Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जमतंय. हरियाणा-दारू, तसे
जमतंय. हरियाणा-दारू, तसे अजून वेगळ्या वेगळ्या भागांची वैशिष्ठ्ये घेऊन लिहा.
(आता सूज्ञांना कळले असेल मी पटकन भागाचे नाव का सांगितले नाही).
बाकी लोक पण भर घाला. या दुष्ट प्रथेने काय काय होऊ शकते सगळ्या शक्यता मांडा. म्हणजे आपण भांडायला जाऊ तेव्हा कोणी काहीही मुद्दा काढला की आपल्याकडे उत्तर तयार असेल .
हरयाणात दारू - टल्ली हरयाणा
हरयाणात दारू - टल्ली हरयाणा
पंजाबात नशा - उडता पंजाब
महाराष्ट्रात तंबाखू- मळता महाराष्ट्र...
मी बराच अनुभव घेतलाय
मी बराच अनुभव घेतलाय हरियानाचा. सकाळी 9 साडे 9 पासूनच सत्संग चालू होतो, अगदी मुख्य घरात. लग्न, होळी इत्यादी खास वेळी पापड तळून व पनीर फ्राय करून देणाऱ्या भाभी सुद्धा एक दोन पेग घेतात काही घरी. माझी बायकोने काही दिवस बोलणे सोडलेले मित्राच्या बायकोशी.
हरिद्वार रुडकी इत्यादी ठिकाणी
हरिद्वार रुडकी इत्यादी ठिकाणी नोव्हेंबर नंतर तपमान कधी कधी 3 4 डिग्री पर्यंत कमी असते, त्यावेळी बरेच जण रमचा सहारा घेतात. आपल्याकडेही हॉस्टेल मध्ये सत्संग असतो, पण सगळे चोरी छिपे असते. रुडकीला मस्त एन्जॉय करून झाले की मोकळ्या बाटल्या अगदी व्यवस्थित रूमच्या बाहेर ठेवतात. या चार महिन्यात सफाई कामगार 5 6 हजार फक्त मोकळ्या बाटल्या विकून कमावतात दरमहा. आणि याला मुलींचे वसतिगृह सुद्धा अपवाद नाही. आधी शॉक बसला, मग तो कमी करायला सत्संगात सहभाग घेऊ लागलो.
हरिद्वार रुडकी इत्यादी ठिकाणी
हरिद्वार रुडकी इत्यादी ठिकाणी नोव्हेंबर नंतर तपमान कधी कधी 3 4 डिग्री पर्यंत कमी असते, त्यावेळी बरेच जण रमचा सहारा घेतात. आपल्याकडेही हॉस्टेल मध्ये सत्संग असतो, पण सगळे चोरी छिपे असते. रुडकीला मस्त एन्जॉय करून झाले की मोकळ्या बाटल्या अगदी व्यवस्थित रूमच्या बाहेर ठेवतात. या चार महिन्यात सफाई कामगार 5 6 हजार फक्त मोकळ्या बाटल्या विकून कमावतात दरमहा. आणि याला मुलींचे वसतिगृह सुद्धा अपवाद नाही. आधी शॉक बसला, मग तो कमी करायला सत्संगात सहभाग घेऊ लागलो.
हरिद्वार रुडकी इत्यादी ठिकाणी
हरिद्वार रुडकी इत्यादी ठिकाणी नोव्हेंबर नंतर तपमान कधी कधी 3 4 डिग्री पर्यंत कमी असते, त्यावेळी बरेच जण रमचा सहारा घेतात. आपल्याकडेही हॉस्टेल मध्ये सत्संग असतो, पण सगळे चोरी छिपे असते. रुडकीला मस्त एन्जॉय करून झाले की मोकळ्या बाटल्या अगदी व्यवस्थित रूमच्या बाहेर ठेवतात. या चार महिन्यात सफाई कामगार 5 6 हजार फक्त मोकळ्या बाटल्या विकून कमावतात दरमहा. आणि याला मुलींचे वसतिगृह सुद्धा अपवाद नाही. आधी शॉक बसला, मग तो कमी करायला सत्संगात सहभाग घेऊ लागलो.
मुळात मुली/स्त्रिया दारू
मुळात मुली/स्त्रिया दारू पितात हे बघून शॉक बसला असे वाचूनच मला शॉक बसतोय...
मुळात मुली/स्त्रिया दारू
मुळात मुली/स्त्रिया दारू पितात हे बघून शॉक बसला असे वाचूनच मला शॉक बसतोय.
>>>>
मी सुद्धा कॉलेजला असताना एका मित्राच्या घरी गेलेलो तेव्हा त्यांच्या घरात आई वडील बहीण सारे दारू पिताना बघून मलाही शॉकच बसलेला. माझे बालपण चाळीत गेले असले तरी तिथेही एकाही बाईला दारू पिताना पाहिले नव्हते. तेच पुरुष ईतके व्यसनी होते की सांगायची सोय नाही. हेच चित्र आईवडीलांच्या भल्यामोठ्या कुटुंबात मागच्या पिढीपर्यंत पाहिले आहे. या पिढीचे बघायला गेलो नाही.
