Submitted by Ajnabi on 22 March, 2022 - 04:07

राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट 'तू तेव्हा तशी', स्वप्नील जोशीची आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका
झी मराठीवर रात्री ८ वाजता
कलाकार : स्वप्नील जोशी
शिल्पा तुळसकर
अभिज्ञा भावे
सुनील गोडबोले
सुहास जोशी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
<<<फारतर काहीतरी फुटकळ
<<<फारतर काहीतरी फुटकळ लाडंलाडं बोलत वाद घालते. >>> अगदी अगदी. मिसानामिका नवऱ्याचा उल्लेख राक्षस, विकृत असा करते पण तिच्या overall expressions मधून तसं दिसून येत नाही. पण आता त्याची entry होणारच असं दिसतंय. कावेरीआईने लग्नातले वरवधूचे पोशाख चक्क धुवायला दिले आहेत. वराचं ठाऊक नाही पण वधू मावेल का त्यात?
आणि स्वतःच्या आईला कुणीही आई म्हणेल, नाव का लावेल आईमागे? आमच्याकडे सासूबाईंनापण आईच म्हणतात, फक्त अहो आई. लग्न झालं आणि सासू खूप प्रेमळ असली तरी आईला असं कावेरी आई कोण म्हणणार? कदाचित मिसानामिकाला लहानपणीच दृष्टांत झाला असेल आणि तिने स्वतःच्या आईला कावेरी आई म्हणायला सुरुवात केली असेल.
कावेरी आई आल्यामुळे इथे लोक
कावेरी आई आल्यामुळे इथे लोक हि सिरीयल बघेनाशी झाले वाटते। खूपच बेकार करून टाकली .
हो ना राधा पण माझी मम्मा माझी
हो ना राधा पण माझी मम्मा माझी मम्मा. लैच बोअर सर्व बायकी वैताग आहे.
कावेरीआई चान्गली गावाला परत
कावेरीआई चान्गली गावाला परत जात होती, सुण्ठीवाचून खोकला जात होता तर अनामिका तिला थाम्बवून स्वतःच्या पायावर धोण्डा पाडून घेते. येडी आहे का ही? आता हि बाई तिला साध ऑफिसलाही जाऊ देत नाही, आता भोग म्हणाव स्वतःच्या कर्माची फळे!
सुहास बाई सुट्टीवर आहेत
सुहास बाई सुट्टीवर आहेत बहुतेक म्हणून कावेरी आईचा मुक्काम वाढवला असेल. पट्याचे काय वेशांतर होते, अर्धा अधिक चेहरा दिसत होता. शिडी अशी घराच्या बाहेर ठेवतात तर चोर यांचे आभार मानेल. राधाशी बोलायला गेले होते की तिला मागणी घालायला, सहकुटुंब सहपरिवार.
पट्या आवडला राधाला समजवताना.
पट्या आवडला राधाला समजवताना.
त्या राधाच्या हातात हितेनने त्याच्या लग्नाची पत्रिकाच ठेवावी आता.
कावेरी अति कजाग, बोअर बाई आहे.
निलला तिथल्या तिथे व्हिडीओ
निलला तिथल्या तिथे व्हिडीओ शूट करायला काय झालेलं. कावेरी अशी पाय पसरून बसलेली, मला लहानपणीच्या एका खेळाची आठवण आली ज्यात असे अडथळे (एका पायावर दुसरा पाय, मग दोन्ही पायांवर एक हात वगैरे) पार करावे लागायचे.
कावेरी जसं वागतेय त्यावरून ती
कावेरी जसं वागतेय त्यावरून ती अनामिकाची सख्खी आई नसावीच असं वाटायला लागलंय. असं कोण वागतं सख्ख्या मुलीशी? नात आणि स्वतःची मुलगी यात फूट पाडण्याची हौस का आहे ते ही समजत नाहीये. मालिका दळणं टाकायला लागल्ये.
ती नात पण स्वार्थी, माणसे
ती नात पण स्वार्थी, माणसे ओळखता येतात का तिला. हितेन पप्पा आणि हितेन यांचे बोलणे ऐकलं नाहीच तिने, नको तिथे मठ्ठ कुठली.
दुष्ट वृत्तीची लोकं स्मार्ट
दुष्ट वृत्तीची लोकं स्मार्ट आणि सज्जन लोकं मठ्ठ असा झी मराठी वाल्यांचा समज आहे.
नील ला व्हिडीओ काढायला सुचत नाही, राधा ला हितेन चा मूर्खपणा दिसूनही दुर्लक्ष, एवढं ओपनली बोलतात हितेन आणि बाबा दार उघडे ठेवून तरी ऐकायला निदान कानोसा घेऊन मग घरात शिरायला काय झालंय, बावळट कुठली.
