तू तेव्हा तशी

Submitted by Ajnabi on 22 March, 2022 - 04:07

राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट 'तू तेव्हा तशी', स्वप्नील जोशीची आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका
झी मराठीवर रात्री ८ वाजता
कलाकार : स्वप्नील जोशी
शिल्पा तुळसकर
अभिज्ञा भावे
सुनील गोडबोले
सुहास जोशी

Group content visibility: 
Use group defaults

अनामिका म्हणते त्याप्रमाणे एक शक्यता अशी असू शकेल की, सौरभ ( स्वजो) कॉलेजमध्ये असताना हॅपी गो लकी टाईप, राऊडी मुलगा असेल, पण त्याच्या आई वडिलान्च्या मृत्यूनन्तर त्याच्यावर घराची जबाबदारी अचानक येऊन पडली असेल. सो, त्याचा मूळ स्वभाव मागे पडून भिडस्तपणा आला असेल त्याच्यात.

अनामिका ला बघताना मागे गाणे लागते तेव्हा खिशात हात घालायचं लॉजिक पण नाही कळलं... >>>>>>>>>> मूळ स्वभाव अधून मधून डोक वर काढतो त्याच हे लक्षण असेल.

टीनेज मुलिची, स्वतंत्र कर्तबगार आई या रोल ला शिल्पा च फिट वाटते आहे सध्यातरी मला.. >>>>>>>>>>> अगदी अगदी

रविवारी चुकून लागली सिरीयल आणि पाहण्याचा योग्य आला. बालिश चुका खूपच आहेत. पण इंटरटाईन म्हणून लॉजिक नसलेली सिरीयल म्हणून पाहायला ठीक आहे. कधीतरी काहीच पाहावंसं वाटलं नाही तर हि पाहता येईल म्हणून एक option. आता ते लावालावी असलेल्या सिरीयल पाहणे खूपच बोअरिंग वाटत. त्यापेक्षा थोडी वेगळी रोमँटिक स्टोरी म्हणून बघू कुठपर्यंत नेतील....

कालपासुन सुजाता मस्तानी ची जाहिरात चालु आहे.... सारखं सारखं मस्तानी मस्तानी ऐकुन ऐकुन शेवटी आज मागवुन खाल्ली तेव्हा जीव शांत झाला Wink
सुजाता वाल्यांनी पैसे दिले असतील का फुकट जाहिरात कोण जाणे...

तो 'नील' ची भूमिका करणारा कोण आहे ??? (अनामिकाचा असिस्टंट)
मला तर त्या दाढी पिकलेल्या स्वप्नील जोशीपेक्षा तो नीलच मालिकेचा हिरो आहे की काय असे वाटते!!! >>>>>>
कालच्या एपी मध्ये नीलचा अनामिकेच्या घरातला वावर बघता अशी एक गट फीलिंग येतेय कि पुढे मागे तिची मुलगी लिव्ह इन मध्ये फसणार आणि निल तिला खांदा देणार किंवा तिचे नीलवरच प्रेम बसेल।

बाकी शिल्पा आता रोलमध्ये सेटल झाल्या सारखी वाटते कारण पहिल्याच भागात आपण काहीतरी करतोय सिरीयल मध्ये लीड आहोत मग किती ऍक्टिंग करू नि किती नको असे झाले होते आता जरा थंड झाली .

काहिही असो, अनामिकाचा वावर फार रिफ्रेशिंग आहे,. अजुन पहिलाच एपि. पाहिला होता.
बर्याच दिवसांनी हलकी फुलकी मालिका बघतोय अस वाटल.
बाकी, कलर्सवर त्या आपसातली भांडणे अन कुटील कारस्थानांच्या मालिका बघुन कंटाळा आला होता.. आता परत झी मराठीकडे वळलेय.

