आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दव असेल ? भुवीची ओव्हर चांगली होती. समोर बुमरा होता हा मुख्य फरक . उमरान ला चौथी ओव्हर द्यायला हवी होती. धमाल आली असती.

मलाही एकदा वाटलं बरका की हातातून बॉल सटकतोय का? इतके कसे फुल टॉस वगैरे येतायत? पण भुवीनी बरोबर टाकली. उमरानबद्दल अनुमोदन असामी पण कदाचित त्याचही नटराजनसारखं होऊ शकलं असतं. कंट्रोल हवा. लेटली दाखवतोय तो कंट्रोल पण भुवी वॉज बेस्ट बेट.

उम्रान, टीम डेव्हीड, त्रिपाठी आणि प्रियम गर्ग - चौघंही मस्त खेळले आज. चौघातले तिघं विनिंग साईडला होते हे ही योग्यच झालं. उम्रान मलिक चा पेस टीव्हीवर बघतानासुद्धा जाणवतो.

उमरान मलिकची एक ओवर शिल्लक ठेवली, जसे काल दिल्लीने एक कुलदीपची ठेवली.
रनरेटचा विचार करून सामना झटपट संपवायला बघायचे तर नेमके विकेट टेकर बॉलरच्या ओवर शिल्लक ठेवणे, अनाकलनीय निर्णय आहेत दोन्ही Happy

पण भुवीनी बरोबर टाकली. >> नटराजन नि भुवी मधे तोच मोठा फरक आहे ना. भुवीचा कंट्रोल अधिक चांगला आहे. नटराजनचे यॉर्कर्स चांगले असतात पण सध्या तो ऑफ बाहेर टाकण्याच्या प्रयत्नामधे काहीतरी करत असतो खरा. उमरान फक्त ह्यासाठी म्हणत होतो की त्याला मार पडू शकतो नि मिस होण्याचे चान्सेस पण अधिक असतात. आपल्याला मजा आली असती हा भागही अलहिदा.

हातातना बॉल सटकत वगैरे नाही, तसे मग भुवीचेही झाले असते. असो, आयपीएलची हीच मजा असते >> काहीही म्हण , धोनी जे करतो ते आयपील मधे इतर कोणालाच करता येत नाही हे मात्र खरे Lol

धोनी मध्येच कुठे आला ईथे? आता काय केले त्याने..
बाकी वाक्याशी सहमत. धोनी आयपीएलचा ब्रांड आहे. हिंदी कॉमेंटेटर तर निम्मे वेळ धोनीवरच बोलत असतात Happy

धोनी मध्येच कुठे आला ईथे? आता काय केले त्याने.. >> उगाच वेड पांघरून पेडगावाला जाऊ नकोस. तू ते पोस्ट का केलेस ते नि त्याला मी तसे का लिहिले ते उघड आहे. Happy

माझ्या पोस्टचा अर्थ उघड होता की आजचा तसेच मागचा सामना लवकर संपवायचा नव्हता. म्हणून मग नेहमीसारखी धावांची लयलूट झाली. रनरेट महत्वाचा असूनही स्ट्राईक बॉलरच्या ओवर राखून ठेवल्या गेल्या. सरळसरळ अक्षरशा एकसारखे फुलटॉस दिले मारायला. ते ही नटराजनने. उनाडकटही बोलू शकत नाही आता. कालही राहुल चहरलाही घे पट्ट्यात आणि फिरव बॅट चालू होते.... असो, पण शेवटी जिंकायचे ते जिंकलेच. आठवतेय का मागची आयपीएल, शेवटच्या दोन मॅचला मुंबईने कशी हवा केलेली Happy

असो. यात धोनी कुठे आला ते कळले नाही म्हणून वाटले की माझ्या नेहमीसारख्याच पोस्टचा काही वेगळा अर्थ लागला का Happy

यात धोनी कुठे आला ते कळले नाही म्हणून वाटले की माझ्या नेहमीसारख्याच पोस्टचा काही वेगळा अर्थ लागला का >> धोनी आला कारण जो न्याय तू इतरांना लावणार तोच धोनीला तेव्हढाच लागणार हे लक्षात ठेव. धोनीचे सगळे पराक्रम पण असेच असणार जसे इतरांचे असणार हे तू उघड करत आहेस.

काल आणि परवा दिल्ली आणि हैद्राबादने रनरेटचा विचार करुन (मुख्यत्वे दोन्ही संघांचे qualification रनरेटवर ठरण्याची पॉसिबिलिटी असताना) खुप लवकर संपवायला हव्या होत्या..... पण दोन्ही संघांच्या कॅप्टन्सचा तो इंटेंटच दिसला नाही!!