आता व्हाई शूल्ड बॉईज हॅव ऑल द फन म्हणत तलवारी ऊपसता येतील. तो वेगळा मुद्दा झाला. पण ज्यांनी आपल्या सभोवतालच्या बायकांना दारू पिताना पाहिले नाही त्यांना शॉक बसणे स्वाभाविक आहे
धाग्याचे नाव बदलून
धाग्याचे नाव बदलून "ज्येनांचा कंड्या पिकवण्याचा कट्टा" असे करा.
एकंदरीत हरियाणा राज्यविषयी
एकंदरीत हरियाणा राज्यविषयी तिथं मिसोजिमिस्टिक पुरुष राहतात जे समाधी ते संभोग काहीही करण्याच्या अगोदर दारूच पितात हे सार्वत्रिकरण मजेशीर वाटले.
पंजाबपेक्षा हरियाणा राज्यात दूध दुभते जास्त खपताना बघणे एक कल्चरल शॉक होता, खेड्यापाड्यात पोरे अन पोरी (सुद्धा) शॉर्ट्स नेसून कडक स्पोर्ट्स प्रॅक्टिस करताना पाहून दुसरा कल्चरल शॉक बसला होता, वयाच्या आठव्या वर्षांपासून डिफेन्स मध्ये भर्तीच्या हिशोबाने अभ्यास सुरू केलेली पोरं बघणे पण एक कल्चरल शॉक होता.
पर्सनल एनेकडोट्स जमेस धरल्यास
"लग्न झालं का (चांगली तहसीलदाराची पोस्ट असलेली) नोकरी सोड" म्हणून पोटच्या पोरींचे बौद्धिक घेणारा हरयाणवी बाप अन
"खबरदार पोरीला फालतू काही शिकवलेत तर, बेटी तू कंपिटीशन फाईट करून पोस्ट मिळवली आहेस, सन्मानाने अन इमानदारीने नोकरी कर, फक्त लाचलुचपत वगैरे करून आमचे नाव तितके खराब करू नकोस, वडिलांचे आता ऐकायची जरूर नाही, तू आता आमची मुलगी आहेस" असे म्हणणारे सासू सासरे (व्याही) हरियाणाच्या ग्रामीण भागात पाहिल्यावर मेजर कल्चरल शॉक लागला होता.
"माझं गुणांचं बाळ ग ते" असं
"माझं गुणांचं बाळ ग ते" असं आपल्या मुलाला
(कायम) म्हणणाऱ्या भारतीय आया माहिती होत्या पण , "माझं गुणांचं बाळ ग ते" म्हणून "किती सुकलाय बघ" म्हणत (३५ वर्षीय) पोराला पार स्वतःच्या हाताने अँटीपास्तो ते मेनकोर्स भरवणारी (७५ वर्षांची) एक इटालियन आई पाहून मजा अन कल्चरल शॉक दोन्ही वाटले होते.
पाळलेला कुत्रा जरी असेल आणि
पाळलेला कुत्रा जरी असेल आणि तुमच्या वर प्रेम पण करत असेल त्याच्या समोर चे अन्न तुम्ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करा .
हल्ला करेल तो.
मालक आहे हे पण विसरून जाईल>>>
सगळेच कुत्रे असं करतील असे नाही
हे करून पाहिले आहे त्यामुळे खात्रीने सांगू शकतो
आणि त्यातही अन्न आणि पाणी हे
आणि त्यातही अन्न आणि पाणी हे जीवनावश्यक घटक आहेत
सेक्स नाहीये
त्यामुळे दोन्हीची तुलनाच होऊ शकत नाही
असो विषयावर
आमच्या रात्रीच्या वेळी नातेवाईकांनी खोलीत वेगवेगळ्या ठिकाणी गजराची घड्याळ लपवली होती
वेगवेगळ्या वेळी वाजतील अशी
पहिली दोन दहा मिनिटांच्या अंतराने वाजल्यावर प्लॅन लक्षात आला आणि खोलीचा शोध घेऊन सापडलेली घड्याळे बंद करून टाकली
वर च्या मनाने कमी निरुपद्रवी
आमच्या खोलीत कोणी आगाऊ पोट्ट्या सापडला असता तर परत आयुष्यात असला आगावू पणा न करण्याचे धडे मिळाले असते
कुठल्यातरी पिक्चरमध्ये
कुठल्यातरी पिक्चरमध्ये बेडखाली फटाके फोडायचा सीन होता. अगरबत्तीने टायमर लाऊन.