आणि अनामिका चा बिनधास्त स्वभाव आई पुढे कुठे गायब झालाय कोण जाणे. 40-45 च्या बाईला काम धाम सोडून असे कोण घरी बसवेल का ? नोकरी नाही केली तर खाणार काय..
काहीही दाखवतात..
दुष्ट वृत्तीची लोकं स्मार्ट
दुष्ट वृत्तीची लोकं स्मार्ट आणि सज्जन लोकं मठ्ठ असा झी मराठी वाल्यांचा समज आहे. >>> अगदी. तिकडे नेहाच पण तेच चाललंय
झी च्या लोकांनी चक्क एका
झी च्या लोकांनी चक्क एका एपिसोड मधेच हितेन आणि त्याच्या बाबांचा परदा फाश केला.. इतकं सुपरफास्ट कसं काय बुवा ?
नील चोरुन ऐकतो हितेन आणि पप्पा चं बोलणं आणि राधा ला सावध करतो... आणि चक्क त्याचा प्लॅन वर्क पण होतो... अच्छे दिन ...
रमा आजी सुट्टी वर गेली आहे का कंटाळुन सोडुन गेली सिरीअल ?
त्या कावेरी ला घालवा आता... बोअर झालं...
सर्व कॅरेक्टर डोईजड करून
सर्व कॅरेक्टर डोईजड करून ठेवतात व प्रेक्षकांचा अंत पाहतात।
एका पूर्ण वाढ झालेल्या चाळीशी
एका पूर्ण वाढ झालेल्या चाळीशी पार केलेल्या बाईला तेही एका मुलीच्या आईला असे आडमुठेपणा करून घरी बसायला लावणे (यांच्याकडे काय टाकसाळ आहे ) म्हणजे कहरच।
आज राधाला बघायला आलेला मुलगा
आज राधाला बघायला आलेला मुलगा रब ने बनादी मधल्या शारुखसारखा दिसत होता. कोणी बघायला येणारे तर आधी राधा आणि पटीला सांगून तरी ठेवायचं. कावेरीच्या गावातल्या मुलीतरी अशा दावणील्या बांधलेल्या गाईसारख्या कोणाशीही लग्न करतील का. राधालाही फार जांभया येत होत्या. आकाशने मराठीत चार ओळी खरडून तो तरी प्रश्न मिटवला. सुहास बाईंना मिळाली असेल चांगली भूमिका किंवा गेल्या असतील अमेरिकेला मुलाकडे, आकाशला भेटायला
सुहास बाईंचा वाढदिवस आहे आज
सुहास बाईंचा वाढदिवस आहे आज
So सेलिब्रेशन करत असतील कुटुंबाबरोबर
https://www.facebook.com/groups/114162481989720/permalink/7648751275197432/
अधून मधून घरात चालू असेल तर
अधून मधून घरात चालू असेल तर बघते ही सिरीअल.
काल फार सुंदर समजावले मिस अनामिकाने कावेरीबाईंना. अतिशय शांत आवाजात त्यांच्या चुका सांगितल्या. अर्थात याचा फार परिणाम होईल असे वाटत नाही. अलिकडच्या सिरीअलमधून मॅच्युअर संवादांची अपेक्षा उरली नाहीये त्यामुळे आवडला प्रसंग.
वल्लीचे वडील घरातून निघून
वल्लीचे वडील घरातून निघून जातात आणि पटया त्यांना शोधून परत आणतो तोही प्रसंग मला आवडला होता.
