तू तेव्हा तशी

Submitted by Ajnabi on 22 March, 2022 - 04:07

राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट 'तू तेव्हा तशी', स्वप्नील जोशीची आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका
झी मराठीवर रात्री ८ वाजता
कलाकार : स्वप्नील जोशी
शिल्पा तुळसकर
अभिज्ञा भावे
सुनील गोडबोले
सुहास जोशी

Group content visibility: 
Use group defaults

राधा पक्की स्वार्थी आहे. नको तिथे मॉड आणि तिचा स्वार्थ तिथे जुने विचार. लिव ईन साठी मॉड आणि दुकान आहे हितेनचे तर त्यांच्यात बहिणींना काही देत नाही म्हणून तीन बहिणी असून हितेनला सर्व प्रॉपर्टी मिळणार म्हणून खुश आणि ह्याला व्यवहारीपणा म्हणते. तिथे ही मॉडर्न विचारांची नाही की प्रॉपर्टी समसमान भावा बहिणींना मिळायला हवी, किंवा काही भाग तरी बहिणींना द्यायला हवा.

राधाचे chara फार वर वर लिहिल्यासारखं वाटतं, हल्लीची पिढी काय विचार करते हे जवळून माहिती नसलं तरी इतकी राधासारखी नसावी बहुतेक.

राधाचे chara फार वर वर लिहिल्यासारखं वाटतं, हल्लीची पिढी काय विचार करते हे जवळून माहिती नसलं तरी इतकी राधासारखी नसावी बहुतेक. >>> ओळखीत १-२ मुली आहेत अश्या स्वार्थी. हल्ली हे कॉमन असावं असंच वाटलं मला तरी.

मागे एक प्रोमो बघितला होता. राधा आईला म्हणते की तू बाकी काहीही कर पण प्रेम करु नको वगैरे.

तो भाग झाला का?

सध्याची राधा अगदीच बावळट वाटते. अजिबात स्वाभिमान नाही. काही कामधंदा करायचा नाही. आई किंवा boy friend ने लाड पुरवायचे. आजच्या काळातल्या आणि एकट्या आईने वाढवलेल्या मुली अश्या नसतात खरंतर. स्वतःची ओळख त्यांना फार महत्वाची असते.

राधाचं पात्र फारच वरवरचं आहे. पट्याने सगळं मार्गावर आणावं एवढ्यासाठी सगळं रचलंय. नाहीतर काय ते हितेंचे आईवडील आणि काय ते सारखं लिव इन. कशाला काही अर्थ नाही. ते लोकही सुधारलेत की आता. हे असं पल्लू डोक्यावर घेऊन शहरात कोण फिरतं.
काल मला वाटलं अनामिका खोटं खोटं रडतेय. मध्येच ती कशी लहान मुलांसारखी रडत होती. पट्या काय करत होता तिकडे. राधा आणि नीलचे जुळेल बहुतेक शेवटी किंबहुना अनामिका आपली बावळट आणि लाडावलेली मुलगी नीलच्या गळ्यात बांधेल आणि त्याला घरजावई करून घेईल.

पट्या प्रत्येक वाक्यात मिस अनामिका मिस अनामिका बोलतो. बोरींग.
आता हे पट्या पट्या आणि मिस अनामिका मिस अनामिका बंद करायला पाहिजे

खुप वर्शापुर्वि एक सिरियल यायची हिन्दि मध्ये... सचिन पिळगावकरची होति बहुतेक... त्यात स्वजो शिल्प तुळसकरचा मुलगा होता.

सचिन ऑफिसात असिस्टंट म्यानेजर लागलाय म्हणून काल वल्लीने मैत्रिणींना घरी बोलावले होते पार्टी करण्यासाठी आणि सर्व मात्र जूस आणि कागदाच्या प्लेट मध्ये कचोरी आणि वेफर दिले होते । भावजींना मात्र आमंत्रण न्हवते पार्टी संपल्यावर या असे काहीसे म्हणून मावशीने तिच्या घरी बटाटे वडे बनविले होते । आणि ते खायला पटी आणि पट्या जमलेले। सचिन ला खूपच हाडतूड करते वल्ली मैत्रिणींसमोर टेबल पुसायला लावते आणि पगार किती तर ७० हजार। काहींच्या काही।

पट्याचं पाकीट जादूचं आहे असं मला वाटतं, त्यातून सतत पैसे बाहेर पडत असतात. वल्ली मागते तितके नाही त्यापेक्षा जास्त पैसे नेहमी पटयाच्या पाकिटात असतात फक्त त्यादिवशी हॉटेलात बिल भरायला पैसे नव्हते. म्हणूनच पट्या अजून अविवाहित आहे. जिथे पाहिजे तिथे पैसे नसतात. दोघे भाऊ कुचकामी आहेत. अनामिका गोड वाटावी म्हणून सतत विनाकारण हसत असते. मावशीने एकावेळी किती बटाटेवडे तळून ठेवले होते. त्याबरोबर चटणी, सॉस वगैरे काहीच नव्हते.

