तू तेव्हा तशी

Submitted by Ajnabi on 22 March, 2022 - 04:07

राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट 'तू तेव्हा तशी', स्वप्नील जोशीची आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका
झी मराठीवर रात्री ८ वाजता
कलाकार : स्वप्नील जोशी
शिल्पा तुळसकर
अभिज्ञा भावे
सुनील गोडबोले
सुहास जोशी

Group content visibility: 
Use group defaults

हो
Screenshot_20220412-190727.png

दोघेही एकाच वयाचे आहेत. ती त्याच्या पेक्षा ६ महिन्यांनी मोठी आहे. पण काही बायका बऱ्याच मोठ्या दिसतात. ती त्याची आई होती ही पोस्ट फेसबुकवर बघितली त्यात पण ती त्या मालिकेत त्याची सावत्र आई होती म्हणे अस फेसबुकवर च कळलं

पुण्याची जाहिरात करण्याचे कंत्राट दिले आहे असे वाटते पुणे मनपाने. संसार कसा करायचा यावर पट्या प्रवचन देतो पण तोंड उचकटून खरं काय ते सांगत नाही. स्वतःची मंडळी आणायचं सोडून दुसऱ्याची मंडळी सांभाळत बसलाय. डॉक्टर कडे जायला एवढे पैसे लागतात Uhoh काल अनामिकेने घातलेला नेकपीस वेगळाच होता. मला पहिले वाटलं तिच्या ड्रेसची कॉलर आहे. आता पट्या तिच्या मुलीलाही लेक्चर देतोय. पुढे हे नात्यात आल्यावर तीपण चांगला वचपा काढेल.

हद कर दीं मालिकेत शिल्पा तुळसकर स्वप्निलची सख्खी आईच दाखवली आहे ,सावत्र नाही
मी ती मालिका पहिली आहे

पुण्याच्या सगळ्या खादाडी ठीकाणांची जाहिरात करुन झाली...
सुजाता मस्तानी, बेडेकर मिसळ, गिरिजा,सारसबाग पावभाजी, दुर्वांकुर, अनारसे सामोसे ई ई..... इथे बघता बघता उगीच आम्हाला रोज क्रेव्हिंग्स होतायत....
पट्या एकदम बावळट्ट आहे तरी स्मार्ट पटीला आवडतो आहे ... काहीही...
मला यातले फक्त नील आणि माई मावशी आवडतात.. त्यांचे सीन आले की मस्त मजा येते.... माई मावशी रॉक्स...वल्ली ला मस्त सुनवतात...
सध्या काहिच बघायला नाही त्यामुळे "तुका म्हणे त्यातल्या त्यात" ही सिरीअल झी५ वर बघितली जाते....

राम अवतार संपून कृष्ण अवतार- हे लक्षात नव्हतं आलं माझ्या, भारी डोकं चालतं तुमचं सुलू. >>>>>>> धन्स चम्पा.

हद कर दी बघितलीय. दारा सिन्ग, रिटा भादुडी, पल्लवी कुळकर्णी , अली असगर, किशोरी गोडबोले अशी बरीच मन्डळी होती त्या सिरीयलमध्ये.

चींधी बांधते…”
गाणं वाजवायला हवं होतं मलमाचया सीन ला

पट्या पटीच्या सिरीयलमधे त्या चिमणला सहा मुलं आहेत, शॉक्ड.

फुलं विकणाऱ्या आजींना (त्या पट्याची मोठी बहीण वाटत होत्या, आजी म्हणत होता तरी, मावशी तरी म्हणायचं) गुलाब फुल देतो आणि त्यांनी सांगितलेल्या भावाला सर्व घेतो म्हणून त्या चक्क शंभर रुपये परत देतात आणि हा घेतो, फुलही देतात त्याला. तो त्यांना म्हणतो चांगल्याशी चांगला वागतो मी (असंच काही म्हणतो) , अरे मग वल्लीशी का चांगला वागतोस, ती कुठे चांगली आहे.

पट्याला महान दाखवण्यासाठी काहीही प्रसंग रचतात. त्या आज्जीला फुल काय देतो आणि जिथे तिथे लेक्चर देत असतो. ती वल्ली डोकयावर मिरे वाटते तिथे काहीच बोलत नाही. भसाभसा पाकिटातून पैसे काढून देतो. अकाउंटंट आहे तर उलट घर खर्च कमी पैशात चालवून दाखवायला हवा. वाचलेल्या पैशात वाडा थोडा राहण्यासारखा करता येईल. सगळं अनामिकासाठी राखून ठेवलंय, वल्लीला ठिक करणे, वाडा ठिक करणे. हा फक्त गोड हसत एक पाय दुमडून कृष्णासारखा उभा राहणार.

