राईज , रोअर , रिव्होल्ट ( आर आर आर ) चित्रपटासाठी धागा

Submitted by शांत प्राणी on 29 March, 2022 - 22:06

आर आर आर (RRR) या एस एस राजामौली यांच्या बहुचर्चित व बहुखर्चिक चित्रपटाबद्दल हितगुज करण्यासाठी हा धागा. RRR

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाळेत दोन फिजिक्स अनिवार्य करतील >>> Lol हे भारी आहे. सुधारित आवृत्ती वगैरे.

अस्मिता. - ती तेलुगू चित्रपटसृष्टीची खासियत आहे. प्रत्येक स्टारला एक युनिक विशेषण देतात. त्या रामचरणचा जंजीर पाहायचा प्रयत्न केला होता. १५-२० मिनीटांनी बंद करून कोठेतरी शोधून मूळ जंजीर परत पाहिला होता.

फारएण्ड पोस्ट भारी! एक तर अचाट सीन, त्यातही रेल्वे असलेला म्हणजे पर्वणीच Lol

ते वेगळं स्पेलिंग असलेले जंजीर आणि अमर अकबर अँथनी मूळ हिंदीचे साऊथ रिमेक आहेत का? मी एकदोनदा नाव बघून चुकून लावले आणि वेगळा पिक्चर आहे म्हटल्यावर लगेच चॅनेल बदललं.

फारएण्ड पोस्ट भारी! एक तर अचाट सीन, त्यातही रेल्वे असलेला म्हणजे पर्वणीच >> +१

सीनवाईज चिरफाडही वाचायला आवडेल.

कालच वाहत्या पानावर नवीन जंजीरचा उल्लेख झाला होता. तो थिएटरला पाहण्याचं पातक केलंय. त्यानंतर शंभर वेळा ओरोजिनल पाहून पापक्षालन करण्याचा प्रण केला होता. त्यातच रामचरण बद्दल प्रतिकूल मत तयार झालं होतं. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी !
अमिताभचा थंड पण आतून धुमसत असणारा अँग्री यंग मॅन हा त्याच्या डोळ्यातून आग ओकतो. रामचरण दात इठ खाऊन चेहरा आवळून घेऊन अँग्री यंग मॅन दाखवायचा प्रयत्न करतो ते इरीटेटींग झाले. किमान बापासारखा तरी अभिनय करायचा. साऊथ ला एखाद्याला डोक्यावर घेतला कि मग बाकीचं काही बघत नाहीत हेच खरं. आपल्याकडेही सलमान खान अभिनय न करताही टिकून आहे.

तो थिएटरला पाहण्याचं पातक केलंय. >>>आपको दवा की नही दुवा की जरुरत है.
मला तर चिरंजीवीचा अभिनयही किंवा काहीच आठवत नाही, रुप सुहाना लगता है , तोता मेरे तोता मै तो तेरी हो गई आठवतेय. शाळेत असताना एकदा सहकारी साखर कारखान्याला सहल गेली होती तर रुप सुहाना हजारो वेळा गाऊन बाईंच डोकं उठवलं होतं, बाईंनी आम्हाला प्रत्येकी चार-चार शिव्या दिल्या होत्या, तेवढी एकच आठवण आहे चिरंजीवीची Biggrin

येथे रामचरण चे मूर्तीभंजन(हा कोणी नवा हिरो नाहीये) झालेले पाहून त्याला आवडून घ्यावा की नाही याबद्दल डोक्यात शंका निर्माण झाली.
अक्षय कुमार टिपिकल देशभक्त अभिनय आणि मूर्ख जोक्स मारायला लागल्या पासून डोक्यातली जागा रिकामीच आहे.

आपको दवा की नही दुवा की जरुरत है. Lol
अभिनय करवून घेणे हे दिग्दर्शकाच्या हातात असते. >> मोठ्या शूजमधे पाय घालू नये अशी एक म्हण आहे. जंजीरचा रीमेक करायचा तर अमिताभशी तुलना होणारच. पूर्ण चेहरा कोरा ठेवून निव्वळ डोळ्यातून राग व्यक्त करण्याचे कसब एक अमिताभकडे आहे , दुसरे नाना पाटेकरकडे. भेदक नजर आहे दोघांची.

