राईज , रोअर , रिव्होल्ट ( आर आर आर ) चित्रपटासाठी धागा

Submitted by शांत प्राणी on 29 March, 2022 - 22:06

आर आर आर (RRR) या एस एस राजामौली यांच्या बहुचर्चित व बहुखर्चिक चित्रपटाबद्दल हितगुज करण्यासाठी हा धागा. RRR

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो चिरन्जीवी पुत्र हिन्दीमध्ये सुद्दा आला होता. अमिताभच्या ' जन्जीर' चा रिमेकमध्ये हा हिरो होता. प्रियान्का च्रोपा हिरवीण होती. त्यात मात्र त्याने अगदी ठोकळा अभिनय केला होता त्याने. साऊथमध्ये मात्र तो छान काम करतो.

मगधीरा मधली तो एकट्याने 100 शत्रूंना कापून काढतो तो सिन भारी घेतलाय
>>>

+७८६
माझ्याही फार आवडीचा. आणि मला तो विश्वसनीयही वाटलेला.
गंमत म्हणजे तो सीन बघताना मला पावनखिंड आठवलेली Happy

मगधीरा मधील तो ब्रिज वर 100 शत्रू सैनिकांना कापून काढतो ते भारी वाटतं , पण आर आर मध्ये समोरील जमवातून दगडफेक करणाऱ्याला घेऊन येतो नेमका या बद्दल काही जणांना आक्षेप का वाटतो हे मला नाही समजले .
डोकं शाबूत ठेवून पहायचे सिनेमे चार पाच वर्षात एखादा येतो .
सध्या सगळा विफक्स चा जमाना !
आर आर मध्ये अशक्य गोष्टींचा ढिगारा आहे , आणि अशक्य दाखवले तरच पब्लिक थेटरात येईल अन्यथा आहेच ott किंवा टेलिग्राम !
एक मात्र खरं पावनखिंड ची कथा 300 च्या तोडीची करण्याच्या लायकीची होती , पण दिगपाल लांजेकर ने पूर्ण बट्याबोळ करून ठेवला आहे .
एखाद्या सिरीयल ला लाजविन असे त्याचे सेट्स , सैन्यदळ , व्हिएफ एक्स असतात .
मान्य पैसा हा मेन खेळाडू आहे , पण औकात नाही तर सशक्त कथांचा चुराडा करू नये !
महाराजांच्या सहकाऱ्यांवर लांजेकर चे तीन सिनेमे येऊन गेलेत अजून पाच ची वाट लावायची बाकी आहे ....
शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अफाट पराक्रमाला फक्त राजमौली च न्याय देऊ शकतो .

त्यात मात्र त्याने अगदी ठोकळा अभिनय केला होता त्याने. >>>>>
उत्तम अभिनय करवून घेणे हे डायरेक्टर च्या हातात असते..उदा. आलिया भट ची हायवे आणि गंगुबाई मधे एक्टींग.तो च कलंक मधे ठोकळा अभिनय.
जब वी मेट मधे करीना चा अभिनय आणि त्या काळी इतर सिनेमांमधे ती चा अभिनय.

जंजिर रिमेक युट्युबवर शोधला. पिक्चर तेंव्हा पडला होता.

हिंदी स्पेलिंगही झंजिर आहे , साऊथ डबिंगमध्ये तूफान

आणि प्राण म्हणजे संजय दत्त
हे ह्यांचे गाणे यारी है इमान मेरा

https://youtu.be/37ZkNXZ9bPI

https://youtu.be/zg-FvZwPLqU

मगधीरा आणि बाहुबली काल्पनिक कथा आहेत. त्यात पूर्ण स्वातंत्र्य घेऊ शकता. आर आर आर मधल्या कथेत दोन्हीही स्वातंत्र्यसैनिकांची टिंगल झालेली आहे. दोन्हीही नायक कधीही दिल्लीला आले नाहीत. मुलीला पळवण्याची घटना झालेलीच नाही. कोहेराम भीम ने ब्रिटीशांनी निझामाला फॉरेस्ट अ‍ॅक्टची सक्तीने अंमलबजावणी करायला लावली त्याविरोधात उभा राहिला. छापामार युद्धाने त्याने ब्रिटीश सैन्य आणि निजामाचे पोलीस या दोघांनाही जेरीस आणले. शेवटी त्याच्या एका मित्राला खबरी बनवल्याने तो एकटा असताना सापडला. पोलिसांनी त्याला ठार मारले. हे कळताच पोलीसांवर जीवघेणा हल्ला झाला. गद्दाराचे डोके कापून लटकवण्यात आले.