कुटील कारस्थान आहे की पुष्पावल्लीच्या रूपाने. आता ती मोठया दिराचे एक लाख पाण्यात घालणार. पहिल्या भागात ती थकून घरी येते तर मला वाटले ती नोकरी करते. सगळे रिकामटेकडे मिळून मावशीबरोबर खानावळ चालवू शकतात. पट्यापेक्षा जास्त कमवतील पण मग मालिकेत मसाला कुठून भरणार. सुजाताने पैसे दिले असतील जाहिरात करण्याचे. फुकट असते तर साडीच्या दुकानाचे नावपण दाखवले असते. लिव इन मध्ये राहणारे वेगळे घर घेऊन राहतात असे मला वाटायचे. इथे मुलगी आईच्याच घरी राहणार बीफला घेऊन आणि तो त्याच्या वडिलांचे दुकान चालवून हिला घरखर्च देणार :कपाळावर हात मारणारी बाहुली: पट्या आणि पटीने सरळ वेगळे राहावे ह्या बिनडोक आणि बांडगुळ लोकांबरोबर राहण्यापेक्षा.

अनामिका म्हणते त्याप्रमाणे एक शक्यता अशी असू शकेल की, सौरभ ( स्वजो) कॉलेजमध्ये असताना हॅपी गो लकी टाईप, राऊडी मुलगा असेल, पण त्याच्या आई वडिलान्च्या मृत्यूनन्तर त्याच्यावर घराची जबाबदारी अचानक येऊन पडली असेल. सो, त्याचा मूळ स्वभाव मागे पडून भिडस्तपणा आला असेल त्याच्यात. >>>> सिरीयलचं नाव " तू तेव्हा तसा " हवय खरतर

पट्या आणि पटीने सरळ वेगळे राहावे ह्या बिनडोक आणि बांडगुळ लोकांबरोबर राहण्यापेक्षा. >>> हाहाहा, सहीच.

इथे मुलगी आईच्याच घरी राहणार बीफला घेऊन >>> ओहह बी एफ का, माझ्या डोक्यात आधी प्रकाश पडेनाच.

बीफ लिहिलंय का मी, सुधारण्याची वेळ निघून गेली आता. बी एफ म्हणायचं होतं मला. धन्यवाद अंजू. आज मस्तानीचा नारा आणि मारा होता नुसता. चिमणे स्वतः का येतो चहा द्यायला. वल्लीचे वडील दिसले नाहीत दोन दिवस झाले.

चंपा, पटी नाव तुम्ही दिलं ते भारी वाटलं.

मी शुक्रवार नंतर बघितलीच नाहीये सिरीयल. त्यामुळे थँक यु इथल्या सर्वांना, न बघता अंदाज आला.

वल्लीचे वडील दिसले नाहीत दोन दिवस झाले. >>> छानच की, कसले कर्कश्श आहेत ते.

अनामिकाचा वावर फार रिफ्रेशिंग आहे >>>>>>> अगदी अगदी. इथे शिल्पा तुळसकर कृत्रिम वाटत नाही. तुपारेमध्ये बरीच कृत्रिम वाटत होती.

सिरीयलचं नाव " तू तेव्हा तसा " हवय खरतर >>>>>> मला पण असच वाटत

जनरली मन्दार देवस्थळीच्या सिरियल्स सुरुवातीला छान असतात. २०-२५ भागानन्तर मात्र भरकटत जातात. उत्तम उदाहरण 'होमिसुयाघ' , श्री जान्हवीच्या लग्नानन्तर काही दिवसान्नी कण्टाळवाणी झाली होती.

आजचा भाग अधूनमधून बघितला. ते सौरभच मस्तानी सिक्रेट काय आहे?

अनामिकेची मुलगी सौरभच्या ऑफिसात काय करत होती? इण्टरव्ह्युला आली होती का तिथे?

अभिज्ञाच्या ओठाला कसलतरी इन्फेक्शन झालय. क्लोजअपमध्ये दिसत होत.

अनामिकेने तिच्या मुलीला पट्याला भेटायला सांगितले जॉबसाठी जेव्हा की तीथे तशी काहीच संधी उपलब्ध नाही. नंतर अनामिका तिला स्वतःची मदतनीस म्हणून कामाला लावते. एकंदरीत पट्याचे ऑफिस आओ जाओ घर तुम्हारा आहे. पटीची मुलगी महाआगाऊ आहे. तिला कधी कष्टाची सवय होईल असे वाटत नाही.

वल्लीचे वडील दिसले नाहीत दोन दिवस झाले. >>> छानच की, कसले कर्कश्श आहेत ते.

