Submitted by शांत प्राणी on 29 March, 2022 - 22:06
आर आर आर (RRR) या एस एस राजामौली यांच्या बहुचर्चित व बहुखर्चिक चित्रपटाबद्दल हितगुज करण्यासाठी हा धागा. RRR
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह.पा. चपखल निरीक्षण आहे.
ह.पा. चपखल निरीक्षण आहे.
मुळात हिरो हा तथाकथित पिचलेल्या वर्गातून येतो व हिरॉइन ही तथाकथित शोषणकर्त्या वर्गातून येते आणि हिरो हिरॉइनला गटवतो - हा जणू काही एका वर्गाने दुसर्या वर्गाचा घेतलेला सूड असतो. >>> हे हिंदी मधे ७० ते ९० द्या दशकांत कायम असे. मनोज कुमार- सायरा बानो (पूरब और पश्चिम), अमिताभ-झीनत (लावारिस), जितेंद्र-श्रीदेवी (मवाली), अजय देवगण कडे तर बहुधा मक्तेदारी होती अशा रोल्सची - "दिलवाले ते दिलजले" रेंज
- अशा अनेक पेअर्स नी हा खेळ खेळलेला आहे. किंबहुना ६० च्या दशकातही तेच असे. पण तेव्हा हीरो लोक तिच्या मंगनीत आपली रडकथा ऐकवत. पुढे ते तिला पटवू लागले. मग २००० पासून हीरो व हिरॉइन दोघेही त्या सो कॉल्ड शोषणकर्त्या वर्गातूनच येउ लागले 
हिरो हा तथाकथित पिचलेल्या
हिरो हा तथाकथित पिचलेल्या वर्गातून येतो व हिरॉइन ही तथाकथित शोषणकर्त्या वर्गातून येते आणि हिरो हिरॉइनला गटवतो ->>>>
हिरो हिरोईन ला गटवत नाही, उदारमनाने तिच्या भावनेला स्वीकारतो.
साधारण साऊथ च्या पिक्चरमध्ये गोरीपान चवळीची शेंग टाइप हिरोईन हिरो च्या मागे लागलेली असते,
ध्येय्य वेडा हिरो (बहुदा बदला घेण्याचे ध्येय्य असते त्याचे) तिला अजिबात घास घालत नाही.
पण शेवटी तिच्या प्रेमाचा खरेपणा पाहून तिला स्वीकारतो
बायांनी आपल्या भोवती रुंजी घालत फिरावे अशी बहुदा साऊथ इंडियन लोकांची फँटसी असावी
नॉर्थ इंडीयन त्यातही पंजाबी
नॉर्थ इंडीयन त्यातही पंजाबी हिरॉईन्स साऊथच्या हिरोपुढे हात जोडून प्रेमाची भीक मागतात आणि
युरोपिअन गोरी मेम देशी हिरोच्या मागे लागते ही फँटसी सेमच आहे. त्यातही देशी हिरो भाबडा असला ( ही भाबडेपणाची अॅक्टींग अंत बघणारी असते) तर गोरी मेम त्याच्यावर जवळपास बळजबरीच करणार असे वाटावे असा सॉन हटकून असतो, त्यातून आपला हिरो पळून येतो आणि राम राम करत राहतो. पण गोरी मेम म्हणत नाही " येडं हाय का खुळं है ह्ये ? ". ती म्हणते "ह्योच नवरा पाह्यजे ". या बायांना टॉम क्रूज सारखे नायक सोडून ही बुद्धी होण्यामागे पिकतं तिथे विकत नाही हाच न्याय असावा.
फारएन्ड आणि सिम्बा, सहमत.
फारएन्ड आणि सिम्बा, सहमत.
"आर आर आर अत्यंत बालिश
"आर आर आर अत्यंत बालिश चित्रपट आहे" - हे अंडरस्टेटमेंट आहे. लहान मुलांनासुद्धा बरेच बरे ऑप्शन्स / चॉइसेस आहेत.
फा आणि ह.पा.
तो तारकरामा ज्युनिअर त्याचा
तो तारकरामा ज्युनिअर त्याचा थोडा पार्ट बघितला राम व त्याचा ओळख सीन. व पुढची मैत्री गाणी व्गैरे.
