डोळ्यात खुपणारी गाणी

Submitted by MazeMan on 20 July, 2022 - 05:22

आत्ताच्या पिढीला कदाचित हे दुःख समजणार नाही. कारण आता चित्रपट किंवा त्यातली गाणी नेत्रसुखद करण्यावर भर असतो. फराह खानसारखे कुशल नृत्यदिग्दर्शक एखाद्या चांगल्या गाण्याला चार चाँद लावतात. एक्झॉटिक लोकेशन्स, देखणे कलाकार, चकाचक सेट, मॉडेलसारखे दिसणारे किंवा भारतिय मानसिकतेला आवडतील असे कॉकेशिअन रंगरुपाचे बॅकग्राउंड डान्सर्स हे गरजेचे झालेले आहे. गाण्यांचे सेपरेट रिलीज होतात व हक्क विकले जातात त्यामुळे गाणे चांगले (असण्यापेक्षाही) दिसणे फार महत्वाचे होते आहे.

पण इंटरनेट, मोबाइलचा जमाना येण्यापूर्वी व उपग्रह वाहिन्यांचा सुळसुळाट होण्यापूर्वी असेही व्हायचे ना की एखादे गाणे ऐकायला खूप छान वाटायचे, कधी पाहिलेले नसायचे. मग एखाद्या दिवशी आपल्या दूर्दैवाने ते गाणे दिसायचे आणि 'क्या यही दिन दिखाने के लिए भगवान ने मुझे जिंदा रखा?' असं म्हणावेसे वाटायचे.

तर चला बनवूया अशा गाण्यांची लिस्ट….

(वि. सु. : गाण्यांचे व्हिडिओ स्वतःच्या हिंमतीवर पाहणे. कुठल्याही प्रकारच्या मानसिक छळास पोस्टलेखक जबाबदार नाही.)

सेहरा चित्रपटातील 'पंख होती तो उड आती रे'. हेच गाणे या पोस्टला (परिणामस्वरुपी तुमच्या डोकेदुखीला) कारणीभूत ठरले आहे. लताबाईंचा आवाज अप्रतिम लागलाय, संगीतही सुंदर आहे पण या गाण्यात संध्याबाईंनी जे काही (मी त्याला नृत्य म्हणण्याचे धाडस करणार नाही) केलेय त्याला तोड नाही. युट्युबरसुद्धा ऑडिओ ऐकते मी.
https://youtu.be/s3Kt97M0ANQ

'घुंगरू' चित्रपटातील 'प्यार के धागे' गाणे. साधना सरगम गोड गायल्या आहेत. मनहर उधासही वाईट नाहीत. लिरिक्सही चांगले आहेत. पण 'प्यार के धागे' म्हणून वडाला गुंडाळलेले दोरेच दाखवले पाहिजेत? गाणं डोळ्यासमोर आणा व खरं सांगा 'आता आठवतायत ते फक्त पांढरेशुभ्र बूट' असं होतं की नाही.
नंतर नंतर तर हिरो हिरॉईनकडे लक्ष जायच्या ऐवजी हिरोचे ते शिकारी/हायकिंग बूटच दिसत राहतात या गाण्यात
https://youtu.be/P43GZJ7lP2E

तसंच ते गॅंबलरमधलं 'दिल आज शायर है'. इतकी सुंदर शायरी किशोरकुमारने जीव ओतून गायली आहे, पण आठवतं काय तर देव आनंदची ती विअर्ड मिशी. मान्य आहे की हा पिक्चर येईपर्यंत तो ५०-६० च्या दशकातला 'राजस, सुकुमार' राहिला नव्हता. पण गाण्यात देव आनंद असताना त्याची मिशी लक्षात रहावी यापरता दैवदुर्विलास तो काय?
https://youtu.be/XRuqrlBmzAY

