Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनु
अनु
बागेत ३ flamingo ठेवले......
बागेत ३ flamingo ठेवले......
हे मलाही माहित नव्हते. वॉक करताना एका घरातल्या यार्ड मध्ये खूपसे फ्लॅमिंगो, ग्नोम दिसायचे व किती छान सजवले आहे यार्ड असं वाटून मीही एक पिंक फ्लॅमिंगो घेतला होता. लावायला जमले नाही पण ..
>>>.चावटपणा करू नका !
>>>.चावटपणा करू नका !
घ्या खरा चावटपणा ते स्विंगर्स करतायत आणि बिल उगाच गरीबड्या माबोकरांच्या नावावर
फ्रोझन पोळ्या मॉडर्न च्या
फ्रोझन पोळ्या मॉडर्न च्या पुण्यात पण मिळतात.अर्थात फार कमी दुकानात.रिलायन्स मार्ट वर मिळतात.
बराच ताज्या पोळी सारखा एक्सपिरियन्स येतो, जर तवा नीट तापला असेल तर.
कशाला पाहिजेत ती थेरं शिंच्या
कशाला पाहिजेत ती थेरं शिंच्या फ्रोजन पोळ्यांची ? इथे कमी दरात माणसं मिळायची बंद होणारेत कि सर्वांना अमेरिकेला जायला व्हिसा मिळणार आहे ? काहीतरीच आपलं. जरा शिनेमे कमी बघावेत, एखादी शिरेल कमी बघावी आणि लाटाव्यात कि पोळ्या ! पण हे असं सुचवलेलं आजकालच्या मॉर्डन पिढीला चालत नाही.
पुष्पवृष्टी
पुष्पवृष्टी
बाली (इंडोनेशिया) ला लोकल
बाली (इंडोनेशिया) ला लोकल लोकं एकदाच जेवण बनवतात. मोस्टली भात आणि चिकन स्टॅाक. तोच नाश्ता, लंच व डीनर.
आमच्या आया रोज ३ दा वेगवेगळं खायला बनवतात, हा त्यांच्यासाठी कल्चरल शाॅक होता.
परदेशात आठवडाभराची पोळी भाजी
परदेशात आठवडाभराची पोळी भाजी करूप फ्रीजमधे ढकलतात आणि मग रोज थोडी थोडी वेळेला गरम करून खातात हे समजल्यावर धक्का बसला + अनुकंपा वाटली जनतेबद्दल>>>> फारच जनरालाइज्ड स्टेटमेंट! गेल्या 20 वर्षात आजूबाजूच्या भारतीय कुटुंबात तरी हे बघितलं नाही. काही ऑस्ट्रेलियन लोक अशा पद्धतीने पोळ्या फ्रोजन करून वापरत असतील तर कल्पना नाही!
गेल्या काही वर्षांत पुण्या-मुंबईत कोणाकडे जेवायला बोलावले तर जेवण बाहेरून (घरगुती केटरिंग) मागवलेले असणे किंवा घरातच एखाद्या कामवाल्या (स्वयंपाकाची कामे करणाऱ्या टापटीप रहाणाऱ्या बाई नव्हे) बाईंकडून करून घेतलेले असणे ह्याचे वाढते प्रमाण बघून खरोखरच धक्का बसला! अन्नाला नावे ठेवण्याचा हेतू नाही पण काही ठिकाणी पहिल्यांदा वाढलेलं जेवण पण कसंबसं संपवलं गेलं. नंतर पुढच्या वेळी त्या-त्या नातेवाईक/परिचितांकडे जाणं टाळलं आणि त्यांना बाहेर (रेस्टॉरंटमध्ये) बोलावलं. अर्थात याला अपवाद पण होतेच. काही ठिकाणी काम करणाऱ्या बाईंनी सुंदर पदार्थ करून प्रेमाने खाऊ घातले. त्या घरातली स्त्री/पुरुष त्या कुक type बाईंबरोबरीने उभं राहून सगळं व्यवस्थित होतंय ना हे बघत होते. योग्य त्या सूचना देत होते.