आर आर आर अत्यंत बालिश चित्रपट
आर आर आर अत्यंत बालिश चित्रपट आहे
नवीन Submitted by Sadha manus on 24 May, 2022 - 10:50 >>>>>स ह म त
काल शिल्लक तासाभराचा संपवला.
काल शिल्लक तासाभराचा संपवला.
त्यात काहीच हाती लागले नाही.
नुसती हाणामारी. फक्त एक आलिया भटचा सीन विदाऊट हाणामारी होता. पण त्यातही तिच्या पोटात एक लाथ घातलीच.
बाकी ते आर आर मधील ईंग्रज आणि
बाकी ते आर आर मधील ईंग्रज आणि तहलका मधील डोंगरीलाचा डाँग कभी राँग नही होता हे एकाच कॅटेगरीतले वाटले.
100
100
मी काल चिकाटीने बघून संपवला
मी काल चिकाटीने बघून संपवला उरलेला भाग. पुढे अनु म्हणाल्या त्याप्रमाणे भन्नाट संस्कृत श्लोक आलेच. त्यामुळे वरच्या यादितली ही टिकमार्क पूर्ण झाली. ते बेंबीचं फार काही दाखवलं नाही ह्यात एवढंच काय ते आवडलं मला ह्या पिक्चरमध्ये.
अजय देवगण ज्या प्रकारे झाडांनी वेढलेल्या भागात मध्ये उघड्यावर एका दगडामागे लपून गोळ्या मारत असतो, ते बघून श्री श्री मिथुन दा यांचा सायकली मागे लपून गोळ्या चुकवण्याचा सीन आठवला.
तो राम जमिनीखाली जेलबंद असताना भीम शोधायला येतो आणि जमिनीवर मुठीने तबला वाजवतो आणि राम दगडी भिंतीवर तेच वाजवून उत्तर देतो हे बघताना ह ह पू वा. रामाने नुसता वरच्या खिडकीतून हात वर केला असता तरी चाललं असतं.
जाऊ दे, ह्या चित्रपटाच्या चुका दाखवण्याइतका stamina माझ्यात नाही. फा, पायस किंवा इतर जाणकारांनी मनावर घ्यावे.
हा बघायला सुरु केल्या पास्नं
हा बघायला सुरु केल्या पास्नं घरातल नेट गंडतय संध्याकाळचं ही काय भुताटकी.
अरे रामुडु- भीमुडु हे फेमस आहे तेलुगु मध्ये म्हणून त्यांची ती नावे ठेवली असावीत.
मुळात हिरो हा तथाकथित
मुळात हिरो हा तथाकथित पिचलेल्या वर्गातून येतो व हिरॉइन ही तथाकथित शोषणकर्त्या वर्गातून येते आणि हिरो हिरॉइनला गटवतो - हा जणू काही एका वर्गाने दुसर्या वर्गाचा घेतलेला सूड असतो. >>> हे हिंदी मधे ७० ते ९० द्या दशकांत कायम असे. मनोज कुमार- सायरा बानो (पूरब और पश्चिम), अमिताभ-झीनत (लावारिस), जितेंद्र-श्रीदेवी (मवाली), अजय देवगण कडे तर बहुधा मक्तेदारी होती अशा रोल्सची - "दिलवाले ते दिलजले" रेंज Happy - अशा अनेक पेअर्स नी हा खेळ खेळलेला आहे. किंबहुना ६० च्या दशकातही तेच असे. >>>>>>>> हे दिलीप कुमार-नादिराच्या 'आन' (१९५२) मध्येही होत.
तो हिरो हिरोइन भेट प्रसंग
तो हिरो हिरोइन भेट प्रसंग अगदीच चाइल्डिश आहे. हिरविणीची बिटकी गाडी विंगमॅन त्यासमोर खिळे टाकतो. मग हिरो तिला घेउन मार्केटात जातो व लगेच पार्टीचे इन्व्हिटेशन. तिथे बॉल डान्स चालू आहे पण संगीत चुकीचे आहे की. ती इंग्लिश मुलगी फारच निरागस आहे. तिथे मल्ली सापड ते.