वल्ली नाही म्हणून वल्लीचे
वल्ली नाही म्हणून वल्लीचे अप्पा किती ते समजूतदारपणे वागत आहे , शोभत नाही त्यांना......... हा हा हा
dकाल एका सीनमध्ये इतका
dकाल एका सीनमध्ये इतका मूर्खपणा दाखवला मावशीला पुपो बनवायच्या होत्या तर तिचा मिक्सर बिघडला होता मग वल्ली म्हणते माझा मिक्सर आणते व तिच्या किचन मध्ये जाऊन ती स्वतःचा मिक्सर आणायला जाते आणि मुद्दाम स्टीलच्या वाटणाच्या भांड्याला तोडते। मिक्सर घेऊन मावशीकडे जाते आणि मुद्दाम चालवून दाखवते व म्हणते कि हा चालत नाही बिघडला आता पुरण कसे वाटायचे तर या त्यामुळे त्या मावशीला ओरड खावा लागतो कि पुपो वेळेत पोचवल्या नाहीत पण मिक्सरच भांड बुडवलं असते नाकि मिक्सर बिघडला असतो तर मावशीचा मिक्सर बिघडला असतो नाकी भांड मग यात गडबड होण्यासारखे काय होते अदलाबदल करून काम झाले असते पण तेवढे लेखकाचे डोके नाही चालले बिचाऱ्या मावशीला नाहक ओरड खावे लागले आणि वल्ली जर शिकलेली असती नोकरी करत असती आणि पैसे कमवत असती तर तिने मिक्सर तुरंत बनवून घेतला असता।
माईमावशी बर्या वाटत होत्या
माईमावशी बर्या वाटत होत्या मागच्या आठवडयापर्यन्त, पण त्यान्नीही अनामिकाला ' तुम्ही नोकरी करणार्या मुली, तुम्हाला घरची कामे कधीच जमणार नाही/ तुम्ही कशाला घरची काम करणार म्हणा, मला बाहेरचा मदतनीस नको वगैरे वगैरे सुनावल्यापासून त्या मनातून पार उतरुन गेल्या. सौरभसुद्दा बदललाय. एक बर, त्या कावेरीकाकूला दाखवत नाही ते. डोक्याचा ताप थोडा function at() { [native code] } तरी कमी झालाय. राधा आता शहाण्यासारखी वागू लागलीये. तीची आणि नीलची लव स्टोरी हळूहळू आकार घेतेय.
मिसानामीका पटवर्धनांची होणारी
मिसानामीका पटवर्धनांची होणारी मोलकरीण कम स्वयंपाकीण जास्त आणि होणारी सून कमी वाटतेय
सुलू_८२ >>> अगदी अगदी!
सुलू_८२ >>> अगदी अगदी!
अजूनतरी ही मालिका बरसातच्या मार्गाने जात नाहीये. तसं झालं तर बघणं बंद करेन. आत्ताही अधूनमधून किंवा फॉर्वर्ड करत पाहते.
मिसनामिका चा जुन्या नवऱ्याची
मिसनामिका चा जुन्या नवऱ्याची एन्ट्री झाली आहे. त्याला मिसनामिकाच्या आईने बोलावून घेतले आहे आणि त्यानेही ते खूप मनावर घेऊन सिरीयल मध्ये व्हिलनगिरी करून छळायला सुरुवात केली आहे
गेले काही दिवस अतिशय गंभिरपणे
गेले काही दिवस अतिशय गंभिरपणे चालु असणार्या मालिकेत आज अचानक चिंग्स चायनिज मसाला ची जाहिरात आणि फ्राईड राइस ची रेसिपी दाखवली. मागे आनंदी म्युझिक आणि मग लगेच पुढच्याच सीन ला सिरीअस प्रसंग सुरु.. असे गरीब बिचारे दिग्दर्शन करताना बिचार्या दिग्दर्शकाला किती वेदना होत असतील ना... असो
तिचा पहीला नवरा आला आणि ही
तिचा पहीला नवरा आला आणि ही सिरीयल सोडली बघायची, तसंही रोज बघत नव्हतेच.
मागे उल्लेख होता, डीव्होर्स झालाय. आता झाला नाहीये. झाला नव्हता तर दुसरं लग्न का करत होती, कायद्याने ते चुकीचं होतं ना.
सगळ्या शिरेली डोक्याला ताप देतात. ती रेशिमगाठ संपत आलीय असं ऐकलं, शेवटचा भाग बघेन. तिथेही पहीला नवरा आल्यावर मी राम राम केला.
मी ही मालिका केव्हाच सोडली
मी ही मालिका केव्हाच सोडली पहायची - अनामिका पट्याच्या घरी जाऊन सर्वगुणसंपन्न वागायला लागली आणि माईमावशी सासूगिरी करायला लागल्या तेव्हाच. आता घरच्यांकडून अपडेट्स कळतात कधीतरी. तेव्हा असंच वाटतं की बरं झालं ही मालिका बघणं सोडलं. प्रचंड डीरेल झालं आहे सगळंच.
र्म्ड, नवा गडी नवे राज्य बघ
र्म्ड, नवा गडी नवे राज्य बघ दिग्दर्शक बराच बरा वाटतोय आणि पल्लवी पाटील पण
नवा गडी नवे राज्य बघ >>> ही
नवा गडी नवे राज्य बघ >>> ही मराठी हम पाँच आहे की काय?? वाचून तसंच वाटतंय.
नाही.. हम पांच सारखी नाहीये..
नाही.. हम पांच सारखी नाहीये...मी फेसबुक वर काही प्रोमो बघितले..बराच संयत अभिनय करतीये लीड pair...
...दिग्दर्शन पण छान वाटलं...
Pages