ट्याचं पाकीट जादूचं आहे असं मला वाटतं, त्यातून सतत पैसे बाहेर पडत असतात. >>> हो ना. नक्की पगार किती आहे त्याचा Uhoh

हो ना. नक्की पगार किती आहे त्याचा Uhoh

Submitted by मी नताशा on 29 April, 2022 - 02:00 वल्लीच्याच गरजा भागवता याव्यात इतका . हा SS हा SSS हा SSSS हा SSSS

मिरच्या होत्या तळलेल्या . >>> फक्त मिरच्याच होत्या, लसणीचं तिखट म्हणजे लसूण चटणी तरी हवी होती. मी त्यादिवशी फक्त तोच सीन बघितला, पट्याला दिलेच नाहीत. सचिन, पटीपण हातात घेऊन होते. मी असते तर चटणी मागून खात बसले असते वडे (नसती तरी तसेच मिरचीबरोबर खाल्ले असते, नुसते खाल्ले असते, वडे समोर असताना खात का नाहीत ही लोकं ), प्रश्न नंतर विचारा, खाते आधी.

बरेच दिवस ही सिरीयल बघितली नाहीये.

अंजू Biggrin शूट झाल्यावर खाल्ले असतील त्यांनी. पट्याचं पोट काही उगीच नाही सुटलंय. पट्या तर घरच्या जबाबदारीमुळे अविवाहित आहे ना, मग हे लोक सारखे तिच्या आठवणीत झुरतो, तिच्यासाठी लग्न नाही केले असे का बोलतात.
आज अनामिका गेल्यावर चंदू आणि मावशीमध्ये काय बोलणे झाले. चंदू म्हणाला थोडं खोटं चालतं ई. अनामिकाबद्दल बोलत होते का ते. वल्ली जवळजवळ रोजच बाहेरून मागवते. वाढदिवस आहे पट्याचा. अनामिका त्याची खोली सजवणार आहे आणि वल्ली सगळं रागाने काढून टाकणार आहे. लहान मुलांच्या वाढदिवसाला करतात तशी सजावट केली आहे. या रविवारी एक तास असेल.

अजूनही मला स्वत:वर हसू येत पण मी हा पोरखेळपणा केला आहे. बहुधा सप्टेंबर् 2019 मधला प्रसंग आहे, तेजाज्ञा (तेजस्विनी पंडित व अभिज्ञा भावे (वल्ली) ह्यांचा प्रख्यात ब्रॅंड) चे वांद्रयाला प्रदर्शन होते. प्रदर्शनात अभिज्ञाशी भेट झाली. त्याच्या काही दिवसांपूर्वीच 'तुला पाहते रे' संपली होती, ज्यात तिने मायराची नकारार्थी भूमिका केली होती, त्याआधीच्या 'खुलता खळी खुलेना' मध्येही ती अश्याच भूमिकेत होती. त्यामुळे मी तिला नकळतपणे बोलून गेलो की तुम्ही सारख्या नकारार्थी पात्र का साकारता? पुढच्या वेळी तुम्हाला सकारात्मक भूमिकेत बघायला आवडेल. माझ्या प्रश्नावर आजूबाजूचेही अवाक झाले आणि अभिज्ञाही वैतागल्या सारखी वाटत होती. पण तिने प्रसंगावधान राखून उत्तर दिले की 'अहो, मला सगळे नकारार्थी पात्रासाठीच विचारतात, पण तुमच्या सूचनेचा जरूर विचार करेल.' (मलाच कुठे तोंड लपवू असे झाले होत, उगीचच शहाणपणा करून अभिज्ञाला विचारल असे वाटत होत. पण पुढे माझी अत्यंत आवडती हर्षदा खानविलकरशी भेट झाली. ती खूप आपुलकीने बोलली. मला जरा हायस वाटल आणि स्वत:वरचा राग निवळून गेला)

तुम्ही काही चुकीचे विचारलं नाहीत, योग्य प्रश्न विचारलात.