हिला पळवुन / सोडवून न्यायचा सीन अगदीच अ नि अ आहे. छोट्याशा ट्रक मध्ये इतके प्राणी एकमेकांना काही न करता आवाज न करता राहतील हेच विचित्र आहे. काल आलिया ची एंट्री झाली सीता म्हणून तिथेच आजुबाजुला अजय देवगण पण दिसला. राम ला साप चावतो व विषबाधा होते ती उतरव तात व तो लगेच फायटिन्ग करायला येतो. काय चल्लंय.
तो त्याचा गुढघा न टेकल्याचा
तो त्याचा गुढघा न टेकल्याचा सीन तर काहीही आहे! एकतर ह्यांनी वरती हात दोराने बांधून खेचून धरलेत. मग कसे टेकणार हा गुढघे, जरी टेकायचे ठरवले तरी? वरची रस्सी जरा ढील द्या, आपोआप गुढघे टेकतील. पण च्यामारी, हे लोक गुढघे अजून हवेत कसे म्हणून डोकं खाजवत बसतात आणि उगाच त्याला मारत राहतात. त्यात तो दातेरी-काटेरी चाबूक जो आहे, जो म्हणे लाकडी खांबालाही फाडतो, त्याने त्या हिरोचं फारसं काही, कातडी जाऊद्या, रक्तपण खूप निघत नाही. उलट एका सीनमध्ये त्याला तो चाबूक मारण्यापूर्वी राम चुकून त्यावरून हात फिरवताना दाखवला आहे. डोंबलाचा काटेरी चाबूक! ही असली चीटिंग करून ते हिरो जिंकतात, त्यामुळे त्या इंग्रजांबद्दल उगाच कीव येते.
अमा, मामी पेक्षा मावशी प्रेमळ
अमा, मामी पेक्षा मावशी प्रेमळ असते. त्या प्रेमाने पिसं काढा आर आर आर ची.
( ही पावती समजा).
अखतर पक्षी भीम हा अगदी
अखतर पक्षी भीम हा अगदी आदिलाबाद जंगलातील अन्नालु( तिकडे नक्षल्स ना अन्नाच म्हणतात मोठे भाउ!!) त्याचा ट्रक मधून उडी मारुन मल्लीला सोड वायला जातानाचा ड्रेस टिपिकल अन्नालु आहे. मला वाट्ते डायवर्जन म्हणून एक कुत्रा पुरला असता. पण इथे डिजिटल झू आणले आहे.
अजय देवगण ऑफ द भोंगे नाक आजिबातच आंध्रा तेलंगणा मधील दिसत नाही. त्याची मुलगी आलिया वाट्त नाही. दोन डबल वेण्या परकर ओढणी ड्रेस पुर्ण लुक डिझायनर वाटतो. नैसर्गिक नाही.
ती मल्ली मुलगी लहान नंदिता दास सारखी दिसते.
फार फार पुर्वी मी बंजार्यात राहात होते व ऑफिस ज्युबिली हिल्स ला मध्ये हिरव्या हिल्स चा प्रदेश व सिंगल लेन रस्ता. मी लुना वरुन जात असे.
एखाद्या हिरव्या वळणावर आपण असु तेव्हा समोरुन चिरंजीवी ची गाडी येइल व बंद पडेल अशी स्वप्ने मीपण पाहिली आहेत. अब तो उसका बेटा आ गया!!! उमर होगई भौ. दीड तास झाला पिक्चर लावुन पण काही घडतच नाही आहे.
हे राम व भीम एकमेकांना कडेवर घेउन कसे काय फिरतात!! ब्रोमान्सच जास्त दिसत आहे. रामची खोली खाली पुस्तके. इथे तिथे सामान. हे सर्व डिजिटली एन्हान्स्ड वाटले.
एखाद्या हिरव्या वळणावर आपण
एखाद्या हिरव्या वळणावर आपण असु तेव्हा समोरुन चिरंजीवी ची गाडी येइल व बंद पडेल अशी स्वप्ने मीपण पाहिली आहेत. >>

आलिया देवगण ची सूनबाई आहे
आलिया देवगण ची सूनबाई आहे त्यामुळे वेगळा लूक चालेलं
सीता म्हणून जी मुलगी लहान
सीता म्हणून जी मुलगी लहान पणी दाखिवली आहे ती आजिबात आलिया सारखी नाही. के थ्री जी मध्ये जसे जाडा मुलगा मोठे पणी एकदम हिर्टी क रोशन अरे वा अरेवा.