भारतात काही मुलं घरी मदतीसाठी येणाऱ्या बायका/ ड्रायव्हर यांच्याशी ज्या पद्धतीने बोलतात ते बघून मुलींना धक्का बसतो. आम्हाला पण बसतो पण त्या मुलांना आपण सुधरवू शकत नाही हे माहीत असल्याने आम्ही गप्प बसतो.
फारच जनरालाइज्ड स्टेटमेंट! >>
फारच जनरालाइज्ड स्टेटमेंट! >> याचाही वापर अतिरेकी होऊ लागलाय. भारतात गणेशोत्सव हा सण साजरा होतो किंवा दुर्गापूजा साजरी होते असे म्हटले जाते. याचा अर्थ प्रत्येक भारतीय गणेशोत्सव थोडीच साजरा करतो ? बंगाल सहीत नॉर्थ इंडीयात तुरळक होतो. काही वर्षांपूर्वी फक्त महाराष्ट्रात ते ही पुण्या मुंबईतच होता. तसेच दूर्गापूजा. बंगाली लोकच करतात हा सण साजरा.
पण आपण समजून घेतो कि भारतात लोक हे सण साजरे करतात. यात भारतात (काही प्रांतात) (काही लोक) हे सण साजरे करतात हे कंस टाकायची गरज भासत नाही.
तसेच वाईफ स्वॅपिंग बाबत लोकांनी युरोप अमेरिकेचा उल्लेख वाचलेला असतो. तिकडच्या नियतकालिकात अशा स्टोर्या असतात, सिनेमात प्रसंग असतात.. कुणाच्याही म्हणण्याचा शंभर टक्के लोक असे वागतात असा अर्थ नसतो.
खोडून काढायची भारी खोड !
ईथे आपणच पप्पु हाहा...
ईथे आपणच पप्पु हाहा...
>>>२ चालतील पण ३ एकत्र म्हणजे
>>>२ चालतील पण ३ एकत्र म्हणजे... समझनेवालोंको इशारा काफी हैं


दोघात तिसरा आता सगळं ..
अमितव
अजुन काही अश्या साईन असतील तर कळायला हवं ... नाही म्हणजे त्या टाळता येतील
फ्लेमिन्गो ३ हा मलाही कल्चरल
फ्लेमिन्गो ३ हा मलाही कल्चरल शॉकच आहे ,आत्ताच बसलाय.नाही इथे बॅक-फ्रन्ट कुठलही यार्ड नाहि पण जिथे आहे तिथेहि स्प्रिन्गचे फ्लॅग आणि रन्गित भिर -भिर फारतर.
इथे फ्लेमिंगो चं वाचून
इथे फ्लेमिंगो चं वाचून नव्याने कल्चरल शॉक बसला. अर्थात भारतात तसेही फ्लेमिंगो वगैरे शोधून शो म्हणून घराबाहेर लावले नसतेच म्हणा
आमच्या कडे शो च्या काच वाल्या खणाला अपारदर्शक ग्लास वॉल पेपर लावून त्यात कोंबलेले स्कार्फ,हॅट आणि बाहेर जायच्या वेळी लागणाऱ्या वस्तूंचा खचाखच भरलेला पसारा हा एकमेव शोपीस आहे.
“ किंवा ग्रहयोग चांगले
“ किंवा ग्रहयोग चांगले नसल्यामुळे 'सेल मधल्या चपला असतात, पण आपले पाय त्या नंबरचे नसतात' असं झालं असेल.” - लोल
ठाण्याला तीन हात नाका ब्रिज
ठाण्याला तीन हात नाका ब्रिज वर तीन फ्लेमिंगो काढले आहेत .
ऐरोली फाट्याला खूपच फ्लेमिंगो उभे केलेत नुकतेच.
आणि पुढे आलं की पुन्हा जायंट फ्लेमिंगो च दिसतात.