वाडा बिल्डरला द्यावा, पैसे मिळतील, फ्लॅट्स मिळतील. वल्ली आणि सचिनला एक फ्लॅट आणि थोडे पैसे द्यावे आणि आता तुमचं तुम्ही बघा म्हणायचं, मावशीना पण फ्लॅट पैसे मिळतील आणि पट्याला पण मिळतील. डागडुजी करून काही होईल असं वाटत नाही, फार अवस्था वाटते त्याची.

असं कसं. मग अनामिका तिचे स्किल कुठे दाखवणार. सगळे एकत्र राहणार तेव्हाच आवश्यक तो मसाला मिळणार. शेवटी ही मालिका किचन राजकारणात शिरणार. दोघे वेगळे राहताहेत आणि त्यांच्यातलं नातं पुढे उमलतं की कोमेजून जातं हे दाखवायला ते पूर्वीचे झी नाही राहिले. आता एकत्र कुटुंब दाखवणं मस्ट आहे, तेव्हाच अनेक पात्र आणि बाष्कळपणा दाखवता येतो.

हाहाहा.

नाहीतर सगळेच पटीच्या बंगल्यात शिफ्ट होतील, वल्लीच्या बाबांसकट, काही सांगता येत नाही.

पुण्यात कॉलेजच्या मैत्रिणी बर्याच वर्षान्नी भेटल्या तर त्यान्ना अहो जाहो करण्याची पद्दत आहे का? अनामिका सतत पटया पटया करते तर हा मात्र तिला मिस अनामिका म्हणत राहतो! का? तो चिमणे सुद्दा तिला अहो जाहो करत असतो.

ते दोघे तर तिच्यापेक्षा म्हातारे दिसतात, ती आवडतेय मला हळूहळू.

त्या चिमणच्या चेहेऱ्यावर सतत बारा वाजलेले असतात. पट्या काही काही सीन्समध्ये आवडतो बाकी जाम बावळट वाटतो.

मला स्व जो आवडतोय ह्यात. मस्त कॅरी करतोय कॅरेक्टर.गोड हसतो.
शि तु तर आवडतेच. अगदी योग्य आहे ती ह्या रोलसाठी.
मु ब ची कल्पनाही करु शकत नाही.

पण......
वल्लीचा मुर्खपणा/स्वार्थीपणा आणि तो सगळयांनी खपवुन घेणं, चिमणेचे आणि त्याच्या बायकोचे बळंच, आजिबात फनी नसलेले इरिटेटींग सीन(कालचा सहा मुलं आणि त्याची नावं माहित नसणं वाला सीन अतिशय फालतु अतिशय बेक्कार होता), सौरभचे बळंच घुसडलेले उपदेशात्मक सीन (कालचा फुलंवालीचा सीन पकाव होता) हे नसेल तर मी मालिका बघेन.
हो आणि मंडळई चा गैस लवकर संपवावा.
एम आय एक्सपेक्टीधग टु मच??? Lol

मंडळी प्रकरण लवकर संपणार आहे असं वाटतं नव्या प्रोमोवरून. अनामिका पट्याला म्हणते, "तू unmarried असशील असं नव्हतं वाटलं."

सस्मित +११११
काल ही सिरियल बघण्याचा योग आला किंवा आणवला gelaa- जे असेल ते. सस्मित यांनी लिहिलेलं अक्षर न अक्षर पटलं. त्या अनामिकेला जर त्याचं लग्न झालं आहे असं वाटतंय तर एव्हढी लाईन का मारते आहे? शंका आहे तर स्पष्ट विचारत का नाही? स्व जो स्वतःच्या वहिनीला कायम मंडळी का म्हणतो? तसं आजकाल बायकोलाही कुणी मंडळी म्हणत नाही, मग हेच असे का? पुढे दाखवलेल्या भागात जोडप्याने नमस्कार करायच्या प्रसंगात तो वल्लिबरोबर जाताना दाखवला आहे. Exactly काय लफडं आहे ते कळत नाही.
वल्ली आणि तिचा बाप पराकोटीचे irritating आहेत त्यामुळे काल पाहिलेला शेवटचा भाग. आणखी सहन होणार नाही ...