आज पाहिला RRR...
मला आवडला हा सिनेमा... फुल्ल टाईमपास Happy

बहुतांश बघितला मजल दरमजल करत. अजून ४० मिनीटे बाकी आहे. मधल्या काळात वन डे मॅच मधे जसे ३० व्या ओव्हरच्या आसपास सगळे रेंगाळते तसा पिक्चर रेंगाळतो. अजय देवगण व आलियाचे रोल्स बघून पूर्वीचे मराठी-हिंदीचे दिवस आठवले. अशोक सराफ सारखे दिग्गज हिंदीत नगण्य रोल करत. आता अजय देवगण व आलिया इथे दुय्यम रोल करताना पाहून साउथ इंडस्ट्री हिंदीपेक्षा मोठी झाल्याचे दिसते.

ती ब्रिटिश राणी स्वतःला बहुधा धरमवीर मधली राणी समजते. सगळा ब्रिटिश एम्पायर प्रोटोकॉल गुंडाळून ठेवून पावनखिंड मधल्या बडी साहेबा सारखी स्वतःच दरबारात त्या भीम ला पकडून आणायचा विडा ठेवल्यासारखे करते. नंतरही वरून काटेरी चाबूक काय फेकते. दर मिनीटाला वरून ओरडते काय. कोठे नेण्याच्या लायकीची नाही असेच तो गव्हर्नर म्हणत असेल.

"गब्बर जिंदा चाहिये या मुर्दा" वाला सीन आपल्याला जबरी आवडला. गव्हर्नरच्या दरबारातील एक ऑफिसर इतर ऑफिसर्सच्या मागे उभा आहे. बडी साहेबाने भीम का सापडत नाही वगैरे विचारल्यावर डायरेक्ट आहे तेथून हा प्रश्न तो ओरडून विचारतो. "युअर हायनेस" वगैरे काही प्रकार नाही. जणू हाच तेथील बॉस आहे. मग पुढचे ऑफिसर सरासर बाजूला होतात व पडद्यावर हा हीरो दिसतो. मग ती राणीही मग लाश आणलीस तर हे मिळेल, जिवंत आणलास तर ते दुसरे काहीतरी अशी खुल्ली ऑफर देते. गव्हर्नरच्या बायकोला ब्रिटिश क्राउन कडून असे अधिकार आतल्या गोटातून मिळत असावेत.

१९२० साली उत्कर्षाच्या टोकावर असलेली, कोणी कोठे काय बोलावे, काय बोलू नये, कोणाशी बोलताना किती व कोणत्या उपाध्या व संबोधने आधी वापरावीत याबद्दल काटेकोर असलेली महाकाय राजसत्ता आहे, की अमरीश पुरीचा अड्डा असा आपल्याला प्रश्न पडतो.

“ महाकाय राजसत्ता आहे, की अमरीश पुरीचा अड्डा असा आपल्याला प्रश्न पडतो.” Lol

मला तर फारएण्ड, ‘तुझं आहे तुजपाशी‘ मधल्या श्यामसारखा ‘मी आता सत्य सांगायला सुरूवात केलीय बरं का आचार्य‘ पोझ मधे दिसायला लागलाय. Happy

फारएण्ड, जबरी!

फारएण्ड, ‘तुझं आहे तुजपाशी‘ मधल्या श्यामसारखा ‘मी आता सत्य सांगायला सुरूवात केलीय बरं का आचार्य‘ पोझ मधे दिसायला लागलाय >> +१ Happy

पण मुळात त्या लहान मुलीला ब्रिटीश नेतातच का ते मला कळले नाही....!
चांगली गाते म्हणून?
अंबर से तोडा सूरज वो प्यारा, अम्मा के आचल ने ढक डाला सारा....... ढक डाला सारा......!!! ??

Happy
त्यातील हिंदी गाणी..हा एक वेगळाच विषय....फारेंड साठी!!

फारएण्ड, एक वेगळा चिरफाड लेख होऊन जाऊदे.
त्या मुलीला फुकटची टॅटू आर्टिस्ट म्हणून इतर बायांवर इम्प्रेशन मारायला पळवून नेतात.गाण्यासाठी नाही.

Pages