तू तेव्हा तशी

Submitted by Ajnabi on 22 March, 2022 - 04:07

राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट 'तू तेव्हा तशी', स्वप्नील जोशीची आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका
झी मराठीवर रात्री ८ वाजता
कलाकार : स्वप्नील जोशी
शिल्पा तुळसकर
अभिज्ञा भावे
सुनील गोडबोले
सुहास जोशी

Group content visibility: 
Use group defaults

लिव इन, पल्लू आणि पट्या सगळं बळच होतं. शिल्पा फारच वेड्यात काढते त्याला. काल गाडीतून उतरून कुठे लपून बसते आणि मग म्हणते गेली ती. ती म्हणजे कोण आणि कुठे गेली. मुळात एव्हडी जाडी बाई क्षणात गायब कशी होऊ शकते. सुहास जोशी सासू असते तिची. भावे आणि गोडसे अति अभिनय करतात. कंटाळा आला रडारड बघून. जोग बाई मावशी आहे का पट्याची. ती त्या वाड्यातच राहते का.

काल ५ च मिनिटे पाहिली... पट्या पट्या ऐकुन वैताग आला....
शिल्पा तुळसकर वेड्यासारखी काय हसते अशी ? किती तो अजुनही अल्लड असल्यासारखा अभिनय...
लिव्ह इन मधे रहायचे आहे म्हणणारी ती शिल्पा ची मुलगी आहे का ? ....
रच्याकने, ती संदीप खरे ची मुलगी रुमानी खरे आहे...ही तिची पहिली सिरीअल आहे...

शी काय ते सारखं पट्या पट्या, तेही ऑफिसमध्ये त्याच्या बॉस समोर,, कमाल आहे. Highly unprofessional आणि बालिश वाटली ती मला. एकाला बाहेर गाडी ठोकते आणि वर म्हणते पुन्हा कधीच ओळख दाखवू नकोस, आणि दुसर्याच्या मागे पहील्याच भेटीत चिपकू सारखी वागते. बालिश अगदी. पाच मिनिटे पाहीली फक्त. या मालिकेची पण बरसात होणार बहुतेक.

खरंतर आजकाल नव्याने सुरू होणा-या मराठी मालिकांमध्ये काहीच नावीन्य नाहीये.

मी बरच आधी कुठेतरी वाचल होत की,स्वप्नीलचा यात निगेटिव्ह रोल.आहे.
अर्थात मंदारबाबा(सिरियल मंदार देवस्थळीची आहे) मेन लीडला निगेटिव्ह दाखवणार नाही,पण सध्याचा जो प्रोमो पाहिला तर स्वप्नील कोणाच्यातरी थोबाडीत देतो.त्यावर तो अलका कुबल पूर्णवेळ नाही,हे नक्की.
बाकी, शिल्पा आवडते,पण यात जरा आर्टिफिशियल हसत आहे,पट्या तर अति होत आहे.
काहीही हं श्री नको व्हायला.

शिल्पा मला आवडते पण यात अतिशय कृत्रिम अभिनय, केसांचा विग हे बघवत नाही, पहिला भाग बघितला, ओढणी छान होती.

स्व जो महाबावळट वाटला. खरंतर अलीकडे त्याने चांगला अभिनय केलाय, व्हिलन म्हणून जिवलगामध्ये आणि मानसोपचारतज्ञ म्हणून एबीपी माझ्याच्या सिरीजमध्ये. यात पहिल्या भागात तरी नाही आवडला.

अभिज्ञाने आता जरा व्हीलनेतर भूमिका कराव्यात, ती दिसली की ही यात व्हिलन असेल असं वाटतंच.

आठवड्यातून एकदा बघितली तरी चालेल, असंही त्यावेळी सोनी हिंदीची बघतेय सध्या, त्यातही दळण असतं पण मेन जोडी भारी आहे.