आपल्याला केतकी माटेगावकर
आपल्याला केतकी माटेगावकर मोठेपणी प्रिया बापट झालेली चालते तसे
ती मल्ली मुलगी खरोखरच नंदिता दास सारखी दिसते.
के थ्री जी मध्ये जसे जाडा
के थ्री जी मध्ये जसे जाडा मुलगा मोठे पणी एकदम हिर्टी क रोशन अरे वा अरेवा.
>>>>>>
हाहा, हो..
पण करीन कपूर छान घेतलेली. लहानपणीची वाटत होती.
शाहरूख मात्र ईतक्या वर्षात तसाच्या तसाच राहिला
“ नाही. के थ्री जी मध्ये जसे
“ नाही. के थ्री जी मध्ये जसे जाडा मुलगा मोठे पणी एकदम हिर्टी क रोशन” - तेव्हढ्या कालावधीत तर त्याच्या डोळ्याचा रंगही बदललाय आणि त्याला ११ वं बोटही फुटलंय.
आलिया देवगण ची सूनबाई आहे
आलिया देवगण ची सूनबाई आहे त्यामुळे वेगळा लूक चालेलं >>>>> ऑ? आलिया तर कपूर खानदानाची सून आहे ना. देवगणची सूनबाई कशी काय?
तो मुलाला वाचवतात तो सीन
तो मुलाला वाचवतात तो सीन पाहिला. प्रचंड नेत्रदीपक चित्रीकरण, जबरदस्त पार्श्वसंगीत याचा वर्ख लावलेला अ. आणि अ. सीन आहे तो. आधी तो राम पुलावर त्याचे ५०० माणसांना सहज झोडपणारे हात ठेवून रागाने बघत असतो व तो पूल थरथरू लागतो. मला वाटले हाच हलवतोय आख्खा पूल. काही सांगता येत नाही. पण त्याखालून एक मालगाडी चाललेली असते. तिचे ते ठेक्यावर आल्यासारखे आवाज येत असतात. मग क्लोज अप मधे अगदी गुळगुळीत व अजिबात सांधे नसलेल्या रूळांवरून सुद्धा ठकाक ठकाक आवाज करत गाडी चाललेली असते. रूळ सलग असतील तर असे आवाज कोठून आले काय माहीत.
मग तो स्फोट वगैरे. एकतर मी रेल्वेला थांबवणारा सिग्नल पुलावर कधी पाहिल्याचे आठवत नाही. पण ते सोडून देउ. वाघिणीचा स्फोट व ती खाली पडते ती त्या मासा पकडायला आलेल्या मुलाच्या बाजूला. नंतर त्या एका रेषेत चाललेल्या गाडीच्या इतर वाघिणीसुद्धा - त्यांनी आपापल्या जागी खाली पडावे ना? तर नाही. त्याही त्या मुलाच्या आजूबाजूलाच पडतात. आता हा स्थानिक मुलगा, मासे पकडणारा. तो पोहू शकत नाही? ही असली पोरे पाण्याखाली वगैरे जाउन येतात बिनधास्त.
तर तेथे हा "वॉटर" म्हणून गाजावाजा केलेला भीम डायरेक्ट पाण्यात उडी टाकून त्याला वाचवण्या ऐवजी "अरे कोणाकडे दोरी वगैरे आहे का रे" करत बसतो. तेव्हा वरून राम ला खाली तो मुलगा दिसतो. त्याला कोणीतरी पाण्यात शिरून वाचवण्या ऐवजी नाट्यमय पद्धतीने वाचवायचे ठरते. मग तो तेथून पार लांबून याला खूण करतो की तू असा तिकडून पुलावर ये. याच्याकडे फटफटी आहे हे त्याला का कोणास ठाउक माहीत असते. तसेच बाजूच्या टांग्यात एक लांबलचक दोरखंड आहे, हे ही. टॉम अॅण्ड जेरी ला लाजवतील अशी साधने पाहिजे तेव्हा हाताशी असतात यांच्या. घोडा, फटफटी, दोरखंड, वंदे मातरम झेंडा. मग एक सर्कस अॅक्ट होते. साउथ च्या पिक्चर मधे फटफटी सुरू केली व सरळ निघाली असे कधी नसते. सर्रकन गिरकी घेउन हवेत माती उडवलीच पाहिजे.
