राईज , रोअर , रिव्होल्ट ( आर आर आर ) चित्रपटासाठी धागा

Submitted by शांत प्राणी on 29 March, 2022 - 22:06

आर आर आर (RRR) या एस एस राजामौली यांच्या बहुचर्चित व बहुखर्चिक चित्रपटाबद्दल हितगुज करण्यासाठी हा धागा. RRR

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या आठवड्याची कमाई चित्रपट किती चांगला आहे यावर भाष्य करत नाही.
तर त्याची मार्केटींग किती भारी झाली, किती स्क्रीन्स मिळाल्या, चित्रपटाच्या कलाकारांची किती क्रेझ आहे, दिग्दर्शकाकडून लोकांच्या किती अपेक्षा आहेत, गाणी किती हिट झालीत, ट्रेलरमध्ये किती दम होता वगैरे गोष्टींवर तो गल्ला ठरतो.
कारण चित्रपट कसा आहे हे माहीत असल्याशिवाय वा त्याचा रिव्यू वाचल्याशिवाय लोकं बघायला गेली असतात.

मग दुसर्‍या आठवड्यात गल्ला फक्त याच जीवावर खेचला जातो की बघा पहिल्या आठवड्यात ईतका गल्ला जमला म्हणजे पिक्चर किती भारी आहे. सोबतीला पेड रिव्यू लिहिले जातात. लोकांना वाटतेय गर्दी आहे म्हणजे ईथला माल चांगलाच असणार. हुमायुन नेचरच आहे ते.

लोकांना वाटतेय गर्दी आहे म्हणजे ईथला माल चांगलाच असणार. हुमायुन नेचरच आहे ते.>> तसं नसतं हो हुमायुन बादशहा.
ज्याच्यात दम असतो तो पिक्चर बरोबर गर्दी खेचतो.

पठाणला पैशात मोजू नका>> हा डायलॉग ऐकल्यासारखा वाटतो.
>>>
माझा होता. पठाण धाग्यावर मी म्हटलेले,

शाहरूखची आणि त्याच्या चित्रपटांची किंमत पैश्यात करू नका..
भारताबाहेर सर्वाधिक लोकप्रियता असलेला भारतीय कलाकार आहे तो
Submitted by ऋन्मेऽऽष on 26 March, 2022 - 23:30

ज्याच्यात दम असतो तो पिक्चर बरोबर गर्दी खेचतो.
>>>>>

दम असतो तो गर्दी खेचतो
पण गर्दी खेचणार्‍या प्रत्येकात दम असेलच असे नाही.
हिच तर मार्केटींग आहे. हिच तर स्टार पॉवर आहे. आकर्षक पॅकिंग करूनही बकवास माल विकला जातो ईथे..

लोकांना वाटतेय गर्दी आहे म्हणजे ईथला माल चांगलाच असणार. हुमायुन नेचरच आहे ते. >>>>>>>
नाही !
दुसऱ्या आठवड्यात फक्त तोंडी प्रसिद्धी मुळेच सिनेमे हिट होतात असे वाटतय !
जुन्या काळात जात नाही , ताजी उदाहरणे आहेत !
बच्चन पांडे , गंगुबाई , सलमान चा राधे यांच्यासाठी पेड रेविव्ह नव्हते का ?
मार्केटिंग भारी केले , स्क्रिन भरपूर होत्या तरी सिनेमे अटपले !
सदोष आणि जनतेच्या मनाची पकड न घेऊ शकणारे कथाबीज फक्त या कारणामुळेच बॉलिवूड वाले तोंडावर पडतात .

रमेशमामा वर माझी पोस्ट वाचा. बरीच कारणे दिली आहेत.... << मार्केटींग किती भारी झाली, किती स्क्रीन्स मिळाल्या, चित्रपटाच्या कलाकारांची किती क्रेझ आहे, दिग्दर्शकाकडून लोकांच्या किती अपेक्षा आहेत, गाणी किती हिट झालीत, ट्रेलरमध्ये किती दम होता वगैरे >>

गंगूबाईमध्ये आलियाला ट्रेलरमध्ये असे बघून कोण जाणार होते?

बरं झालं रुन्मेष गाण्याचा विषय काढल्यास !
आर आर आर मुव्ही आख्या तीन तासात हिरो हिरोईन च्या रोमान्सची गाणी न दाखवता पब्लिक ला खेचतोय .
त्यामुळे गाण्याची कॅटेगरी पण बाद !
हा पण त्यांनी नॉर्थ बेल्ट साठी शेवटला एक देशभक्तीपर गाणे टाकलंय , त्यात शिवाजी महाराज देखील दाखवलेत .
सिनेमा मध्ये भगवा झेंडा दाखवलाय म्हणून काही लोकांना आर आर चे यश खुपतंय का ? Happy

म्हणून काही लोकांना आर आर चे यश खुपतंय का ? >>> यश हे खुपतेच, जर ते आपले नसेल. मत्सर हा देखील हुमायुन नेचरचाच भाग आहे. तीन तासांच्या सिनेमात गाणी नाहीयेत हे भारी आहे बाकी Happy

ढीगभर गाणी आहेत

एका गाण्यावर कॉपी केल्याचाही आरोप लागला आहे

पण मला ते कॉपी वाटले नाही , फोक सॉंग कुणीही थोडेफार बदलून वापरू शकतो

ओह ओके.
ढिगभर आहेत तर चांगल्याची तेवढी लिंक मिळेल का..