घडलेल्या कथेवर इतके स्वातंत्र्य ?
शिवाजी महाराजांच्या कथेतल्या लढाया या भालजींच्या चित्रपटात अस्सल वाटायच्या. व्हीएफएक्स नसतानाही अतिरंजित आणि अतर्क्य दृश्ये न दाखवताही श्वास रोखून धरणारी साहसदृश्ये दाखवता येऊ शकतात हे भालजींमुळे सिद्ध होते. तंत्रज्ञानाचा वापर करावा. पण त्यामुळे महाराजांच्या काळाच्या कथांना साऊथच्या अ आणि अ कॅटेगरीत नको घालायला.

शांत माणूस +१

शिवाजी महाराजांच्या सिनेमांना फॅन्टसी सारखं बनवू नये. उगाच vfx चा भाडीमार करू नये.
ब्रेव्हहार्ट आणि द किंग हि दोन इंग्रजी उदाहरणं डोळ्यासमोर येतात- चांगले ऐतिहासिक सिनेमे म्हणून.
ब्रेव्हहार्ट स्कॉटिश स्वातंत्र्ययोद्धा विल्यम वॉलेस वर आहे, आणि द किंग हेन्री द फोर्थ आणि फ्रांस मधील युद्ध दाखवते. कोठेही vfx नाही, 300 सारखी अविश्वसनीय युद्धाची दृश्य नाहीत. मस्त सिनेमे आहेत दोन्ही.

नवीन Submitted by शान्त माणूस on 3 April, 2022 - 07:55>>>

अगदीच सहमत

जुन्या काळची ती पावनखिंडीची लढाई बघताना अजूनही भारी वाटतं
आणि त्यातले बाजीप्रभू झालेले खुद्द तलवार, भाला बरची चे प्रशिक्षण देत असत त्यामुळे ती लढाई इतकी जिवंत वाटते

मुळात शिवाजी महाराजांनी सामान्य शेतकरी मावळ्यांच्या मनात स्वाभिमानाचा स्फुलिंग पेटवला आणि ती भोळी भाबडी जनता महाराजांच्या एका शब्दखातर तळहातावर प्राण घेऊन लढली

यात कुठेही बाहुबली मगदिधरा सारखे अचाट शक्तीचे प्रयोग नव्हते
होती ती अपार भक्ती आणि शौर्य

मी अनू +१.
साउथ चित्रपट आहे म्हटल्या वर थोडा इल्लॉजिकल असणार, राजामोउली चा असल्याने ग्रँड असणार असे ठोकताळे चुकले नाहित. सर्व चित्रपट भर भव्य दिव्य दृश्य भरून राहिलेली आहेत. राम चरण आय कँडी आहे :डोळ्यात बदाम:
दुसरा हीरो अभिनय , नाच चांगला करतो.
बाहुबली सारखा पुन्हा पुन्हा बघण्या सारखा नसला तरी १-२ टाईम वॉच नक्कीच आहे!
अलिया ला अक्षरशः वाया घालवली आहे! तशी कथा पण बरी आहे.

वाघा चा, मुला ला पुला वरून वाचवायचा सिन ओव्हर अचाट घेतलाय. पण चालायचंच!

आर आर ला कितीही नावे ठेवा !
त्याचे उत्पन्नच सांगतंय मुव्ही हिट ....
आर आर वर्ल्ड वाईड 900 कोटी आणि काश्मिरी फाईल 315 कोटी !
जॉनी चा अटॅक ने तिसऱ्याच दिवशी दम तोडला , खर्च निघणे मुश्किल !
बजेट 55 करोड आणि 3 rd डे उत्पन्न 16 करोड!

आर आर ला कितीही नावे ठेवा !
त्याचे उत्पन्नच सांगतंय मुव्ही हिट ....
>>>>>>

मूव्ही हिट आहे म्हणजे चांगलाच आहे असे नसते ओ. तो असूही शकतो, नसूही शकतो. ज्याला नाही वाटत तो आपल्या टाईपचा तो नावे ठेवतोय. ज्यांना वाटतोय आपल्या टाईपचा ते बघत आहेत. हे म्हणजे मायबोलीवरील शतकी प्रतिसाद धाग्यासारखे झाले.