आता ते पाहिले की इथल्या कमेंट्स आठवणार
चपला पोस्ट्स भारी आहेत
ईथे वाशीलाही सगळीकडे
ईथे वाशीलाही सगळीकडे फ्लेमिंगो लावलेत. एवढे दिवस विचार करत होतो मध्येच काय हे.. पण आता अर्थ समजला. धन्यवाद मायबोली.
२०१७ ला आमच्या Parent Company
२०१७ ला आमच्या Parent Company मध्ये नव्या मशीनच्या Assembly training साठी Uzwil Switzerland ला गेलेलो.
आमचं काम जास्तं करुन shop floor ला होत आणि बहुतेक कामगार वयस्क होते.
शिफ्ट संपल्यावर हात पाय धुवायला washroom मध्ये गेलो तर बरेचजण दिगंबर अवस्थेत शॉवर घेत होते आणि तसेच बाहेर येऊन अगदी गप्पा मारत अंग पुसत होते.
फ्लेमिंगो, चपला, पुष्पवृष्टी
फ्लेमिंगो, चपला, पुष्पवृष्टी
मी सेक्स अँड द सीटीचे सगळे एपिसोड बघितले आहेत म्हणून मला वाटायचं मला 'ह्यातलं' सगळ्ळं माहिती आहे पण हे नव्हते माहिती...
काही वर्षांपूर्वी एका अमेरिकन बाईला आम्ही आणि मुलं एकाच बेडरूममध्ये झोपतो हे कळलं, तिला कल्चरल शॉक बसलेला दिसला होता.
मुलगी ४-५ वर्षाची असताना
मुलगी ४-५ वर्षाची असताना पहिल्यांदाच भारतातून बाहेर विमान प्रवास करत होते. आपल्याकडे जनरली मुलं चहा कॉफी वगैरे पितात ना दुध जास्त घालून किंवा टोस्ट बुडवण्यापुरतं वगैरे टाईप्स. (ज्यांची पित नसतील त्यांनी इग्नोर मारा
. ) मी त्याच मोड मधे होते.
तर मी विमानात माझ्यासाठी कॉफी ऑर्डर केली होती ती माझी मुलगी पण टेस्ट करून बघत होती. लुफ्क्थान्साचा तो मेल फ्लाईट अटेंडंट होता इतका शॉक मधे बघत होता आणि विचारलं इज शी ड्रिंकिग कॉफी ? यु गिव्हिंग कॅफेन टू हर? नॉट गुड.
मला गडब्डून काय बोलावं कळलंच नाही. कॅफेन मुलांना देऊ नये वगैरे हा कन्सेप्टच कळायचा बाकी होता. काय बोलणार?
हा कल्चरल शॉक त्यालाच बसला असेल.
काही वर्षांपूर्वी एका अमेरिकन
काही वर्षांपूर्वी एका अमेरिकन बाईला आम्ही आणि मुलं एकाच बेडरूममध्ये झोपतो हे कळलं, तिला कल्चरल शॉक बसलेला दिसला होता>>>>>>>>>>>> हा हा खरंय!
म्हटलं अरे विसरलात का आपण पण आईबाबांजवळ किती वर्ष झोपायचो
लगेच काय इथली संस्कृती वगैरे आं... 
असे शॉक बसलेले मी पण लोक पाहिलेत पण अमेरिकन नव्हे देसीच
उगाच सगळीकडे तोच अर्थ लावु
उगाच सगळीकडे तोच अर्थ लावु नका. सबर्बन लेजंड/मिथ आहे ते. असेल एखाद्या दुसर्या ठिकाणी कुणीतरी वापरत पण कॉमन नाही. उगाच शेजार्यानी ३ फ्लेमिंगो लावले म्हणजे ते स्विंगर असा अर्थ काढण अगदीच वेडेपणा होईल. चॅरिटी वगैरे साठी , बर्थडे सेलेब्रेशचॅरिटी, गार्डन डेकोरेशन म्हणुन फ्लेमिंगो वापरतात. स्विंगर एखाद्यावेळी वापरत असतील पण मला नाही वाटत नेबरहुड मध्ये कुणी सहजा सहजी स्विंगर म्हणुन अॅड करत असतील.