आता राजस्थान आणि लखनौ त्यांची उरलेली मॅच कशी खेळतायत त्यावर qualifier कोण खेळणार आणि eliminator कोण खेळणार हे ठरेल पण त्यात लखनौचे पारडे जड वाटतेय कारण त्यांना अंडरप्रेशर (अंडरप्रेशर एव्हढ्यासाठी की ते अजूनही रेसमध्ये येऊ शकतात आणि त्याचे प्रेशर त्यांच्यावर असेल) केकेआरशी खेळायचे आहे पण चेन्नई एकदम केअरफ्री मोडमध्ये आहे आणि अश्या संघाला हरवणे जास्त अवघड असते..... राजस्थान (पारंपारिक रित्या थोडी अल्पसंतुष्ट टीम असल्याचा अनुभव असल्याने) qualifier साठी तितक्या विजिगिषू वृत्तीने लढेलच याची खात्री नाही!! अर्थात राजस्थानने चेन्नईला हरवून दुसरे स्थान पटकावले तर राजस्थानचा चाहता म्हणून मला आनंदच होईल आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत Happy

जर राजस्थान आणि लखनौने आपापल्या मॅचेस जिंकल्या तर मग दिल्लीचे चान्सेस जास्त वाटतायत (अनलेस दिल्ली मुंबईविरूध्द हरली आणि बंगलोरने गुजरातला हरवले)

एकूण इंटरेस्टींग आहेत पुढच्या काही मॅचेस Happy

कारण जो न्याय तू इतरांना लावणार तोच धोनीला तेव्हढाच लागणार हे लक्षात ठेव.
>>>>>>
हे तर मी आधीच म्हणालोय. मागच्या आयपीएललाही धोनी फ्लॉप जात असताना दिल्ली समोर जे हिरो बनणारी खेळी होती तेव्हाही मी ईथे येऊन लिहिलेले बघा. सरळसरळ मारायला पट्ट्यात बॉल देणे चालू होते. मी याबाबतीत धोनीला काही वेगळा न्याय लावत नाही. जिथे गडबड दिसते तिथे दिसते. मग लाडका प्लेअर बघत नाही. Happy

बाकी धोनी ईंटरनॅशनलचा एक ऑल टाईम ग्रेट खेळाडू आहे. त्याचे कीपर, फलंदाज आणि कर्णधार या तिन्ही भुमिकात ईतके किर्तीमान आहेत की असे पेकेज जगात दुसरे नसेल. त्याला कुठे आयपीएल कामगिरीवरून जोखत बसायचे..

मागच्या आयपीएललाही धोनी फ्लॉप जात असताना दिल्ली समोर जे हिरो बनणारी खेळी होती तेव्हाही मी ईथे येऊन लिहिलेले बघा. > >एव्हढी हौस नाही पण ह्या आय्पील मधे धोनी च्या तू लावलेल्या सगळ्या पिपाण्या त्याच न्यायाने पिचक्या ठरणार हे लक्षात ठेव. तुझेच बोल आहेत हे ! नटराजन सारखा प्लेयर जो भारतीय संघात आत बाहेर करतोय नि आता आत येण्याचे जबरदस्त चान्सेस आहेत तो मुद्दामहून का करेल हे तुला कळत नसेल ह्यावर माझा विश्वास नाही.

अर्थात राजस्थानने चेन्नईला हरवून दुसरे स्थान पटकावले तर राजस्थानचा चाहता म्हणून मला आनंदच होईल आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत >> +१ एकदंर राजस्थानचा खेळ बघायला यंदा मजा आली आहे. दिल्ली हरावी अशी माझी इच्छा आहे. त्यामूळे सगळ्याच मॅचेस मह्त्वाच्या ठरतील. पण एकंदर दिल्ली डेंजरस टीम झाली आहे सध्या - वॉर्नर नि मार्श फॉर्म मधे आले आहेत नि नोकिए आल्यामूले बॉलिंग अला ही टीथ आले आहेत.

तो मुद्दामहून का करेल >>> जर सगळेच करत असतील. जर हे सो कॉलड अपयश काऊंट होणार नसेल. जर न करणेच उलटे करीअरला घातक असेल.. तर का नाही करणार. ईथे बसून ठामपणे ना तुम्ही काही सांगू शकता ना मी.. बस आपापल्या शंका आणि आपापले विश्वास Happy

आपापल्या शंका आणि आपापले विश्वास >> सॉरी बॉस. ह्याला शंका म्हणत नाहीत - काडीचेही प्रूफ नसताना निव्वळ फुकट लिहायला- बोलायला मिळते म्हणून इतरांच्या इंटीग्रिटीवर कॉमन सेन्स ला गहाण ठेवून उठसूठ शंका घेणे ह्याला शुद्ध हलकट विचार म्हणतात आमच्यामधे.