मदन मोहनचे अप्रतिम संगीत, लताबाईंचा दैवी आवाज मातीमोल करणारं हंसते ज़ख्म मधले 'आज सोचा तो आंसू भर आये'. काय ती प्रिया राजवंश, काय तो गॅरीश सिल्कचा ड्रेस, अगागा. त्यातून ती बिचारी देणार जेमतेम साडेतीन एक्स्प्रेशन्स. आता प्रिया तर नाहीच करत आहे मग तिच्या वाटचा अभिनयपण तुम्ही करुन टाका म्हणून वेठीला धरलेले के. एन. सिंग व रझा मुराद. वास्तविक हे दोन्ही अभिनेते एखादी भुवई उंचावून किंवा ओठाला हलकीशी मुरड पाडून बरंच काही सांगून जातात. पण त्यांनाही या गाण्यात कॅरीकेचरच्या लेव्हलला आणुन ठेवलंय.
https://youtu.be/PcOfJLdIh1M

तुम्हाला कुठली गाणी खुपतात?

Group content visibility: 
Use group defaults

त्या काळी संध्याचा नाच आवडत असेल लोकांना. मीही लहानपणी टीव्हीवर सिनेमे पाहिले, तेव्हा त्यात काही खटकायचं नाही.

डोळ्यात खुपणारी ऐवजी डोळ्यांना खुपणारी हवं.

युट्युबवर आत्ता मिळत नाही आहे, पण संध्याचा 'जल बिन मछली, नृत्य बिन बिजली' वरचा नाच हा नाच ह्या शब्दाला लाजवेल असा होता.

'अश्विनी ये ना' मॅडकॅप गाणं म्हणून आवडतं मला. तो झाडू डान्स तर जबरी आहे.

बाकी राकुच्या नृत्यकौशल्याबद्दल काय बोलावे?हा चिपळ्या डान्स पहा.
https://youtu.be/hg3SFk29Bao?t=269

रा.कु. गाण्यात हास्यास्पद दिसतो हे सांगायला या खुलाश्याची गरज नाही Happy बाय द वे, मिलो न तुम तो मधला राकु मलाही आधी हास्यास्पद वाटला होता. पण नंतर विचार केला मूळचा डान्सर वगैरे नसलेला एखादा प्रेमातबिमात पडला की एकदम खुष होऊन असाच काहीतरी नाचत असेल. अगदी कोरिओग्राफ्ड स्टेप्स नसतीलच.

राज - देव आनंद्/विजय आनंद बद्दल एक्झॅक्टली हेच मी दुसर्‍या एका धाग्यावर लिहीले होते. बहुधा. अतुल ठाकूर यांचा कोणतातरी धागा.

अक्षय कुमारची सुरूवातीच्या काळातली गाणी. अंगात आल्यासारखा नाचायचा. आता थोडा बदल झालाय.
हल्लीची सॉफ्ट गाणी बहुधा असतात बघणेबल. पण फास्ट ट्रॅक्स... विचित्रच.

sonalisl हे ते गाणे Happy>>> हो. तेच ते. काहीही नाच बसवला आहे. धन्यवाद फारएण्ड.

बाकी राकुच्या नृत्यकौशल्याबद्दल काय बोलावे?हा चिपळ्या डान्स पहा.
https://youtu.be/hg3SFk29Bao?t=269

>>> हास्यास्पद वाटत नाहीय.. बिट्स पकडल्या आहेत बरोबर..

लाखों हैं यहां दिलवाले - हे मला खुपत वगैरे नाही पण छान ट्यून आठवून गुणगुणायला सुरुवात करताच गिटार खाजवणारा विश्वजीत डोळ्यांसमोर येतो.
त्याच चित्रपटातले आओ हुजूर तुमको मात्र फारच खुपते.

थोराड राजा गोसावी आणि कोवळी रंजना यांचे " हि कश्याने धुंदी आली " हे पण भयाण गाणे बघायला . प्रदीपकुमार आणि मीनाकुमारीचे "दिल जो न कह साका " हे मेल व्हर्जन रफीने ग्यायलेले पहायला भयाण आहे. प्रकु चा चेहरा एक्स्प्रेशन लेस वाटतो , बाकी हेच गाणे लता मंगेशकर च्या आवाजात आहे आणि प्रेक्षणीय पण

रोज रोज आंखोंतले हे अजून एक >>>
यातल्या कलाकारांसकट हे गाणं खुपणारं आहे Biggrin त्यांची लायकी नाहीय इतक्या सुंदर गाण्याची...