चॅरिटी साठी बरेचवेळा बाहेर ठेवले जातात जेणेकरून त्या घरातल्या लोकांनी पैसे डोनेट करावेत. त्यांनी पैसे डोनेट केले कि मग नेक्स्ट टारगेट घर. बर्थेडेला गुड लक म्हणुन वापरतात. पायनॅपल जसे वापरतात तसे.
भारतात कुणी स्विंगर या अर्थाने वापरत असतील याची जराही शक्यता वाटत नाही.
चावटपणा करू नका ! अन्यथा अ
चावटपणा करू नका ! अन्यथा अॅडमिन येऊन टाळे लावतील.
>> ते फ्रंटयार्ड चेक करण्यात बिझी आहेत.. चुकून फ्लेमिंगो तर नाहीय ना
पायनॅपल जसे वापरतात तसे.>>>
बर्थेडेला गुड लक म्हणुन वापरतात. पायनॅपल जसे वापरतात तसे.>>>
इथे भलतंच म्हणतायत
A pineapple that is placed on your porch or mailbox by swingers lets everyone know that there is a swinger party going on.
(No subject)
हे काही चटकन सापडलेले फ्लेमिंगो.. तरी हे फक्त मिनी सी शोअरचे आहेत
लोल मोरोबा. अहो लिंक शोधाल
लोल मोरोबा. अहो लिंक शोधाल तशाच मिळतील. पाय्नॅपल गुड लक का समजले जाते असे गुगल करून पहा. स्विंगर शब्द अॅड करू नका. :ड
होय लिंका शोधाल तशा मिळताहेत.
होय लिंका शोधाल तशा मिळताहेत. बरं स्विंगर सर्व सुंदर वस्तू एकजात वापरु लागले तर आम्ही का म्हणुन बघत बसायचं? ते नोम्स(Garden gnomes) छान दिसतात की.
हे सगळे चोराच्या वाटा चोराला
हे सगळे चोराच्या वाटा चोराला ठावे या चालीवर आहे.
एखादी वाट उघड झाली की धक्का बसतो.
मुळात कोणताही cult सूचक गोष्टींसाठी नवीन काही न वापरता जे common आहे त्यालाच twist देऊन वापरतो. म्हणून त्याचा मूळ वापर थांबत नाही. सर्वमान्य अर्थ आणि cult चा सूचक अर्थ हे mutually exclusive नाहीत.
३ flamingoes चा जो अर्थ युरोपमधील एका देशात आहे तोच जगभर काय पूर्ण युरोपात असेलच असे नाही.
ऑर बाबा के लिए (म्हणजे आपण
ऑर बाबा के लिए (म्हणजे आपण ज्यांना बाबा म्हणतो त्यांना नाही, तर आपल्याल जे बाबा म्हणतात त्यांना हे लोक बाबा म्हणतात) क्या दिखाऊ? >>> अमित
"ऑर बाबा के लिए (म्हणजे आपण
"ऑर बाबा के लिए (म्हणजे आपण ज्यांना बाबा म्हणतो त्यांना नाही, तर आपल्याल जे बाबा म्हणतात त्यांना हे लोक बाबा म्हणतात) क्या दिखाऊ?" -
आमच्याखडे पप्पू, इसमेसे सात
आमच्याखडे पप्पू, इसमेसे सात नं निकाल म्हटलं की वरच्या माळ्यावरूप पुष्पवृष्टी व्हावी तशी हवी ती आणि हव्या त्या नं. ची चप्पल पडते खाली >>>
हे भारीये!
ऑर बाबा के लिए (म्हणजे आपण ज्यांना बाबा म्हणतो त्यांना नाही, तर आपल्याल जे बाबा म्हणतात त्यांना हे लोक बाबा म्हणतात) क्या दिखाऊ?" >>>
Pages