"एकदंर राजस्थानचा खेळ बघायला यंदा मजा आली आहे. " - +१. संजूची एक कॅप्टन म्हणून झालेली ग्रोथ पण लक्षणीय आहे. मागच्या सीझन ला तो जितका क्लूलेस वाटत होता तितकाच यंदा त्याचा प्रेझेन्स जाणवतोय. आधी वाटलं होतं तितकी ही टीम संपूर्णपणे बटलर आणि चहल वर अवलंबून नाहीये (बरीचशी असली तरिही).

" एकंदर दिल्ली डेंजरस टीम झाली आहे" - मार्श, वॉर्नर, नॉकिये, कुलदीप आणि अक्षर हे त्यांचे गेम चेंजर्स आहेत. कुलदीप चा बदललेला फॉर्म फारच सुखावह आहे. लेफ्ट आर्म लेग/रिस्ट स्पिनर्स हा मोठा अ‍ॅसेट ठरू शकतो (फॉर्म मधे असेल तर).

आज लखनऊ चे ओपनर्स वेगळ्याच पीचवर खेळत होते असं वाटत होतं. तो एक कॅच सोडला तर (जो तोमर ने सोडला) एकही संधी दिली नाही केकेआर ला. आता केकेआर ने जबरदस्त प्रत्युत्तर द्यावं म्हणजे मॅच चुरशीची होईल.

"आज का दिन डीकॉक के नाम " - असंच वाटतंय. तसंही केकेआरच्या लाइन-अप मधे श्रेयस आणि रसेल सोडून कुणीच इतकी मोठी मॅच खेचून आणू शकतील असा विश्वास वाटावा असे बॅट्समेन नाहीयेत.

"इतक्या महत्वाच्या गेममध्ये रहाणे आणि फिंच सोडून तोमर??" - रहाणे इंज्युअर्ड आहे. फिंच चा फॉर्म बघता साऊदी, नरिन, बिलिंग्ज आणि रसेल च्या पुढे त्याला खेळवणं अवघड होतं.

अश्यावेळी राहुल एकदम क्लूलेस वाटतो कर्णधार म्हणून!! >> राहूल मला उगाचच जनरलच क्लूलेस वाटतो. त्याला बोल्ट च्या बॉल बद्दल विचारल्यावर 'मला दिसलाच नाही' असे म्हणाला होता. Happy

रआणा नि अय्यर एकत्र खेळतात तेंव्हा एकदम परफेक्ट अंडरस्टँडिंग असते असे वाटत राहते. कोण कधी टेंपो उचलणार ? रन्स घेणे इत्यादी मधे. बटलर जैस्वाल मधे पण जाणवलेले तेच. भले पार्टनरशिप न होउ दे.

इतरांच्या इंटीग्रिटीवर कॉमन सेन्स ला गहाण ठेवून उठसूठ शंका घेणे ह्याला शुद्ध हलकट विचार म्हणतात आमच्यामधे.
>>>>

हो नक्कीच
फक्त धोनीला ढोंगी बोलणे मात्र तेवढे अलाऊड आहे Happy

असो, आयपीएलच काय ईंटरनॅशनलमध्येही फिक्सिंग झालीच आहे. त्यासाठी लोकांना शिक्षाही झाली आहे. तर हा काय मी नवीन विचार मांडत नाहीय.

राहीला प्रश्न ईंटीग्रिटीवर शंका घ्यायचा तर ज्यांनी देशाचे प्रतिनिधीत्व करताना फिक्सींग केलीय त्यांचे तोंडही बघायला मला आवडत नाही. ते मला विश्वासघातकी देशद्रोही वाटतात.

पण आयपीएल जर स्क्रिप्टेड करत असतील जसे की रिॲलिटी शो तर ईटस ओके फॉर मी. व्यवसाय आहे तो. जे या सर्कसमध्ये सामील असतील त्यांची ईंटीग्रिटी माझ्या नजरेत शाबूतच राहते Happy

राहुल डिकॉक एकाच संघातील दोघांच्या ५००+ धावा झाल्या.
राहुल ऑरेंज कॅप मिळवतो आणि संघाला हरवतो म्हणून बदनाम आहे. आता जोडीदार मिळालाय तर यंदा जिंकवून द्यावे.

Pages