कुत्रा आणि मालकाबाबत आशुचॅंपशी सहमत. कुत्रा मालकाशी वफादार असतो. त्याचसाठी तर तो प्रसिद्ध असतो. ईतरांना तो माणूसकी दाखवेल याची खात्री नसते. पण तरीही त्याच्या प्रणयामध्ये बाधा टाकणाऱ्यांना चावेल असेही नसते. बरेचदा हे पाहिले आहे. भर वस्तीत मध्यभागी कुत्र्यांचा प्रणय चालू असतो. माणसांना ते बघायला छान वाटत नाही म्हणून ते काठी मारून वा रॉकेल टाकून त्यांना वेगळे करतात. बिचारे कुई कुई करत आपली नाराजगी व्यक्त करून निघून जातात. पण त्यात बाधा आणणाऱ्यांना पलटून चावत नाहीत
किती डेंजरस!
किती डेंजरस!
समजा हे हरयाणात झाले असते. ढोसलेला नवरदेव चिडून ते घड्याळ हातात घेऊन त्याच अवस्थेत बाहेर येईल "किस की घडी हैं बे ये?" ओरडत आणि दिसेल त्याला ठोकत सुटेल "तेरी हैं ना घडी, आ ? xxx के तेरी हैं ना?" करत. एखाद्याचा मुडदा पडू शकतो .
लै जोराचा कल्चरेल धक्का बसला
लै जोराचा कल्चरेल धक्का बसला बगा. याले काय समजत व्हतो..
https://www.loksatta.com/manoranjan/did-you-know-shah-rukh-khan-once-sai...
शाह रुख खान नेहमी मिडिआला
शाह रुख खान नेहमी मिडिआला आवडेल/ मिडीआ खपेल, असे बोलतो. बट दॅट इज हिज स्ट्रॅटेजी.
इतका शॉक बसतो तर परत परत जाता
इतका शॉक बसतो तर परत परत जाता कशाला त्या विरंगुळा मध्ये? Happy
Submitted by मोरोबा on 5 May, 2022 - 07:30
>>
सामान्य जीवनात, द्वैत किंवा
सामान्य जीवनात, द्वैत किंवा अद्वैत, खास असलेल्या जीवनात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, माहित असलेली किंवा भविष्यात माहित पडेल अशी शक्यता असणारे, प्रकट किंवा अप्रकट, लौकिक किंवा अलौकिक अस काही आहे का की जे सरांना माहित नाही किंवा त्यांच्याबरोबर घडले नाही.
मायबोलीवर टंकल्या जाणार्या प्रत्येक शब्दाला एक अशी गोष्ट एकतर सरांबरोबर घडलेली किंवा अनुभवलेली असतेच असते.
हा माझ्यासाठी मोठाच शॉक आहे.
जली को आग केहते है
जली को आग केहते है
बुझी को राख केहते हैं
जेम्स बाँड को भी शॉक्ड कर दे
उसी को शॉकाल कहते है.
जेम्स बाँड
जेम्स बाँड
परंतू सर्वव्यापी, सर्वसाक्षी सरांच्या अनुभवविश्वाबद्दल तुम्हाला शॉक बसलेला पाहून समस्त भक्तगण कोमात जातील
काहुन कोमात जातील? त्याहीले
काहुन कोमात जातील? त्याहीले गुदगुल्याच व्हतील.
पितळ उघडे पडले आहे पण फॅन
पितळ उघडे पडले आहे पण फॅन गर्ल्स त्याचे दागिने बनवून नाचत आहेत. शॉकिन्ग गलिबल बिहेविअर.
(No subject)
इंग्लिशमध्ये हसताना आपण
इंग्लिशमध्ये हसताना आपण Hahahaha असे हसतो. पण स्पॅनिश लोक तसे हसत नाहीत. तर ते Jajajaja असे हसतात
पहिल्यांदा मला वाटले टायपो असेल. पण नाही. अनेक ठिकाणी तसेच लिहिलेले दिसते. त्याचा त्यांच्या लिपीत यायायाया असा उच्चार आहे, व ते तसेच हसतात म्हणे.
मला मात्र "आसमाँ से आया फ़रिश्ता... " गाण्यात शर्मिला टागोर "जा ज्जा" म्हणते ते आठवते. जाज्जा जाज्जाजा
स्पॅनिश लोक J चा उच्चार ह
स्पॅनिश लोक J चा उच्चार ह प्रमाणे करतात. जर्मन, स्वीडिश, डच वगैरे लोक J ला य म्हणतात. त्यामुळे स्पॅनिश लोकांचा jajaja हा हाहाहा असाच वाचावा अशी माझी समजूत होती.
San Jose = सॅन होसे
San Jose = सॅन होसे
हो, त्यांच्या J चा उच्चार ह
हो, त्यांच्या J चा उच्चार ह सारखा होतो असेही स्पष्टीकरण आहे अनेक ठिकाणी
Jalapeño चा उच्चार हालापेनो
Jalapeño चा उच्चार हालापेनो असा करतात.
Hasun hasun gadabada lolalo =
Hasun hasun gadabada lolalo = jasun jasun gadabada lolalo
Pages