शिल्पा कुठे विग लावते आणि स्वजो तर कधीपासून लावतोय. रुमानी खरेबद्दल मीही आजच वाचलं गुगल फीड मध्ये. लिव इन मध्ये राहणारे ईतके बालिश असतात का की त्यांना जबाबदारी कसली हेही कळत नाही. नऊ हजाराची भेट ती देते आणि हा बावळट ते पाकीट वल्लीकडे देतो आणि ती लग्नात. लग्नात parfum देतात का भेट म्हणून. दोघेही रिकामेच असतात का, ये भेटायला म्हटलं की येतात. तो काहीतरी गिफ्ट वरून काहिबाही बोलतो आणि चालायलाच लागतो सरळ, विक्षिप्त आहे का तो. कर्वे रोडचा जोक आधी वाचलेला/ ऐकलेला आहे.

नेहेमी नाही लावत, यावेळी विग लावलेला वाटला शिल्पाने, म्हणजे मला वाटलं तसं.

लग्न कोणाचं होतं, दुसऱ्या भागात दाखवले का.

पट्ट्याचा प्रॉब्लेम काय आहे नक्की? स्पिल्ट पर्सनेलिटी असते की काय त्याला?

आजचा दुसरा भाग थोडा तरी सहणेबल वाटला. शिल्पा तुळसकर बालिश दाखवलीये मान्य पण का कोण जाणे आज तिचा बिनधास्तपणा आवडला. हेमावैम. नाहीतर इतर सिरियलच्या नायिका सगळया जगाचा भार आपल्यावरच आहे अस वागतात. इथे हा भार पट्टयाने घेतलाय.

पण तिच बॉससमोरच वागण पटल नाही.

ते ' यमुना जळी खेळ खेळूया' भारी होत.

लिव इन मध्ये राहणारे ईतके बालिश असतात का की त्यांना जबाबदारी कसली हेही कळत नाही. >>>>>>> अगदी अगदी. ती मुलगी तर मला खूपच लहान वाटली.

असंही त्यावेळी सोनी हिंदीची बघतेय सध्या, त्यातही दळण असतं पण मेन जोडी भारी आहे. >>>>>>> बडे अच्छे लगते है २ का?

स्वजो जर यात निगेटिव्ह/ ग्रे रोल मध्ये असेल तर बघायला आवडेल.

एकाला बाहेर गाडी ठोकते आणि वर म्हणते पुन्हा कधीच ओळख दाखवू नकोस, आणि दुसर्याच्या मागे पहील्याच भेटीत चिपकू सारखी वागते. >>> अगदीच गळेपडू वाटतिये ती

स्वजोचा एक सिनेमा आला होता. नीना कुलकर्णी आई होती त्त्याची. नाव बहुतेक मोगरा फुलला. त्याच कॅरेक्टरच एक्ष्टेंशन वाटतय त्याच ह्या मालिकेत

शिल्पाने नवऱ्याला दोन महिन्यातच सोडले असे ती त्या लिव्ह इन मध्ये राहण्यास उत्सुक असलेल्या गुज्जू मुलाच्या बापाला सांगते।

स्वजोचा एक सिनेमा आला होता. नीना कुलकर्णी आई होती त्त्याची. नाव बहुतेक मोगरा फुलला. त्याच कॅरेक्टरच एक्ष्टेंशन वाटतय त्याच ह्या मालिकेत >>>>>>. अगदी अगदी

ती ' मन झाल बाजिन्द' नावाची सिरियल कोणी बघत का? नवीन प्रोमो बघितला त्या सिरियलचा. त्या सिरियलमध्ये हिरवीणीचा कितीवेळा अपघात होतो? आतापर्यन्त दोन अपघात झालेत तिचे. आताचा हा तिसरा.

<<<ती ' मन झाल बाजिन्द' नावाची सिरियल कोणी बघत का? नवीन प्रोमो बघितला त्या सिरियलचा. त्या सिरियलमध्ये हिरवीणीचा कितीवेळा अपघात होतो? आतापर्यन्त दोन अपघात झालेत तिचे. आताचा हा तिसरा.>>>>
ही ही ही..
याचा पुढचा सिझन असेल- शरीर झालं मोडकंतोडकं...

बाजींद मध्ये तर एकदा कपाळाच्या डाव्या बाजूला लागलेले असताना उजव्या बाजूला पट्टी लावली होती, म्हणजे एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे पट्टी Proud
काल स्वजो तो मैत्रीपट्टा लावतो तेव्हा त्याच्या दोन बोटांवर अंगठीच्या खुणा होत्या. म्हणजे त्याने त्या दोन बोटातल्या अंगठ्या काढून ठेवल्या असणार. त्यातली एक हिरवी असणार पाचूची जी सगळे कलाकार घालतात. कशाला एवढं करायचं. प्रेक्षकांना सवय झालीये गरीब घरातल्या श्रीमंत राहणीमानाची. चिमणेची बायको छान काम करते.