ती सर्कस अॅक्ट फिझिक्स चा शोध लागायच्या आधी घडलेली आहे. पुलाला परपेण्डिक्युलर दिशेने झोके घेताना रामसाहेब त्या मुलाला भिरकावतात तो थेट काठावर - पुलाला समांतर इतक्या लांब फेकला जातो की जेथून लोक पाण्यात उतरायला कचरत होते. पूर्व-पश्चिम झोका घेत असताना दक्षिण किंवा उत्तरेला इतकी जड वस्तू इतक्या लांब कशी फेकता येइल? माहीत नाही. अर्थात लॉजिक या सीनच्या बर्याच आधी रानोमाळ हरवले आहे.
मग हे दोघे पुन्हा शेक हॅण्ड करतात. ७० च्या बॉलीवूड पिक्चर्स सारखे. आणि मग खाली पाण्यात उड्या टाकतात व स्कूबा डायव्हिंग केल्यासारखे, पण मास्क शिवाय, आरामात हिंडतात.
मग आधीच नुसते पाण्यात का नाही उतरले? उगाच सर्कस.
मनमोहन देसाईचे जुने चित्रपट जर नवीन तंत्रज्ञान वापरून पुन्हा केले तर जसे होतील तसे वाटते हे पाहून. पण तेव्हा त्याची नॉव्हेल्टी होती. ती तेव्हा सुद्धा पाच एक वर्षात ओसरली होती.
फारएण्ड पूर्ण पोस्टला अनुमोदन
फारएण्ड पूर्ण पोस्टला अनुमोदन. मस्त पोस्ट.
तो सगळाच सीन महा अतर्क्य आहे.
तो सगळाच सीन महा अतर्क्य आहे.
या चित्रपटात असे सीन अनेक मिळतील.ते बाईक ला लाथ मारून ती उभी फिरवून फेकणे, जळता रथ घेऊन त्याचे घोडे सोडणे वगैरे वगैरे पण.
फारेण्ड, बर्याच दिवसांनी
फारेण्ड, बर्याच दिवसांनी
वाघाच्या पुढे त्याच्या पेक्षा वेगाने पळणे अशा अनेक अ आणि अ दृश्यांवर स्वतंत्र लिहीणे जिवावर येते. अ आणि अ चा इतका मारा आहे कि शेवटी आपल्याला ते नॉर्मल वाटू लागतात हेच साऊथच्या सिनेम्यांचे यश असते. पुढे मागे राजामौली, रोहीत शेट्टी हे केंद्रात विज्ञान खात्याचे मंत्री झाले तर शाळेत दोन फिजिक्स अनिवार्य करतील. एक पृथ्वीतलासाठी आणि दुसरे साऊथच्या शिणुमामांसाठी.
मनमोहन देसाई किमान पोटासाठी पिक्चर काढतो असे तरी म्हणायचे.
फा
फा
“अर्थात लॉजिक या सीनच्या बर्याच आधी रानोमाळ हरवले आहे.” -
फा
फिजिक्सचा शोध लागायच्या आधीही फिजिक्स होतंच नं पण हे ऐकतंच नाहीत...!
रामचरण फारच मख्ख वाटतो, शिवाय अत्यंत यांत्रिक व 'मला पाहा फुलं वाहा' हावभाव करत कृत्रिम बोटॉक्स स्माईल देत रहातो म्हणून अद्याप बघितला नव्हता पण पंचेस नीट समजावेत व मारताही यावेत म्हणून बघेन. ते 'नाचो नाचो' बघून वैताग झाला, चेहरा चिकटवलेले CGI शरीर नाचते आहे असा भास झाला. रोबॉटिक मुव्हमेन्टस !!
त्यात हे नावाची यादी दाखवताना सुपर्रस्टार चिरंजीवी, सुपर्र मेगास्टार रामचरण लिहितात एवढं असत्य पचवायची ताकद राहीली नाही आता...!
Pages