Rrr ओटीटी वर येणार आहे 25मे ला झीफाईव्हवर आणि नेटफ्लिक्सवर..तेलुगू, तमिळ, कन्नड,मल्याळम.
हिंदीमधे 25 जूननंतर कारण हिंदीत जास्त गल्ला जमवतोय rrr....मी बघेन झीफाईव्हवर आल्यावर तेलुगू. Happy

अवांतर माहिती: राधेश्याम, साऊथ भाषांत आलाय प्राईमवर.. हिंदी अजून नाही आला

आम्ही काल परत पाहिला
ज्या मेंबर्स नी पाहिला नव्हता त्यांच्याबरोबर ओटीटी वर.
थिएटर चा अनुभव वेगळाच.पणघरीही डॉल्बी स्पीकर होता त्यामुळे न पाहिलेल्या लोकांनाही चांगला अनुभव मिळाला.
संगीत: एकदम अंगावर शहारे आणते.त्यांची मैत्री होतानाचे गाणे, तो मालगाडी आणि झेंडा वाला सीन(त्यात नंतर पाण्याच्या तळाशी चालणे अति अतर्क्य आणि विनोदि आहे.ते सोडून देऊ.)
प्राणी वाला सर्वच भाग अतर्क्य आहे.(खाली स्पॉयलर आहेत)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

स्पॉयलर
टॉर्चर चे गाणे डोळ्यात पाणी आणते.प्रचंड वेदना, मूळ उद्देश्य साध्य झाला नाही, या वेदना अंताकडे नेतील, वेदना देणारा आपलाच मित्र या सगळ्या तून बाहेर निघून, 'मृत्तिकामय शरीर, शेवटी याच मातीला, याच पाण्याला परत द्यायचे' हे त्या करूण गाण्यातून व्यक्त होते आणि त्याचा परिणाम शेवटी वेगळाच.'गाणं का,असा छळ होत असताना गाणं सुचेल का, सीन चे गांभीर्य कमी होते' असे आक्षेप जॅबी च्या रिव्ह्यू मध्ये आले.
शारीरिक वेदना, श्रम, कठीण काम यावरून लक्ष विचलित करायला गाणे ही अतिशय जुन्या काळापासून चालत आलेली पद्धत आहे.
आलिया चे काम काहीच नाही.पण तिला त्यातल्या त्यात महत्वाचा रोल दिला आहे.
राम ला तुरुंगातून काढण्या पासून ते रामाच्या वेशतला राम, बाईक फिरवणे हा सर्वच पार्ट अति अतर्क्य आहे.तोही सोडून देऊ.आम्ही सगळे त्या मूर्तीच्या आसपास साग्रसंगीत धोतर बनवून नेसता येईल इतक्या लांबी चे झेंडे शोधत होतो.
रामचरण घोड्यावर छान दिसतो.जनरली असे घोडा वाले सीन लॉंग शॉट मध्ये घोड्यावर माणूस आणि नंतर क्लोजप मध्ये कमी वेगाच्या (किंवा मेकॅनिकल)घोड्यावर बसलेला मनुष्य असे असतात.इथे पूर्ण रामचरण चे जवळून घोड्यावर शॉट आहेत म्हणजे बहुधा त्याला येत असावे हॉर्स रायडिंग.
मी बाहुबली चे दोन्ही भाग पाहिले नाहीयेत.त्यामुळे यातली भव्यदिव्यता नवी वाटली आणि आवडली.

मी पण का ल बघायला सुरुवात केली. ओपनिन्ग सीन जो आदिलाबाद जंगलात आहे तो मला आव्ड ला. आदिवासी स्त्रीच्या मुलीला नेतात. व ती मरते तो. पुढे राम चा एक फाइट सीन व ज्यु एन टी आर चा वाघा बरोबरचा सीन चालू होता.