अनामिकेला हे माहीतच नाही की तो अविवाहित आहे तरी काय खास माणसाने साडी निवडलीये Uhoh त्याचं लग्न झालंय असं तिला वाटतंय तरी ती एव्हडी काय त्याच्या गळ्यात पडतीये. ती भूतकाळात जगते आणि हा लाईन मारायचा आणि खूप मुलं मरायची तिच्यावर यातून बाहेर यायलाच तयार नाही. लग्न झालेल्या माणसाबरोबर ही रोज चहा प्यायला जाणार का. वल्लीचे आणि तिच्या वडिलांचे सगळेच वागणे विचित्र आहे नाहीतर एवढ्या मोठया दुकानात साडी घ्यायला गेलेच नसते.

रविवारी बघितल्यानंतर एकदम शुक्रवार एपिसोड बघितला.

वल्ली कसली आहे, स्व जो च्या पैशावर जगतात आणि डबाही देत नाही. स्व जो तीने काही केलं तरी कौतुकाने का हसतो . सरळ तिच्या पुढ्यातले खाणे घेऊन खायचे आणि तिला रिकामा डबा द्यायचा. कसला बावळट आहे.

ओढण्या मस्त दिल्यात अनामिकाला.

आज घरात ही मालिका लावलेली असताना थोडीशी पहिली.
तो 'नील' ची भूमिका करणारा कोण आहे ??? (अनामिकाचा असिस्टंट)
मला तर त्या दाढी पिकलेल्या स्वप्नील जोशीपेक्षा तो नीलच मालिकेचा हिरो आहे की काय असे वाटते!!!

स्वजोचा भाऊपण छान आहे दिसायला. >>> हो, इम्प्रेसिव्ह आहे तो स्वाभिमान मधे इन्स्पेक्टर होता, त्या आधी कलर्सवर होता ऐतिहासिक मालिकेत. मग वैदेहीत गेला, ती सिरीयल पड्ली बहुतेक.

स्वजो वल्लीच्या खांद्यावर किंवा पाठीवर हात ठेवताना दाखवलंय ते जरा विचित्र वाटलं. >>> अगदी अगदी. हे काल लिहायचं मनात होतं.

अभिद्या प्रचन्ड बोअर वाटते आहे, स्वजोचा भाउ छान वाटतो, स्वजो थेट मोगरा फुलला मधुन कॉपी पेस्ट कन्टिन्यु आहे फक्त मोगर्‍यात जरा टवटवित तरी होता इथे वाळका,बोअर,सुन्गध उडालेला मोगरा वाटतोय...

स्वजो ला स्प्लीट पर्सनॅलिटी डीसॉर्डर वगैरे असणार आहे का ? रीक्षावाल्याच्या कानाखाली बरी लगावली इतक्या शामळु माणसाने...
अनामिका ला बघताना मागे गाणे लागते तेव्हा खिशात हात घालायचं लॉजिक पण नाही कळलं...
अभिज्ञा म्हणजे वैताग आहे अगदीच.... आणि तिचे वडील डबल वैताग.... संदीप खरेची कन्या छान काम करते आहे ... सहज वावरते... आवडली...
नील चा नक्की काय रोल कळला नाही.. अधुन मधुन तुटक बघते त्यामुळे संदर्भ लागत नाहिये...
शिल्पा चा आवाज सर्दाळलेला येतो कायम पण तरी मला आवडते ती... तिची स्कीन कॉम्प्लेक्शन कसलं मस्त आहे...
परवा सोमी वर कुठे तरी वाचलं की म्हणे यात शिल्पा च्या ऐवजी मुक्ता बर्वे पाहिजे होती... बरे झाले देवा मुक्ता नाहीये ते असं झालं मला वाचुन...
टीनेज मुलिची, स्वतंत्र कर्तबगार आई या रोल ला शिल्पा च फिट वाटते आहे सध्यातरी मला... उलट स्वजो च्या ऐवजी दुसरा कोणी चालला असता...

Pages