ती तीन का चार मैत्रिणींची एक सिरियल होती त्यात फक्त positive होती. छान केलेला तो रोल. उगाच सारखं निगेटीव्ह देतात, यावेळी तर पार डोक्यात जातेय ती.

भाऊ सेटल झालाय मग पटया लग्न का करत नाही? आता त्याला अनामिकाला मागणी घालण्याचा चान्गला चान्स आहे.

काल तो माउथ ऑर्गनवर 'आनन्द' सिनेमाच गाण वाजवत होता ( जिन्दगी कैसी यह पहेली हाय). पटयाला काही आजार-बिजार तर नाही ना दुनियादारीसारखा, म्हणून तो लग्न करण्याच टा़ळत असतो?

अनामिका आणि सौरभ लग्न करणार आहेत असे पुभामध्ये दाखवले. एकतर ते वल्लीचे किंवा मावशीचे स्वप्न असेल, नाहीतर इतक्या लवकर लग्न लागले तर पुढे काय दाखवणार. जोग आणि जोशी आजीची भेट झाली आहे. नंबरही घेतलेत एकमेकींचे. आता फक्त त्या एकमेकींच्या विहीणबाई (एक मावशी आणि एक सासू असली तरी दोघी आई सारख्याच आहेत पट्या आणि पटीला) होणार आहेत हे त्यांना कळायचे बाकी आहे. निल छान काम करतो. सचिन नेहमी झाडू कटका करत असतो. पट्याचा वाढदिवसाचा केक ईतका चॉकलेटने ओथंबलेला होता की माझी अप्पासारखी अवस्था झाली Proud तोंडाला पाणी.

इथले वाचून मी बघायला सुरु केले आहे. वल्ली ट्रॅक फार ऑव्हर अ‍ॅक्टिन्ग आहे . तो म्हातारा फार फेमस आहे खडूस पणा साठी.

पण खर्‍या पुणेरी माण्साला कळायला पाहिजे की वल्ली ड्रामा करते आहे. पन हा स्पेशली साध्या स्वभावाचा दिसतो. काही खास पुणेरी पॉइन्ट्स
बरुब्बर घेतले आहेत म्हणोन स्वप्निलचे क्यारेक्टर आपलेसे वाटते. आपणही असेच होतो असे फीलिन्ग अनेकदा येते.

त्या पट्याला किती त्रास देतात सगळे. निल पट्यासारखा दिसतो Biggrin आता पट्या परत अनामिकाकडे जाणार. पुढच्या भागात अनामिकेने माप चुकून ओलांडण्याचा फिल्मी प्रसंग आहे.

वल्ली अद्वातद्वा बोलणार आहे पुढच्या भागात, पटीने एक मुस्कटात द्यायला हवी होती. डोळ्यातून पाणी कसली काढते, चुकून माप ओलांडले जाणे, सो टिपिकल इन सिरीयल.

त्या पट्याचा बड्डे सचिनपण नाही करत, साध्या शुभेच्छाही देत नाही का.

त्या पट्याचा बड्डे सचिनपण नाही करत, >>>>>>>> करतो ना. ते बर्थडेच डेकोरेशन त्यानेच केलेल असत. वल्ली ते डेकोरेशन रागाने काढते.

सचिन पट्याला शुभेच्छा देत नाही. वेडाच आहे, एक चॉकलेट देतो फक्त. वल्ली पट्याचा एवढा राग का करते. चांगली सजवलेली खोली, पट्याने खूष होऊन भविष्यात आणखी खिसा मोकळा केला असता.

सदाशिव पेठेचा उल्लेख केला आज. वल्ली पेठेत राहते म्हणून ती अशी आणि अनामिका कोथरूडला म्हणून सुसंस्कृत असे तर नाही ना दाखवायचे. मावशी आणि पट्याही पेठेतच राहतात. स्वतःच्या डागडुजी न केलेल्या वाड्यात राहतात का अजूनही लोक. माझ्या माहितीत रास्ता पेठेत आता वाडे पाडून ज्या बिल्डिंग बांधल्या होत्या त्या तीस - चाळीस वर्ष जुन्या झाल्यावर आता रेडेव्हलोपमेंट चालू आहे.

गर्ल्स मुव्ही नाईट! आणि पिक्चर कुठला बघितला, नटसम्राट! अशी ही बनवाबनवी तरी बघायचा ना? राधाला कसा काय आवडला हा रडका चॉईस?

ते बर्थडेच डेकोरेशन त्यानेच केलेल असत. वल्ली ते डेकोरेशन रागाने काढते. >>> हो का. मी फक्त शेवटी पाच सात मिनिटं बघितलं.

Pages