आर आर आर अर्धा पाहिला. बाहुबलीसारखीच द्रुश्ये सतत जाणवत राहते. पण बाहुबलीचे ईमोशन्स नाहीत त्यात. म्हणजे तितके कनेक्ट होता आले नाही. अर्थात एकदा बघायला हरकत नाही. आज पुर्ण करेन मी. पण बाहुबलीसारखा पुन्हा पुन्हा बघावा असा नाही वाटत. बाकी सविस्तर आज पुर्ण बघितल्यावर लिहितो.

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2022 - 10:51

मी अजूनपर्यंत दोन टप्प्यात बघूनही अर्धाच झाला आहे. अ आणि अ च्या पलिकडे लॉजिक आहे ह्या पिक्चरचं.

हा चित्रपट दक्षिण-लोकप्रिय चित्रपटांच्या खालील गरजा (मराठीत टिकमार्कस म्हणतो ते) पूर्ण करतो -
- हिंदू - मुस्लिम ऐक्य, प्राणापलिकडची यारी वगैरे
- उत्तम डान्स व अतर्क्य मारामारी
- गरिबीतून/अन्यायातून पिचून मग उत्थान करणारा हिरो
- धट्टीकट्टी गरीबी व लुळीपांगळी श्रीमंती, त्यात गरीब/अन्यायग्रस्त हे कायमच साधे-भोळे असणे
- हिरॉईन ही गरीबांच्या/अन्यायग्रस्तांच्या बाबतीत (फक्त ठराविक सोयीस्कर प्रसंगी) कनवाळू असणे आणि त्याने हिरो (दिसणे वगैरेच्या जोडीला ह्या महत्त्वाच्या कारणाने) भाळला जाणे (हा प्रकार दक्षिणस्रोती उत्तरनिर्मित चित्रपटांतही दिसतो - उदा. गझनी)
- हिरॉईनच्या बेंबीवर फोकस - हा अजून तरी अर्ध्या चित्रपटात जाणवला नाही, पुढे नसेल अशी आशा आहे
- व्हिलन पार्टी अतिशय व अकारण क्रूर व तेवढीच रेमेडोक्याची असणे
- कुठलेतरी भन्नाट संस्कृत श्लोक (जुने अपरिचित किंवा नवनिर्मित). हिंदी चित्रपटवाले अजून मंगलम् भगवान विष्णुच्या पलिकडे जात नाहीत.
- राकट हिरो आणि कोमलकाय हिरॉइन, इथे ही जोडी सावळा - गोरी, दाक्षिणात्य - उत्तर भारतीय, भारतीय - परदेशी (पक्षी गोरीच. काळी परदेशी नाही चालणार) इत्यादीपैकी काहीही असू शकते. मुळात हिरो हा तथाकथित पिचलेल्या वर्गातून येतो व हिरॉइन ही तथाकथित शोषणकर्त्या वर्गातून येते आणि हिरो हिरॉइनला गटवतो - हा जणू काही एका वर्गाने दुसर्‍या वर्गाचा घेतलेला सूड असतो.

हपा,
बेंबीचे लक्षात नाही पण श्लोक वाला भाग तुम्हाला पुढे दिसेलच.
एकदा रामचरण ला जेलात टाकल्यावर जे धूम धडाम अचाट प्रकार आहेत त्याला तोडच नाही.
रामचरण राम म्हणून चांगला दिसतो.आता पर्यंत आपल्याला मूर्ती आणि फोटोत क्लीन शेव्हन बिन दाढी मिश्या रॅम कृष्ण शंकर विष्णू बघायची सवय आहे.त्या मानाने हा तसा नसूनही बऱ्यापैकी शोभतो.

आर आर आर मधले शोले गाणे फार छान आहे. त्यात छ. शिवाजी महाराजांना २ सेकंदांसाठी पाहून फार भारी वाटते.

इथे पूर्ण रामचरण चे जवळून घोड्यावर शॉट आहेत म्हणजे बहुधा त्याला येत असावे हॉर्स रायडिंग >>>>>>>
त्याच्या मालकीचे घोडे असून तो पोलो देखील खेळतो !

मुळात हिरो हा तथाकथित पिचलेल्या वर्गातून येतो व हिरॉइन ही तथाकथित शोषणकर्त्या वर्गातून येते आणि हिरो हिरॉइनला गटवतो - हा जणू काही एका वर्गाने दुसर्‍या वर्गाचा घेतलेला सूड असतो.

you are on to something..

Pages