बाहुबलीच्या दोन्ही पार्टसची सगळी गाणी छान होती.

एक नाचो नाचो सोडल्यास आर आर मधली कुठलीच गाणी लक्षात राहत नाही. सन्गीताच्या बाबतीत मार खाल्लाय सिनेमाने.

पुष्पाचीही गाणी छान होती की.

ब्रिटीश १९५७ सालीच पळून गेले असा सिनेमा काढायचा म्हटलं तर त्याला लिबर्टी म्हणायचं का ? >>>>>>> १८५७ म्हणायचे आहे का तुम्हाला , शामा?

बच्चन पांडे , गंगुबाई , सलमान चा राधे यांच्यासाठी पेड रेविव्ह नव्हते का ? >>>>>>>> गन्गूबाई हिट झाला की.

अस्सल गाण्याचा बाज डब्ड गाण्यात आणणे कठीणच काम असते. >>>>>>> असहमत. रहमान , एम एम करीम ह्यान्ची डब्ड गाणी उत्तम उदाहरणे आहेत.

रहमान ची डबडं बेस्ट असतात...

टेलिफोन धुन मैं हँसने वाली
मेल्बॉर्न मछली मचलने वाली
डिजिटल मे सुर हैं तराशा
मेडोना हैं या नताशा
ज़ाकिर हुसेन तबला तू हैं क्या
सोना सोना तेरा चमके रूप सैलोना
सोना सोना सेल्युलर फोन तुम तो हो ना
कंप्यूटर को ले कर ब्रम्हा ने रचाया क्या

तरीही मला ओरिजिनल च जास्त आवडतात.।गाणी आणि सिनेमे दोन्ही.
ओटीटी आल्यापासून तर मी डब्ब मुव्हीज पाहत नाही.. ओरिजिनल लैंग्वेज मधेच पाहते..डब्बंमधे बैकग्राउंड म्युझिक, डायलॉग च सगळंच बदलतं..पुष्पा ओरिजिनल आणि हिंदी मधे हि छोटे छोटे डॉयलॉग फरक होते.

ओटीटी आल्यापासून तर मी डब्ब मुव्हीज पाहत नाही..
>>>>
मला तर संशय आहे तुम्ही हिंदी मूव्हीज सुद्धा कुठे तमिळ तेलगू डब आहेत का बघत असाल Happy

पण पुष्पा हिंदीतही मस्त वाटला. स्पेशली श्रेयस मुळे..

पुष्पाचीही गाणी छान होती की.>>> +७८६ शब्द आचरट आहेत पण मस्त आहेत बोलायला. अंटावा गाण्यात ओरिजिनलमध्ये काहीतरी मावा बोलतात, तिथे हिंदीत साला आहे त्यामुळे छान वाटते Happy

मोरबियस , अटॅक 1 आल्यापासून आर आर आर चे शो भयानक कमी झाले आहेत. थ्रीडी हिंदी कमी झाले आहेत.
दोन्हीपण सायफाय मुवि आहेत

पाहिला.सर्व अचाट आणि अतर्क्य कंटेंट, सगळं माफ करूनही कथा आवडली.शेवटचं 'आम्हाला शिक्षण द्या' हे आदिवासी जमातीच्या कंटेक्स्ट मध्ये खूपच आवडलं आणि पटलं.चांगल्या उद्देशाने वेगवेगळे काम करणारे, एकमेकांना कॉन्फलीक्ट करणारे लोक नंतर एकत्र येऊन शक्तीने लढणं हेही आवडलं.
मारामारी, टॉर्चर चे सीन फार अंगावर आले.त्यात डॉल्बी चा पण महत्वाचा भाग आहे.
बाकी बाईक फेकणे, इतक्या मजबूत हिरोला खांद्यावर घेऊन समरसॉल्ट, हिरोच्या पायाच्या जखमा एकदम दे धूम मारामारी इतक्या बऱ्या होणं, एकांतवास जेल चं झाकण ओरडून उचकटेपर्यन्त पहारेकरी लोकांचं लक्ष न जाणं, पेरीफेरल व्हिजन कोणालाही नसणं हे सर्व सुपरहिरो पिक्चर म्हणून सोडून द्यायचं.
मला चिरंजीवी पुत्र जाम म्हणजे जामच आवडला.साऊथ चित्रपट पाहत नसल्याने दोन्ही हिरो पहिल्यांदाच पाहिले आणि मग गुगल केले.(बाहुबली अजून पाहिलेला नाहीय)

Pages