>>हे गाणे पाहिले तर तुम्हि मेन्स्ट्रीम मधील कोणत्याच गाण्याबद्द्ल कधीच तक्रार करणार नाहि !

काय ते गाणे
काय ते पिक्चरायजेशन
काय ती एकटींग

सगळ ओक्के मन्दी हाय एकदम

हे गाणे पाहिले तर तुम्हि मेन्स्ट्रीम मधील कोणत्याच गाण्याबद्द्ल कधीच तक्रार करणार नाहि !>> कौन है ये लोग? कहा से आते है ये?

>>हे गाणे पाहिले तर तुम्हि मेन्स्ट्रीम मधील कोणत्याच गाण्याबद्द्ल कधीच तक्रार करणार नाहि !

या जॉनर मध्ये ढिंच्याक पूजाच्या पलिकडे काही नाही असे आजवर वाटत होते. या गाण्याने तो भ्रम दूर केला. कॉमेंट वाचा एकेक. "ऐकून कानातून अश्रू आले" अशी एक कमेंट आहे Lol

<<हे गाणे पाहिले तर तुम्हि मेन्स्ट्रीम मधील कोणत्याच गाण्याबद्द्ल कधीच तक्रार करणार नाहि !<<
याहिपेक्षा भयाण पाकिस्तानी ताहेर शहाची गाणी आहेत. मागे माबोवर खुप खुप चर्चा झाली त्यावर.
https://www.youtube.com/watch?v=_8Gx6AFMJ9U - आय टु आय
अन याला टक्कर देणारा हा इन्डियन राजकुमार
https://www.youtube.com/watch?v=eUoWuPenhK0
https://www.youtube.com/watch?v=Kx0TrkPqwlI

घरंदाज सुर हा लताच्या शास्त्रिय गाण्यांवर आधारीत कार्यक्रम ऐकत होते, त्यात ‘झननन झन झननन झन झननन झन बाजे पायलिया‘ हे गाणे ऐकले. माझे प्रचंड आवडते गाणे. हे गाणे ऐकताना नेहमीच ते पाहायची ईच्छा होते आणि पडद्याबर कोण आहेत व त्यांनी काय केलेय याची पुर्ण माहिती असुनही मी परत परत हे गाणे पाहते. निरुपा रॉय अफाट सुन्दर दिसलीय, भारत भुषणच्या मठ्ठपणाबद्दल आता अजुन नवे काही लिहिता येईल असे वाटत नाही इतके आधीच मायबोलीवर लिहुन झालेय तरी गाणे पाहताना निरुपा रॉयच्या जागी वैजयंतीमाला हवी होती असे वाटत राहते व मनी हळहळ दाटुन येते. वैजयंती कशी कारंज्यासारखी थुई थुई नाचली असती….

असो. बाकी या प्रकारच्या आलापींनी युक्त गाणे गाणारे गायक एका जागी बसुन गाताहेत हे वास्तवास जास्त धरुन आहे. पण तरी …

https://youtu.be/suZPPgnsKhc

हल्लीच कधीतरी विविधभारतीवर मोरे घर आये सजनवा हे शास्त्रिय सन्गितावर आधारीत गाणे ऐकले. याआधी कधीही ऐकले नव्हते म्हणुन यु ट्युबवर शोधले आणि अवाक होउन पाहातच राहिले.

गिटार हे वाद्य हातात आले की भले भले भलत्या भलत्या पोझेसमध्ये नाचायला लागतात पण सन्जय दत्तने या गाण्यात जशी गिटार वाजवलीय तशी वाजवायचे धाडस त्याआधी कोणी केले नव्हते ना नंतर कोणी केले. दत्तच्या हातात गिटार आहे पण गाण्यात गिटार आहे का हा संशय आहे. पुढे त्याने गिटार टाकुन इतर वाद्ये वाजवस्यची हौसही फेडुन घेतलीय.

हे गाणे सन्जय दत्तच्या भयाण अभिनयामुळे फारसे प्रेक्षणीय नाहीय पण श्रवणीय जरुर आहे म्हणुन इथे देतेय.

https://youtu.be/AaJydN2tyfY

Pages