'सुनील गोडबोले' नाव त्यांचे. इथे काहीसे विक्षिप्त वाटत असले तरी सुमित कॅॅसेटच्या अनेक धार्मिक VCD मध्ये छान भूमिका आहे त्यांची. उदा. मुंगी उडाली आकाशी इ.

सुनिल गोडबोले यांच्या इथल्या भुमिकेबद्दलच लिहिलं आहे, बाकी त्यांच्याबद्दल काही आकस नाही. मागे त्यांनी झी अवॉर्ड फंक्शनमधे छान डान्सही केलेला.

मगाशी एपिसोड बघितला, शुक्रवारनंतर आज.

मावशी मस्त सुनावते वल्लीला. वल्ली कसली लोभी आहे, जाम बोअर करते ती. मला खरंतर अभिज्ञा आवडायची पुर्वी खूप, आता सेम सेम भुमिका करते, फक्त व्हिलन.

वल्लीच्या खालच्या ओठाला फोड आला आहे. पट्यावर बस स्टॉपवरची बाई लाईन मारते. का ही ही. ऑफिसात लाईन मारणारी जनता वेगळी. चिमणेपेक्षा बरा दिसतो एवढच. पट्याचा बॉस योगेश सोमण यांच्यासारखा दिसतो पण उंची कमी आहे त्यांच्यापेक्षा. कुठली जाहिरात वाचून एक लाख मागतेय हेही विचारत नाहीत दोघे भाऊ. पट्या तर मध्येच वेगळ्या जगात हरवून जातो असे वाटते. मध्येच ब्लँक होतो. कालपासून प्रिंटआऊट का काढताहेत. पेपर वाया का घालवतात. अनामिका रोज का जाते तिथे. एकदा तिला काम दिलं की तिच्या माणसांनी जाऊन करायचं काय ते. ती तर मुलीला घेऊन जाते, बेबी सीटिंग असल्यासारखं. पट्या बसस्टॉपवर उभा असताना पटीचा फोन का उचलत नाही.

आसावरी (बबडयाची आई) किव्वा अरुने अनामिकाकडून शिकवणी लावायला हवी. कसली स्ट्रि़कट आहे ती तिच्या मुलीच्याबाबतीत.

मावशी मस्त सुनावते वल्लीला. >>>>>>>> उज्वला जोग ह्यान्ची हि भुमिका त्यान्च्या 'कन्यादान' सिरियलमधल्या लालीमावशीच एक्स्टेन्शन आहे. तिकडेही नायिकेच्या सासूला मस्त टोमणे मारते.

ती तर मुलीला घेऊन जाते, बेबी सीटिंग असल्यासारखं. >>>>>> मदतनीस म्हणून घेतलय तिला हिने कामावर. कष्टाची सवय लागावी म्हणून. फायनली तिची आणि नीलची भेट झाली म्हणायच.

पट्या तर मध्येच वेगळ्या जगात हरवून जातो असे वाटते. मध्येच ब्लँक होतो. >>>>>>>> तेच तर. ह्याचा नक्की प्रॉब्लेम काय आहे?

तो नील तर चॅप्टरच निघाला. सौरभ- अनामिका झुरळाला हाकलतात त्याचा व्हिडिओ काढत होता.

राधाच्या बीएफचा तिच्या पगारावर डोळा आहे वाटत.

आजकाल सोशल मीडिया मुळे रियूनियन वगैरे किती सोपं झालंय. त्यातही दोघे पुण्यात रहात असूनही त्यांना एकमेकांची काहीच खबरबात नाही. म्हणजे प्रत्यक्ष नाही भेटले तरी हस्ते परहस्ते आजकाल कोणाचीही लाईफ तशी पर्सनल रहात नाही जसं यात दाखवलंय. एकवेळ तेही असेल पण मंडळी या एका शब्दावरून एपिसोड वाढवायची ताकद जबरदस्त आहे. अनामिकासारखी बिनधास्त बाई पट्याला विचारत नाही की तुझी बायको काय करते, मुलं किती आहेत वगैरे. बरं ती तर त्याला सगळं सांगून मोकळी होते मग हाच का मंडळी मंडळी करत असतो तेही गैरसमज होताहेत हे दिसत असून. पट्याला रामाची उपमा म्हणजे कै च्या कै आणि त्यात कहर म्हणजे तो रामनवमीला कृष्ण पोसिशन मध्ये उभा राहतो. कृष्णाची भूमिका केली तेव्हा तो सोळा वर्षाचा होता पण हे त्यातून बाहेर यायलाच तयार नाहीत. ह्या नं पटणाऱ्या गोष्टी सोडल्या तर बाकी बरी आहे. जोगबाई छान काम करतात. अनामिकाचे दुपट्टे छान असतात. अनामिका एक दिवस त्या आशुतोष केळकरसारखी सचिन आणि त्याच्या मंडळींना स्वतःच्या कंपनीत चिकटवून घेईल. इन्टीरीर म्हणजे वेगवेगळे डोळ्यात भरतील असे रंग, चौकोनी, त्रिकोणी आकार आणि जिथून तिथून लाईट लटकावलेले ही मालिकांची जुनी (गैर) समजुत आहे.

