्स मधे अजूनही आहे.

देव आनंदच्या दिग्दर्शनात त्याला कॅमेर्‍याचे अँगल्स जमत नसावेत>>>>

नसावेत नाही नव्हते. आणि नुसते कॅमेरा कोनच नाही तर उरलेल्या खात्यांतलेही काही जमत नव्हते. अभिनय हा त्याचा प्रांत कधी नव्हताच, गोल्डी असो वा नसो. आणि कोणी ती अपेक्षाही ठेवली नव्हती. पण संवादही तो पाठ केल्यसरखे कुठुनही सुरु करुन कुठेही संपवे. तुम्हा मंडळींचा तेव्हा जन्म झालेला का ते माहित नाही, झाला नसेल तर तुम्हाला माहित नसणार पण देवानंदने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली की पब्लिकमध्ये भितीची लहर पसरे… आता काय बघायला लावतोय हा बाबा म्हणुन… तो साक्षात देव असल्याने तो जे काय बघायला घाली ते बघणारे फॅन्स होते.

Pages