कोणताही महाएपिसोड न करता पट्या च्या "मंडळी" चे गुपित आज फोडले एकदाचे... झी५ वर पहिला आत्ताच एपिसोड....
या साठी माझ्याकडुन दिग्दर्शकाला एक ब्राउनी पॉईंट...
वल्ली पट्याची बायको नाही हे सांगायला माहाएपिसोड... मागे डेंजर म्युझिक पीस.... गरागरा फिरणारे कॅमेरे न लावता एका झटक्यात सस्पेन्स फोडला आहे... तो पण एपिसोड च्या शेवटी... उगीच भिजत घोंगडं ठेवुन सोमवार पर्यंत ताणलं नाही....

परवा माई मावशी आणि नील चा सीन भारी होता.... पटी पट्या ला हाताला मलम लावत असते तेव्हा नील ऑफिसमद्धे डीटेक्टिव्हगिरी करतो आणि माई ना फोन करुन रनिंग कॉमेंट्री करत असतो.. त्याच्या तोंडी येणारे जळगावी शब्द पण भारी आहेत... फोन ठेवताना... "रॉजर" म्हणतो तर माई म्हणतात... हा कोण रॉजर आता जळगावचा... हा हा हा... मज्जा आली त्या सीन ला....

शितु आणि स्वजो गोड आहेत. दिसू दे त्याच्यापेक्षा मोठी. काय फरक पडतो. मुलींनी मग त्या कितीही वयाच्या असल्या तरी बारीकच असलं पाहिजे हा समज तरी खोडून निघेल. शितूच्या वागण्या बोलण्यात आवाजात एक गोडवा आहे. आता गैरसमज दूर झाल्यावर तरी पट्याने वल्लीपासून अंतर राखावे. नाहीतर सतत तिच्या पाठीवर हात ठेव, खांद्यावर हात ठेव. पुष्पवल्ली हे नाव मराठीत असते?

शिल्पा मला नाही दिसत स्वप्नीलपेक्षा मोठी, सत्यनारायण एपिसोडमध्ये छान दिसत होते दोघे.

पटीला वाटतं जोड्याने पट्या वल्ली नमस्कार करतायेत, मी ही क्षणभर अवाक झाले, मग सचिन वल्ली बघून जीव भांड्यात पडला.

बाकी चिमणे नवरा बायको मुलं फार बोअर करतात, वल्लीही बोअर आहे. खरंतर अभिज्ञा दिसायला सुरेख आहे पण या भूमिकेसाठी तिला बरंच वजन कमी करायला लावलं की काय. त्यात ती कायम वाकडी तोंड करते, चिडवते, व्हिलनपणाचा कहर करण्यासाठी काहीही करायला लावतात.

सर्वात आवडलेला सीन सुहास जोशी कारने सोडते म्हणते आणि त्यानंतर लायसन्सवरून झालेला पटी बरोबर संवाद. तिघांनी तो सीन भारी सहज केला, फार उत्स्फूर्त.

पुष्पवल्ली हे नाव मराठीत असते? ?? >>>>>>>>>> बहुधा पुष्पा सिनेमाचा इफेक्ट असावा. पुष्पा + श्रीवल्ली = पुष्पवल्ली

पुष्पवल्ली आम्हा सोयरी वनचरे... >>>>>>>>>> ते वॄक्षवल्ली आहे.

ती दिसते चाळीशीची... तिला अहो जाओ च म्हणणार ना... म्हाताऱ्या लोकांना आदर देणे चांगले असते... >>>>>>>> चाळीशीचा स्वजो सुद्दा आहे. आणि चाळीशीचे म्हातारे कधीपासून झाले? मध्यमवयीन म्हणा हव तर. पन्नाशीच्या वर असलेले म्हातारे असतात.

पुष्पवल्ली आम्हा सोयरी वनचरे.>>> Lol

काही मोठी दिसत नाहीये अनामिका सौरभपेक्षा.

आता बोर करणं सोडुन चांगलं काही दाखवावं.
अनामिकाची आई आणि सौरभची मावशी मस्त. दोघींचं काम छान आहे.

वल्ली मेन विलन आहे तर तिला घालवू शकत नाही पण चिमणे फॅमिलीला घालवा. नकोच ते. बोर. वल्लीला लिमिटेड ठेवा.

Pages