खरंय ते "मंडळी" बरोबर "पट्या" ही बोअर होतंय. "बेंबट्या ना आमचा? शुंभ!!" च्या चालीवर "बेंबट्या" म्हणा त्याला. त्याला नक्कीच ती आवडते, मग अगदी लग्नाचं विचारण्यापर्यंत उडी न का जाईना, "माझं लग्न झालं नाही" एवढं तोंड उघडुन सांगता येऊ नये?
त्या वल्लीनी ह्या सचिनशी का लग्न केलं असेल? ती सारखी पैसे-पैसे करत असते. मग न कमावणार्‍या आणि जुन्या वाड्यात रहाणार्‍या मुलाशी का लग्न करते?

चंपा मस्त पोस्ट. रामनवमी वगैरे बघितलं नाहीये.

तो बावळट पट्या, त्या दिवशीच्या फसवणूक करणाऱ्या कंपनीला धडा शिकवतानाच्या सीनमध्ये हीरो वाटला मात्र. हाच हीरोपणा वल्लीसमोर कुठे जातो, तिची नाटके ओळखता येत नाहीत का. तो एपिसोड मी बघितला त्यानंतर नाही.

त्या पट्याची ऑफिसची खोली उर्फ रूम बघवत नाही, तिला निदान कलर तरी काढून दे बाई अनामिका.

सचिन तेव्हा नोकरी करत असेल. वल्लीकडे काही कसब नाही आणि त्यात तिच्या वडिलांनाही पोसा. दोघांचाही नाईलाज असेल. त्यात रामाच्या अवताराने त्यांना वचन दिलंय ना आयुष्यभर सांभाळण्याचं. वाड्याची जमीन बिल्डरला विकली तर काही कोटी मिळतील. म्हणून तर ते पट्याकडून लिहून घेतात की तो वाड्यावरचा हक्क सोडून देईल

त्यात कहर म्हणजे तो रामनवमीला कृष्ण पोसिशन मध्ये उभा राहतो. >>>>>>> अनामिका पुन्हा त्याच्या आयुष्यात आल्यावर त्याचा राम अवतार सम्पून कृष्ण अवतार सुरु होईल अस सूचित करायच असेल त्यान्ना.

जोगबाई छान काम करतात. अनामिकाचे दुपट्टे छान असतात. >>>>>> अगदी अगदी

तो सचिन एवढा बुळया का दाखवलाय? त्याला काही मेण्टल प्रॉब्लेम असतो का?

त्या बावळट पट्याला कळत नाही का, तिला सांगून टाकावं लग्न केलं नाहीये मी, ती कशी लगेच सांगते डिव्होर्स बद्दल.

बरं ती ग्रेट वल्ली डबा धड देत नाही तर मावशीकडून डबा न्यायचा आणि पैसे द्यायचे तिला, असं तसं का खायचं वल्लीने दिलेलं.

परवडत नसेल त्याला. असंही वल्ली बऱ्याच वेळा बाहेरचंच खाते. राम अवतार संपून कृष्ण अवतार- हे लक्षात नव्हतं आलं माझ्या, भारी डोकं चालतं तुमचं सुलू.
पट्या असा वागतो आणि बोलतो जशी वल्ली त्याचीच बायको आहे. सचिन आणि वल्लीमध्ये काहीच understanding नाही.

Pages